हार्दिक पांड्या माहिती Hardik Pandya Information in Marathi

Hardik Pandya Information in Marathi – Hardik Pandya Biography in Marathi हार्दिक पांड्या माहिती क्रिकेट विश्वामध्ये आपल्या उत्कृष्ट कलाने धुमाकूळ घालत क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करणारा आपला गुजरातचा छोकरा हार्दिक पांड्या याच्या जीवनाविषयी आपण आजच्या लेखामध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हार्दिक पांड्या हा भारतीय उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. एक सुप्रसिद्ध क्रिकेटर म्हणून हार्दिक पांड्या यांची ओळख आहे. हार्दिक पांड्या हे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गुजरात बडोदा आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स या संघाकडून मैदानात उतरतात.

Hardik Pandya Information in Marathi
Hardik Pandya Information in Marathi

हार्दिक पांड्या माहिती – Hardik Pandya Information in Marathi

पूर्ण नाव (Name)हार्दिक पांड्या
जन्म (Birthday)११ ऑक्टोंबर १९९३
जन्म गाव (Birth Place)गुजरातच्या सुरत
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

जन्म

११ ऑक्टोंबर १९९३ रोजी गुजरात राज्यातील सुरत या शहरांमध्ये हार्दिक पांड्या यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला. हार्दिक यांच संपूर्ण नाव हार्दिक हिमांशू पांड्या असं आहे. हार्दिक यांच्या वडिलांचा कार फायनान्स म्हणजेच कार घेण्यासाठी लागणारं भांडवल देण्याचा एक छोटासा व्यवसाय होता परंतु काही काळानंतर त्यांनी तो व्यवसाय बंद करून आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बरोडा येथे स्थलांतर केलं.

हार्दिक याला कृणाल नावाचा एक भाऊ देखील आहे. हे दोघं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून मुंबई इंडियन्स या संघामध्ये इंडियन प्रीमियर लीग मध्ये सहभागी होतात. हार्दिक पांड्या याला कुंगफू पांड्या असं टोपण नाव त्याच्या चाहत्यांनी त्याला दिलं आहे. उत्कृष्ट सिक्स मारणे ही त्याची आवड आहे. हार्दिकला लहानपणापासूनच क्रिकेट या खेळाविषयी प्रचंड प्रेम होतं.

हार्दिकने त्याच्या भावा सोबत किरण मोरे क्रिकेट ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन क्रिकेटचा श्रीगणेशा केला. आज हार्दिक पांड्या विशेषतः उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी या साठी प्रसिद्ध आहे. लहानपणापासून हार्दिकच मन क्रिकेटमध्ये होतं त्यामुळे शाळेत कधी त्याचं लक्ष लागल नाही. हार्दिक ने फक्त नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे.

पुढे शाळेला रामराम ठोकून हार्दिकने त्याचं संपूर्ण लक्ष क्रिकेट या खेळावर केंद्रित केलं. वयाच्या अठराव्या वर्षी हार्दिक लेग स्पिनर कडून वेगवान गोलंदाजिकडे वळला आणि तेव्हापासून तो वेगवान गोलंदाज बनला. आता हल्लीच १ जानेवारी २०२० मध्ये हार्दिक विवाह बंधनात अडकला. भारतीय वंशाची नताशा स्टॅनकोविझ हिच्याशी हार्दिक पांड्या याची लग्नगाठ बांधली गेली आणि आता त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

हार्दिकच क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण

लहानपणापासून हार्दिकला क्रिकेटची प्रचंड आवड होती यामुळे हार्दिकने क्रिकेट मध्येच करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. कोच सनत कुमार यांच्याकडून प्रशिक्षण घेत हार्दिकने‌ २०१३ रोजी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या बडोदा संघातर्फे क्रिकेट खेळतो.

हार्दिक पांड्या यांच्या प्रसिद्धीस खरी सुरुवात २०१३- १४ रोजी घडलेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी मध्ये हार्दिकने उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्यांमध्ये विदर्भ क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना आठ षटकार ठोकत ८६ धावा आणि नाबाद असा धुवाधार विजय आपल्या संघाला मिळवून दिला. षटकार मारने हे हार्दिकच आवडीचं काम आहे. हा त्याचा एक छंदच आहे असं म्हटलं तरी चालेल.

डोमेस्टिक करिअर नंतर हार्दिक ने ओडीआय इंटरनॅशनल क्रिकेट/ एकदिवसीय क्रिकेट मध्ये १६ ऑक्टोंबर २०१६ मध्ये पदार्पण केलं त्याचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध होता या सामन्यांमध्ये हार्दिकने ३२ चेंडूंमध्ये ३६ धावा अशी खेळी केली होती. या सामन्यानंतर संदीप पाटील, मोहित शर्मा, के एल राहुल यांसारख्या क्रिकेट खेळाडू नंतर एकदिवसीय सामन्यात सामनवीर म्हणून निवडला जाणारा हार्दिक पांड्या हा चौथा भारतीय खेळाडू ठरला.

क्रिकेट विश्वामध्ये हार्दिक आपल्या कौशल्याने पुढे जात होता. २१०८ साली घडलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ७६ धावा अशी खेळी हार्दिकने रचली होती. यानंतर क्रिकइन्फोने २०१७ साली हार्दिक ची एकदिवसीय इलेव्हनमध्ये सुद्धा निवड केली होती.

ओडीआय नंतर हार्दिकने कसोटी सामन्यांमध्ये देखील सहभाग घेण्यास सुरुवात केली. २०१६ मध्ये भारताच्या कसोटी संघामध्ये हार्दिकची फलंदाज म्हणून नेमणूक करण्यात आली परंतु प्रॅक्टीस दरम्यान हार्दिकला दुखापत झाल्याने त्याला या कसोटी सामन्यात सहभागी होता आले नाही. परंतु २०१७ साली झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या सामन्यांमध्ये तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यांमध्ये हार्दिकने आपले कौशल्य दाखवून पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं.

असा विक्रम नोंदवणारा हार्दिक पांड्या हा पहिला भारतीय फलंदाज आहे. याशिवाय एका षटकात २६ धावा असा भारताकडून सर्वाधिक धावा केल्याचा विक्रम देखील हार्दिक पांड्या यांनी नोंदवला आहे. हार्दिक पांड्या यांना क्रिकेट विश्वात मिळणारऱ्या प्रसिद्धीच कारण म्हणजे त्यांचं क्रिकेट बद्दल असणारा प्रेम, चिकट सराव, जिद्दीपणा, अथक परिश्रम या सगळ्यांचा एक रूप म्हणजे हार्दिक पांड्या.

बघता-बघता हार्दिक पांड्या यांना क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. खूप कमी वेळा मध्ये हार्दिक पांड्या यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करण्यास सुरुवात केली‌ वयाच्या २२ व्या वर्षी २७ जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये दोन खेळाडूंना बाद करून हार्दिक पांड्या यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभाग घेण्यास सुरुवात केली.

रांची येथे श्रीलंका विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये हार्दिक पांड्या यांनी १४ चेंडू मध्ये मध्ये २७ धावा केल्या होत्या याशिवाय आशिया चषक २०१५ मध्ये हार्दिक पांड्या यांच्या बॅटमधून १८ चेंडूंमध्ये ३१ धावा असे गुण समोर येत बांगलादेशविरुद्ध एक यशस्वी बारी खेळली होती. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये फक्त आठ धावा देऊन तीन खेळाडू बाद करणं हार्दिक पांड्या यांनाच जमलं.  

वर्ल्ड टी-२० मध्ये बांगलादेश विरुद्ध झालेल्या एका सामन्यांमध्ये हार्दिक ने तीन चेंडूमध्ये बांगलादेशच्या महत्त्वाच्या विकेट्स काढल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे बांगलादेशला एका धावेने पराभूत व्हावं लागलं होतं. तिसरा आणि शेवटचा सामना इंग्लंड विरुद्ध होता‌‌. या सामन्यांमध्ये ३४ धावा देत चार खेळाडू बाद केले होते हार्दिक पांड्या यांनी नोंदविलेली आजपर्यंतची सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी मानली जाते.

याशिवाय फलंदाजी करताना १४ चेंडूंमध्ये ३३ धावा तेही नाबाद असा विक्रम हार्दिक पांड्या यांनी रचला आहे. एकाच सामन्यांमध्ये हार्दिकने ३० पेक्षा जास्त धावा करून चार खेळाडू बाद करून एक यशस्वी विजय मिळवला. ज्याने क्रिकेट विश्वातील मान्यवरांना हार्दिकची वाह! वाह! करावी लागली. इंडियन प्रीमियर लीग हा भारतीयांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.

या लिंग मध्ये सर्वात जास्त मुंबई इंडियन्स संघाचे चाहते आहेत. त्याचं कारण म्हणजे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या असे दिग्गज मान्यवर. हार्दिक पांड्या आणि इंडियन प्रीमियर लीग आयपीएल हे नातच जरा वेगळ आहे. या लीगमध्ये हार्दिकच नवीन रूप पाहायला मिळतं २०१५ साली झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये हार्दिकने ८ चेंडू मध्ये मध्ये २१ धावा करत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धचा सामना जिंकून दिला होता.

ज्यामुळे हार्दिक पांड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. पुढील सामन्यांमध्ये कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध खेळताना हार्दिक ने आपल्या संघाला वरच्या स्तरावर पोचवण्यासाठी अवगी ३१ चेंडूंमध्ये ६१ धावा करत आपल्या संघाला एक दणदणीत विजय मिळवून दिला होता. २०१७ साली झालेल्या आयपीएलच्या मोसमात हार्दिकने रायझिंग पुणे सुपरजॉईंट विरुद्ध खेळताना शेवटचा शतकात गोलंदाज अशोक दिंडा विरुद्ध ३० धावांची खेळी रचून विक्रम तयार केला होता.

असा उत्कृष्ट खेळाडू मुंबई इंडियन्स या संघाला गमवायचा नव्हता. म्हणून आयपीएल लिलावात २०१८ साली मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्या यांना तब्बल अकरा कोटी रुपयांसाठी विकत घेतल. हार्दिकने आत्तापर्यंत अकरा कसोटी सामने खेळले ज्यामध्ये त्याचा आत्तापर्यंतचा ५३२ धावांचा रेकॉर्ड आहे.

या कसोटी सामन्यात त्यांनी एक शतक आणि चार अर्धशतक केले आहेत. या कसोटी सामन्यांमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या १०८ आहे. तर दुसऱ्या बाजूला कसोटी सामन्यात मध्ये त्यांनी १७ विकेट घेतल्या आहेत. त्याची कसोटी सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी २८ धावा देऊन ५ विकेट अशी आहे. हार्दिक पांड्या यांनी ६२ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

यामध्ये हार्दिकने १२६७ धावा केल्या आहेत. तर सात अर्धशतके आणि एकदिवसीय सामन्यांमधील हार्दिक ची सर्वोच्च धावसंख्या ९२ अशी आहे. एक दिवसीय सामन्यात हार्दिकने तब्बल ५७ विकेट घेतल्या आहेत. तर आतापर्यंतची त्यांची या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी ३१ धावा देऊन तीन विकेट अशी ठरली आहे. आतापर्यंत हार्दिकने टी-२० चे ४९ सामने खेळले आहेत.

हार्दिकने या सामन्यांमध्ये ४८४ धावा केल्या आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या ४२ आहे. टी-२० मध्ये हार्दिकने आतापर्यंत ४२ विकेट्स घेतल्या आहेत. या टी-२० सामन्यांमधील हार्दिकची सर्वोत्तम गोलंदाजी ३८ धावा देऊन ४ विकेट अशी आहे. हार्दिकच्या या विक्रमाने चाहत्यांना वेड लावून ठेवल आहे

आम्ही दिलेल्या hardik pandya information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हार्दिक पांड्या माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about hardik in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि hardik pandya cricketer information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये hardik pandya family information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!