सोने तारण कर्ज माहिती Gold Loan Information in Marathi

gold loan information in marathi – sone taran karj सोने तारण कर्ज माहिती, सध्या बाजारातील बँका अनेक प्रकारचे वेगवेगळे कर्ज देतात आणि या मध्ये घरासाठी कर्ज, सोन्यावर कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज अश्या वेगवेगळ्या कारणांच्यासाठी बँक कर्ज  देते. तसेच आज आपण या लेखामध्ये गोल्ड लोन म्हणजेच ज्याला मराठीमध्ये सोने तारण कर्ज म्हणतात या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. गोल्ड लोन म्हणजे जे बँका सोन्याविरुध्द देतात किंवा जे कर्जदारांच्याकडून त्यांच्या सोन्याच्या वस्तू (१८ ते २४ कॅरेटच्या मर्यादेत) तारण ठेवून घेतलेले हे एक सुरक्षित प्रकारचे कर्ज असते.

गोल्ड लोन हा वैयक्तिक कर्जाचा प्रकार आहे आणि हे कर्ज एखाद्या व्यक्तीने घेतले तर त्या व्यक्तीच्या तत्काळ गरजा पूर्ण होण्यास मदत होते. सोने ककर्जाचे व्याज दर हे इतर कर्जाच्या प्रकारापेक्षा खूप कमी असतात आणि कर्जाचे व्याज दर हे बँकेनुसार किंवा सावकारानुसार बदलू शकतात आणि या कर्ज प्रकारचे व्याज दर हे ९ टक्के ते १७ टक्के इतके असू शकतात.

तसेच एखाद्या व्यक्तीने कर्जासाठी जाण्यापूर्वी व्याजदर, उशिरा पेमेंट शुल्क, प्रक्रिया शुल्क, प्री पेमेंट चार्जीस तपासणे आणि त्यांची तुलना करणे खूप गरजेचे असते. सोने तारण कर्ज किंवा सुवर्ण कर्ज हि अल्प मुदतीचे असते आणि हि कर्ज मुदत देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते.

आणि ते कर्ज बहुतेक वेळी १ महिना ते ५ वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते. सोने तारण कर्ज हे तुमच्या सोन्यावर सुरक्षित असल्यामुळे तुम्ही कर्जाच्या परतफेडीवर सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणजेच तुम्ही परत करू शकता इतकेच कर्ज तुम्ही घेतले पाहिजे.

gold loan information in marathi
gold loan information in marathi

सोने तारण कर्ज माहिती – Gold Loan Information in Marathi

कर्जाचा प्रकारगोल्ड लोन, सोने तारण कर्ज, सुवर्ण कर्ज
पध्दतबँका सोन्याविरुध्द देतात किंवा जे कर्जदारांच्याकडून त्यांच्या सोन्याच्या वस्तू (१८ ते २४ कॅरेटच्या मर्यादेत) तारण ठेवून घेतलेले हे एक सुरक्षित प्रकारचे कर्ज असते
व्याजदर९ टक्के ते १७ टक्के
कर्जाचा कालावधी१ महिना ते ५ वर्ष

गोल्ड लोन म्हणजे काय – gold meaning in marathi

गोल्ड लोन म्हणजे जे बँका सोन्याविरुध्द देतात किंवा जे कर्जदारांच्याकडून त्यांच्या सोन्याच्या वस्तू (१८ ते २४ कॅरेटच्या मर्यादेत) तारण ठेवून घेतलेले हे एक सुरक्षित प्रकारचे कर्ज असते. गोल्ड लोन हा वैयक्तिक कर्जाचा प्रकार आहे आणि हे कर्ज एखाद्या व्यक्तीने घेतले तर त्या व्यक्तीच्या तत्काळ गरजा पूर्ण होण्यास मदत होते.

गोल्ड लोन घेतल्याचे फायदे – gold loan benefits

गोल्ड लोन म्हणजे एखादा व्यक्ती आपले सोने तारण ठेवून बँकेकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण खर्चासाठी, वैद्यकीय आणीबाणीसाठी, लग्नाच्या खर्चासाठी किंवा इतर कोणत्याही वापरासाठी तो व्यक्ती कर्ज घेवू शकतो. गोल्ड लोन हे वैयक्तिक प्रकारचे कर्ज आहे आणि आपण सोने तारण ठेवल्यानंतर ते आपल्याला लगेच मिळते. चला तर आता आपण खाली गोल्ड लोण घेण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया.

  • वापराची लवचिकता : यामध्ये प्रक्रियेमध्ये अंतिम वापराचे कोणतेही निरीक्षण नसल्यामुळे या प्रकारचे कर्जे हे तुम्हाला कोणत्याही प्रकारासाठी हि कर्जाची रक्कम खर्च करण्यासाठी परवानगी देते.
  • कमी व्याजाचा दर : कमी व्याज दर हा एक महत्वाचा फायदा आहे आणि वैयक्तिक कर्जाच्या तुलनेमध्ये सोन्याच्या कर्जावरील व्याजदर कमी आहेत कारण यामध्ये सोने हे संपर्श्विक म्हणून काम करत असते.
  • जलद वितरण : या कर्जाच्या प्रकारामध्ये जलद वितरण म्हणजेच तुम्हाला कर्ज लवकरात लवकर मिळते आणि कमीत कमी दस्ताऐवाजामुळे सुवरण कर्ज सुरक्षित स्वरूपामुळे जलद गतीने प्रक्रिया होण्यास मदत होते तसेच या प्रकारामध्ये तुम्हाला आवश्यक असलेला निधी हा काही मिनिटामध्ये मिळू शकतो.
  • कोणत्याही अंतिम प्रतिबंधाची चिंता न करता तुम्ही क्राजाची रक्कम कोणत्याही खर्चासाठी वापरू शकता.
  • सोन्याचा वापर हा क्वचितच पैसा निर्माण करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे भांडवल उभे करण्यासाठी आणि अराठीक गरजा पूर्ण करण्यासाठी जेंव्हा तुम्हाला पैशाची गरज भासते निधी वापरण्यासाठी गोल्ड लोन हा एक उत्तम उपाय आहे असे मला वाटते. कारण हे तुमच्या घरापेक्षा बँकेमध्ये लॉकर मध्ये सुरक्षित राहते.
  • ज्यावेळी तुम्ही गोल्ड लोन या प्रकारातून व्याज घेत असता त्यावेळी गोल्ड लोन मंजूर करण्यासाठी सावकारांना तुमच्या क्रेडीट स्कोअरची आणि मासिक उत्पन्नाची माहिती आवश्यक नसते. तारण म्हणून ठेवलेल्या सोन्याच्या आधारे कर्जाचे मूल्य केले जाते.
  • फ्लोरक्लोजर किंवा प्री पेमेंट शुल्काची चिंता न करता तुम्ही तुमचे गोल्ड लोणचे व्याज आणि मूळ रक्कम कधीही परत करू शकता.
  • सावकार तुमचे तारण ठेवलेले सोने हे हेवी ड्युटी व्हॉल्टमध्ये साठवून सुरक्षित ठेवले जाते.

गोल्ड लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे – documents

बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे लागतात आणि तसेच गोल्ड लोन कर्जाची प्रक्रिया देखील पुढे नेण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात आणि हि कागदपत्रे बँकेनुसार किंवा सावकारानुसार बदलू शकतात. चला तर खाली आपण गोल्ड लोन घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते पाहूया.

  • ओळखीचा पुरावा (जसे कि आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड).
  • पत्ता पुरावा किंवा रहिवासी पुरावा (जसे कि ड्रायव्हरचा पुरावा, वीज बिल, पासपोर्ट) .
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.

गोल्ड लोनसाठी अर्ज कसा करावा / प्रक्रिया – how to apply/process

गोल्ड लोनसाठी अर्ज करताना तुम्हाला खालील प्रक्रीयेप्रमाणे अर्ज करावा लागतो आणि खाली आपण अर्ज करण्याची प्रक्रिया पाहणार आहोत.

  • सर्वप्रथम बँक किंवा सावकार निवडणे : गोल्ड लोन प्रक्रीयेमधील पहिली पायरी म्हणजे तुम्ही तुमच्या पसंतीचा सावकार निवडणे. तुम्ही तुमच्या मालमत्तेचे संरक्षण करणारा आणि कर्ज कालावधी संपल्यानंतर तुम्हाला तुमची मालमत्ता परत करणारा प्रतिष्ठित सावकार किंवा बँक निवडा.
  • सोन्याचे मुल्यांकन : एकदा सावकाराची किंवा बँकेची निवड झाली कि तुम्ही तुमच्या सोन्याचे मुल्यांकन केले पाहिजे आणि मूल्यांकनाचा प्रकार हा सावकारावर किंवा बँकेवर आधारित असतो. या मुल्यांकन प्रक्रियेमध्ये परीक्षक सोन्याचे वजन करतो आणि केवायसी प्रक्रिया करतो. मग सावकार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम, व्याजदर आणि इतर सर्व अटींच्याविषयी माहिती देतो.
  • परतफेड अटींचे मुल्यांकन : कर्जदार हे तुम्हाला कर्जाच्या कालावधी दरम्यान फक्त गोल्ड लोणच्या व्याज घटकाची परतफेड करण्याची परवानगी देतात. गोल्ड लोनचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही कधीही मूळ रक्कम एकरकमी परत करू शकता.
  • कर्जाची रक्कम देणे : हि कर्ज देण्याच्या प्रक्रियेतील शेवटची प्रक्रिया आहे आणि कर्ज वाटप हि गोल्ड लोन प्रक्रियेमधील पुढची आहे आणि तुम्ही प्रस्तावित गोल्ड लोन अटींशी सहमत झाल्यानंतर सावकार तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा करतो.  

आम्ही दिलेल्या gold loan information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सोने तारण कर्ज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sone taran karj या gold meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gold loan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!