गौतम अदानी यांची माहिती Gautam Adani Information in Marathi

Gautam Adani Information in Marathi – Gautam Adani Biography in Marathi गौतम अदानी यांची माहिती मित्रांनो कोणीही रातोरात करोडपती बनत नाही अर्थात त्यामागे असतात ते अपार कष्ट, संयम, कौशल्य आणि मुख्य म्हणजे काम करण्याची जिद्द. आज भारतामध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी हे उद्योजक प्रसिद्ध आहेत. भारतातील नंबर वन उद्योजकांच्या यादीमध्ये यांचा समावेश होतो. परंतु त्यांना इतक मोठं नाव कमवायला बराच वेळ लागला. आजच्या लेखामध्ये आपण एका अशा उद्योजकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर फक्त दहा वर्षांमध्ये करोडोंची संपत्ती उभी केली.

आज मार्केटमध्ये त्यांच मुकेश अंबानी आणि रतन टाटा यांच्या नंतर यशस्वी उद्योजक म्हणून नाव आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण गौतम अदानी या उद्योजकाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्यांची मागील दहा वर्षाची भरभराट.

gautam adani information in marathi
gautam adani information in marathi

गौतम अदानी यांची माहिती – Gautam Adani Information in Marathi

पूर्ण नाव गौतम अदानी
जन्म२४ जून १९६२
जन्म गावगुजरातच्या अहमदाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख उद्योगपती

जन्म

गौतम अदानी यांची सुरुवात एका गरीब कुटुंबातून झाली. गुजरातच्या अहमदाबाद येथे त्यांचा जन्म झाला. २४ जून १९६२ रोजी या उद्योगपतीने गुजरात मधील एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला. असं म्हणतात परिस्थिती माणसाला बदलवते. गरीब परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही आहे. काही सूत्रांच्या आधारे असं समजण्यात येते की त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल आहे.

आता तुम्ही म्हणाल फक्त बारावी शिकलेला माणूस एक करोडपती कसा होऊ शकतो? तर अर्थातच एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवण्यासाठी शिक्षणाची नव्हे तर कौशल्याची गरज असते. स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे तोच आत्मविश्वास गौतम अदानी यांच्याकडे होता. गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः च्या बळावर काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय घेतला.

दहा वर्षांमध्ये करोडपती

मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा उद्योगपती आणि उद्योजक हे दोन्ही शब्द जरी सारखे वाटत असले तरी त्यांचा अर्थ एकसारखा नाही आहे. उद्योगपती तो असतो जो त्यांच्या पूर्वजांचा वारसा पुढे चालवतो म्हणजेच आपल्या वडिलांचा बिझनेस पुढे घेऊन जाणं त्याला उद्योगपती म्हणतात.

आणि उद्योजक तो असतो जो स्वतःच्या बळावर त्या बिजनेस मध्ये काहीतरी नवीन बदल घडवून आणून तो उद्योग मोठ्या स्तरावर नेहतो. आणि गौतम अदानी हे उद्योजक आहेत. त्यांनी स्वतःच्या बळावर बिजनेस सुरु केला त्यांनी तिथे स्वतःचे गुण कौशल्य वापरले. गौतम अदानी हे फार लहान होते जेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे २ असे मुख्य निर्णय घेतले.

सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. ते गुजरातच्या विद्यापीठांमध्ये वाणिज्य शाखेमध्ये बीकॉम ही पदवी संपादन करत होते परंतु दुसऱ्याच वर्षी त्यांनी कॉलेजमधून आपला दाखला काढून घेतला. आणि दुसरा म्हणजे आपल्या वडिलांना त्यांच्या कपड्याच्या व्यापारात मदत करण्यास नकार दिला.

आणि आपल्या स्वप्न जगण्यासाठी ते मुंबईला निघून आले. मुंबईमधील जवेरी बाजार तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. खूप मोठ्या प्रमाणावर हिरऱ्यांची देवाणघेवाण या व्यापारात केली जाते. हे बघून गौतम अदानी हिऱ्यांच्या व्यापारात उतरले. सर्वप्रथम दोन वर्षात त्यांनी हिराच्या एका कंपनीत काम केलं.

महिंद्रा ब्रदर्स या व्यापारऱ्या सोबत त्यांनी दोन वर्ष हिर्‍यांचा व्यापार केला. नंतर थोडा अनुभव आल्यावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. पुढच्या वर्षातच त्यांनी डायमंड ब्रोकरेज चा व्यवसाय सुरु देखील केला आणि बघताच दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची गणना लक्षाधीश व्यापाऱ्यांमध्ये होण्यास सुरुवात झाली. या बिजनेस मध्ये पहिल्याच वर्षी त्यांचा टनओवर लाखोंच्या वर गेला.

हा बिझनेस सुरू करायच्या आधी ते आपल्या भावाला त्याच्या प्लास्टिकच्या व्यापारात मदत करायचे. भावाच्या प्लास्टिक व्यवसायाच रूपांतर पीव्हीसी आणि पॉलीमार आयात करणाऱ्या कंपन्यांमध्ये केलं. इथूनच अदानी एक्सपोर्ट्स ला सुरुवात झाली. व्यापार करण्यासाठी कौशल्य, गुणवत्ता, सय्यम, निर्णय घेण्याची क्षमता, नवीन कल्पना, याशिवाय आत्मविश्वास आणि समोरच्याला आपलं बोलणं क्वचित शब्दांमध्ये पटवून देण्याची क्षमता देखील लागते. हे सगळेच गुण गौतम अदानी यांच्यामध्ये आहेत.

पुढे १९९५ मध्ये गौतम अदानी यांना गुजरात सरकार तर्फे मुंद्रा बंदराची व्यवस्थापनाच खाजगी कामाचं कॉन्ट्रॅक्टर गौतम अदानी यांच्याकडे सोपवलं. पहिल्यापासूनच गौतम अदानी यांना या क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवायचं होतं. आज देशामध्ये अदानी पोर्ट्स ही भारत देशातील सगळ्यात मोठी खाजगी बंदर व्यवस्थापना आहे.

एक वेळ ती होती जेव्हा वडिलांच्या कपड्याच्या व्यापारावर जेमतेम पैशांमध्ये घर चालायचं आणि आज ही वेळ आहे जिथे गौतम अदानी यांच्याकडे जवळपास ४३०५६ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. आज ते बीएमडब्ल्यू, फेरारी पासून तीन हेलिकॉप्टर्स आणि तीन चार्टर्ड प्लेन चे मालक आहेत. अदानी पॉवर कंपनीने २०१५ साली उडिपी औष्णिक ऊर्जा प्रकल्प सहा हजार तीनशे कोटी रुपयांना विकत घेऊन फक्त शंभर तासांमध्ये संपूर्ण व्यवहार करून दाखवला.

इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार पार पडायला पत्र व्यवहार होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतात आणि हे सगळं फक्त गौतम अदानी यांनी १०० तासात केलं. त्यांचे कौशल्य खरंच उत्तम आहेत. आज संपूर्ण जगामध्ये एक ग्रेट उद्योजक म्हणून त्यांचा नंबर ११ व्या स्थानावर आहे. एक्सपोर्ट्स आणि पोर्ट्स या क्षेत्रामध्ये उतरून त्यांनी त्यावेळचे रेल्वेमंत्री नितीश कुमार यांना पटवून दिलं की प्रमुख बंदर रेल्वे मार्गाने जोडणे किती आवश्यक आहे आणि याने आपल्या भारत औद्योगिक क्षेत्रांमध्ये कशी प्रगती होऊ शकते.

गौतम अदानी यांच्याकडे समोरच्याला आपलं मत समजावून सांगायची एक वेगळीच कला होती. त्यांचे बोलणे ऐकताच नितीशकुमार यांनी काही वर्षांमध्येच देशातील प्रमुख सहा बंदरांना रेल्वे मार्गाने जोडण्याची घोषणा केली आणि हे काम गौतम अदानी यांच्या हाती सोपवला. इसवी सन १९९१ साली गौतम अदानी उद्योजक बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आले आणि स्वतःचा व्यापार देखील सुरू केला.

बघता-बघता अस म्हणतात की आज गौतम अदानी यांनी ७८ बिलियन अमेरिकन डॉलर संपत्ती उभी केली आहे. आजच्या घडीला त्यांच्या अदानी एंटरप्राइजेसच वार्षिक टर्न ओव्हर तीस हजार कोटी इतकी आहे. एका वेळेस चाळीत राहणारे गौतम अदानी आज आशियातील पहिल्या दोन क्रमांकाचे उद्योजक आहेत.

३३ वर्षांचा अनुभवाने आणि एक दशकाच्या काळामध्ये त्यांनी दिवसाची रात्र करून आपले साम्राज्य उभे केले आहे. इसवी सन ११९८ मध्ये गौतम अदानी यांनी अदानी ग्रुपची स्थापना केली. ही कंपनी सुरुवातीला फक्त शेतीविषयक उत्पादनांमध्ये काम करायची. मीडियाच्या माहितीनुसार २०१२ सालापासून अदानी यांच्या कंपनीमध्ये ४०० टक्के शेअर्सची वाढ झाली आहे.

असं म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच एकमेकांशी घट्ट मैत्रीचा नातं आहे. गौतम अदानी यांनी स्वतःहून सुरू केलेला हा बिझनेस आज मोठ्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. एकदा त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर २६ नोव्हेंबर २००८ रोजी ताजमहाल हॉटेल वर झालेला दहशतवादी हल्ला यामध्ये ताजमहाल हॉटेल मध्ये १६० प्रवासी मरण पावले होते.

यामध्ये गौतम अदानी यांचा देखील समावेश होता परंतु त्या सगळ्यातून ते सुखरूप बाहेर पडले. आज त्यांचं वय ५८ वर्षे आहे आणि आज देखील ते तितक्याच जिद्दीने काम करतात परंतु मध्ये काही काळात त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये बरीच घट पाहायला मिळाली आणि पुन्हा शेअर्स मार्केट मध्ये गौतम अदानी यांचं नाव सातत्याने वर येऊ लागलं. त्यावेळी गौतम अदानी यांचा अब्जावधींचे नुकसान झालं.

आज गौतम अदानी यांनी आपलं व्यापार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पसरवला आहे. विद्युत निर्मिती, कोळशाच्या खाणी, रियल स्टेट, लॉजिस्टिक, ऍग्रो प्रॉडक्ट, ऑइल, गॅस या सर्व क्षेत्रांमध्ये गौतम अदानी यांच्या कंपन्या आहेत ज्यांच र्टन ओव्हर करोडोंच्या घरात असतं. गौतम अदानी हे आपल्या भारताच्या सर्व युवा तरुणांसाठी एक रोल मॉडेल आहेत.

स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या बळावर त्यांनी आपला हा इतका मोठा व्यवसाय उभा केला आहे. त्यांना वडिलोपार्जित व्यापार करण्याची संधी मिळत होती परंतु त्यांनी ती नाकारली. हा व्यवसाय पुढे घेऊन जाताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले व बऱ्याच लोकांनी त्यांचे यश बघून त्यांच्या रस्त्या मध्ये आड येण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्या प्रसंगांना अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जाऊन अजून त्यांच्या व्यवसायाची घोडदौड सुरूच आहे.

व्यवसायात संयम ठेवणे फार महत्त्वाचं असतं.‌ परंतु गौतम अदानी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी फक्त दहा वर्षाच्या अवधी मध्ये इतकं मोठं नाव कमावलं. फक्त भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मोठे नाव आहे. त्यांचे प्रॉडक्ट आज आपण घराघरांमध्ये वापरतो. आपल्या भारताला गौतम अदानी यांच्यासारख्या कौशल्य आणि जिद्द असणाऱ्या अनेक उद्योजकांची खरच गरज आहे.

आम्ही दिलेल्या Gautam Adani Information in Marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गौतम अदानी यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gautam adani biography in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about gautam adani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Gautam Adani Information in Marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!