हत्तीची माहिती Elephant Information In Marathi

elephant information in Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या सदरात आपण हत्ती विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत. लहानपणापासूनच आपण गणेशोत्सवात सहभागी झालो आहोत. गणेशोत्सवामध्ये आपण गणपतीची आराधना करतो. गणपती म्हणजेच आपण त्याला गजानन ही संबोधतो. गजानन म्हणजे गजमुख. गज म्हणजे हत्ती. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये पहिल्यापासूनच हत्ती ला खूप महत्त्वाचे स्थान आहे. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रत्यक्षपणे हत्तीची पूजा देखील केली जाते.
आपल्याला हत्ती या प्राण्याची थोडीफार कल्पना असली तरी आपण हत्ती ची रचना कशी असते यावर खोलवर माहिती पाहणार आहोत त्याबरोबरच हत्तीचा नैसर्गिक अधिवास , त्याची जीवनशैली, त्याचे मानवा बरोबर असलेले नाते व हत्ती ची सध्याची परिस्थिती यावर भाष्य करणार आहोत.

horse information in marathi

ELEPHANT-INFORMATION-IN-MARATHI
elephant information in marathi

हत्तीची रचना! (structure of the elephant) (Elephant Information In Marathi)

हत्ती म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये एलिफंट असे म्हणतो पण एलिफंट हा शब्द लॅटिन भाषेतील एलिफस या शब्दावरून आला आहे. वैज्ञानिक दृष्ट्या वर्गीकरण केले असता हत्ती हा प्राणी गटात मोडतो, त्याबरोबरच तो पाठीचा कणा असलेल्या उप वर्गात मोडतो. हत्ती हा सस्तन प्राणी आहे.हत्ती हा सर्वात मोठा अस्तित्वात असणारा प्राणी आहे. हत्तीचे तीन प्रमुख प्रजाती आहेत आफ्रिकन झुडूपातील हत्ती, आफ्रिकन जंगलातील हत्ती, आणि आशियाई हत्ती. त्याला काही हत्तींच्या प्रजाती ह्या लोप पावल्या आहेत त्यामधील मैमथ आणि सरळ हस्तिदंताच्या हत्ती. आफ्रिकन हत्ती आणि आशियाई हत्ती मध्ये खूप फरक दिसून आला आहे. आफ्रिकन हत्तीचे कान हे मोठे असून पाठ ही अंतर्वक्र असते. आशियाई हत्ती चे कान हे लहान असून पाठ ही बहिर्वक्र असते. आफ्रिकन नर 304 ते 336 सेंटिमीटर उंच असून आफ्रिकन मादा ही 247 ते 273 सेंटिमीटर उंच असते. आशियाई नर हा 261 ते 289 सेंटिमीटर उंच असून आशियाई मादा ही 228 ते 252 सेंटिमीटर उंच असते. आशियाई जंगलातील नर हा 209 ते 231 सेंटिमीटर उंच असतो. आफ्रिकन झुडुपातील नर हा 23 टक्‍क्‍याने मादीपेक्षा उंच असतो. त्याबरोबरच आशियाई नर हा मादीपेक्षा 15% टक्क्याने आणि उंच असतो. हत्ती मध्ये 326 ते 351 हाडे असतात. आफ्रिकन हत्ती मध्ये बरगड्यांच्या 21 जोड्या असतात पण आशियाई हत्ती मध्ये बरगड्यांच्या 19 ते 20 जोड्या असतात.

हत्तीचे डोके हे अतिशय लवचिक असते. लवचिक डोक्यामुळे हत्ती हत्ती मध्ये झालेल्या द्वंद्वात आणि हस्तिदंत यांमुळे बसलेल्या जबर धक्क्याचा कोणताही परिणाम हत्तींवर होत नाही. हत्तीच्या डोक्याच्या कवटीमध्ये हवेची पोकळी असते. यामुळे त्याला लवचिकता प्राप्त होते. हत्तीचे कान हे सुपासारखे असतात. यामध्ये असंख्य रक्तवाहिन्या पसरलेल्या असतात. या रक्तवाहिन्यांमधून अनावश्‍यक उष्णता ही वातावरणात फेकली जाते. त्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. हत्ती अगदी कमीत कमी वारंवारतेचे ध्वनि ऐकू शकतात. अगदी १ kHZ साठी सुद्धा त्यांचे कान संवेदनशील असतात.

हत्तीची सोंड म्हणजे नाक आणि वरचे ओठ यांचे संलयन असते. हत्तीच्या सोंडेमुळे हत्ती हा सर्वात विशिष्ट आणि वेगळा प्राणी आहे. . तसेच त्याच्या मध्ये एकही हाड नसून अगदी कमी प्रमाणात मेद असते. हत्तीची सोंड सरळ डोक्याच्या कवटीला जोडली गेलेली असते. हत्तीची सोंड ही घानेंद्रिय असून त्याचा उपयोग श्वसनासाठी ,स्पर्श करण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टीचे आकलन करण्यासाठी तसेच ध्वनी निर्माण करण्यासाठी होतो. हत्तीच्या सोंडेमध्ये जोरदार पकड, पिळणे आणि गुंडाळी करण्याची क्षमता असते.

हत्तीला सव्वीस दात असतात. तसेच दोन हस्तीदंत असतात जे सुळ्यासारखे बाहेर आलेले असतात. नर आणि मादी दोन्हीमध्ये हस्तिदंत हे 300 सेंटीमीटर म्हणजे नऊ फूट 10 इंच लांब असून 200 पाउंड म्हणजे 90 किलो वजनाची असतात. याच हस्तिदंत साठी हत्तींची मोठ्या प्रमाणात आफ्रिका आणि आशिया खंडात शिकार केली जाते.

हत्तीची त्वचा ही राखाडी असून ती खूप टणक असते. त्वचेची जाडी हि 2.5 सेंटिमीटर ,असून ती मुख गुदद्वार आणि कानाच्या आतील भागात पातळ असते. हत्तीच्या पिल्लाची केस हि लालसर असून ती मुख्यत: डोके आणि पाठीवर असतात.  प्रौढ हत्तींचे केस हे गडद रंगाचे असून नंतर विरळ होत जातात. आशियाई हत्तींची त्वचा ही मोठ्या प्रमाणात केसांनी भरलेली असते. या केसांचा उपयोग शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी केला जातो. केसान द्वारे शरीरातील उष्णता व बाहेरील वातावरणात विकली जाते.  त्याबरोबरच शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हत्ती हे चिखलामध्ये लोळतात. चिखल हा हत्ती साठी सनस्क्रीन लोशन चे काम करतो. तसेच हत्तींचे अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. चिखल स्नान केले नाही तर हत्तींची त्वचा मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकते तसेच त्वचा जळणे, कीटकांना पासून होणारा त्रास आणि आर्द्रता याची कमतरता इत्यादी अडचणी येऊ शकतात.

lion information in marathi

जीवनशैली आणि अधिवास! (Lifestyle and domicile!)

हत्ती हे सवांनाह, वाळवंट तसेच तलावांच्या किनारी आणि समुद्र सपाटीपासून उंच डोंगराळ भागात सुद्धा आढळतात.हत्ती हे मोठ्या प्रमाणात उप वाळवंटी आफ्रिका खंड ,दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया या ठिकाणी आढळतात. हत्ती हा शाकाहारी प्राणी असून तो पाण्याच्या शेजारील प्रदेशातच वावरत असतो. हत्ती झाडांची पाने ,फळे, फांद्या, गवत आणि मुळे खातो. तसेच तो एका दिवसात 150 किलो अन्न आणि 40 लिटर पाणी पिऊ शकतो.

मानवाशी असलेले नाते! (Relationships with humans!)

हत्तीला कामगार प्राणी सुद्धा म्हटले जाते कारण हत्ती हा मानवाच्या बऱ्याच कामांमध्ये मदत करतो. मोठमोठे लाकडाचे ओंडके वाहून नेले, रस्त्यांवरून आणि नद्यांमधून सुद्धा अवजड सामान वाहून नेणे, पर्यटकांना आपल्या पाठीवर बसवून राष्ट्रीय उद्यानांमध्ये फिरवणे, त्यांची सामान सुद्धा आपल्या पाठीवरून नेणे, अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये पालखी सोहळ्यामध्ये मध्ये कार्यक्रमाचे नेतृत्व करणे. इत्यादी बरीच कामे हत्तींकडून करून घेतली जातात.

त्याबरोबरच हस्तिदंत , हत्तींच्या मांसासाठी सुद्धा हत्तींची मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते.अगदी दहा बारा वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाला जंगलातून सापळा रचून पकडून आणले जाते व त्यांचा हस्तिदंत यांचा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर अगदी अनधिकृतपने प्राणी व्यवसाय केला जातो. सन

1979  1.3 दशलक्ष इतकी हत्तींची संख्या होती. पण सन 1989 पर्यंत ती 74 टक्क्यांनी घटली.  सन 2000 आशिया खंडात 13000-16500 हत्ती कामासाठी वापरण्यात आली आहेत. भारतामध्ये कामगार हत्ती हे संशयित रित्या फक्तमोठ्या प्रमाणात त्रास देण्यासाठीच पकडले जायचे असे निदर्शनात आले. त्यामुळे प्राणी क्रूरता प्रतिबंध कायदा 1960 च्या अंतर्गत हत्तींना संरक्षण देण्यात आले. भारत सरकार किंवा कोणत्याही देशाचे सरकार प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी निरनिराळे कायदे बनवत असते. पण त्याबरोबरच प्रत्येक नागरिकांचीही ही जबाबदारी आहे की कोणत्याही मूक प्राण्यांना किंवा जनावरांना त्रास देऊ नये.

cheetah information in marathi

हत्ती बद्दल मजेदार माहिती! (Funny information about elephants!)

 • हत्तीच्या मेंदूचे वजन हे 4.5 ते 5.5 किलोग्राम असते.
 • तसेच हृदय हे 12 ते 21 किलोग्राम असते.
 • शरीराचे तापमान 35.9 डिग्री सेल्सियस असून ते वातावरणाबरोबर बदलत जाते.
 • हत्ती दिवसातून तीन ते चार तास झोपतात आणि एका दिवसात दहा ते वीस किलोमीटर प्रवास करतात.
 • हत्तीच्या सोंडेत 150000 वेगवेगळे स्नायू असतात.
 • हत्ती सौम्य प्रकाशात पाहू शकतो पण अगदी प्रखर प्रकाशात प्रकाशात पाहू शकत नाही.

ox information in marathi

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा हत्ती प्राणी कसा आहे त्याच्या जाती कोणत्या व त्याचे जीवन कसे आहे. elephant information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच हा लेख कसा वाटला व अजून काही elephant information in Marathi / information on elephant in Marathi राहिली असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद. तसेच या लेखाचा वापर करून आपण information about elephant in marathi essay असा देखील करू शकता. या माहिती काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “हत्तीची माहिती Elephant Information In Marathi”

 1. हत्ती संरक्षण कायदा……
  |
  प्रस्तावना
  विषयाचे महत्त्व
  उद्दिष्टे
  कार्यपदधती
  निरीक्षणे
  विश् लेषण
  निष्कर्ष…

  Hya vishyavr वर lavkarat lavkr taka n sir praklpa baddl …

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!