गोपाळ कृष्ण गोखले माहिती Gopal Krishna Gokhale Information in Marathi

Gopal Krishna Gokhale Information in Marathi गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या लहानश्या खेड्यात झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात येथे गोपाळ कृष्ण गोखले यांचे बालपण गेले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कागल शहर येथे झाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण महादेव गोखले असे होते. आणि आईचे नाव सत्यभामाबाई कृष्ण गोखले होते. सदरच्या लेखात आपण गोपाळ कृष्ण गोखले यांच्या शिक्षण ,राजकीय आयुष्याबद्दल व कार्याबद्दल सखोल माहिती पाहणार आहोत.

gopal krishna gokhale information in marathi
gopal krishna gokhale information in marathi

गोपाळ कृष्ण गोखले माहिती – Gopal Krishna Gokhale Information in Marathi

नाव (Name)गोपाळ कृष्ण गोखले
जन्म (Birthday)9 मे 1866
जन्मस्थान (Birthplace)रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक खेड्यात
वडील (Father Name)कृष्ण महादेव गोखले
आई (Mother Name)सत्यभामाबाई कृष्ण गोखले
पत्नी (Wife Name)सावित्रीबाई गोखले
मुले (Children Name)काशीबाई, गोधूबाई
मृत्यू (Death)१९ फेब्रुवारी १९१५
लोकांनी दिलेली पदवी (gopal krishna gokhale upadhi name)प्रोफेसर टू ऑर्डर

गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिक्षण :-

वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांचे बंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडले आणि त्यांच्या पत्नीने स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे गोपाळ कृष्ण गोखले यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज आणि मुंबईचे एल्फिन्स्टन कॉलेज येथे झाले. त्यांनी 1884 मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जानेवारी 1885 मध्ये  शिक्षकाची नोकरी स्वीकारली होती. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट वर फेलो म्हणून 1895 मध्ये नियुक्ती असा प्रवास सुरू होत असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला होता.

सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून त्यांनी काही काळ कार्य केले होते. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ आणि सावकारांचा त्रास या विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदन पाठवणे,  त्याबाबत पाठपुरावा करणे अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्या विषयक कार्यात गोपाळ कृष्ण गोखले यांनी शिस्त निर्माण केली होती. त्यामुळे गोपाल कृष्ण गोखले यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळत होती.

गोपाळ कृष्ण गोखले यांचे राजकीय आयुष्य :-

बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला होता. लोकमान्य टिळक यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोपाळ कृष्ण गोखले यांना मवाळ वादाचा मार्ग स्वीकारला होता. लोकशिक्षण, अस्पृश्यता, जातिनिर्मूलन, स्त्री शिक्षण,  स्त्री-स्वातंत्र्य यांच्यासंबंधी त्यांनी समाजकार्य केले आहे. इंग्रजी शासकांना समजेल असे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या होत्या. 1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदे मंडळात झाली होती.

गोपाळ कृष्ण गोखले हे नामदार झाले होते. अशा प्रकारे या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग करून घेतला होता. विविध समस्यांना आणि प्रश्नांना वाचा मिळवून दिली होती. त्यावेळी त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनीं नामदारांना 1909 साली  मार्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले होते. त्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्यावेळी त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि देखील प्रश्न त्यांच्या कानी घातले होते.

त्याकारणे त्यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले होते. काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषण आ पासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध 1889 मध्ये प्रस्थापित झाला होता. आयुष्याच्या अखेरीपर्यंत गोपाळ कृष्ण गोखले कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले होते.  काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून मानले जात होते.

भारतामधील ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या सामाजिक व राजकीय एक नेत्यांपैकी होते. भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखले यांचे शिष्य मानले जाते. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर 1885 ते 1905 हा पहिला कालखंड होता. तो कालखंड मवाळमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. गोपाळ कृष्ण गोखले या  काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून ओळखले जाते.

त्यांनी राजकारणाला अध्यात्मिकरणचा विचार मांडला होता. गोपाळकृष्ण गोखले यांना एकोणिसाव्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमधील एक महत्वाचे विचारवंत म्हणून ओळखले जाते. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्त्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली होती. महात्मा गांधीनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीची सुरुवात करताना गोपाळ कृष्ण गोखले यांना आपले गुरू मानले होते.

कुशल राजनीती तज्ञ गोपाळ कृष्ण गोखले होते. त्यांचा दृष्टिकोन राजकारणाच्या प्रति उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे मत गोपाळ कृष्ण गोखले यांचे होते. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जहाल विचार व आणि सरळ प्रतिकार , सशस्त्र क्रांती यावर विश्वास नव्हता. मात्र त्यांचा विश्वास इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर, उदारतेवर, निष्पक्षपातीपणावर होता.

इंग्रज पूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मते नव्हती. इंग्रजांच्या अगमनानंतर केवळ सनदशीर मार्गाने ब्रिटिशांनी शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित केली होती. गोपाळ कृष्ण गोखले यांचा दृष्टिकोन हा ब्रिटिषधार्जिन होता. गोपाळ कृष्ण गोखले यांनी खऱ्या अर्थाने राजकारणाला आध्यात्मिकतेवर बसवले होते. महात्मा गांधी यांनी त्यांचाच वारसा पुढे चालवला होता. महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाचा  दौरा गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून केला होता.

अहिंसात्मक सत्याग्रहाची चळवळ देशामध्ये उभी करण्यात यशस्वी झाले होते.राजकीय आणि सामाजिक परिवर्तन करताना हिंसात्मक मार्गाला त्यांनी केलेला विरोध म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या उदारमतवादाचे वैशिष्ट्य आहे. सरकारशी संघर्ष करण्याच्या आणि  कायद्याच्या उल्लंघन करण्याच्या विरोधात गोपाळ कृष्ण गोखल हे होते. कोणताही प्रश्न हिंसात्मक मार्गाने सुटणार नाही उलटपक्षी तो अधिकच गंभीर बनतो असा विचार गोपाळ कृष्ण गोखले यांनी मांडला होता.

ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली भारताची नवनिर्मिती करता येईल अशी गोपाळ कृष्ण गोखले यांची धारणा होती. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या उदारमतवादी विचारात कोणतेही स्थान हिंसेला नव्हते. पुणे या ठिकाणी भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती. या माध्यमातून लोकांना  सामाजिक सुधारणा आणि राजकीय शिक्षण मिळाव हा उद्देश गोपाळ कृष्ण गोखले यांनी कायम ठेवला होता. त्यांचा विश्वास ब्रिटिश सरकारच्या न्याय बुद्धीवर होता. भारतात सर्वप्रथम कायद्यांचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यामुळे इंग्रजी सत्तेविषयी गोपाळ कृष्ण गोखले यांचे धोरण मवाळ होते.

कोणतेही चळवळ कायद्याच्या चौकटीतून स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे असे गोपाळ कृष्ण गोखले यांचे विचार होते. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ‘सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली होती. सार्वजनिक सभा, राष्ट्र सभा समाचार या वृत्तपत्रातूनही त्यांनी लेखन केले होते. वृत्तपत्रातील लिखानाद्वारे गोपाळ कृष्ण गोखले हे समज सुधारणांचा सतत पाठपुरावा करत होते.

गोपाळ कृष्ण गोखले यांनी “राजकारणाचे आध्यात्मिकरण” ही अतिशय वेगळी संकल्पना त्यांनी भारतात मांडली होती.राजकारण हे साधन शुचितेला महत्व दिले, सेवभावाने करायचे विशेष काम आहे असे गोपाळ कृष्ण गोखले यांचे मत होते. नैतिकता, चारित्र्य, निस्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा सतत्यानी त्यांनी पाठपुरावा केला होता. स्वतःचे आदर्श उदाहरण ही तत्कालीन नेत्यासमोर आणि जनतेसमोर ठेवले होते. “भारत सेवक समाजाची” स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी इ. स. 1905 साली केली होती.

गोपाळ कृष्ण गोखले यांचा मृत्यू :-

संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ‘राजकारण’ न करता विरुद्ध सामाजिक जीवन जगणाऱ्या या महाराष्ट्रच्या निधन वयाच्या 49 व्या वर्षी झाले.

‘अंकगणित’ हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते. ज्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या अंकगणितातली गणित सोडवली त्यांना कोणतेही गणित अवघड वाटणार नाही अशी तेव्हा मान्यता होती. नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे येथे ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली.

आसामी इतिहासकार डॉ. सुर्यकुमार भुया यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनानंतर आसामी भाषेत 1916-17 या काळात लिहिलेल्या गोखल्यांच्या पहिल्या चारित्र्याचे मराठी भाषेमध्ये 94 वर्षांनी 2011 मध्ये मराठीत आले होते. विद्या शर्मा यांनी हे भाषण केले आहे.

आम्ही दिलेल्या gopal krishna gokhale information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लाला लजपतराय यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या namdar gopal krishna gokhale information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about gopal krishna gokhale in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!