गुमतारा किल्ला माहिती Gumtara Fort Information in Marathi

gumtara fort information in marathi – gumtara fort history in marathi गुमतार किल्ल्याविषयी माहिती, गुमातारा हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील किल्ला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची हि १९४९ फुट इतकी आहे आणि या किल्ल्यापासून दुगड हे गाव जवळ आहे आणि ह्या गावातून आपण या किल्ल्यावर जाऊ शकतो परंतु हा किल्ला हा दुर्लक्षित किल्ला म्हणून संबोधला जातो. गुमतारा या किल्ल्याला गोतारा किल्ला किंवा घोटवडा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी दुगड गावातून तर वाट आहेच परंतु उसगाव आणि मोहाली या गावातून देखील या किल्ल्यावर जाता येते.

गुमतारा हा किल्ला शिलाहार काळापासून वसलेला असल्याचे म्हटले जाते आणि हा किल्ला बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे तानसा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता नंतर शिवकालामध्ये या किल्ल्याची दुरुस्ती करून हा किल्ला परत वसवला होता. पण सध्या या किल्ल्यावर लोकांचा फारसा वावर नाही आणि या किल्ल्यावर जाण्यासाठीच्या वाटेवर घनदाट जंगल आहे तसेच गवत आलेले आहे.

gumtara fort information in marathi
gumtara fort information in marathi

गुमतारा किल्ला माहिती – Gumtara Fort Information in Marathi

किल्ल्याचे नावगुमतारा किंवा गोतारा किल्ला
प्रकारगिरीदुर्ग
किल्ल्याची उंचीकिल्ल्याची उंची हि १९४९ फुट
पाहण्यासारखी ठिकाणेकिल्ल्याच्या माचीवरील परिसर, बालेकिल्ला, गोमुखी प्रवेश दरवाजा, बुरुज, किल्ल्याची तटबंदी, भग्न मूर्ती आणि (टकमक गड आणि कामनदुर्ग चा परिसर)  

गुमतारा किल्ल्यावरील बांधकाम आणि पाहण्यासारखी ठिकाणे

किल्ल्यावर चढल्यानंतर माची आहे आणि माची वर उभे असल्यास आपल्याला या किल्ल्याचा बालेकिल्ला दिसतो आणि पुढे बालेकिल्ल्याकडे जाऊन चढ चढून आपण बालेकिल्ल्यावर पोहचू शकतो आणि बालेकिल्ल्यावर चढल्यानंतर आपल्याला किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते तसेच किल्ल्याची तटबंदी देखील दिसते. या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे गोमुखी बांधकाम शैलीचे आहे.

आपण प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये बनवलेले पाण्याचे टाके दिसतात पण त्यामध्ये पाणी नाही तर ते कोरडे आहेत. तसेच प्रवेशद्वाराच्या डाव्याबाजूकडे गेल्यानंतर आपल्याला एक बुरुज दिसतो आणि त्या बुरुजाचा उपयोग हा पूर्वीच्या काळामध्ये टेहळणी बुरुज म्हणून केला जात असावा. त्याचबरोबर गडावर एक भग्न मूर्ती आहे आणि या मूर्तीची पूजा गावकरी करतात आणि या गडावरून टकमक गड आणि कामनदुर्ग या किल्ल्यांचा परिसर देखील पाहायला मिळतो.

गुमतारा किल्ल्याचा इतिहास – gumtara fort history in marathi

गुमतारा हा किल्ला खूप प्राची किल्ला आहे परंतु या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या किल्ल्यावर जास्त पर्यटक नसतात तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी ज्या वाटा आहेत त्या देखील धोक्याच्या आहेत. गुमतारा हा किल्ला शिलाहार काळातील किल्ला आहे आणि हा किल्ला बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे तानसा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.

नंतर शिवकालामध्ये या किल्ल्याची दुरुस्ती करून हा किल्ला परत वसवला  होता. ऐतिहासिक नोंदी नुसार असे म्हटले जाते कि २४ मार्च १७३७ मध्ये मराठ्यांची टोळी हि माहुली किल्ल्याच्या रानातून बाहेर पडली होती आणि गुमतारा परिसराच्या रान आली होती आणि त्यांनी त्या दिवाशी त्या ठिकाणीच दिवस घालवला होता.  

किल्ल्यावर कसे पोहचावे – How to reach 

  • दुगड मार्गे वाट : दुगड हे किल्ल्याजवळील सर्वात जवळीच वाट आहे परंतु जरी हि खूप जवळची पायवाट असली तरी या वाटणे जाने धोक्याचे आहे कारण या वाटेवर घनदाट जंगल आहे तसेच या वाटेवर घसरट देखील आहे त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे असे तेथील गावकरी म्हणतात. म्हणजेच हि वाट इतकी सुरक्षित नाही.
  • उसगाव मार्गे वाट : या किल्ल्याला उसगाव मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे. उसगाव या गावामध्ये एक धारण आहे त्या धरणाजवळून सरळ गेल्यास पुढे चालत गेल्यास त्या ठिकाणी एक छोटासा धबधबा पाहायला मिळतो आणि पुढे दिसणाऱ्या पायवाटेने पुढे गेले कि आपल्याला गडावर पोहचता येते.

गुमतारा किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about gumtara fort in Marathi

  • गुमातारा हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील किल्ला आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची हि १९४९ फुट इतकी आहे
  • या किल्ल्याच्या घनदाट जंगलाच्या परिसरामध्ये वज्रेश्वरी देवीचे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
  • गुमतारा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तीन तास लागतात आणि या किल्ल्यावर पायी चालत जावे लागते.
  • ऐतिहासिक नोंदी नुसार असे म्हटले जाते कि २४ मार्च १७३७ मध्ये मराठ्यांची टोळी हि माहुली किल्ल्याच्या रानातून बाहेर पडली होती आणि गुमतारा परिसराच्या रान आली होती
  • गुमतारा हा किल्ला शिलाहार काळापासून वसलेला असल्याचे म्हटले जाते आणि हा किल्ला बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे तानसा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता नंतर शिवकालामध्ये या किल्ल्याची दुरुस्ती करून हा किल्ला परत वसवला होता.
  • गुमतारा हा किल्ला पूर्वीपासूनच दुर्लक्षित आहे परंतु सध्या या किल्ल्यच्या संवर्धनासाठी भिवंडी विभाग आणि शिवस्मरण प्रतिष्ठान यांनी मोहीम सुरु केली आहे.
  • या किल्ल्याविषयी असे म्हटले जाते कि १८१८ मध्ये हा किल्ला ज्यावेळी ब्रिटीशांच्या हातामध्ये गेला त्यावेळी त्यांनी या किल्ल्यावर काही बांधकाम केले होते.
  • आपण प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये बनवलेले पाण्याचे टाके दिसतात पण त्यामध्ये पाणी नाही तर ते कोरडे आहेत आणि या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे गोमुखी बांधकाम शैलीतील आहे.

आम्ही दिलेल्या gumtara fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गुमतारा किल्ला माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gumtara fort history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gumtara fort in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!