माझा आवडता नेता नरेंद्र मोदी निबंध Essay on Maza Avadta Neta in Marathi

Essay on Maza Avadta Neta in Marathi माझा आवडता नेता नरेंद्र मोदी निबंध आज जगभरामध्ये अनेक नेते होऊन गेले तसेच भारतामध्ये देखील अनेक वेगवेगळे नेते होऊन गेले आहेत आणि त्यामधील काही नेत्यांनी अनेक लोकांच्या मनामध्ये घर केले आहे आणि प्रत्येकाचे कोणी ना कोणी प्रेरणा स्थान असते जसे माझे देखील आहे. आज आपण या लेखामध्ये माझा आवडता नेता यावर निबंध लिहिणार आहोत. चला तर मग आता आपण माझा आवडता नेता या विषयावर निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.

माझा आवडता नेता दुसरे तिसरे कोणी नसून सध्या आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी हे आहेत. नरेंद्र मोदी यांचा जन्म १९ सप्टेंबर १९५० मध्ये महेसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावामध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी असे होते. नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नाव दामोदर मोदी आणि आईचे नाव हिराबेन मोदी असे होते.

essay on maza avadta neta in marathi
essay on maza avadta neta in marathi

माझा आवडता नेता नरेंद्र मोदी निबंध – Essay on Maza Avadta Neta in Marathi

Maza Avadta Neta Essay in Marathi

नरेंद्र मोदी यांना ५ भावंडे आहेत आणि त्यामधील ते तिसरे आहेत. त्यांनी १९६७ मध्ये वड नगर येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या ८ व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी घर सोडले आणि मग २ वर्ष संपूर्ण देश फिरला.

नरेंद्र मोदी १९७० मध्ये म्हणजेच वयाच्या २० व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतका प्रभाव पडला कि ते पूर्णवेळ प्रचारक बनले आणि म्हणून त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी औपचारिक पणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक विद्यार्थी शाखा स्थापन केली आणि याचा त्यांना राजकीय कारकीर्दीमध्ये खूप फायदा झाला. दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निगमधुन राज्य शास्त्रातील कला शाखेची पदवी मिळवली.

नरेंद्र मोदी हे चहा विकणाऱ्या मुलापासून ते विकासाभिमुख नेता बनलेले ते एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व बनले तसेच त्यांनी यश हे जात, पंथ, परिस्थिती किंवा व्यक्ती याच्याशी काहीही संबध नसतो हे त्यांनी सिद्ध करून संपूर्ण जगासमोर एक उत्तम उदाहरण बनले आहेत. नरेद्र मोदी हे २०१४ पासून भारताचे पंतप्रधान आहेत आणि ते आज देखील भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी त्या अगोदर गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री पद देखील सांभाळले आहे. नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये वाराणसी या मतदान संघाचे प्रतिनिधित्व करतात तसेच ते त्यांच्या पक्षाचे प्रमुख रणनीतीकार म्हणून ओळखले जातात.

नरेद्र मोदी यांची मुख्य राजकीय कारकीर्द हि इ.स १९८७ पासून झाली कारण त्यांनी इ.स १९८७ भाजपमध्ये ( BJP ) प्रवेश मिळवला आणि त्यांना एक वर्षानंतर त्यांना पक्षाच्या गुजरात शाखेचे सरचिणीस बनण्याचे यश मिळाले. त्यांनी पक्ष्यांच्या यशस्वी प्रचारात एक महत्व पूर्ण भूमिका बजावली त्यामुळे त्यांना पक्ष्याचे रणनीतीकार म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली.

त्याचबरोबर १९८८ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत गुजरात भाजप हा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्ष बनला. नरेंद्र मोदी यांना विविध राज्यामध्ये पक्ष्याचे संघटन सुधारण्याची जबाबदारी पार पडण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले. इ.स १९८८ मध्ये ते महासचिव बनले आणि २००१ पर्यंत त्यांनी महासचिव या पदाची जबाबदारी पार पाडली.

२००१ मध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी गुजरातचा कारभार हाती घेतला आणि ते सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमत्री बनले. त्याचबरोबर त्यांनी २४ फेब्रुवारी २००२ रोजी त्यांनी गुजरात राजकोट २ मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांनी ती निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली. तसेच त्यांनी २६ मे २०१४ रोजी शपथ घेतली.

२००२ मध्ये ते गुजरातचे मुख्यमात्री झाल्यानंतर त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी व्यापारी आणि उद्योजकांच्यासाठी त्यांनी आकर्षक ठिकाण बनवले तसेच त्यांनी गुजरातमध्ये कृषी विकास दर सुधारला आणि सर्व गावांना वीज पुरवून दिली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना सरकारच्या पाठिंब्याने भूजल संवर्धन प्रकल्प उभारले.

यामुळे कूपनलिकांद्वारे सिंचनाची सोय करून बीटी कपाशीची लागवड करण्यास मदत झाली होती. मोदींच्या राजवटीत गुजरात राज्यात प्रत्येक गावात वीज पोहोचवली. कृषी वीज ग्रामीण वीजेपासून वेगळी करून राज्यातील वीज वितरणाची व्यवस्थाही त्यांनी बदलली तसेच गुजरात राज्यात परकीय गुंतवणुकीला आमंत्रण देण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले होते.

भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी “स्वच्छ भारत अभियान“, “मेक इन इंडिया”, “स्वच्छ गंगा” इत्यादी अनेक महत्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू केले आहेत. जगातील इतर देशांसोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

नरेन्द्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक योजना राबवल्या त्यामधील काही खाली दिल्या आहेत.

  • मध्यम आणि लघु उद्योगांसाठी बँकिंग सेवांसाठी मुद्रा बँक योजना.
  • ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी संसद आदर्श ग्राम योजना.
  • आर्थिक समावेशनासाठी प्रधानमंत्री जन धन योजना.
  • चांगल्या स्वच्छता सुविधा आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन.
  • मुलांचे वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये वाढवण्यासाठी पढे भारत बढे भारत.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बीपीएल म्हणून राहणाऱ्या कुटुंबांना एलपीजी पुरवते.
  • सिंचनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना.
  • प्रधानमंत्री आवास योजना सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देते.
  • ऑनलाइन दस्तऐवज सुरक्षित करण्यासाठी डिजिलॉकर.
  • शालेय रोपवाटिका योजना हि एक तरुण नागरिकांद्वारे आणि त्यांच्यासाठी एक वनीकरण कार्यक्रम आहे.
  • युवा कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना.

नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वेगवेगळ्या चांगल्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आणि त्यामधील काही खाली सांगितले आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अफगाणीस्थानचा सर्वोच्च नागरी सन्मान अमीर अमानुल्ला खान हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. तसेच नरेंद्र मोदी हे फोर्ब्स च्या जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीच्या यादीत २०१८ मध्ये ते ९ स्थानावर आहेत.

२०१९ मध्ये त्यांना पहिला फिलीप कोटलर प्रेसिडेन्सशियल हा पुरस्कार मिळाला. अश्या प्रकारे त्यांना अनेक पुरस्कार आणि मान देउन गौरवण्यात आले होते. अश्या प्रकारे त्यांनी वेगवेगळय माध्यमातून आपल्या देशासाठी काही ना काही विकासकामे केलेली आहेत.

‘काही तरी बनण्याचे स्वप्न पाहू नका,

तर काही तरी महान करण्याचे स्वप्न पहा.’

– नरेंद्र मोदी

आम्ही दिलेल्या essay on maza avadta neta in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता नेता नरेंद्र मोदी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या maza avadta neta essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Majha avadta neta essay in marathi  माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!