घनगड किल्ला माहिती Ghangad Fort Information in Marathi

ghangad fort information in marathi घनगड किल्ला माहिती, आज आपण या लेखामध्ये घनगड (Ghangad) या किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील लोणावळा जिल्ह्यातील लोणावळा या डोंगररांगेमध्ये घनगड हा किल्ला वसलेला आहे आणि हा किल्ला मुळशीच्या पश्चिमेला मावळ भागामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील एक चढाईसाठी एक अवघड समजला जाणारा किल्ला आहे आणि या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची हि ३००० फुट आहे. घनगड हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक चांगला किल्ला आहे आणि हा किल्ला लोणावळा – खंडाळा या प्रसिध्द ठिकाणांच्या पासून फक्त ३० किलो मीटर अंतरावर आहे.

आणि हा किल्ला पुणे या शहरापासून १०० किलो मीटर अंतरावर आहे. घनगड या किल्ल्यावर सामंत घराणे, आदिलशाही घराणे, निजामशाही घराणे आणि शेवटी या किल्ल्यावर मराठ्यांनी राज्य केले होते. या गडावर आपल्या फारसे असे काही ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळत नाहीत परंतु या गडावरून सरसगड आणि सुधागड देखील दिसतो तसेच कोकणाकडे जाण्याच्या घाट वाटा देखील दिसतात. किल्ल्याच्या वाटेने जाताना एक गर्जाई देवीचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर एक प्राचीन तोफगोळा देखील आहे.

ghangad fort information in marathi
ghangad fort information in marathi

घनगड किल्ला माहिती – Ghangad Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावघनगड
प्रकारगिरिदुर्ग
किल्ल्याची उंचीया किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची हि ३००० फुट आहे
जवळचे शहरलोणावळा – खंडाळा
जिल्हालोणावळा

घनगड किल्ल्याविषयी माहिती – information about ghangad in Marathi

घनगड हा किल्ला लोणावळा या डोंगररांगेवर वसलेला आहे आणि हा किल्ला मुळशीच्या पश्चिमेला मावळ भागामध्ये वसलेला आहे. घनगड हा किल्ला चढाईसाठी एक चांगला किल्ला आहे आणि या किल्ल्याचा ट्रेक हा तैलबैला, सुधागड आणि कोरीगड या किल्ल्यांनी वेढलेला आहे आणि तरीदेखील हा किल्ला खूप दुर्गम म्हणून ओळखला जातो.

गडावर चढण्यासाठी एकाच वाट आहे आणि या वाटेने गड चढत असताना त्या वाटेवर गर्जाई देवीचे मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोर एक प्राचीन तोफगोळा देखील आहे आणि जरी या किल्ल्यावर चढल्यानंतर आपल्याला राहण्याची सोय होत नसली तरी या मंदिरामध्ये राहण्यासाठी जागा आहे त्यामुळे जर एखाद्या ट्रेकरला मुक्काम करायचा असल्यास या मंदिरामध्ये मुक्काम करता येतो.

किल्ल्यावर चढण्याच्या वाटेने पुढे आल्यानंतर गडाला दोन प्रवेश दार आहेत आणि मुख्य दरवाज्याची कमान हि पडलेली आहे आणि दुसऱ्या प्रवेश दरवाज्याच्या वाटेवर पाण्याचे टाके आहेत आणि या टाक्यांच्यामध्ये असणारे पाणी हे पिण्यासारखे आहे. किल्ल्याच्या माथ्यावर गेल्यानंतर तेथे बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यावर काही जीर्ण इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात.

या गडावरून सरसगड, तैलबैला, कोरीगड आणि सुधागड देखील दिसतो तसेच कोकणाकडे जाण्याच्या घाट वाटा देखील दिसतात. घनगड किल्ल्याचे एक मनोरंजक आणि नयनरम्य वैशिष्ट्य म्हणजे डोंगराच्या भिंतीवरून खाली पडलेला दगडाचा मोठा भाग आहे आणि तो अजूनही त्याच्या विरुध्द उभा आहे आणि यामुळे किल्ल्याला एक बोगद्याचे स्वरूप आलेले आहे आणि या भागाच्या पलीकडे एक पाण्याचे टाके आहे.

घनगड किल्ल्याचा इतिहास – ghangad fort history in Marathi

जरी ह्या किल्ल्याविषयी खूप कमी माहिती असली तरी हा किल्ला ३०० वर्ष जुना किल्ला आहे आणि या किल्ल्यावर घनगड या किल्ल्यावर सामंत घराणे, आदिलशाही घराणे, निजामशाही घराणे आणि शेवटी या किल्ल्यावर मराठ्यांनी राज्य केले होते. काही काळामध्ये घनगड किल्ल्याचा उपयोग हा कैदी ठेवण्यासाठी केला जात होता.

तसेच पुणे आणि किकन व्यापारी महामार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग हा टेहळणी बुरुज म्हणून केला जात होता. घनगड हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर हा किल्ला १८१८ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात राहिला आणि १७ मार्च १८१८ रोजी हा किल्ला ब्रिटीश सैन्यास शरण गेला.

घनगड किल्यावरील पाहण्यासारखी ठिकाने

गडाच्या वाटेवर जाताना गर्जाई देवीचे मंदिर आहे तसेच गडावर दोन प्रवेश दरवाजे आहेत तसेच या किल्ल्याला बालेकिल्ला किल्ला देखील आहे आणि या बालेकिल्ल्यावर अनेक जुन्या इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात तसेच या किल्ल्यावर काही पाण्याचे टाके देखील आहेत आणि या टाक्यां च्यामधील पाणी हे पिण्यासारखे असते.

घनगड किल्ल्याला कसे पोहचायचे – How to reach 

महाराष्ट्र राज्यातील लोणावळा जिल्ह्यातील लोणावळा या डोंगररांगेमध्ये घनगड हा किल्ला वसलेला आहे आणि या किल्ल्यापासून लोणावळा हे गाव सर्वात जवळचे गाव आहे आणि या ठिकाणी आपण बसने किंवा रेल्वेने येवू शकतो आणि मग तेथून टॅक्सी पकडून एकोले गावामध्ये पोहचू शकतो कारण एकोले हे गाव किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.

एकोले गावामध्ये पोहचल्यानंतर एकोले गावाच्या दक्षिणेला डोंगरावरून ट्रेकिंगची वाट सुरु होते आणि हा मार्ग चांगला सुरक्षित आहे परंतु मार्गावर घनदाट जंगल आहे आणि याच वाटेवर गर्जाई देवीचे मंदिर देखील आहे.किल्ल्याच्या प्रवेश दारापर्यंत जाण्यासाठी अर्धा तास लागतो. प्रवेशदाराजवळील सपाट मैदान किंवा गडावर जाणाऱ्या गर्जाई देवीच्या मंदिरामुळे तळ ठोकण्याची आणि आणि राहण्याची चांगली सोय आहे.

किल्ल्यावर सर्व ऋतूंच्यामध्ये पोहचता येते परंतु पावसाळ्यामध्ये हा किल्ला चढताना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते. किल्ल्याच्या डाव्या बाजूने धोकादायक पायवाटेने ट्रेक करून किल्ल्याच्या मागील बाजूच्या गुहेमध्ये पोहचता येते. जर अनुभवी ट्रेकर्स असतील तर अश्या ट्रेकर्सनी ह्या किल्ल्याला आवर्जून भेट ध्यावी. जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर तुम्ही किल्ल्याच्या वाटेवर असणाऱ्या गर्जाई देवीच्या मंदिरामध्ये करू शकता किंवा मग एकोले गावामध्ये देखील करू शकता.

घनगड किल्ल्याविषयी महत्वाची माहिती

  • महाराष्ट्र राज्यातील लोणावळा जिल्ह्यातील लोणावळा या डोंगररांगेमध्ये घनगड हा किल्ला वसलेला आहे आणि हा किल्ला मुळशीच्या पश्चिमेला मावळ भागामध्ये वसलेला आहे.
  • या किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची हि ३००० फुट आहे. घनगड हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक चांगला किल्ला आहे.
  • घनगड या किल्ल्यावर सामंत घराणे, आदिलशाही घराणे, निजामशाही घराणे आणि शेवटी या किल्ल्यावर मराठ्यांनी राज्य केले होते.
  • घनगड हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर हा किल्ला १८१८ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात राहिला.
  • या गडावरून सरसगड, तैलबैला, कोरीगड आणि सुधागड देखील दिसतो तसेच कोकणाकडे जाण्याच्या घाट वाटा देखील दिसतात.
  • घनगड या किल्ल्यापासून लोणावळा आणि खंडाळा हि शहरे ३० किलो मीटर अनातारावर आहेत.

आम्ही दिलेल्या ghangad fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर घनगड किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ghangad fort information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about ghangad in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!