gor honyasathi upay in marathi गोरे होण्यासाठी उपाय प्रत्येक व्यक्तीला आपल्या सौंदर्याबद्दल खूप काळजी असते आणि लोक आपण सर्वांच्यापेक्षा कसे चांगले दिसू यावर त्यांचे लक्ष असते आणि खासकरून स्त्रियांच्या मध्ये हा क्रेझ खूप असतो आणि स्त्रिया आपल्या सौंदर्याबद्दल सतत चिंतीत असतात तसेच त्या अनेक वेगवेगळे उपाय करतात आणि आपला चेहरा आणि त्वचा चांगली कशी दिसेल या वर लक्ष देतात. जरी एकादी व्यक्ती गोरी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा रंग हा सावळ्या रंगाचा असला तरहि या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.
गोरी असणारी व्यक्ती आपला चेहरा किंवा त्वचा तजेलदार कशी दिसेल यासाठी प्रयत्न करत असते तर सावळी असणारी व्यक्ती आपला चेहरा किंवा त्वचा कोणता उपाय करून उजळेल या साठी प्रयत्न करत असते. सध्या वातावरणामधील प्रदूषण हे खूप वाढलेले आहे आणि या प्रदूषणामुळे देखील आपला चेहरा काळवंडतो तसेच सध्या सूर्याची किरणे देखील खूप प्रखर पडतात आणि या किरणांच्या मुळे देखील त्वचा काळवंडते तसेच बाहेरील धुळी मुळे अशा वेगवेगळ्या कारणांच्या मुळे आपली त्वचा हि घाण आणि काळवंडल्यासारखी दिसते.
आणि म्हणून अशा व्यक्तींनी ज्यांची त्वचा उन्हामुळे, धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे त्वचा काळवंडते किंवा घाण होते अशा व्यक्तींनी आपल्या त्वचेची तसेच आपल्या चेहऱ्याची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि आपली त्वचा नीरोगी आणि ताजीतवानी दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले पाहिजेत. चला तर आता आपण त्वचा तजेलदार आणि उजळ दिसण्यासाठी काय काय उपाय आहेत ते पाहूया.
चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय – Gor Honyasathi Upay in Marathi
चेहरा काळा पडण्याची कारणे
आता आपण त्वचा कशामुळे खरं होते किंवा काळवंडते याची करणे पाहणार आहोत. सध्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या त्वचेची किंवा चेहऱ्याची निगा राखणे जमत नाही अश्या प्रकारे अनेक कारणांच्यामुळे त्वचा खराब होते किंवा काळवंडते. चला तर आता आपण खाली त्याची कारणे पाहूयात.
- सध्या वातावरणामध्ये प्रदूषण खूप वाढले आहे आणि हे हवेतील वाईट प्रदूषण आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर परिणाम करते.
- तसेच सूर्याची प्रखर किरणे आपल्या चेहऱ्याला किंवा त्वचेला ती प्रखर किरणे वाईट परिणाम करतात आणि त्यामुळे आपली त्वचा काळवंडते किंवा खारब होते.
- सध्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या त्वचेची किंवा चेहऱ्याची निगा राखणे जमत नाही
- रस्त्यावरून जाताना आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर धूळ साचून आपली त्वचा खराब दिसते.
- तसेच वाढत्या वयामुळे देखील आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा त्वचेमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात.
- त्याचबरोबर काही लोक केमिकलयुक्त कॉस्मेटीकचा खूप वापर करतात आणि या प्रकारच्या केमिकलयुक्त कॉस्मेटीकच्या अतिवापराने देखील त्वचा काळवंडते किंवा खराब होते.
गोरे होण्यासाठी घरगुती उपाय – home remedies for whitening skin and face
प्रत्येकाला वाटते कि आपली त्वचा सुंदर, गोरी आणि तजेलदार दिसावी आणि या साठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. चला तर आता आपण त्वचा गोरी आणि सुंदर बनवायची असल्यास काय उपाय करावे या बद्दल माहिती घेवूया.
- खूप पूर्वीच्या काळापासून त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा उपाय म्हणजे डाळीचे / बेसन पीठ. असे म्हटले जाते डाळीचे पीठ हे आपला रंग उजळण्यासाठी मदत करतो म्हणून जर सावळ्या व्यक्तीने आठवड्यातून ३ दिवसातून डाळीचे पीठ आणि दुध मिक्स करून चेहऱ्याला आणि हाताला लावले आणि ते १५ ते २० मिनिटे ठेऊन ते पाण्याने स्वाचा धुतले तर आपल्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो. यामुळे
- तसेच जर आपण थोडेसे केल दुधामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट बनवून ते चेहऱ्याला लावले आणि ते ३० ते ४५ मिनिटे ठेऊन कोमट पाण्याने धुतले तर आपला चेहरा उजळ आणि तजेलदार दिसण्यास मदत होते.
- टोमॅटो चा अर्धा भाग कापून घ्या आणि त्यावर अर्धा चमचा हळद घाला आणि तो टोमॅटो तोंडावर हळुवारपणे घासा असे ५ ते ७ मिनिटे करा त्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार आणि गुळगुळीत दिसेल आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो.
- घरगुती उपायांपैकी एक चांगला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कच्चे दुध घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटांनी तुमच्या चेहऱ्याला मास्क लावल्यासारखे लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा आणि ३० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे तुमचा चेहरा उजळ दिसण्यास मदत होते.
- आपल्या त्वचेसाठी काकडी देखील खूप मोठी कामगिरी बजावते. जर आपण काकडीचे तुकडे एक मग फिल्टर पाण्यामध्ये घातले तसेच त्यामध्ये १ चमचा तांदळाचे पीठ घालून ते मिश्रण मिक्स करून ते २ ते ३ तास तसेच ठेवा आणि मग त्या पाण्याने तुमचा चेहरा धुवा देखील आपल्याला फरक जाणवतो.
- दही आणि बेसन मिश्रण चेहऱ्याला लावले तरी देखील आपला चेहरा उजळण्यास मदत होते.
- कोरफड थंड आणि दाहक-विरोधी प्रभावामुळे त्वचेला प्रकाश देणारा एजंट म्हणून वापरला जाऊ शकतो . कोरफडीचा वापर केल्याने पेशी विभाजन आणि खराब झालेल्या ऊतींच्या दुरुस्तीला प्रोत्साहन मिळते. हे हायपरपिग्मेंटेशनच्या उपचारात मदत करू शकते
- काही वेळा आपण उन्हामध्ये गेल्यानंतर चेहरा खराब होऊ शकतो किंवा काळवंडतो आणि म्हणून सूर्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी आपण आपल्या चेहऱ्याला सूट होणारे सनस्क्रीन लावले पाहिजे त्यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांच्या मुळे आपली त्वचा काळवंडनार नाही किंवा खराब होणार नाही.
- संत्री त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत कारण ते व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत आहेत. संत्री एक लाइटनिंग एजंट म्हणून काम करून त्वचा उजळ करण्यास मदत करू शकतात. तसेच, ताजे पिळून काढलेल्या संत्र्याच्या रसाचे दररोज सेवन केल्याने त्वचा मऊ आणि गुळगुळीत राहते.
- कोरडेपणामुळे त्वचेवर काळे डाग येऊ शकतात आणि मध त्वचेला हायड्रेट करू शकतो ज्यामुळे त्वचेचा टोन एकसमान होण्यास मदत होते. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असल्याने, मध मुरुमांच्या विकासास प्रतिबंध करते आणि मुरुमांचे विद्यमान चट्टे आणि वयाच्या डाग कमी करण्यास मदत करते.
- हळद मेलेनिनचे उत्पादन रोखते आणि त्वचेला एकसमान रंग देते. ते निरोगी त्वचा राखण्यास देखील मदत करते कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात.
- टॅन किंवा सनबर्नची चिन्हे काढून टाकण्यासाठी योग्य, टोमॅटो पॅक तुमच्या त्वचेचा रंग हलका करेल आणि तुमच्या चेहऱ्यावरील मृत पेशी साफ करेल. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त १ ते २ टोमॅटो, २ चमचे लिंबाचा रस आणि बेसन ( हे ऐच्छिक आहे ) लागेल आणि ते सर्व ब्लेंडरमध्ये घालून पेस्ट बनवा. अंघोळ करण्यापूर्वी दररोज पॅक लावा.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या gor honyasathi upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gore honyasathi upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट