foot care tips in marathi पायाची काळजी कशी घ्यावी आज आपण या लेखामध्ये पायांची काळजी कशी घ्यायची या बद्दल संपूर्ण माहिती आणि टिप्स पाहणार आहोत. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपले सौंदर्य कसे खुलून दिसेल तसेच आपली त्वचा कशी सुंदर, तजेलदार आणि मऊ दिसेल तसेच काही लोक असे असतात जे आपला चेहरा देखील कसा चांगला दिसेल या साठी प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर अनेकांना असे वाटते की आपले पाय देखील चांगले दिसावेत ते कायम स्वच्छ दिसावेत तसेच मऊ आणि सुंदर दिसावे म्हणून सतत प्रयत्न करत असतात काही टिप्स वापरून किंवा उपाय करून आपले पाय आपण सुंदर बनवू शकतो.
आपण रोज कामासाठी बाहेर जातो आणि आणि धुळीमुळे, किंवा रस्त्यावर असणाऱ्या गडूळ पाण्यामुळे त्याचबरोबर आपण पायाची स्वच्छता न केल्यामुळे, तसेच सतत पाण्यामध्ये काम असेल तर, चप्पल पायांना लागल्यामुळे अश्या अनेक कारणांच्यामुळे आपले पाय हे टॅन होतात किंवा काळे पडतात आणि त्यावेळी अनेकांना असा प्रश्न पडतो कि आपण पायाची काळजी कशी घ्यावी आणि आपण पाय चांगले ठेवण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करून आपल्या आपल्या पायाची काळजी घेऊ शकतो.
तर अशा लोकांच्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय हे उपलब्ध असतात आणि आज आपण या लेखामध्ये पायाची काळजी कशी घ्यायची या बद्दल काही टिप्स किंवा उपाय पाहणार आहोत. चला तर मग आता आपण पायांची काळजी घेण्यासाठी कोणकोणत्या टिप्स फॉलो कराव्या लागतात ते पाहूया.
पायाची काळजी कशी घ्यावी – Foot Care Tips in Marathi
पायाची त्वचा खराब होण्याची कारणे – causes of damage skin of foot
अनेक लोकांना वाटते कि आपले पाय हे स्वच्छ आणि सुंदर दिसावेत पण अनेक कारणांच्या मुळे पायाची त्वचा हि खराब होते आणि हि कारणे कोणकोणती आहेत ते आपण आता जाणून घेवूया.
- काही लोक बाहेरून आल्यानंतर आपले पाय पाण्याने स्वच्छ धुवत नाहीत किंवा ते पायाची स्वच्छता करत नाहीत अशा लोकांच्या पायाची त्वचा हि खराब होण्याची शक्यता असते.
- काहींच्या पायाची त्वचा हि चप्पल लागून देखील खराब होते म्हणजे जर नवीन चप्पल असेल तर ते आपल्या पायाला खूप गच्च बसते आणि ते चालताना आपल्या पायाला लागुन त्याची जखम आपल्या पायावर होऊ शकते.
- बाहेर गेल्यानंतर पायाला धूळ आणि गडूळ पाणी लागल्यानंतर देखील पायाची त्वचा किंवा पाय खराब दिसू शकतात.
- जर काहींचे पाय हे काही कारणास्तव पाण्यामध्ये जास्तवेळ राहत असतील तरी देखील पायाची त्वचा खराब होऊ शकते.
- जर तुम्ही पायामध्ये चप्पल न घालता उन्हामध्ये चालला तर त्यामुळे आपल्या पायाला चटके बसतात आणि त्यामुळे देखील पायांची त्वचा खब होऊ शकते किंवा पाय उन्हामध्ये जास्त वेळ असल्यास देखील त्वचा खराब होऊ शकते.
पायाची काळजी घेण्यासाठी टिप्स – Tips On Foot Care In Marathi
सध्या अनेक लोक आपल्या त्वचेची काळजी घेतात आणि त्यामध्ये पाय देखील समाविष्ट असतात. पायाची त्वचा हि सुंदर आणि चांगली दिसावी म्हणून अनेक जन प्रयत्न करत असतात परंतु अनेक कारणांच्या मुळे आपल्या पायाची त्वचा हि खराब होते परंतु आपण काही घरगुती टिप्स किंवा उपाय वापरून पायाची चांगली काळजी घेवू शकतो. चला मग आपण पायाची काळजी घेण्यासाठी कोणकोणते उपाय करू शकतो ते पाहूयात.
- आपल्याला पाय स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वप्रथम आणि विशेष सर्वांना घ्यावयास लागणारी लागणारी काळजी म्हणजे आपले पाय हे नियमितपणे पाण्याने स्वच्छ धुवा तसेच तुम्ही जर बाहेर गेलेला असेल तर घरामध्ये आल्यानंतर देखील तुमचे पाय हे स्वच्छ धुवा असे केल्याने तुमच्या पायाची त्वचा हि खराब होणार नाही.
- तुम्ही घरगुती पद्धतीने देखील काळजी घेवू शकता. प्रथम तुम्ही कोमट पाण्यामध्ये डेटॉलचे २ थेंब टाका आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये तुमचे पाय घालून ५ ते १० मिनिटे बसा आणि मग तुमचे पाय बाहेर काढून स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या. आता तुमच्या पायाचा साखर आणि मध मिक्स केलाला स्क्रब लावा आणि पायांना हलक्या हाताने मसाज कर.
- ५ मिनिटांनी मसाज केल्यानंतर तुम्ही तुमचे पाय स्वच्छ धुवा आणि मग ते टॉवेलने कोरडे करून घ्या आणि मग त्याला तुम्हाला सूट होणारे लोशन लावा. असे केल्यामुळे देखील तुमच्या पायाची त्वचा हि सुंदर बनण्यास मदत होईल.
- कोरफड मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि हे पायाची त्वचा सुधारण्यासाठी देखील मदत करते. जर आपण कोरफडचा गर पायांना लावला तर आपल्या पायाचा काळपट पणा निघून जाण्यास मदत होते. तुम्ही कोरफडचा गर हा दोन्ही पायांना लावा आणि मग तो १० ते १५ मिनिटे तसाच ठेवा आणि मग १० ते १५ मिनिटांनी तुमचे पाय स्वच्छ धुवा.
- जर तुमचे पाय काळपट किंवा टॅन झालेले दिसत असतील तर तुम्ही एक टब मध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये १ चमचा सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करून त्या मिश्रणामध्ये तुमचे पाय १० मिनिटे पाण्यामध्ये ठेवा आणि मग तुमचे पाय पाण्यातून काढा आणि ते दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवा आणि टॉवेलने कोरडे करा.
- लिंबू मध्ये देखील अनेक गुणधर्म असतात आणि लिंबू हे पायाच्या स्वच्छतेसाठी खूप उपयुक्त असतात कारण त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ते पायावरील सर्व घाण काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे लिंबूचा रस तुमच्या पायांना लावा आणि ३ ते ४ मिनिटे मसाज करा आणि मग तुमचे पाय ५ मिनिटे कोमट पाण्यामध्ये ठेवा आणि फरक पहा तुमचे पाय खूप स्वच्छ आणि सुंदर दिसतील.
- पायांना कॉफी पॅक लावल्यामुळे देखील आपले पाय सुंदर आणि उजळ दिसू शकतात. एक चमचा कॉफी मध्ये थोडेसे पाणी मिक्स करा आणि त्याची पेस्ट बनवून घ्या आणि मग ते दोन्ही पायांना लावा आणि मग ते १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा.
- तुम्हाला जर तुमचे पाय चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही सॉक्स चा वापर करा.
- जर तुम्हाला पायाची स्वच्छता ठेवायची असेल तर तुम्ही महिन्यातून एकदा पेडीक्युअरचा पर्याय निवडू शकता कारण पेडीक्युअर केल्यामुळे पायाचा स्वच्छता होते तसेच पायांच्यावरील टॅन निघून जाण्यास मदत होते.
- तुम्ही आठवड्यातून एकदा तुमचे पाय १० ते १५ मिनिटे कोमट पाण्यामध्ये घालून ठेवा आणि मग ते टॉवेलने कोरडे करा आणि मग त्याला तुम्हाला सूट होणारे लोशन लावा. असे केल्यामुळे तुमच्या पायांच्या वर कोणत्याही प्रकारचे टॅन तयार होणार नाही आणि तुमचे पाय खार्ण दिसणार नाहीत.
- तुम्ही बाहेर जाताना शूज किंवा असे चप्पल घाला ज्यामुळे तुमचे पाया झाकले जातील आणि त्यामुळे तुमचे पाय घन होणार नाहीत.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या foot care tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर पायाची काळजी कशी घ्यावी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Tips On Foot Care In Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट