गोपाळगड/अंजनवेल किल्ला माहिती Gopalgad Fort History in Marathi

gopalgad fort history in marathi – gopal gad fort information in marathi गोपाळगड/अंजनवेल किल्ला माहिती, सात एकर परिसरामध्ये पसलेला गोपाळ गड हा महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्यामध्ये वसलेला आहे. गोपाळगड या किल्ल्याला अंजनवेल किल्ला म्हणून देखील ओळखले जाते आणि या किल्ल्याची प्रगती किंवा किल्ल्याचा विस्तार हा वेगवेगळ्या काळामध्ये होत गेला. गोपाळगड हा किल्ला सागरी किल्ला आहे आणि हा किल्ला वशिष्ठ नदी पर्यंत असणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला आहे आणि या किल्ला विजापूरच्या शासकांनी १६ व्या शतकामध्ये बांधला आहे असे म्हटले जाते.

इ. स. १६६० या साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याचे नाव गोपाळगड असे ठेवले तसेच त्यांनी किल्ल्यामध्ये अनेक बांधकामे देखील करून घेतली अशा प्रकारे या किल्ल्याचा विस्तार हा प्रत्येक घराण्याकडून झाला. चला तर खाली आपण किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेवूयात.

gopalgad fort history in marathi
gopalgad fort history in marathi

गोपाळगड/अंजनवेल किल्ला माहिती – Gopalgad Fort History in Marathi

किल्ल्याचे नावगोपाळगड किंवा अंजनवेल किल्ला
प्रकारसागरी किल्ला
किल्ल्याची बांधणीकिल्ल्याची बांधणी १६ व्या शतकामध्ये विजापूरच्या शासकांनी केली
ठिकाणहा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर या तालुक्यामध्ये वसलेला आहे

गोपाळगड किल्ल्याचा इतिहास – gopal gad fort information in marathi

गोपाळगड हा किल्ला वशिष्ठ नदी पर्यंत असणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता आणि हा किल्ला विजापूरच्या शासकांनी १६ व्या शतकामध्ये बांधला होता. त्यानंतर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दाभोळ मोहीम करत असताना गोपाळगड म्हणजेच अंजनवेल किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये किल्ल्यावर अनेक बांधकाम देखील केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर हा किल्ला सिद्दी खैरत खानने आपल्या ताब्यात घेतला आणि याने त्याच्या काळामध्ये या किल्ल्याची तटबंदीचा विस्तार हा समुद्र सपाटी पर्यंत केला परंतु १७४४ मध्ये हा किल्ला तुलोजी आंग्रे यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तुलोजी आंग्रे हे एक मराठा योध्दा होते म्हणजेच हा किल्ला परत मराठा साम्राज्यामध्ये समविष्ट झाला.

तुलोजी आंग्रे यांच्या कारकिर्दीत त्यांनी किल्ल्याचा बालेकोट बांधला. त्यानंतर हा किल्ल्या १७५५ च्या दरम्यान पेशव्यांच्या हाती गेला आणि ज्यावेळी इंग्रजांनी महाराष्ट्रातील अनेक किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये गोपाळगड हा किल्ला देखील होता आणि शेवटी १८१८ मध्ये गोपाळगड हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.

गोपाळगड किल्ल्याचे तीन भाग – parts of fort 

गोपाळगड हा एक सागरी किल्ला आहे आणि हा किल्ला ७ एकर क्षेत्रफळामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याची बांधणी हि तीन विभागामध्ये बांधण्यात आली आहे. ते तीन भाग आपण खाली पाहणार आहोत.

 • मुख्य मध्यवर्ती किल्ला
 • बालेकोट.
 • पडकोट.

गोपाळगड किल्ल्याचा विस्तार आणि बांधकाम

गोपाळगड किंवा अंजनवेल हा किल्ला समुद्रकिनारी ७ एकर परिसरामध्ये वसलेला आहे. हा किल्ला तीन विभागामध्ये बांधला आहे आणि ते म्हणजे मुख्य मध्यवर्ती किल्ला, बालेकोट आणि पडकोट. या किल्ल्याचा विस्तार हा वेगवेगळ्या घराण्यांनी केला आहे आणि हा किल्ला विजापूरच्या शासकांनी वशिष्ठ नदी पर्यंत असणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी १६ व्या शतकामध्ये बांधला.

गोपाळगड या किल्ल्याला एक मजबूत तटबंदी आहे आणि हि तटबंदी सिद्दी खैरत खानने त्याच्या कारकिर्दीत बांधली होती. तसेच या किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे आहेत आणि किल्ल्याला पश्चिमेला किल्ल्याचे प्रवेश दार आहे. किल्ल्याच्या आतमध्ये आंब्याची झाडे आहेत तसेच इतर झुडपे देखील आहेत त्याचबरोबर किल्लेदाराचे निवास्थान, विहिरी आहेत. या किल्ल्याला एकूण १२ बुरुज आहेत आणि हे बुरुज भिंतीमध्ये एक दंडगोलाकार रचना आहे.

किल्ल्या पर्यंत कसे पोहचायचे – how to reach 

जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही तुम्ही या किल्ल्याला बसने किंवा टॅक्सीने येऊ शकता. गुहागर हे शहर गोपाळगड किल्ल्यापासून खूप जवळचे शहर आहे म्हणजेच हे शहर किल्ल्यापासून १२ किलो मीटर अंतरावर आहे आणि या शहराला पुणे, मुंबई आणि कल्याण या शहरांनी चांगल्या रस्ता वाहतुकीने जोडलेले आहे आणि त्यामुळे या शहरातून गुहागरला आपण सहज बसने येवू शकतो आणि तेथून गोपाळगड किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी करू शकतो.

त्याचबरोबर काही लोकांना रेल्वेने जायचे असल्यास या किल्ल्यापासून जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे चिपळूण रेल्वेस्थानक आणि हे गुहागर या शहरापासून ४० किलो मीटर अंतरावर आहे. तुम्ही चिपळूण रेल्वे स्थानकावर येऊन तेथून टॅक्सी किंवा बस पकडून किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.

गोपाळगड/अंजनवेल किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – anjanvel fort information in marathi

 • गोपाळगड हा किल्ला सागरी किल्ला आहे आणि हा किल्ला वशिष्ठ नदी पर्यंत असणाऱ्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला आहे आणि या किल्ला विजापूरच्या शासकांनी १६ व्या शतकामध्ये बांधला आहे असे म्हटले जाते.
 • या किल्ल्याला दोन मुख्य दरवाजे आहेत आणि किल्ल्याला पश्चिमेला किल्ल्याचे प्रवेश दार आहे.
 • किल्ल्याला मजबूत तटबंदी आहे आणि हि तटबंदी सिद्दी खैरत खानने त्याच्या कारकिर्दीत बांधलेली आहे. सिद्दी खैरत खानने या किल्ल्यावर ४६ वर्ष राज्य केले होते.
 • १८१८ मध्ये कर्नल केनेडी यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला म्हणजे हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.
 • १७४४ मध्ये हा किल्ला तुलोजी आंग्रे यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि तुलोजी आंग्रे हे एक मराठा योध्दा होते म्हणजेच हा किल्ला परत मराठा साम्राज्यामध्ये समविष्ट झाला.
 • ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दाभोळ मोहीम करत असताना गोपाळगड म्हणजेच अंजनवेल किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये किल्ल्यावर अनेक बांधकाम देखील केली.
 • गोपाळगड या किल्ल्याला अंजनवेल किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.
 • या किल्ल्याला आपण रस्ता आणि रेल्वे मार्गाने भेट देवू शकतो.

आम्ही दिलेल्या gopalgad fort history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोपाळगड/अंजनवेल किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gopal gad fort information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि anjanvel fort information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!