Essay on Clock in Marathi Language – Ghadyal Naste Tar Marathi Nibandh घड्याळ निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये घड्याळ (Essay on clock ) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. घड्याळ म्हणजे काय हे कोणाला माहित नाही हे सर्वांना माहित आहे आणि हि अशी वस्तू आहे जी वेळ दर्शवते. घड्याळाचा वापर हा लोक रोजच्या जीवनामध्ये करतात म्हणजेच त्याचा वोर हा प्रत्येक मिनिटासाठी केला जातो आणि घड्याळ हे वेळ पाहण्यासाठी वापरले जाते. पूर्वीच्या काळामध्ये जरी घड्याळ हि वस्तू नसली तरी आपण सूर्याच्या हालचालीवरून किती वाजलेलेल आहे ते ठरवत होतो म्हणजेच सूर्य पूर्णपणे उगवला कि ती सकाळ झालेली असायची तसेच सूर्य डोक्यावर आला कि त्यावेळी दुपार झालेली असायची आणि सूर्य मावळला कि ती संध्याकाळ झाली असे समजले जायचे.
परंतु सध्या घड्याळ ह्या नावाच्या वस्तूमुळे आपल्याला वेळ किती झाला आहे ते समजते आणि तसेच घड्याळ मुळे आपल्याला दिवसभराची कामे नियोजन करून करता आली. घड्याळ हा शब्द clocca या लॅटिन शब्दापासून आला आहे आणि घड्याळ या वस्तूला इंग्रजीमध्ये clock म्हणतात आणि हिंदिमध्ये घड्याळला घडी या नावाने ओळ्खले जाते.
घड्याळ निबंध मराठी – Essay on Clock in Marathi Language
घड्याळ नसते तर मराठी निबंध – Ghadyal Naste Tar Marathi Nibandh
खूप पूर्वीच्या काळी जरी घड्याळ नसले तरी सूर्याच्या हालचालीवर वेळ ठरवली जायची आणि याच पध्दतीला ३५०० वर्षापूर्वी सूर्य घड्याळ या नावाने ओळखले जात असावे आणि आणि घड्याला विषयी असे देखील म्हटले जाते कि घड्याळाचा वापर सर्वप्रथम ६०० वर्षापूर्वी केला होता. मधल्या काळामध्ये एक काचेची वस्ती घड्याळ म्हणून वापरली जायची आणि वस्तू वरच्या भागाला थोडी पसरत आणि मध्य भागी एकदम निमुळती आणि खाली आणि पसरत होती आणि त्यामध्ये वाळू घातली जायची आणि ती वाळू अगदी हळू हळू त्या निमुळत्या भागातून खाली जायची आणि यावरून वेळेचा अंदाज काढला जायचा.
आता जे आपण घड्याळ वापरतो त्या घड्याळाची कल्पना हि इजिप्त लोकांची असावी कारण त्यांनी प्रत्येक दिवस हा तासामध्ये आणि तासांचे विभाजन मिनिटामध्ये करण्याचा विचार केला होता आणि हि कल्पना तेथूनच आली होती तसेच पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे हि इजिप्त मध्येच वापरली जायची.
घड्याळ हे आपल्या जीवनातील एक महत्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्याला दिवसाचा वेळ समजतो आणि आपण दिवसभराच्या वेळेनुसार आपण आपल्या कामाचे नियोजन करू शकतो किंवा कामे ठरवू शकतो ज्यामुळे आपली कामे गडबडीने होतात तसेच नियोजन केल्यामुळे दिवसभरामध्ये अनेक कामे होतात. घड्याळ मध्ये आपण सकाळी लवकर उठण्यासाठी गजर ( alarm ) लावू शकतो तसेच आपल्याला कोणती तरी गोष्ट ठराविक वेलेमाढेच करायची असल्यास आपण त्या वेळेसाठी टायमर देखील लावू शकतो.
घड्याळाची दोन भागामध्ये विभागाबी केली आहे आणि ते म्हणजे भिंतीवरचे घड्याळ आणि हातातले घड्याळ. भिंतीवर लावलेल्या घड्याळाला clock या नावाने इंग्रजीमध्ये ओळखले जाते आणि हे घड्याळ मोठ्या आकाराचे असते आणि हे घड्याळ आपण घरामध्ये भिंतीवर किंवा मोठ मोठ्या कार्यालयामध्ये, दवाखान्यांच्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या दुकानांच्या मध्ये, हॉटेल मध्ये आणि शाळेमध्ये देखील भिंतीवरचे घड्याळ वापरले जाते आणि अश्या प्रकारे भिंतीवरच्या घड्याळाचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी होतो.
तसेच आपण जे हातामध्ये घड्याळ घालतो ते आकाराने छोटे म्हणजे आपल्या मनगटावर बसेल इतके असते आणि याचा वापर आपण आपल्या मनगटावर घालून केंव्हाही म्हणजेच चालता – बोलता कधीही करू शकतो. हातामध्ये जे घड्याळ घातले जाते त्या घड्याळाला इंग्रजीमध्ये watch या नावाने ओळखले जाते.
घड्याळाचा आकार गोल, चौकोनी, आयताकृती, षटकोनी असा कसाही असू शकतो आणि घड्याळामध्ये १ ते १२ नंबर असतात आणि घड्याळाला तीन काटे असतात आणि ते म्हणजे एक तास काटा, एक मिनिट काटा आणि एक सेकंद काटा. घड्याळातील सेकंद काटा हा वेगाने फिरतो आणि मिनिट काटा मध्यम वेगामध्ये फिरतो आणि तास काटा खूप कमी वेगाने फिरतो. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईम झोन आहे म्हणजेच जसे कि आपल्या देशामध्ये सकाळ असली तर काही इतर देशामध्ये संध्याकाळ असते.
चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपमध्ये मानवी इतिहासातील पहिल्या घड्याळाचा शोध लागला आणि घड्याळे वाहनाने चालणारी होती आणि त्याची यंत्रणा अतिशय नाजूक होती. १६०० व्या शतकामध्ये या घड्याळांच्या बाह्य रचनेमध्ये बदल झाले होते. त्याचबरोबर १९ व्या शतकामध्ये बॅटरी आणि क्वार्ट्ज चे घड्याळ विकसित झाले आणि यामुळे येथून पुढे घड्याळा बद्दलच्या अनेक नवीन कल्पना उदयास आल्या अश्या प्रकारे घड्याळाची निर्मिती झाली.
घड्याळ हे आपल्याला वेळ समजण्यासाठी वापरले जाते आणि हे भिंतीवर लावले जाते आणि घड्याळ हे सेलवर चालते आणि त्याचे सेल संपले कि ते आपल्याला बदलावे लागतात नाही तर सेल संपल्यानंतर ते बंद पडते. घड्याळ हि अशी वस्तू आहे जी न थकता आणि न थांबता काम करते आणि आपल्याला वेळेचे मार्गदर्शन करते. त्या मधील सेल संपल्यानंतर किंवा काही बिघाड झाला तरच ते काम करणे बंद करते. घड्याळाचे जे काटे असतात ते बहुतेक रेडीयमचे असतात कारण ते रात्रीचे चमकतात.
आपल्याला भिंतीवर अडकवायचे घड्याळ किंवा मनगटावर घालायचे घड्याळ हे घड्याळाच्या कोणत्याही दुकानामध्ये मिळू शकते आणि त्या ठिकाणी भिंतीवर अडकवायची किंवा हातामध्ये घालायची वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे असतात. भिंतीवरच्या घड्याळला प्लास्टिक, फायबर किंवा लाकडी फ्रेम असते आणि त्याच्या आतमध्ये १ ते १२ अंक असतात आणि तीन काटे असतात ते म्हणजे तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा आणि वर काचेने झाकले असते आणि अश्या प्रकारे भिंतीवर अडकवायचे घड्याळ हे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असते.
तसेच जर मनगटावर बांधायची घड्याळे म्हटला तर त्यामध्ये अनेक वेगवेगळे डिझाईन असतात आणि मुलांची वेगळ्या प्रकारची डिझाईन असतात तर मुलींची वेगळ्या प्रकारची डिझाईन असतात. सध्या बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या ब्रँडची घड्याळे बाजारामध्ये असतात तसेच घड्याळ्यांच्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ठ्ये देखील असतात जसे कि घड्याळे वेळेसोबत तारीख देखील दाखवतात.
तसेच घड्याळांच्या मध्ये आपण किती पावले चाललो तसेच आपल्या हृदयाचे ठोके देखील दाखवतात आणि काही घड्याळ पाण्यामध्ये जरी टाकले तरी काय होत नाही अश्या वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळी वैशिष्ठ्ये असणारी घड्याळांची निर्मिती आधुनिक काळामध्ये झाली आहे. अश्या प्रकारे घड्याळ हे आपल्या रोजच्या जीवनासाठी उपयुक्त आहे कारण आपल्याला घड्याळामुळे वेळ समजतो.
आम्ही दिलेल्या Essay on Clock in Marathi Language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर घड्याळ निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ghadyal naste tar marathi nibandh या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on autobiography of clock in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट