Essay on Computer in Marathi संगणक निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये कॉम्प्युटर म्हणजेच ज्याला मराठी मध्ये संगणक म्हणतात त्या उपकरणावर निबंध लिहिणार आहोत. संगणक हा आधुनिक जगातील लोकांच्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे आणि संगणकामुळे आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. संगणक हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा पूर्वी उपयोग फक्त मोजण्याचे यंत्र म्हणून केले जायचे. संगणकामुळे कामाचा वेग वाढला तसेच कामामध्ये अचूकता मिळू लागली, त्यामुळे लोक त्यावर अवलंबून राहू लागले.
संगणक निबंध मराठी – Essay on Computer in Marathi
Sanganakache Mahatva Nibandh
संगणक म्हणजे काय ?
संगणक हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे वापरकर्त्याने दिलेल्या सूचना प्राप्त करते आणि प्रोग्रॅम वापरून वापरकर्त्याला संख्यात्मक माहिती किंवा महत्वाची माहिती देते.
संगणकाचा इतिहास
१८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज याने पहिल्या यांत्रिकी संगणकाचा शोध लावला होता आणि म्हणूनच त्यांना संगणकाचा जनक असे मानले जाते. त्याचबरोबर जगातील पहिले संगणक चिन्ह हे १९४४ मध्ये हॉवर्ड विद्यापीठा मध्ये झाले. मग १९४५ मध्ये डॉ फॉन न्यूमन यांनी संगणक क्रांतीला योग्य दिशा दिली.
तसेच त्यांनी एक कीबोर्ड देखील डिझाईन केला आणि त्यामध्ये इनपुट, आऊटपुट, अंकगणित, तर्क एकके होती. मग १९४५ मध्ये जगातील पहिला पूर्णपणे जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक बनवला गेला आणि अश्या प्रकारे जस जसे दिवस जातील तसतसा संगणक विकसित होत गेला.
संगणक हे आपले काम खूप वेगामध्ये करू शकते तसेच एका वेळी अनेक कामे आपल्याला संगानावर करता येतात, त्याचबरोबर आपण संगणकामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवून ठेवू शकतो तसेच आपण संगणकामध्ये महत्वाच्या नोंदी देखील खूप मोठ्या काळासाठी जतन करून ठेवू शकतो.
अशा प्रकारे आपण संगणकाचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करू शकतो आणि संगणक हे आपल्याला मिळालेले एक वरदानच आहे असे मी मानतो. संगणकाचा उपयोग हा आपण सर्व अधिकृत कामांच्यासाठी करू शकतो. संगणकचा उपयोग हा सर्व क्षेत्रामध्ये केला जातो जसे कि शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, आय टी क्षेत्रामध्ये, वाणिज्य विभाग आणि इतर भागामध्ये संगणक वापरला जातो.
संगणक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी त्याच्या हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर वर अवलंबून असतो. हार्डवेयर म्हणजे संगणकाचे जे भाग ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो तसेच त्यांना स्पर्श करू शकतो आणि सॉफ्टवेयर म्हणजे संगणक चांगल्या रीतीने काम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचनांचा किंवा प्रोग्रॅमचा संच ज्याला आपण डोळ्याने पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही.
तसेच सॉफ्टवेयर हा एक प्रोग्रॅम असून हे संगणकाला कसे काम करायचे याबद्दल सूचना देते. सीपियू, मॉनीटर, कि बोर्ड, माऊस, प्रिंटर, आणि युपीयस हे संगणकाला जीडलेले काही उपकरणे आहेत.
१८२२ मध्ये चार्ल्स बॅबेज याने पहिल्या यांत्रिकी संगणकाचा शोध लावला होता संगणक हे १९४० मध्ये विकसित झाले होते मग त्याचा वापर झपाट्याने वाढत गेला आणि संगणकाचा वापर शाळा, महाविद्यालय, हॉटेल, दुकान, घरी वापरला जातो आणि आता लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांना संगणक कसा वापरायचा ते माहित आहे.
जगामध्ये जसजसा संगणकाचा वापर वाढला तसतसे प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाची गरज भासू लागली आणि कामकाजासाठी संगणक वापरले जावू लागले आणि त्यामुळे काम करणे आणि वर्गीकरण करणे खूप सोपे झाले. संगणकचा वापर संशोधन क्षेत्रामध्ये केला जातो आणि यामुळे अंतराळ संशोधन, वैज्ञानिक संशोधन आणि सामाजिक संशोधन करणे खूप सोपे झाले आणि संशोधनाला वेग आला.
अशा प्रकारे संगणकाचा उपयोग रोगाचे निदान करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. तसेच संरक्षक कंपन्या देखील संगणकाचा वापर करतात. तसेच सरकारी क्षेत्रातील संगणकांचा वापर विविध कार्ये करण्यासाठी आणि त्यांच्या सेवा सुधारण्यासाठी केला जातो.
सरकारी क्षेत्रामध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये डेटा प्रोसेसिंग कार्ये, नागरिकांच्या डेटाबेसची देखभाल करणे आणि पेपरलेस वातावरणाचा प्रचार करणे हे संगणक वापरण्याचे प्राथमिक हेतू सरकारी क्षेत्राचा असतो. तसेच शाळेमध्ये ऑनलाइन वर्ग, ऑनलाइन शिकवणी, ऑनलाइन परीक्षा तसेच मुले अनेक प्रकारचे प्रकल्प बनवण्यासाठी देखील संगणकाचा वापर केला जातो.
अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर केला जातो. आपण संगणकावर टाईप करू शकतो, गेम खेळू शकतो, इमेल पाठवू शकतो, स्प्रेडशीट बनवू शकतो तसेच सांगण वापरून वेब ब्राऊज केले जाते अश्या प्रकारे आपण वेगवेगळे संगणकाचे उपयोग करू शकतो.
संगणकाचे महत्व निबंध मराठी – Essay on Importance of Computer in Marathi Language
संगणक हा इनपुट, प्रक्रिया आणि आऊटपुट या तीन चक्रामध्ये आपले कार्य करतो असतो म्हणजेच आपण दिलेल्या माहितीची प्रक्रिया करतो आणि मग त्याचे रुपांतर आऊटपुट मध्ये देतो किंवा त्यांचे परिणाम देतो. इनपुट उपकरणे ही अशी उपकरणे आहेत जी सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये माहिती प्रविष्ट करण्यासाठी वापरली जातात
आणि त्याची काही उदाहरण म्हणजे कीबोर्ड, माउस, डॉक्युमेंट रीडर, बारकोड रीडर, मॅग्नेटिक रीडर हि काही संगणकाला इनपुट देण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे आहेत. त्याचबरोबर आउटपुट उपकरणे ही अशी उपकरणे आहेत जी प्रक्रिया केलेली माहिती मानवाला वाचता येतील अश्या स्वरूपात प्रदान करतात.
संगणकाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे त्यांच्या क्षमतेनुसार काम करतात. सूक्ष्म संगणक (micro computer) हा एकल वापरकर्ता संगणक आहे ज्याची गती आणि संचयन क्षमता इतर प्रकारांपेक्षा कमी आहे आणि सूक्ष्म संगणकाची उदाहरणे म्हणजे पीसी, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि संगणक हि आहेत.
त्याचबरोबर मोठ्या कंपन्या आणि सरकारी संस्था त्यांचे व्यवसाय ऑपरेशन्स चालविण्यासाठी मेनफ्रेम या संगणकाचा वापर करतात कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती साठवण्याची क्षमता असते. त्याचबरोबर सुपर कॉम्प्युटर हे सर्वात वेगवान आणि सर्वात महाग संगणक आहेत आणि या संगणकाची स्टोरेज आणि संगणन गतीची प्रचंड क्षमता आहे आणि त्यामुळे ते प्रति सेकंद लाखो सूचना करू शकतात.
संगणकामुळे कामाचा वेग वाढतो त्याचबरोबर तसेच एका वेळी अनेक कामे होवून जातात आणि ती खूप वेगाने होतात त्याचबरोर संगणक मोठ्या प्रमाणात माहितीची नोंद करून घेवू शकते. संगणक मानवी जीवनाचा भाग नसता तर मानवाचे जीवन इतके सोपे झाले नसते हे निश्चितच माहीत आहे. कारण संगणकामुळे अनेक कामे सोपी झाली म्हणजेच एका वेळी जास्त कामे होऊ लागले तसेच कामाचा वेग देखील वाढला. अश्या प्रकारे अंगानाकाचे महत्व आपल्या जीवनामध्ये वाढत गेले.
आम्ही दिलेल्या Essay on Computer in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर संगणक निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on importance of computer in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on computer in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on advantages and disadvantages of computer in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट