आरसा नसता तर निबंध Essay On Mirror in Marathi

Essay On Mirror in Marathi – Essay on If Mirror is Not There in Marathi आरसा नसता तर निबंध आज आपण आरसा या विषयावर निबंध लिहिणार आहोत आणि आरसा हि एक वस्तू आहे ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. आरसा हि आपल्या रोजच्या वापरातील अशी एक उपयुक्त वस्तू आहे. ज्यामध्ये आपले प्रतिंबिंब दिसते आणि आपण त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहतो तसेच आपण कसे दिसत आहोत, आपल्या केसांची रचना चांगली दिसते का, आपण जो ड्रेस घातला आहे तो आपल्यावर चांगला दिसतो का या सर्व गोष्टींची खात्री आपण आरश्यामध्ये बघून करू शकतो. अश्या प्रकारे आपण आरश्याचा वेगवेगळ्या कारणासाठी उपयोग करू शकतो.

आरसा या वस्तूची उत्क्रांती खूप पूर्वीच्या काळी झाली पूर्वी मानवाने आपले स्वताचे प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पहिले होते त्यानंतर पाण्यापासून प्रथम काच निर्माण करण्यात आली आणि काचेपासून आरसा निर्माण झाला आणि आरसा निर्माण झाल्यामुळे मानवाला आपले प्रतिबिंब आरश्यामध्ये पाहणे खूप सोपे झाले त्याचबरोबर आरश्याचा उपयोग हा फक्त मानवाने आपले प्रतिबिंब पाहण्यासाठी केला नसून याचा उपयोग अनेक कारणांच्यासाठी होऊ लागला.

essay on mirror in marathi
essay on mirror in marathi

आरसा नसता तर निबंध – Essay On Mirror in Marathi

Essay on If Mirror is Not There in Marathi

आरसा हि अशी वस्तू आहे ज्यामध्ये सूर्यप्रकाश्यापासून येणारे किरण परावर्तीत करण्याची शक्ती असते तसेच आरसा कोणतेही कृत्रिम किरण देखील परावर्तीत करू शकतो. आपण घरामध्ये जे स्वताची प्रतिमा पाहण्यासाठी आरशे वापरतो ते चौकोनी, आयताकृती, गोल, शंकरपाळी आकाराचा अश्या कोणत्याही आकारामध्ये असतो आणि आरशाचे अनेक प्रकार देखील आहेत जे आपण शाळेमध्ये असताना शिकलो आहोत.

आरसा अंतर्गोल, बहिर्गोल, अवतल आरसा आणि विमानाचा आरसा. विमानामध्ये वापरला जाणारा आरसा हा समतल आरसा असतो आणि या आरश्यामधून जी प्रतिमा तयार होते ती परावर्तीत प्रतिमा असते आणि ती डावीकडून उजवीकडे उलटी असते त्याचबरोबर समतल आरसा हा सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा आरसा आहे म्हणजेच या प्रकारच्या आरश्याचा उपयोग बहुतेक कारणांच्यासाठी केला जातो.

बहिर्वक्र आरसे हे बाहेरून वक्र असतात किंवा बाहेरून वळलेले असतात आणि या आरश्यामध्ये जी प्रतिमा दिसते ती आराल आणि ताठ दिसते. तसेच अवतल आरश्यामध्ये जी प्रतिमा दिसते ती वस्तूच्या स्थानावर अवलंबून असते आणि हे आरशे आतून थोडे वक्र असतात.

जर आपल्याला असा प्रश्न पडला असेल कि आरशाचा शोध कोणी लावला आणि आरशाची उत्क्रांती कशी झाली तर आरशाची उत्क्रांती हि खूप पूर्वीच्या काळी झाली पूर्वी मानवाने आपले स्वताचे प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पहिले होते त्यानंतर पाण्यापासून प्रथम काच निर्माण करण्यात आली आणि काचेपासून आरसा निर्माण झाला आणि हि उत्क्रांती १८ ते १९ व्या शतकामध्ये झाली होती.

इ. स १८३५ मध्ये जर्मन येथील रसायन शास्त्रज्ञ जस्टन वॉन लीबिग यांनी सर्वप्रथम स्पष्ट काच घेतली आणि काचेच्या एका बाजूला चांदीचा एक पातळ थर दिला आणि आरसा बनवण्याची प्रक्रिया विकसित झाली. मग ह्या प्रक्रियेमध्ये आणखीन सुधारणा करून अराष्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यास सुरुवात झाली. आता आपण आरश्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी जाणून घेवूयात ज्या ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल.

पूर्वीच्या काळी ज्यावेळी आरशाचा शोध लागला नव्हता त्यावेळी लोक आपले प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहत होते मग त्यानंतर काही दिवसांनी पाण्यापासून काच बनवली आणि मग काचेपासून आरसे बनवण्यात आले. आपल्या सर्वांना माहीतच आहे कि आरसा हा सूर्यप्रकाश किंवा कोणताही कृत्रिम प्रकाश आरश्यावर पडला कि तो प्रतिबिंबित करतो तसेच आरसा हि अशी वस्तू आहे.

जी ध्वनी लहरी देखील प्रतिबिंबित करतो आणि त्या आरश्याला ध्वनिक आरसा म्हटले जाते. ध्वनिक आरशाचा उपयो ज्यावेळी रडारचा शोध लागला नव्हता त्यावेळी शत्रूच्या विमानातून येणाऱ्या आवाजाचा शोध घेण्यासाठी या प्रकारच्या आरश्याचा उपयोग केला होता त्याचबरोबर आरसा पदार्थ देखील प्रतिबिंबित करतो आणि या आरशाला अनु मिरर म्हणून ओळखले जाते.

सामान्य लोकांना आरसा हा आपली केशरचना, वेशभूषा, आपण कसे दिसत आहोत या साठी वापरला जात असेल असे वाटत असले तरी आरशाचे अनेक उपयोग आहेत. सूक्ष्मदर्शक आणि शास्त्रज्ञ दुर्बीण या सारख्या साधनांच्या मध्ये आरशाचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे अत्यंत लहान आणि सूक्ष्म वस्तू पाहण्यास मदत होते. त्याचबरोबर फॅशन डिझाईन क्षेत्रामध्ये देखील आरशाचा वापर केला जातो.

फॅशन डिझाईनर त्यांचे कपडे आणि सामान एकाच वेळी अनेक कोनामधून पाहण्यासाठी आरशाचा वापर करतात तसेच आरश्याचा उपयोग हा छायाचित्रीकारण करण्यासाठी देखील केला जातो त्याचबरोबर आपण पाहतो कि गाड्यांना देखील आरशे वापरलेले असतात आणि ती गाडी छोटी असो किंवा मोठी असो या गाड्यांना लावलेल्या आरश्यातून गाडी चालक गाडीच्या पाठीमागील वस्तू किंवा हालचाली पाहू शकतो.

कोणत्याही घरामध्ये खोली निर्माण करण्यासाठी आणि घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आरसा हि एक आपल्याला परवडणारी आणि कमी किंमती मध्ये येणारी गोष्ट आहे. आपल्या घरामध्ये योग्य प्रकारचा आरसा हा आपल्या घरामध्ये चांगला प्रकाश अनु शकतो अबी खोलीचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढू शकते. अनेक वास्तूंच्यामध्ये त्या वस्तू नुसार आरसा वापरला जातो.

आपण आपली वेशभूषा, केशभूषा, आपण कसे दिसतो तसेच शेव्हिंगसाठी आणि कोणत्याही सलून मध्ये किंवा पार्लर मध्ये अवतल प्रकारचा आरसा वापरला जातो. तसेच सौर भट्टी, फ्लॅशलाईट, सूक्ष्म दर्शकामध्ये, दुर्बिणीमध्ये, अवतल आरसा वापरला जातो तसेच टॉर्च, वाहनांच्या हेडलाईट मध्ये, सर्च लाईट मध्ये देखील अवतल आरसा वापरला जातो.

मागील बाजूची वाहतूक पाहण्यासाठी कोणत्याही गाडीला जे आरशे असतात ते बहिर्वक्र असतात तसेच दुकानामध्ये देखील सुरक्षा आरसे लावले जातात आणि ते बहिर्वक्र प्रकारचे असतात. जर आपण आरश्याचा सामन्य वापर आपण कसे दिसतो हे पाहण्यासाठी करतो असलो तरी आरश्याचा वापर वाहतुकीमध्ये, विज्ञान क्षेत्रामध्ये, फॅशन डिझाईन क्षेत्रामध्ये, छायाचित्रण क्षेत्रामध्ये आरश्याचा वापर केला जातो.

आरसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाची वस्तू आहे कारण जर आरसा नसता तर आपण कसे दिसत आहोत, आपल्याला ड्रेस चांगला दिसत आहे कि नाही, आपली केश रचना चांगली दिसते कि नाही हे कसे पहिले असते तसेच आपण गाडी चालवत असताना पाठीमागील हालचाली पाहण्यासाठी आरशामध्ये पाहतो आणि जर गाडीला आरसाच नसता तर आपल्याला पाठीमागे मान वळवून पाहावे लागले असते तसेच आरसा नसता तर विज्ञान क्षेत्रामध्ये आपण आरसा कसा वापरला असता. म्हणूनच आरसा हि एक मानवाच्या जीवनातील महत्वाची वस्तू आहे.

आम्ही दिलेल्या essay on mirror in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आरसा नसता तर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on if mirror is not there in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on if mirror was not there in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on mirror in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!