गाजर हलवा रेसिपी मराठी Gajar Halwa Recipe in Marathi

Gajar Halwa Recipe in Marathi – Gajracha Halva गाजर हलवा रेसिपी गाजर हलवा हि एक भारतीय गोड डिश आहे जी समारंभांना किंवा घरातील आनंदाच्या क्षणी किंवा आपल्याला खाऊ वाटल्यास बनवला जाणारा पदार्थ आहे. जो गाजर या फळभाजी पासून बनवला जातो आणि हि फळभाजी आपlल्याला हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये पाहायला मिळते आणि आपण फक्त या सीजनमध्येच हलवा बनवून खाऊ शकतो. गाजराचा हलवा कोणाला आवडत नाही, गाजराचा हलवा हा पदार्थ एक गोड पदार्थ असल्यामुळे हा पदार्थ बहुतेक लोकांचा आवडता पदार्थ आहे आणि ते हिवाळ्यामध्ये गाजर हि फळभाजी बाजारामध्ये आली कि ती बाजारातून विकत आणून त्याचा हलवा आवर्जून बनवून खातात.

गाजर हे जरी पौष्टिक असले तरी ते तसेच कोणी खायला बघत नाहीत, पण जर आपण गाजर खिसून ते तुपामध्ये भाजून घेवून, दुधामध्ये शिजवून, त्यामध्ये साखर घालून त्याचा हलवा बनवला तर तो हलवा लहानांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वजन आवडीने खातात. गाजर हलवा हा स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ लागत नाही आणि खूप मोजक्या साहित्यामध्ये हा गोड आणि स्वादिष्ट हलवा बनतो.

आपण हा गोड आणि पौष्टिक पदार्थ रात्रीच्या जेवणानंतर एक डेझर्ट म्हणून खाऊ शकतो किंवा आपण सणानिमित्त काही तरी गोड बनवतो आणि गाजराचा हलवा हा एक उत्तम पर्याय आहे. आज या लेखामध्ये आपण स्वादिष्ट आणि पौष्टिक गाजराचा हलवा कसा बनवायचा याविषयी पाहणार आहोत.  

gajar halwa recipe in marathi
gajar halwa recipe in marathi

गाजर हलवा रेसिपी मराठी – Gajar Halwa Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ५० मिनिटे
पाककलाभारतीय

गाजर हलवा म्हणजे काय ?

गाजर हलवा म्हणजे गाजराचा खीस पाडून तो खीस तुपामध्ये चांगला भाजला जातो आणि मग त्यामध्ये दुध घालून तो चांगला शिजवला जातो आणि मग त्यामध्ये साखर टाकून तो साखर चांगली मिक्स करून त्याला ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर वाफवले जाते.

गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

 • गाजर : गाजर हा या पदार्थातील मुख्य घटक आहे. गाजर हे बाजारामध्ये हिवाळ्यामध्येच उपलब्ध असते त्यामुळे आपण गाजराचा हलवा हि रेसिपी फक्त हिवाळ्य मध्येच बनवू शकतो. गाजराचा खीस तेलामध्ये भाजला जातो आणि मग तो दुधामध्ये शिजवून त्यामध्ये साखर घालून गोड बनवला जातो.
 • साखर : साखर हा घटक देखील गाजराचा हलवा बनवण्यासाठी महत्वाचा घटक आहे कारण साखरेमुळे हलव्याला गोड चव येते.

गाजर हलवा कसा बनवायचा – gajar ka halva banane ki recipe

गाजर हलवा हा एक गोड पदार्थ आहे जो कित्येक लोकांना आवडतो आणि कित्येक लोक हा पदार्थ आवडीने बनवतात आणि खातात. गाजर हि फळभाजी बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये येते आणि आपण गजरापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो पण गाजर हलवा हा गाजर ह्या फळभाजी पासून बनवला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे जो भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये बनवला जातो.

गाजराचा हलवा बनवताना गाजराचा खीस प्रथम तुपामध्ये भाजला जातो आणि मग दुधामध्ये शिजवून त्यामध्ये साखर घातली जाते. गाजराचा हलवा कसा बनवायचा हे आपण सविस्तरपणे खाली पाहूयात. चला तर मग पाहूयात गाजराचा हलवा कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी  काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ५० मिनिटे
पाककलाभारतीय

गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make gajar halwa 

गाजर हलवा बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही जे साहित्य लागते ते आपण लगेच बाजारातून लगेच उपलब्ध करून घेवू शकतो. पण आपण गाजर हलवा हा पदार्थ हिवाळ्यामध्येच बनवू शकतो कारण गाजर हि फळभाजी बाजारामध्ये हिवाळ्यामध्येच उपलब्ध असते.

 • ३ वाटी गाजर.
 • दीड वाटी साखर.
 • अर्धा लिटर दुध.
 • अर्धी वाटी तूप.
 • १ चमचा वेलची पावडर.
 • १ छोटी वाटी काजू आणि बदाम तुकडे.

गाजर हलवा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make gajar halwa 

 • सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचा खालील थोडासा भाग चाकूने चिरून टाका आणि त्याचा खिसणीने खीस पडून घ्या.
 • अश्या प्रकारे गाजराचा हलवा बनवण्यासाठी ३ वाटी खीस घ्या.
 • आता कढई गॅसवर ठेवून ती मध्यम आचेवर गरम करून घ्या आणि त्यामध्ये थोडे तूप घालून काजू आणि बदामाचे तुकडे भाजून घ्या आणि ते चांगले भाजले कि ते बाजूला काढून ठेवा.
 • आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप घाला आणि तूप गरम झाले कि त्यामध्ये गाजराचा खीस घालून तो खीस सतत वर खाली करत चांगला भाजून घ्या.
 • गाजर भाजत असतानाच एका भांड्यामध्ये दुसरीकडे दुध उकळण्यासाठी ठेवा.
 • आता गाजर चांगले भाजले कि त्यामध्ये उकळलेले दुध घाला आणि ते दुध गाजारामध्ये चांगले मिक्स करा आणि ते मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या आणि पहा त्यामधील गाजर मऊ झाले आहे काय, जर गाजर मऊ झाले असेल तर तुमचा हलवा ८० टक्के तयार झाला.
 • आता त्यामध्ये वेलची पावडर आणि तळलेले काजू बदाम घाला आणि ते चांगले मिक्स करा आणि त्यावर झाकण घालून २ ते ३ मिनिटे वाफवून घ्या.
 • तुमचा हलवा तयार झाला.

गाजराचे फायदे – benefits 

गाजर या फळभाजी मध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्व अ, पोटॅशियम, जीवनसत्व क आणि कॅल्शियम या सारखे पोषक घटक असतात त्यामुळे यातील काही पोषक घटक हे आपल्या डोळ्यांच्यासाठी, हृदयासाठी, रक्त दाब नियंत्रणासाठी, वजन नियंत्रणासाठी तसेच गाजरामधील काही पोषक घटक कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

त्यामुळे गाजर खाणे चांगले असते पण तसेच गाजर खाणे लहान मुलांना तसेच कित्येक लोकांना आवडत नाही म्हणून गाजराचा हलवा बनवून खायला देणे हा एक चांगला पर्याय आहे.

गाजर या फळभाजीतील पोषक घटक – nutritional value 

पोषक घटकप्रमाण
कॅलरी२५
फायबर२ ग्रॅम
प्रथिने०.५ ग्रॅम
जीवनसत्व अ७३ टक्के
जीवनसत्व क९ टक्के
कॅल्शियम२ टक्के
पोटॅशियम८ टक्के

आम्ही दिलेल्या gajar halwa recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गाजर हलवा रेसिपी मराठी gajar ka halwa kasa banvaycha बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gajar ka halva banane ki recipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gajar halwa in cooker recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये recipe in marathi gajar ka halwa Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!