नोटबंदी निबंध मराठी Essay on Demonetization in Marathi

Essay on Demonetization in Marathi – Demonetization Information in Marathi नोटबंदी निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये demonetization म्हणजेच नोटाबंदी या विषयावर निबंध लिहिणार आहोत. नोटाबंदी म्हणजे काय हा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडला असेल पण नोटा बंदी म्हणजे हि एक कायदेशीर रित्या केली जाणारी निविदा म्हणून काम करते ज्यामध्ये वापरात असलेलेली चलन बंद करून किंवा जुने चलन बंद केले जाते आणि त्याजागी दुसरे चलन वापरात आणण्याची घोषणा केली जाते. नोटाबंदीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने विशिष्ट मुल्ल्याच्या नोटा आणि नाण्यांच्यावर बंदी घातली जाते.

नोटाबंदी झाली कि ज्या आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी वापरात असलेल्या जुन्या नोटा बंद करून आपल्याला सरकारने चलनात आणलेल्या नवीन नोटा वापराव्या लागतात. अनेकांना असा प्रश्न पडला असेल कि नोटाबंदी का केली पाहिजे आणि त्यामुळे काय होते. अनेक देश त्यांच्या देशातील अनेक समस्या सोडवण्यासाठी नोटाबंदी या शास्त्राचा वापर करतात जसे कि चलनाचे मूल्य स्थिर करण्यसाठी किंवा मग चलन वाढ सामना करण्यासाठी नोटाबंदीचा मार्ग वापरतात.

तसेच काही विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेचे अधुनीकरण करण्यासाठी, भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी, बनावट आणि कर चोरी ह्या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी नोटा बंदी केली जाते.

essay on demonetization in marathi
essay on demonetization in marathi

नोटबंदी निबंध मराठी – Essay on Demonetization in Marathi

Demonetization Information in Marathi

भारताने तर नोताबंदीची घोषणा झालेली एकरात्री मध्ये पहिली आहे आणि पूर्वी ज्यावेळी व्या शतकामध्ये मोहम्मद बिन तुघलकने एक प्रशासकीय उपाय म्हणून त्यांनी त्यांचे चलन बदललेले होते त्यावेळी अनेक लोकांना त्रास झाला होता आणि अनेक लोकांना या निर्णयामुळे मोहम्मद बिन तुघलक नापसंतीस आला होता.

भारतामध्ये देखील सध्या नोटाबंदीची घोषणा केली होती, ज्यावेळी नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान बनले त्यावेळी त्यांनी सर्व काळ्या धंद्यांच्यावर तसेच भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये एक रात्रीच्या निर्णयामुळे नोटाबंदीची घोषणा केली होतो आणि त्यावेळी चलनात असणाऱ्या ५०० च्या आणि १००० रुपयाच्या जुन्या नोटा बंद करू त्यांनी ५०० रुपयाच्या आणि २००० रुपयाच्या नवीन नोटा चलनात आल्या आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला थोड्या प्रमाणात आळा बसला परंतु लोकांना त्यामुळे थोडा त्रास देखील झाला.

नोटाबंदी केल्यामुळे भारतामध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून आले होते. ज्यावेळी म्हणजेह २०१६ मध्ये नोटाबंदीची घोषणा करण्यात आली त्यावेळी लोकांना आपले चलन बदलण्यासाठी बँकेमध्ये जावे लागले पण त्यामुळे अनेक भ्रष्टाचारांना आळा बसला म्हणजेच काळा पैसा बाहेर पडण्यास मदत झाली तसेच आतंकवाद्यांना जो वित्तपुरवठा होत होता तो बंद झाला तसेच नोटाबंदी मुळे बँकेतील व्याजदर कमी होण्यास मदत झाली.

तसेच नोटा बंदीमुळे कर टाळणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आणि ते नियमितपणे कर भरू लागले आणि अश्याप्रकारे वेगवेगळ्या गोष्टींच्यामध्ये सुधारणा झाली. नोटाबंदी मुले जरी अनेक फायदे झाले असले तरी नोटा बंदी केल्यामुळे अनेक वाईट आणि नकारात्मक परिणाम देखील दिसून येतात आणि ते एखाद्या सत्तेसाठी खूप हनीकरण असून शकते म्हणून नोटाबंदीची घोषणा करताना सरकार नीट विचात करूनच करते.

नोटाबंदी केल्यामुळे अनेक परिणामांना सामोरे जावे लागते आणि त्यामधील एक म्हणजे रोखीची कमतरता किंवा तुडवडा. नोटा बंदी केल्यामुळे रोखीचा तुटवडा भासतो आणि २०१६ मध्ये नोटाबंदी केल्यामुळे लोकांना ह्याच समस्येला सामोरे जावे लागले होते. तसेच या निर्णयाचा परिणाम हा ग्रामीण भागामध्ये देखील पाहायला मिळतो कारण ग्रामीण भागामध्ये अनेक लोक शेतीवर अवलंबून असतात आणि शेती हे असे क्षेत्र आहे जे पूर्णपणे रोखीवर अवलंबून आहे आणि असे अनेक लोक आहेत.

ज्यांची आर्थिक साक्षरता चांगला नाही तसेच त्यांना डिजिटल व्यवहार याबद्दल माहित नाही. नोटा बंदी मुळे देशाला झालेले अनेक फायदे पाहायला मिळाले जसे कि आपल्या देशामध्ये वापरात असलेल्या अनेक बनावट नोटांचा भारतातील अर्थव्यवस्थेवर अनेक वाईट परिणाम होत होते परंतु अचानक नोटा बंदीच्या निर्णयामुळे बनावट नोटांचा व्यवहार बंद झाला आणि त्या अर्थ व्यवस्थेतून काढून टाकण्यात आला त्याचबरोबर रियल इस्टेट हा एक व्यवसाय आहे.

जो काळ्या पैश्याच्या आधारावर चालतो आणि नोटा बंदी मुळे यामधील काळ्या पैश्याचा व्यवहार थांबला, बँकेतील ठेव वाढण्यास मदत झाली कारण नोटाबंदी मुळे पूर्वीचे चलन हे बंद होणार होते आणि ज्या लोकांच्या कडे हे चलन होते त्यांनी ते बँकेमधून बदलून घेवून, बँकेमध्ये ठेव ठेवली आणि यामुळे बँकांना खूप फायदा झाला. परंतु नोटाबंदी मुळे रोखीवर चालणारे अनेक छोटे उद्योग बंद झाले आणि त्यामुळे अनेक छोटे उद्योग आर्थिक संकटामध्ये सापडले आणि तसेच अनेक कारखाने दुकाने बंद ठेवावी लागली आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला.

ज्यावेळी भारतामध्ये नोटा बंदी करण्यात आली त्यावेळी भारतामध्ये देखील त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळाले तसेच भारतातील बहुतांश लोकांना नोटाबंदी हि संज्ञा माहित नव्हती त्यामळे अनेक लोक गोंधळात पडले होते तसेच ते जुन्या चलनातील नोटा बदलून नवीन चलनातील नोटा घेण्यासाठी बँकेमध्ये गर्दी करत होते.

तसेच भारतामध्ये ८० ते ८५ टक्के व्यवहार हे रोखीने होतात परंतु नोटा बंदी मुळे रोखीचा तुटवडा भासू लागला आणि त्यामुळे अनेक रोखीचे व्यवहार बंद झाले त्यामुळे लोकांचे नुकसान झाले आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील फटका बसला. नोटा बंदीचा हा परिणाम थोडे दिवस देशामध्ये तसाच राहिला आणि त्यामुळे देशाच्या GDP मध्ये घट झाली आणि अश्या प्रकारे देशाला अनेक आर्थिक संकटांचा देखील सामना करावा लागला.

नोटाबंदी मुळे सोने व्यवसायामध्ये देखील परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ते म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या अविवाहित महिला त्यांच्या जवळ २५० ग्रॅम पेक्षा जास्त सोने ठेवू शकत नाहीत तसेच विवाहित महिला ५०० ग्रॅम पर्यंत सोने ठेवण्याची मर्यादा आहे. तसेच कुटुंबातील पुरुष सदस्य फक्त १०० ग्रॅम सोने स्वता जवळ ठेवू शकतो. तसेच इक्विटी आणि म्युचल फंड, इ – वॉलेट, रियल इस्टेट अश्या अनेक गोष्टींच्यावर परिणाम झाला.

अश्या प्रकारे नोटाबंदी हि काही कारणांच्यासाठी चांगली ठरते तर काही कारणांच्यासाठी नोटाबंदीचे अनेक नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. जगामध्ये अनेक देश वेगवेगळ्या कारणांच्यासाठी नोटाबंदी हा पर्याय निवडतात आणि त्याचे काही वेळेला चांगले परिणाम पाहायला मिळतात तर काही वेळेला त्याचे वाईट परिणाम पाहायला मिळतात.

आम्ही दिलेल्या Essay on Demonetization in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर नोटबंदी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या demonetization information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of Demonetization in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!