Essay on Satyamev Jayate in Marathi सत्यमेव जयते मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये ‘सत्यमेव जयते’या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपण निबंधाकडे वळण्या अगोदर आपण सत्यमेव जयते या वाक्याचा रथ काय आहे ते समजावून घेवूया. सत्यमेव जयते म्हणजे जगामध्ये कितीही खोटेपणा जरी वरती आणण्याचा प्रयत्न जरी केला तरी शेवटी सत्याचा म्हणजे जे खरे असते त्याचाच विजय होतो म्हणजेच शेवटी जे खरे आहे तेच लोकांच्या समोर येते. प्रभू श्री राम आणि रावण यांच्यामध्ये जेंव्हा युध्द झाले होते त्यावेळी प्रभू श्री रामांनी रावणाचा पराभव केला होता म्हणजेच त्यांनी वाईटावर सत्याचा विजय मिळवला होता.
सत्यमेव जयते हे भारताचे म्हणजेच आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे आणि वाक्यामध्ये सांगितले आहे कि शेवटी सत्याचा विजय होतो आणि आपण पाहतो कि भारतीय न्यायालयामध्ये किंवा कोणत्याही मोठ्या सरकारी सरकारी कार्यालया मध्ये हे वाक्य आपल्याला लिहिलेले पाहायला मिळते. सत्याच्या मार्गाने जाणार्या व्यक्तिल अनेक दुखः आणि त्रास सहन करावे लागते तसेच त्या व्यक्तीवर अनेक अत्याचार, आरोप देखील केले जातात पण शेवटी त्या व्यक्तीचा विजय होतो म्हणजेच शेवटी सत्याचा विजय होतो.
सत्यमेव जयते मराठी निबंध – Essay on Satyamev Jayate in Marathi
Satyamev Jayate Nibandh in Marathi
‘सत्यमेव जयते’ हे भारतीय बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य आहे जे आपल्याला भारताच्या राष्ट्रीय चिन्हाच्या खालच्या बाजूला पाहायला मिळते. सत्यमेव जयते हे वाक्य सोरी सम्राट अशोकाने बांधलेल्या स्थंभाच्या शिखरावरून घेतले आहे जो स्थंभ उत्तर प्रदेश मधील वाराणसी मधील सारनाथ येथे आहे. ज्या वेळी आपला भारत देश खूप वर्षापासून ब्रिटीशांच्या सत्तेतून मुक्त झाला त्यावेळी काही स्वातंत्र्य सैनिकांनी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य वापरले होते म्हणजेच त्यांना सांगायचे होते कि शेवटी सत्याचा विजय होतो आणि असत्याची हार.
भारत सरकारने २६ जानेवारी १९५० या रोजी सत्येमेव जयते हे वाक्य सर्व भारतभर लागू केले आणि मग त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या सर्व सरकारी कार्यालयामध्ये, संसद भवन, न्यायालये, पोलीस स्टेशन या ठिकाणी ते लिहिले जावू लागले आणि त्यामुळे लोकांना वाटू लागले कि शेवटी सत्याचा विजय होतो पण सध्या हे वाक्य फक्त ऐकायला आहे कारण सध्याच्या काळामध्ये ते सत्यतेमध्ये उतरणे तसे कठीणच आहे. या वाक्याबद्दल असे देखील म्हटले जाते कि मुंडकोपनिषद या मजकुरातून घेतले आहे आणि या वाक्याचा प्रचार करण्याचा मोठा वाटा हा पंडित मदमोहन मालवीय यांच्या नाव आहे.
त्याचबरोबर आपल्या देशामध्ये असे मोठ मोठे संत देखील होवून गेले आणि त्यामधील एक लोकप्रिय संत कबीर दास म्हणतात कि सत्यापेक्षा या जगामध्ये काही महत्वाचे आणि मनुष्याने सत्याच्या मार्गावर चालणे हि एक मोठी तपश्चर्याच आहे कारण जो व्यक्ती सत्याच्या मार्गावर चालतो त्याला अनेक दुखः तसेच त्रास सहन करावा लागतो तसेच त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पण शेवटी तो विजयो होतोच म्हणजेच सत्याचा विजय होतो.
जे लोक खोट बोलतात किंवा असत्यांने वागतात त्यांचे केंव्हाच चांगले होत नाही आणि कबीर दास असे देखील म्हणतात कि खोट बोलणे हे खूप मोठे पाप आहे. पण जो व्यक्ती सत्यांने वाहतो किंवा खरे बोलतो त्या व्यक्तीच्या मनामध्ये देव वास करतो असे देखील महान संत कबीर दास यांनी म्हटले आहे. भूतकाळामध्ये सत्याच्या विजय झालेला होता या विषयी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत जसे कि ज्यावेळी कौरव आणि पांडवांच्या मध्ये युध्द लागले होते.
त्यावेळी पांडवांची सत्याची बाजू होती पण त्यावेळी त्यांच्या बाजूने कोणीच उभे राहिले नाही पण भगवान श्री कृष्ण त्यांच्या बाजूने उभे राहून त्यांनी अजुनाला सांगितले होते कि शेवटी सत्याचा विजय होतो आणि त्यावेळी पांडवांचा विजय झाला होता म्हणजेच सत्याचा विजय होतो. त्याच बरोबर सत्याचा विजय झालेली अनेक घटना म्हणजे ज्यावेळी रावणाने सीता देवींचे अपहरण केले होते त्यावेळी प्रभू श्री राम आणि रावण यांच्यामध्ये युध्द सुरु होते आणि त्यावेळी प्रभू श्री रामांनी रावणाचा वाढ केला होता म्हणजेच त्यावेळी देखील वाईटावर चांगले जिंकले होते म्हणजेच सत्याचा विजय झाला होता.
त्याचबरोबर शेवटी सत्याचाच विजय होतो या विषयाची आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या देशाने खूप वर्ष ब्रिटीशांची गुलामगिरी सहन केली आणि त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र सैनिकांनी कष्ट घेतले तसेच आपले प्राण पणाला लावले आणि ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी परणाची आहुती दिले त्याचे चीज झाले आणि आपल्या देशाला ब्रिटीशांच्यापासून स्वातंत्र्य मिळाले म्हणजेच शेवटी सत्याचा विजय झाला म्हणजे आपला देश शेवटी आपला झाला.
अशा प्रकारे कोणतीही गोष्ट असुदे शेवटी सत्याचा विजय होतो. सत्यम शिवम सुंदरम या वाक्यामध्ये देखील असेच सांगितले आहे कि शेवटी सत्य जिंकते किंवा कोणत्याही मनुष्यासाठी सत्यच हितकारक असते तसेच सत्य शुभ, प्रिय आणि सुंदर आहे तसेच सत्य हे चिरंतन काळ टिकते तसेच सत्याच्या मार्गावर चालणारे लोक कधीच कुठेच तटत नाहीत आणि ते आयुष्यामध्ये कधीच अयशस्वी होत नाहीत.
जे लोक खोटे बोलतात किंवा असत्यावर चालतात ते कधी यशस्वी होऊ शकत नाहीत तसेच असत्य हे सत्य आहे हे कितीही पटवून सांगण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्य बाहेर आल्या शिवाय राहत नाही. म्हणून मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे म्हणजे तो आयुष्यामध्ये कुठेच तटणार नाही तसेच अयशस्वी देखील होणार नाही.
सर्व लोकांनी माझे मते सत्यमेव जयते या वाक्याचा मूळ भाव किंवा अर्थ समजावून घेवून या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मनुष्याने खरे बोलले पाहिजे तसेच सत्याने वागले पाहिजे आणि आपली कर्तव्ये बजावली पाहिजेच. ‘सत्यमेव जयते’ हे आपल्या देशाचे ब्रीदवाक्य आहे आणि ह्या वाक्याचे जे लोक पालन करत नाहीत.
म्हणजेच सतत खोटे बोलतात किंवा असत्याने आणि खोटेपणाने वागतात ते ह्या वाक्याचा अपमान करतात आणि हे वाक्य देशाचे ब्रीदवाक्य असल्यामुळे हा देशाचा देखील अपमान होतो. अश्या प्रकारे आपण सत्य या विषयी जितके सांगू तितके कमीच. शेवटी इतकेच सांगतो कि सत्याने वागा कधी खोटे बोलू नका कारण सत्य सदैव जिंकत असते.
आम्ही दिलेल्या essay on satyamev jayate in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सत्यमेव जयते मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या satyamev jayate nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि short essay on satyamev jayate in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट