हिमा दास यांची माहिती Hima Das Information in Marathi

Hima Das Information in Marathi हिमा दास संपूर्ण माहिती मराठी आसाम मधील छोट्याश्या गावातून आलेली जागतिक स्पर्धेत सुर्वणपदक कमावणारी पहिली भारतीय महिला धावपटू हिमा दास. हिमा दास हि २० दिवसात ५ सुवर्णपदके मिळवणारी सुवर्णकन्या आहे. भारताची महिला धावपटूच बालपणीच स्वप्न पूर्ण होऊन, ती आसाम पोलीस विभागात उपाधीक्षक (DSP) पदावर रुजू झाली.

hima das information in marathi

सुवर्णकन्या हिमा दास यांची माहिती – Hima Das Information in Marathi

पूर्ण नावहिमा दास
टोपणनाव धिंग एक्सप्रेस, सुवर्णकन्या, उडणपरी  
जन्म९ जानेवारी २०००, कंधुलिमारी, धिंग, नागाव, आसाम
राष्ट्रीयत्वभारतीय
खेळमैदानी खेळ (अॅथलेटिक्स) (४०० मीटर धावणे)
उंची १६५ सेंमी (५ फुट ५ इंच )
प्रशिक्षकनिपुण दास, नाबजीत मालकर, गालीना बुखरींना, एलिना 
वडीलरोणजीत
आईजोनाली
पुरस्कार अर्जुन पुरस्कार (२५ सप्टेंबर २०१८)

बालपण  

आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी या छोट्याश्या गावात एका शेतकऱ्याच्या कुटुंबात ९ जानेवारी २००० साली हिमा दास हिचा जन्म झाला. त्यांचे आई वडील भाताची शेती करतात. हिमा व तिची भावंडे हि लहानपणापासूनच शेतात काम करीत. त्यांच्या वडिलांचे नाव रणजीत आणि आईचे नाव जोनाली असे आहे. तिला तीन भावंडे आहेत ज्यामध्ये हिमा हि सर्वात लहान आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भाताच्या शेतीतून चालतो.

हिमा लहानपणा पासूनच खूप धाडशी, हिंमती आणि कष्ट करणारी आहे. ती सगळ्यांना मदत करत असे. घरच्या परिस्थिती मुळे असणाऱ्या संघर्षमय जीवनातही हिमा दासने स्वप्न बघायचे थांबवले नाही आणि त्यासाठी अपार कष्ट करून ते सत्यात उतरवले. हिमा दास शेतातून, चिखलातून रानातून अनवाणी धावत असे. रस्त्यावरून धावणाऱ्या कार सोबत हिमा दास स्पर्धा करत असे.

लहान असतानाच शालेय जीवनातच हिमा दास ने पोलीस अधिकारी होण्याचे इच्छा होती. तिच्या आईचे देखील हेच स्वप्न होतं. हिमा लहान असताना तिच्या आई दुर्गापूजेच्या काळात खेळन्यातली बंदूक द्यायची. हिमाच आणि तिच्या आईचं हे स्वप्न २६ फेब्रुवारी २०२१ ला सत्यात उतरलं.

शैक्षणिक जीवन

हिमा दास हिचे शालेय शिक्षण हे धिंग पब्लिक हायस्कूल मधून घेतले. आणि शाळेत असतानाच तिच्या शाळेतील मुलांसोबत तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. तिने फुटबॉल मध्ये करियर करण्याचे ठरवले. परंतु पुढे जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षक शामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दास ने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

तेव्हापासून ती पळण्याच्या शर्यतीमध्ये सहभागी होऊ लागली. श्यामशुल हक यांनी हिमा दास चा परिचय नागाव स्पोर्ट्स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी करून दिला. त्यांनी तिला अॅथलेटिक्स स्पर्धेत येण्यास सांगितले.

पुढे तिची भेट प्रशिक्षक निपोन दास यांच्याशी झाली. जानेवारी २०१८ मध्ये हिमा गुवाहाटी मध्ये कँम्पसाठी आली असताना तिच्यावर तिचे प्रशिक्षक निपोन दास यांची नजर पडली. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या हिमा दास ला पाहून त्यांनी तिला गुवाहाटीला येण्याचा आग्रह केला.

हिमा दास चे प्रशिक्षक निपोन दास यांनी आंतर जिल्हा स्पर्धेत हिमाला धावताना बघितल्यानंतर म्हणतात,

“She was wearing cheap spikes, but she won gold in the 100 and 200. she ran like the wind. I hadn’t seen such a talent in ages.”

आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे हिमाला घरापासून १५०० किलोमीटर दूर मोठ्या शहरात पाठविण्यास परवडणारे नव्हते. मात्र प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून हिमा गुवाहाटीला आली आणि तिथून तिचा नवीन प्रवास चालू झाला. तिथे तिचा राहण्याचा खर्च तिचे प्रशिक्षक निपोन दास यांनी केला.

हिमा दास नंतर आंतर जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धेत २ सुवर्ण पदके जिंकली. आसाम हायर सेकंडरी एज्युकेशन कौन्सिल इथून हिमा दास हिने मे २०१९ मध्ये १२ चे शिक्षण पूर्ण केले.  

हिमा दास चे प्रशिक्षण गुवाहाटी मधील सरुसाजाई स्टेडियम मध्ये निपोन दास आणि नबजीत मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

खेळातील कारकीर्द

२० वर्षाखालील अॅथलेटिक्स स्पर्धा         

फिनलंडमध्ये जुलै २०१८ मध्ये झालेल्या २० वर्षाखालील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत १८ वर्षीय हिमाने ४०० मीटर धावण्याची स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. जागतिक स्तरावर अशा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी हिमा दास हि पहिली भारतीय महिला आहे. तिने ५१.४६ सेकंदाची वेळ नोंदवली.

२०१८ आशियायी क्रीडा स्पर्धा (जकार्ता, इंडोनेशिया)

  • ५०.७९ सेकंदात ४०० मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि रौप्य पदक पटकावले.
  • आशियायी क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या मिश्र रिले स्पर्धेत हिमा दास, एम. आर. पुवम्मा, मुहम्मद अनस, राजीव आरोकीया यांच्या संघाने रौप्य पदक पटकावले.
  • महिलांच्या ४*४०० मीटर रिले स्पर्धेत हिमा दास, एम. आर. पुवम्मा, सरिता गायकवाड, व्ही. के. विस्मया यांच्या संघाने सुवर्णपदक मिळवले.
रौप्यमहिला ४०० मीटर धावणे
रौप्यमिश्र रिले ४*४०० मीटर
सुवर्णमहिला रिले ४*४०० मीटर

IAAF जागतिक २० वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धा

सुवर्ण ४०० मीटर अजिंक्यपद स्पर्धा

२०१९ मधील विविध स्पर्धा

तारीख पदक स्थान स्पर्धा वेळ
२ जुलैसुवर्णपोझनान अॅथलेटिक्स ग्रांप्री, पोलंडमहिला २०० मीटर२३.९५ सेकंद
७ जुलैसुवर्णकुत्नो अॅथलेटिक्स स्पर्धा, पोलंडमहिला २०० मीटर२३.९७ सेकंद
१३ जुलैसुवर्णक्लादनो स्पर्धा, चेक प्रजासत्ताकमहिला २०० मीटर२३.४३ सेकंद
१७ जुलैसुवर्णटाबोर स्पर्धा, चेक प्रजासत्ताकमहिला २०० मीटर२३.२५ सेकंद
२० जुलैसुवर्णनोव मेस्टो ग्रांप्री, चेक प्रजासत्ताकमहिला ४०० मीटर५२.०९ सेकंद

पुरस्कार

  • २५ सप्टेंबर २०१८ – हिमा दास हिला भारत सरकार कडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रधान करण्यात आला.
  • Adidas या जगविख्यात स्पोर्ट्स श्युज बनविणाऱ्या कंपनीला आपला एक ब्रँड हिमा दास च्या नावाने निर्माण करावा लागला.
  • प्रसिद्ध धावपटू हिमा दास हिला २६ फेब्रुवारी २०१२ ला आसाम पोलीस विभागात पोलीस अधीक्षक पदी (DSP) म्हणून नियुक्त करण्यात आले. हिमाला आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्ती पात्र देण्यात आले.
  • हिमा दास हि सचिन तेंडूलकर ची मोठी चाहती आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये हिमा दास ला सचिन तेंडूलकर ची सही असलेला जर्सी मिळाली.
  • हिमा दास आसाम फायर अँड इमर्जन्सी सर्विसेस ची ब्रँड अँबेसिडर आहे.  

सामाजिक कार्य

  • आसाम मध्ये पूर आला होता तेव्हा हिमा दास ने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला.
  • ऑल आसाम स्टुडंट्स युनियन या संस्थेची स्पोर्ट्स सेक्रेटरी आहे. तिच्या भागात तिने अवैध दारू विरोधात मोहीम चालवली आहे.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये hima das information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information on hima das in marathi म्हणजेच “हिमा दास यांची माहिती” information about hima das in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या सुवर्णकन्या हिमा दास या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि hima das in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!