गोडा मसाला रेसिपी मराठी Goda Masala Recipe in Marathi

Goda Masala Recipe in Marathi गोडा मसाला रेसिपी मराठी गोडा मसाला हा महाराष्ट्रीयन स्वयंपाकामध्ये वापरली जाणारी एक मसाला पावडर आहे ज्याचा उपयोग मसाले भात, सर्व प्रकारच्या तिखट भाज्या, भरलेली वांगी किंवा आमटी मध्ये वापरला जातो आणि हा कोणत्याही तिखट पदार्थामध्ये वापरल्यामुळे त्या पदार्थाची चव वाढते आणि तो पदार्थ मसालेदार बनण्यास मदत होते. हि मसाल्याची पावडर जरी गोडा नसली तरी या मसाल्याला गोडा मसाला म्हणायचे कारण यामध्ये सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या नसतात पण जो इतर मसाला महाराष्ट्रीयन किंवा देशामध्ये कोठेही वापरतात त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या असतात.

पण गोड्या मसाल्यामध्ये वापलेल्या नसतात म्हणून याला गोडा मसाला म्हणतात. गोडा मसाला हा महाराष्ट्राबरोबर देशामध्ये अनेक भागामध्ये वापरला जातो. गोडा मसाला आपल्यला घरगुती पद्धतीने बनवता येतो पण प्रत्येक घरानुसार गोडा मसाला बनवण्यासाठी वापरलेले घटक वेगवेगळे असू शकतात. चला तर मग आज आपण या लेखामध्ये घरगुती पध्दतीने गोडा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.

Goda Masala Recipe in Marathi
Goda Masala Recipe in Marathi

गोडा मसाला रेसिपी मराठी – Goda Masala Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( भारतीय )
बनवण्याची पद्धतसोपी

गोडा मसाला कसा बनवायचा – how to make goda masala recipe in marathi

गोडा मसाला हा आपण वेगवेगळ्या तिखट भाज्यांमध्ये ग्रेवी मध्ये किंवा कोणत्याही मसाला भाजीमध्ये वापरू शकतो जसे कि मसाला दोडका, मसाला वांगी, मसाला भेंडी किंवा कोणत्याही प्रकारची आमटी असो किंवा सांबर. गोडा कोणत्याही तिखट पदार्थामध्ये वापरल्यामुळे रेसिपिला चांगली चव येते त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक स्वयंपाक घरांमध्ये गोडा वापरला जातो. तसेच गोडा मसाला घरच्या घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर मग गोडा मसाला कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.

तयारीसाठी लागणारा वेळ५ मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२० ते २५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन ( भारतीय )
बनवण्याची पद्धतसोपी

गोडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य – goda masala ingredients

गोडा मसाला बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खडे मसाले लागतात आणि सर्व खडे मसाले घरामध्ये उपलब्ध असू शकत नाहीत त्यामुळे आपण गोडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारातून अनु शकतो. चला तर मग गोडा मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ छोटी वाटी तीळ
  • २०० ग्रॅम धणे.
  • २० ग्रॅम काळी मिरी.
  • १०० ग्रॅम जिरे
  • २० ग्रॅम लवंग.
  • २५ ग्रॅम खसखस.
  • २० ग्रॅम दालचिन
  • ५ ग्रॅम तमाल पत्री.
  • १० ग्रॅम दगड फुल.
  • १ बदाम फुल.
  • २५ ग्रॅम हिंग खडा हिंग.
  • २० ग्रॅम सुंठ पावडर.
  • १ चमचा लाल मिरची पावडर
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

गोडा मसाला बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make goda masala recipe 

  • आता आपण वर दिलेले खडे मसाले वापरून गोडा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात.
  • गोडा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम सर्व मसाले उन्हामध्ये चांगले १ ते २ तास वळवून घ्या.
  • आणि जे मसाले आपण तेलामध्ये भाजू शकतो ते मसाले वेगळे करा आणि जे मसाले आपल्याला कोरडे भाजावे लागतील ते मसाले वेगळे करा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये सर्व कोरडे भाजावे लागणार आहेत ते मसाले प्रथम भाजून घ्या जसे कि तील, जिरे, धने आणि खसखस आणि सर्व मसाले भाजून झाल्यानतर एकत्र करा आणि मिक्सरवर बारीक पावडर करून घ्या आणि ती पावडर बाजूला ठेवा.
  • आता त्याच कढईमध्ये १ ते २ मोठे चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये काळी मिरी आणि लवंग टाका आणि ते १ ते २ मिनिटासाठी भाजा आणि ते तेलातून बाहेर काढा. मग त्यामध्ये दालचिन, दगड फुल, खडा हिंग आणि एक बदाम फुल त्या तेलामध्ये टाका आणि त्याचा खमंग वास येईपर्यंत ते भाजून घ्या आणि ते देखील कढतून काढून बाजूला ठेवा.
  • मग शेवटी त्यामध्ये तमाल पत्रीची पाने टाका आणि ती देखील चांगली भाजून घ्या.
  • त्यानंतर हा तेलामध्ये भाजलेला मसाला थोडा थंड झाला कि तो एकत्र करून त्याची बारीक पावडर करून घ्या.
  • आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडा भाजलेला मसाला पावडर आणि तेलामध्ये भाजलेल्या मसाल्याची पावडर एकत्र करा आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर, सुंठ आणि चवीनुसार मीठ घालून ते परत एकदा मिक्सरला फिरवून घ्या म्हणजे सर्व मिश्रण चांगले एकत्र होईल.
  • आता हा मसाला चाळणीने चालून घ्या.
  • तुमचा घरगुती पध्दतीने बनवलेला गोडा मसाला तयार झाला.

गोडा मसाला बनवण्यासाठी वापरलेले काही घटक जे मसाल्याची चव वाढवतात – key ingredients 

  • दगड फुल : दगड फुल या खड्या मसाल्यामुळे गोड्या मसाल्याला एक वेगळीच चव येते. त्यामुळे जेंव्हा तुम्ही घरामध्ये गोड मसाला बनवलं तेंव्हा त्यामध्ये दगड फुल आवर्जून वापरा.
  • तीळ : गोडा मसाल्यामध्ये खोरडे भाजलेले तील देखील वापरा त्यामुळे मसाल्याला खूप चांगली चव येते.
  • खसखस मुले देखील मसाल्याला चांगली चव येते त्यामुळे हा गोडा मसाला बनवताना खसखस वापरायला विसरू नका.

आम्ही दिलेल्या goda masala recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोडा मसाला रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या goda masala powder recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि brahmani goda masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maharashtrian masala Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!