मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण निबंध Girl Education Essay in Marathi

Girl Education Essay in Marathi मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये मुलींचे शिक्षण किंवा स्त्री शिक्षण (girl education) या विषयावर निबद्ध लिहिणार आहोत. मुलींचे शिक्षण हे पूर्वी देखील महत्वाचे होते आणि आज देखील तितकेच महत्वाचे आहे. कारण मुलींच्या शिक्षणाबद्दल असे म्हणतात कि,

‘मुलगी शिकली, प्रगती झाली.’

आपल्या सर्वांना माहित आहे कि स्त्री हि एकमेव व्यक्ती असते जी आपले घर चांगल्या प्रकारे चालवते आणि म्हणूनच जर घरातील कोणतीही महिला सुशिक्षित असली तर ती अजून चांगल्या प्रकारे घर चालवू शकेल तसेच ती सुरक्षित असली तर ती आपल्या मुलांना चांगले संस्कार देवू शकेल तसेच तिला शिक्षणाचे महत्व माहित असल्यामुळे ती आपल्या मुलांना हि शिक्षणाचे महत्व पदावून देईल तसेच आपल्या मुलांना शिक्षण देईल.

girl education essay in marathi
girl education essay in marathi

मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी निबंध – Girl Education Essay in Marathi

Essay on Girl Education in Marathi

सध्या जरी परिस्थिती वेगळी असली तरी पूर्वीच्या काळामध्ये मुलांना शिक्षण किंवा बाहेर पडून आपल्या आवडीच्या गोष्टी करणे खूप अवघड होते कारण पूर्वीच्या काळी महिलांनी फक्त चूल आणि मुल सांभाळणे हि प्रथा होती त्यामुळे महिलांना बाहेर पडता येत नव्हते तसेच त्यांना जे करायचे होते ते त्या करू शकत नव्हत्या पण जस जसे दिवस निघून गेले आणि अनेक स्त्रियांनी स्त्रियांच्या साठी लढा दिला जसा कि आपल्याला सर्वांना माहित आहे कि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या किंवा स्त्री शिक्षणाची वाट मोकळी करून दिली आणि त्यांनी मुलींना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी अनेक संकटांचा सामना करून त्यांनी मुलींना देखील शिक्षण द्यावे म्हणून लोकांना समजावून सांगितले.

आणि अनेक लोकांची स्त्री शिक्षण हे किती महत्वाचे आहे ते सांगून मने वळवली आणि मग तेव्हापासून महिला शिक्षण घेवू लागल्या. पूर्वीच्या काळी महिलांच्यावर अनेक अन्याय व्हायचे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मारहाण केली जायची पण हे अनेकांना माहित नव्हते कि मुलींनी जर शिक्षण घेतले तर मुलींच्यावर आणि स्त्रियांच्यावर होणारे अन्याय कमी होतील तसेच मुली किंवा स्त्रिया आपल्या स्वकर्तुत्वावर काही तरी करू शकतील त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

पूर्वीच्या काळी मुलींना शिक्षण घेणे खूप अवगड होते कारण पूर्वीचे लोक हे खूप वेगळ्या आणि विचित्र विचाराचे होते आणि ते म्हणायचे कि मुलींनी किंवा स्त्रियांनी ‘चूल आणि मुल’ या गोष्टींचा फक्त विचार करावा म्हणजेच स्त्रीय्यानी फक्त घरातील कामे करावी जसे कि स्वयंपाक आणि घरातील इतर कामे तिने घरातून कोणत्याही कारणासाठी पडू नये.

त्याचबरोबर जरी लोक असे म्हणत असले कि मुलींनी आणि स्त्रियांनी फक्त घरामध्ये लक्ष घालावे इतर काश्यामध्ये नाही त्याच्या उलट देखील असे लोक होते कि मुलींनी चांगले शिक्षण घेवून आपल्या स्वताच्या पायावर उभे राहावे परंतु अनेक लोकांची शिक्षणासाठी लागणारे पैसे घालण्याची परिस्थिती नव्हती त्यामुळे अनेक मुलींचे शिक्षण व्हायचे नाही म्हणजेच जर घरातून शिक्षणासाठी घरातून काही अडचणी नसल्या तरी त्यांच्या परिस्थितीमुळे अनेक मुलींना शिक्षण घेता आले नाही तसेच सध्या जसे शाळा ह्या आपल्या गावामध्ये तसेच घराजवळ झाल्या आहेत.

पण पूर्वी शाळा ह्या अनेक मुलींच्या घरापासून लांब असायच्या आणि त्या लांब असल्यामुळे मुलींना शिक्षण घेता येत नव्हते कारण मुलींच्या घरातील लोक मुलगीच्या सुरक्षतेसाठी तेवढ्या लांब शिक्षणासाठी पाठवून देत नव्हते. त्याच बरोबर पूर्वीच्या काळी मुली शिक्षण घेणे हे समाज्याच्या विरुद्ध होते त्यामुळे मुली शिक्षण घेत नव्हत्या. परंतु जस जसे पूर्वीचे दिवस गेले आणि अधुनिकारणाची सुरुवात झाली तेंव्हापासून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग रिकामा होत गेला आणि अधुनिकरनासोबत लोकांचे विचार देखील बदलत गेले आणि सध्या मुलींच्या शिक्षणासाठी काहीच अडचणी येत नाहीत आणि मुली सध्या चांगल्या प्रकारे शिक्षण घेवू शकत आहेत.

तसेच मुलींच्यावर होणारा अन्याय देखील खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे आणि मुली जगामध्ये आता स्वातंत्र्यपणे वावरत आहेत आणि हे फक्त मुलींच्या शिक्षणामुळे शक्य झाले आहे कारण सध्या ममुली मोठ मोठ्या हुद्द्यावर आहेत आणि स्वताची जबाबदारी स्वता घेत आहेत. सध्या मुली इंजिनीयर, डॉक्टर, उद्योजिका, गायिका, नायिका, पायलट, पोलीस या सारख्या अनेक क्षेत्रामध्ये दिसून येते आणि त्यामुळे स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हिरीहीरेने भाग घेत आहेत आणि आपली कामगिरी बजावत आहेत आणि त्यामुळे मुलींच्यावर होणारे अन्याय आणि त्यांना होणारा त्रास याचे सामाजीतील खूप प्रमाण कमी झाले आहे.

मुलींच्या शिक्षणाचे अनेक फायदे आहेत आणि ते त्या संबधित घरासाठी देखील आहेत आणि देशासाठी देखील आहेत. आपल्याला माहित आहे कि घर हे स्त्रिया चालवतात आणि जर घरातील स्त्रिया ह्या चांगले शिकलेल्या असल्या तर त्या संपूर्ण घरावर चांगले संस्कार करू शकतात तसेच मुलांना चांगले घडवू शकतात आणि शिक्षण देखील चांगली करू शकतात आणि जर मुलांनी शिक्षण चांगले घेवून जर देशाची सेवा करायची म्हटले तर त्यामुळे देशाची प्रगती होऊ शकते.

तसेच जर मुली शिकल्या तर त्या आपल्या पायावर उभे राहून त्यांच्या गरजा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या समर्थ ठरू शकतील. मुली शिक्षण घेतल्यामुळे त्या आपल्या शिक्षणाचा वापर करण्यासाठी नोकरी करतील आणि त्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या मजबूत होतील. त्याचबरोबर महिलांचे किंवा मुलींचे शिक्षण झाल्यामुळे महिलांच्यावर होणारे घरातील अत्याचार, बालविवाह आणि बरेच इतर समस्या कमी होतील आणि स्त्रिया जगामध्ये स्वातंत्र्यपणे जगू शकतील.

मधल्या काळामध्ये मुलींचे शिक्षण किंवा स्त्री शिक्षण किती महत्वाचे आहे हे लोकांना पटवून सांगावे लागत होते तसेच लोकांच्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जागरुकता निर्माण करावी लागत होती परंतु सध्याची परिस्थिती पाहता आता मुलींना शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि लोकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व आता पटवून द्यावे लागत नाही.

सध्या मुली या सर्व क्षेत्रामध्ये आपले नाव उंचावत आहेत आणि मुली ह्या सर्व क्षेत्रामध्ये वरचड होत आहेत. त्या आपले आयुष्य स्वातंत्र्यपणे जगत आहेत तसेच मुलींच्या वाढत्या शिक्षणामुळे आणि जुन्या सामाजिक रूढी मोडीस निघाल्या आहेत तसेच स्त्रियांच्यावर होणारे अन्यान कमी झाले आहेत आणि स्त्रिया आज जगामध्ये मान उंचावून जगत आहेत.

अश्या प्रकारे सर्वांनी मुलींच्या शिक्षणाचे किंवा स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्व लक्षात घेवून मुलींना चांगले शिक्षण दिले पाहिजे आणि तिला तिच्या पायावर उभे केले पाहिजे.

आम्ही दिलेल्या girl education essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on girl education in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of yoga in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!