गाळणा किल्ला माहिती Galana Fort History in Marathi

Galana Fort History in Marathi गाळणे किल्ल्याची माहिती गाळणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामध्ये वसलेला आहे हा किल्ला मालेगाव पासून २२ ते २३ किलो मीटर आहे. गाळणा हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेतील सातमाळ या उपरांगेमधील गाळणा टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्याला प्राचीन काळी दक्षिणेकडील बागलानचे प्रवेश दार म्हणून ओळखले जायचे. गाळणा हा किल्ला दोन खोऱ्यामध्ये आहे उत्तरेला तापी नदी आणि दक्षिणेला पांजरा नदी आहे.

galana fort information in marathi या किल्ल्यचा इतिहास म्हणजे या किल्ल्यावरील लढाया ज्यामध्ये मराठा, निजामशाही, आदिलशाही, मुगल आणि इंग्रज या सर्व वंशानी या किल्ल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी खूप लढाया केल्या. गाळणा हा किल्ला बहुतेक १३ व्या शतकामध्ये बांधला आहे आणि या किल्ल्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी १४ व्या शतकापासूनच वेगवेगळ्या वंशानी या किल्ल्यावर हल्ले केले. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ७११ मीटर (२३३२ फुट) इतकी आहे.

galana fort history in marathi
galana fort history in marathi

गाळणा किल्ला माहिती – Galana Fort History in Marathi

किल्ल्याचे नावगाळणा किल्ला (galna fort)
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणहा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामध्ये वसलेला आहे
डोंगर रांगगाळणा हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेतील सातमाळ या उपरांगेमधील गाळणा टेकडीवर वसलेला आहे
स्थापना१३ व्या शतकामध्ये
समुद्र सपाटी पासूनची उंची७११ मीटर (२३३२ फुट)
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेमहिरपी कमान, सुंदर कोरीव गुहा, बुरुज, चर्या, अंबरखाना, जीबिचा दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर, गुप्त दरवाजा, गुहामंदिर, गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर

गाळणा किल्ल्याचा इतिहास 

गाळणा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला कोणी बांधला यांचा ठोस पुरावा कोठे मिळत नाही पण असे मानले जाते कि या किल्ल्याची निर्मिती बहुतेक १३ व्या शतकामध्ये झाली असेल कारण असे म्हणतात कि १३ व्या शतकामध्ये गाळणा या किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल हे राज्य करत होते आणि यांच्यामुळेच या प्रांताला बागलाण असे नाव पडले होते.

पण हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी १४ व्या शतकापासूनच या किल्ल्यासाठी लढाया सुरु झाल्या. हा किल्ला आपल्या त्याब्यात घेण्यासाठी निजामशाही, आदिलशाह, मुगल इंग्रज आणि मराठा वंशाने प्रयत्न केले आणि ताबा देखील मिळवला. १५ व्या शतकामध्ये गाळणा या किल्ल्याने महत्व पूर्ण कामगिरी बजावली आहे कारण हा किल्ला डेक्कनच्या सीमेवर होता.

ज्यावेळी हा किल्ला इ. स. १४८७ मध्ये हा किल्ला मराठा साम्राज्याकडे होता त्यावेळी जे दौलताबादचे जे गवर्नर मलिक वूजी आणि मलिक अश्रफ हे दोन भावांनी या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो आपल्या ताब्यात घेतला. इ. स १५०६ मध्ये मलिक वूजी (मलिक वूजी याला मारले होते) यांचा मृत्यू झाल्यानंतर हा किल्ला मलिक अश्रफ याने मलिक अहमद शहा याच्याकडे दिला जो अहमदनगरचा निजाम होता पण ३ ते ४ वर्षामध्ये मलिक अहमद शहा याचा मृत्यू झाल्यमुळे गाळणा हा किल्ला एक मुस्लीम प्रमुखाकडे दिला.

जो मराठा साम्राज्याचा कट्टर विरोधी आणि त्याने मराठा साम्राज्याला खंडणी देण्यास देखील नकार दिला होता पण त्याने इ. स. १६३४ मध्ये मोगलांना खंडणी दिली होती. औरंगजेबाला या किल्ल्याची भव्यता पाहून गाळणा हा किल्ला आपल्या ताब्यात असावा असे वाटू लागले म्हणून त्याने इ. स. १७०४ मध्ये गाळणा या किल्ल्यावर हल्ला केला आणि इ. स. १७०५ मध्ये हा किल्ला त्याच्या ताब्यात आला. होळकर प्रमुख वॉलास याने हा किल्ला औरंगजेबाकडून आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर हा किल्ला सर्व किल्ल्यांच्या प्रमाणे इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गाळणा या किल्ल्यावर राज्य करणारे वंश 

गाळणा या किल्ल्यावर मराठा, निजाम, आदिलशाही, मुगल, इंग्रज आणि होळकर या वंशानी वर्चस्व गाजवले होते.

गाळणा किल्ला फोटो:

galana fort history in marathi
galana fort history in marathi

गाळणा या किल्ल्यावर काय पहायला मिळते ?

  • गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर :

गोरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर हे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे जे इ. स. १९६१ मध्ये बांधले आहे आणि या मंदिरा मध्ये अनेक देवांची छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतील. या मंदिरा मध्ये आपल्यला अष्टविनायक गणपती, १२ जोतिर्लिंग तसेच नवदुर्ग माता आणि काही संतांच्या मूर्ती देखील पाहायला मिळतात.

  • दरवाजे :

या किल्ल्यावर आपल्यला एकूण ८ दरवाजे पाहायला मिळतात त्यामधील काही दरवाजे म्हणजे जीबिचा दरवाजा ( चौकशी किवा पडकोट दरवाजा ), लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर किवा चोर दरवाजा आणि शेवटी येतो तो लाखा दरवाजा किवा त्याला गुप्त दरवाजा देखील म्हंटले जाते.

  • आपल्याला किल्ल्यावर पर्शियन भाषेमध्ये असलेले शिलालेख देखील पाहायला मिळतात.
  • गुहामंदिर :

या किल्ल्यावर आपल्यला एक गुहा मंदिर पाहायला मिळते ज्यामध्ये आपल्यला एक गणपतीची मूर्ती, महादेवाची पिंड आणि पिंडीच्या बाजूला एक मारुतीची मूर्ती कोरलेली आहे त्याचबरोबर येथे आणखी गुहा पाहायला मिळतात.

  • या किल्ल्यावर आपल्यला एक प्राचीन काळी वापरली जाणारी अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी बनवलेला चुल्हाना पाहायला मिळतो तसेच आंघोळीचे टाके आणि गरम पाणी लवकर थंड होऊ नये म्हणून तेथे एक रचना केली आहे.
  • इतर ठिकाणे :

या किल्ल्यावर आपल्यला महिरपी कमान, सुंदर कोरीव गुहा, बुरुज, चर्या, अंबरखाना आणि कोठारे इत्यादी ठिकाणे पाहायला मिळते.

गाळणा या किल्ल्यावर असणारे शिलालेख

  • या किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या उत्तर भागामध्ये एक शिलालेख पाहायला मिळतो जो महमद अलीखान याच्या नावाचा आहे त्याने किल्ल्याच्या उत्तरेकडील भागामध्ये इ. स. १५८३ मध्ये एक बुरुजाची बांधणी केली होती आणि तो शिलालेख याच संदर्भात आहे.
  • महमद अलीखान यांच्या नावाने अजून एक शिलालेख आहे जो इ. स १५८७ मध्ये बांधलेल्या बुरुजावर आहे म्हणजेच या वरून असे स्पष्ठ होते कि हा शिलालेख देखील यानेच बांधला असावा.
  • अफलातून खान याने देखील या किल्ल्यावर बांधकाम केल्याचे इ. स १५६२- १५६३, इ. स १५६६ – १५६७, इ. स १५६९ – १५७०, इ. स १५७० – १५७१ या किल्ल्यावर असणाऱ्या शिलालेखा वरून समजते.

गाळणा या किल्ल्यावर कसे जायचे ?

मुंबईहून किवा पुण्याहून या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्यला पुणे नशिक हायवे मार्गे जावे लागेल. पुणे ते नाशिक २११ किलो मीटर आहे आणि मुंबई ते नाशिकचे अंतर १६६ किलो मीटर आहे. आपण नाशिक मध्ये गेल्यानंतर आपल्याला मालेगाव ला जाण्यासाठी बस मिळू शकते. नाशिक ते मालेगावचे अंतर १०० ते १०४ किलो मीटर आहे आणि मालेगावहून गाळणा किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी आपल्यला तेथील गाळणा गावाला जाणाऱ्या स्थानिक बस मिळू शकतात. मालेगाव ते गाळणा हे अंतर २२ ते २३ किलो मीटर इतके आहे.

टीप

  • साल्हेर किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची सोय नसल्यामुळे आपण सोबत पाणी आणि खाण्यासाठी काही स्नॅक्स घेतले तर चांगलेच होईल.
  • गाळणा हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, गाळणा किल्ला galana fort history in marathi हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. galana fort information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about galana fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही गाळणा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या galana killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!