आंबोली घाट निबंध मराठी Essay On Amboli Ghat in Marathi

Essay On Amboli Ghat in Marathi आंबोली घाट निबंध मराठी भारत देश हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे आणि भारतामध्ये अशी प्रत्येक राज्यामध्ये अनेक नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत आणि तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये तर सह्याद्री डोंगर रांगा हे एक मुख्य आकर्षण आहे आणि या ठिकाणी अनेक लोक किल्ले, घाट, घाटातील धबधबे, जंगले असे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी येतात. आणि आज आपण अश्याच एका सुंदर आणि सगळीकडे हिरवळ असणारा आंबोली घाट यावर माहिती घेणार आहोत. चला तर मग आंबोली घाट यावर निबंध लिहूया.

नैसर्गिक सुंदरता असणारे पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा आंबोली घाट हा सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक घात आहे. जो पर्यटन स्थळासाठी खूप प्रसिध्द आहे आणि या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी लोकांची खूप गर्दी असते. आंबोली घाटामधून जाताना आपल्याला एक धबधबा दिसतो आणि हा धबधबा रस्त्यावर आहे आणि या ठिकाणी लोकांची खूप गर्दी असते आणि या धबधब्या पासून आंबोली हे शहर २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे.

essay on amboli ghat in marathi
essay on amboli ghat in marathi

आंबोली घाट निबंध मराठी – Essay On Amboli Ghat in Marathi

Amboli Ghat Essay in Marathi

आंबोली घाट हा महाराष्ट्राच्या कोकण भागामध्ये येतो आणि त्या ठिकाणी राज्याच्या तुलनेने सर्वाधिक पावूस पडतो असे म्हंटले जाते आणि म्हणूनच या ठिकाणाला महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले तर काही हरकत नाही. घाटातून उंचीवरून पडणारे धबधबे, रस्त्यावर छत असल्यासारखी असणारी झाडे किंवा जंगले, हिरव्यागार आणि खोल दऱ्या, घाटातील उंच उंच कडा तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे घाटातून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या सर्व गोष्टी परायाताकांना भुरळ पडतात.

कर्नाटकातून आंबोली घाट हा खूप जवळ आहे आणि वेशेष करून बेळगाव पासून खूप जवळ आहे. त्यामुळे या ठिकाणी कर्नाटकातील पर्यटकांची गर्दी खूप पाहायला मिळते आणि असे म्हंटले जाते कि आंबोली घाट हा कर्नाटकातील म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातील लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे आणि हे त्यांना खूप जवळ देखील आहे.

तसेच या घाटाला भेट देण्यासाठी आणि येथील नैसर्गिक संपती पाहण्यासाठी गोवा या मोठ्या शहरातून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे या घाटावर लोकांना सुट्टी असलेल्या दिवशी खूप गर्दी असते कारण काहीजन घाटातील धबधबे पाहायला येतात, काहीजण घाटाची हिरवळ सुंदरता पाहायला येतात तर काहीजण घाटातील सुंदर असा सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहायला गर्दी करतात.

आंबोली घाट हा सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे जे समुद्र सपाटीपासून ६९० मीटर उंचीवर आहे. आंबोली घाट हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील एक लोकप्रिय घाट म्हणून ओळखले जाते आणि ह्या घाटावर लोकांची ये जा हि सतत सुरु असते तसेच गोव्याला जाणारे लोक हे याच मार्गावरून जातात.

आंबोली घाटाचे मुख्य आकर्षण म्हणजे धबधबा आणि हा धबधबा पारपोली या गावाजवळ आहे. आणि हा आंबोली शहरापासून ३ किलो मीटर अंतरावर आहे. आपल्याला या घाटामध्ये येताना अनेक नागमोडी वळणे घेत यावे लागते त्यामुळे या घाटाच्या रस्त्यावरील गाड्यांचा वेग देखील तसा आटोक्यात असतो.

आंबोली घाटामध्ये आपल्याला पारपोली गावाजवळील धबधबा, सूर्योदय आणि सूर्यास्त पॉइंट, कावळाशेत पॉइंट, नांगरतास धबधबा, महादेव गड आणि हिरण्यकेशी नदीचा उगम यासारखी अनेक ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात. या घाटातील हिरण्यकेशी नदीचा उगम हे एक घाटातील मुख्य पर्यटन स्थळ आहे.

या घाटामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम हा एका गुहेतून झाला आहे आणि मग तेथून ती पुढे वाहत गेली आहे आणि या ठिकाणाजवळ एक महादेव मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. तसेच पारपोली या गावाजवळ असणारा धबधबा हे अनेक लोकांचे मुख्य आकर्षण आहे आणि अनेक लोक हा धबधबा पाहण्यासाठी म्हणून फक्त आंबोली घाटावर येतात.

आंबोली घाटातील हा धबधबा घाटाच्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच जो रस्ता घाटा ला कर्नाटक राज्याशी आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडतो त्या रस्त्यावरच आहे आणि हे एक भव्य आकर्षण आहे कारण हा खूप उंचीवरून वाहतो आणि हे सौदर्य पावसाळ्यामध्ये पाहायला खूप छान वाटते. तसेच कावळशेत पॉइंट म्हणजे हा एक दरीच्या कडा असणारा भाग आहे आणि आपण तेथे हिरवीगार खोल दरी आहे आणि समोर येणारे डाग असतात.

या ठिकाणी दरीच्या कडेने लोखंडी तट आहे आणि तेथे उभारून पर्यटक या ठिकाणाचा आनंद घेतात. तसेच सूर्योदय आणि सूर्यास्त पॉइंट हे देखील या घाटावरील एक आकर्षण आहे कारण हे या घाटावरून खूप छान दिसते आणि जे सूर्यास्त आणि सूर्योदय प्रेमी आहेत ते या ठिकाणी येवून घाटातील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फेडून घेतात.

अश्या प्रकारे आपण घाटावर अनेक गोष्टी पाहू शकतो. तसेच या घाटातील विशेषता म्हणजे या घाटातील जी माकडे असतात ती आपल्या समोर अगदी न घाबरता येतात आणि आपण जर त्यांना खायला द्यायला लागलो तर ती ते आपल्या हातातून घेवून जातात.

जो पारपोली गावाजवळ धबधबा आहे त्या ठिकाणी आपल्याला चहाचे, किंवा मक्याची कणीस यासारखे छोटे गाडे पाहायला मिळतात तसेच त्याठिकाणी छोटी छोटी हॉटेल देखील आहेत त्यामुळे आपल्याला खाण्याची कोणतीच अडचण या घाटामध्ये येत नाही.

पावसाळ्याच्या दिवसामध्ये या घाटावर जाने थोडे धोक्याचे असते कारण मुसळधार पाऊस असतो आणि घाटावर जाण्यासाठी नागमोडी वळणे देखील आहेत आणि पावसाळ्यात या घाटावर दिवसभर धुके असतात त्यामुळे समोरचे काही दिसत नाही तसेच घाटांच्या उंच कड्यांवरून पाणी रस्त्यावर वाहत असते त्यामुळे पाऊस जर जोराचा असेल तर तुम्ही या घाटावर जाने शक्यतो टाळा.

आंबोली घाटाला ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. कि हा घाट मागच्या काही काळामध्ये सावंतवाडी या शहराची उन्हाळी राजधानी होती. तसेच भारतातील एक महत्वाची आणि सर्वांना माहित असणारी गोष्ट म्हणजे मिठाचा सत्याग्रह आणि हा मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गाधींनी आंबोली घाटाच्या मार्गाचा अवलंब केला होता आणि त्यांनी शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह केला होता.

तसेच आंबोली घाटावर आपल्याला महादेव गड देखील पाहायला मिळतो जो खूप जुना आहे आणि त्याला भक्कम असा बुरुज आहे ज्यावरून पूर्वी मार्गावर होणाऱ्या सर्व हालचालींवर नजर ठेवली जायची. तसेच हा किल्ला १८३० मध्ये लेफ्टनंट कर्नल मॉर्गन याने जिंकला होता असे इतिहासामध्ये म्हंटले जाते.

जर तुम्ही आंबोली घाटाला किंवा कोणत्याही पर्यटन स्थळाला भेट देणार असाल तर त्यापूर्वी त्या ठिकाणाबद्दलचा इतिहास जाणून घ्या त्यामुळे त्या ठिकाणाची मजा घेणे खूप सोपे जाईल. आंबोली घाट हा कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा घाट आहे आणि तुम्ही जर कर्नाटकातून येत असाल तर हा  घाट बेळगाव पासून फक्त ६८ किलो मीटर आहे तसेच हा घाट मुंबई पासून ४८६ किलो मीटर आहे आणि पुणे शहरापासून हा ३४३ किलो मीटर आहे आणि तुम्ही या घाटाला भेट देण्यासाठी जर तुमची स्वताची कार घेवून आला तर ते सोयीचे ठरले.

अश्या प्रकारे आंबोली हा घाट निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि कित्येक पर्यटकांना भुरळ पाडणारे हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.

आम्ही दिलेल्या essay on amboli ghat in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आंबोली घाट निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या amboli ghat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि amboli ghat nibandh in marahi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये amboli ghat nibandh marahi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!