hadsar fort information in marathi हडसर किल्ला मराठी माहिती, सातवाहन यांच्या काळामध्ये म्हणजेच २ हजार वर्षापूर्वी देश आणि कोकण या दोन प्रदेशांना जोडणारा नाणेघाट हा उदयास आला आणि या घाटाच्या संरक्षणासाठी जीवधन, हडसर, शिवनेरी, निमगिरी आणि या सारख्या आणखीन काही किल्ल्यांची निर्मिती हि कुकडी नदीच्या खोऱ्यामध्ये झाली आणि आज आपण या पैकी एक म्हणजेच हडसर (Hadsar) या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. हडसर किल्ल्याच्या आजूबाजूने घनदाट असे निसर्ग सौंदर्य आहे आणि हा किल्ला हरीश्चंद्रगड, जीवधन, चावंड, शिवनेरी, निमगिरी या किल्ल्यांच्या रांगेमध्ये वसलेला आहे.
हडसर हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील एक किल्ला आहे आणि ह्या किल्ल्याला पर्वतगड किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. हडसर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ४६८० फुट इतकी आहे आणि हा किल्ला सह्याद्रीच्या डोंगररांगेवर वसवला आहे आणि किल्ल्यापासून जवळची गावे म्हणजे जुन्नर आणि हडसर हि आहेत.
हडसर हा किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला आहे म्हणजेच हा किल्ला २ हजार वर्षापूर्वी नाणेघाटाच्या संरक्षणासाठी बांधला आहे म्हणजेच नाणेघाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता आणि त्यावेळी या किल्ल्यावर लोकांची दाट वस्ती होती. चला तर आता आपण हडसर या किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेवूया.
हडसर किल्ला मराठी माहिती – Hadsar Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | हडसर किंवा पर्वतगड |
प्रकार | गिरिदुर्ग |
काळ | सातवाहनांचा काळामध्ये बांधला आहे |
डोंगर रांग | सह्याद्री |
उंची | ४६८० फुट |
पाहण्यासारखी ठिकाणे | महादेवाचे मंदिर, नंदी मंदिर, प्राचीन पाण्याचे टाके, तलाव, गुहा, बुरुज, प्रवेशद्वार, आजूबाजूचा परिसर जसे कि हरीश्चंद्रगड, जीवधन, चावंड, शिवनेरी, निमगिरी, भैरवगड, नाणेघाट |
हडसर किल्ल्याचा इतिहास – hadsar fort history in marathi
हडसर हा किल्ला नाणेघाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी सातवाहनांच्या काळामध्ये बांधला गेला आहे आणि ह्या किल्ल्याला पर्वतगड म्हणून देखील ओळखले जाते. ज्यावेळी शहाजी महाराजांनी मोगलांशी १६३७ मध्ये तह केला होता त्यावेळी त्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा देखील समावेश होता.
ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजांनी वर्चस्व स्थापित केले त्यावेळी १८१८ मध्ये त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि त्यामध्ये हडसर किल्ल्याचा देखील समावेश होता. ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची नासधूस केली त्यामधील हडसर हा देखील एक किल्ला होता. हडसर किल्ल्यावर जायच्या वाटा त्यांनी सुरुंग लाऊन तोडून टाकल्या होत्या.
हडसर किल्ल्याची वास्तुकला आणि माहिती
हडसर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला खूप प्राचीन किल्ला आहे आणि हा किल्ला २ हजार वर्षापूर्वी सातवाहनांनी बांधला आहे. हडसर किल्ल्यावर चढण्यासाठी ज्या वाटा होत्या त्या वाटा काही प्रमाणात ब्रिटिशांनी उद्वस्त केल्या आहेत. किल्ल्यावर गेल्यानंतर हडसर किल्ल्याचे दरवाजे हे माद्यायुगीण वास्तुकलेचे किंवा बांधकाम शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.
बोगद्यासारख्या प्रवेशदारातील दुहेरी दरवाजे आणि खडकातून कोरलेल्या पायऱ्या आणि प्रवेश दाराची जीउमुखाची केलेली रचना हि पाहण्यासारखी आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या आत गेल्यानंतर एक पाण्याचे टाके समोर दिसते आणि या पाण्याच्या टाक्यामधील पाणी हे पिण्यायोग्य आहे.
पुढे गेल्यानंतर कुंडच्या समोर असणाऱ्या उंचावलेल्या भागाकडे गेल्यास खडकातून कोरलेल्या तीन मोठ्या गुहा दिसतात तसेच त्या खडकावर गणपतीची चित्रे देखील कोरलेली आहेत. किल्ल्यावर एक लहान असे नंदी मंदिर आहे आणि महादेव मंदिर देखील आहे आणि मंदिराच्या सभामंडपामध्ये सहा कोपरे आहेत आणि मंदिराच्या तीन कोपऱ्यांच्या गणपती, मारुती आणि गरुडाच्या मुर्त्या आहेत आणि मंदिराजवळ एक मोठा तलाव देखील आहे आणि हा तलाव पावसाळ्यामध्ये पाण्याने पूर्ण भरलेला असतो.
महादेवाच्या मंदिराच्या बाजूला एक भक्कम बुरुज देखील बांधलेला आहे आणि पूर्वी बहुतेक या बुरुजाचा वापर हा टेहळणी बुरुज म्हणून केला जात असावा. या किल्ल्यावरून हरीश्चंद्रगड, जीवधन, चावंड, शिवनेरी, निमगिरी, भैरवगड, नाणेघाट हा परिसर दिसतो.
कसे पोहचायचे
हडसर गावापर्यंत कसे पोहचायचे
जुन्नर हे तालुक्याचे गाव आहे आणि हे गाव हडसर या किल्ल्यापासून जवळ आहे आणि जर आपल्याला हडसर किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्ही पुणे किंवा मुंबई या शहरातून बसने जुन्नर मध्ये येवू शकता कारण पुणे आणि मुंबई हे शहर जुन्नरला चांगल्या रस्ता वाहतुकने जोडलेले आहे.
जुन्नर बसस्थानकावर पोहचल्यानंतर आपण निमगिरी किंवा राजूरला जाणारी बस पकडून हडसर पर्यंत पोहचू शकतो, तसेच आपण जर स्वताची कार घेवून हडसर हा किल्ला पाहण्यास गेलो तर ते खूप सोयीस्कर ठरू शकते. हडसर या गावामध्ये आपण कार पार्क करून किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो.
हडसर किल्ल्यावर कसे जायचे
हडसर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, किल्ल्यावर जाण्याचा एक मार्ग हा शाही दरवाजामधून जातो आणि दुसरा मार्ग हा गावकऱ्यांनी खडकामध्ये पायर्या कोरून तयार केला आहे आणि दोन्हीहि वाटा हडसर या गावातूनच सुरु होतात. हडसर या गावातून टेकडी चढायला सुरुवात केली कि पठारावर डावीकडे थोडावेळ चालत गेल्यानंतर दोन टेकड्यामधील खिंड दिसते आणि येथून सरळ चालत राहिल्यास अर्ध्या तासामध्ये बुरुजावर पोहचतो. लहान खडक चढून गेल्यानंतर आपण गडाच्या प्रेवेशदाराजवळ पोहचतो.
दुसऱ्या पायवाटेने जाण्यासाठी खिंडीच्या दिशेने न जाता डावीकडून टेकडीभोवती फिरून दुसऱ्या बाजूने जावे लागते. या ठिकाणापासून थोडे अंतर आपल्याला खिंडीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातो. हा राजेशाही दृष्टीकोन खूपच सोपा आहे आणि या वाटेवरून किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त एक तास लागतो.
हडसर किल्ल्याविषयी महत्वाची माहिती – information about hadsar in Marathi
- हडसर किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला आहे.
- ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजांनी वर्चस्व स्थापित केले त्यावेळी १८१८ मध्ये त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि त्यामध्ये हडसर किल्ल्याचा देखील समावेश होता.
- किल्ल्याचा संपर्क तोडण्यासाठी ब्रिटिशांनी हडसर या किल्ल्याच्या वाटेवर सुरुंग लाऊन किल्ल्याचा संपर्क तोडण्याचा प्रयत्न केला.
- या किल्ल्यावरून हरीश्चंद्रगड, जीवधन, चावंड, शिवनेरी, निमगिरी, भैरवगड, नाणेघाट हा परिसर दिसतो.
- हडसर हा किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला आहे म्हणजेच हा किल्ला २ हजार वर्षापूर्वी नाणेघाटाच्या संरक्षणासाठी बांधला आहे, म्हणजेच नाणेघाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला होता.
- शहाजी महाराजांनी मोगलांशी १६३७ मध्ये तह केला होता, त्यावेळी त्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा देखील समावेश होता.
आम्ही दिलेल्या hadsar fort information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर हडसर किल्ला मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या hadsar fort information in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about hadsar in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट