होळी निबंध मराठी Holi Essay in Marathi

Holi Essay in Marathi – Holi Nibandh in Marathi माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी होळी सणाची माहिती मराठी निबंध होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग, द्वेष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा म्हणजेच वर्षातील शेवटचा सण. होळीच्या सणाला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. होळीच्या सणाला अनेक नावाने संबोधले जाते. उदाहरणात शिमगा, हुताशनी महोत्सव, वसंतोत्सव किंवा वसंतागमनोत्सव. होळी हा सण शहरात आणि खेड्यापाड्यात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

होळी हा खूप मानाचा सण आहे. होळी ह्या सणाला भारतीय संस्कृतीत खूप मोठं स्थान आहे. होळी ही त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दारिद्र, नैराश्य दहन करून सुख शांती आनंददायी आरोग्याच्या प्रज्वलित झालेल्या किरणांना रंगीबिरंगी किरणा मधून आपलं करणे म्हणजे खऱ्या अर्थाने होळी साजरी करणे होय.

या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे, ती पोर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठून टाकणाऱ्या थंडीला निरोप. होळी म्हणजेच थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञता पूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत. होळीनंतर नवीन वर्षाची नव्या पालवीची सुरुवात होते.

होळी सण आला

रंगात न्हाहुनी गेला

ती पिचकारी

मायेची शिकारी

रंग तसे साधेच

पण मन प्रसन्न नव्यानेच

ती शेकोटी पेटवून

थंडीला लावी पळवून

शेकोटीत पेटती साऱ्यांचे

अहंकार राग द्वेषाचे

मत्सर दुःख लोभाचे

मग सगळीकडे दिसेल

वातावरण आनंदाचे

holi essay in marathi
holi essay in marathi

होळी सणाची माहिती मराठी निबंध – Holi Essay in Marathi

माझा आवडता सण होळी निबंध इन मराठी

होळीला महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी. जो होळीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळ्या करतात आणि सायंकाळी होळी पेटवली जाते. होळीत एरंड वृक्षाची फांदी मधोमध ठेवली जाते. होळी पूर्णपणे पेटल्यावर त्यातील एरंड कोणत्याही एका बाजूला झुकतो.

त्यावरून जुनी परंपरा आहे की एरंड ज्या बाजूला झुकतो त्यादिशेने पाऊस पडेल. परंतु हे खरे नसावे असे वाटते कारण त्याचा आणि पावसाचा इतका संबंध नसावा. होळी सणाच्या निमित्ताने आपण आपल्या मनातील वाईट विचारांची होळी केली पाहिजे अशी त्यामागची भावना आहे.

होळी पेटल्यावर गाईचे तूप, 11 लवंग, सात बत्तासे, पाच विड्याची पाने, गोटा खोबरे नारळ,पुरणाची पोळी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करतात. होळीभोवती अकरा प्रदक्षिणा मारतात. त्यानंतर होळीमध्ये गोटा खोबरे नारळ तूप वाहतात. नैवेद्य दाखवतात आणि नंतर सुख-समृद्धी वाढावी, सर्व कष्ट दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करतात.

फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगांचा सण आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत या सणाची वाट सर्वजण पाहत असतात. या सणामुळे घरात घरात आनंदाचे वातावरण असते. महाराष्ट्रात खास करून कोकणात होळी या उत्सवाला असाधारण महत्त्व आहे. होळी हा सण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. होळी हा एकमेव सण आहे जो कोकणातील लोकांच्या उत्सवाचा प्रतीक आहे.

होळी या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते यामागे एक आख्यायिका आहे. राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. राजाने प्रल्हादाला विष्णु भक्ति करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

पण त्याच्यावर कोणता प्रयोग काम करत नव्हता. विषारी खीर खायला दिली पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्याच्यावर विष्णुची खूप मोठी कृपा होती. प्रल्हाद हिरण्यकश्यप राजा हैरान झाला कारण काही केल्या प्रल्हादचा जप थांबत नव्हता. मग त्याला एक युक्ती सुचली त्याने वेगळा डाव टाकायचं ठरवलं.

राजाने प्रल्हादाला मारण्यासाठी आपली बहिण होलिका ची मदत घ्यायची ठरवले. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. हिरण्यकश्यप राजाच्या सांगण्यावरून होळीकाने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नित प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचला आणि होळीका अग्नित जळून भस्म झाली.

हे पाहून राजा खूप चवताळा आणि आपल्या महालातील खांब उचलून प्रल्हादच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला परंतु राजा जसा तो खांब घेण्यासाठी पुढे सरसावला तसा त्यातून प्रत्यक्ष विष्णूने सिंहाचे रूप घेऊन हिरण्यकश्यपची छाती फाडून टाकली आणि भक्त प्रल्हादला आशीर्वाद दिला. त्यानंतर वाईटाचा नाश करण्यासाठी सगळे होळी पेटवू लागले.

होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरी करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट विचारांचा, वाईट गोष्टीचा त्याग केला जातो.

होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी  होळी उत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.होळी हा वर्षातील शेवटचा सण. वाईट अमंगलाचे दहन करून मांगल्याची गुढी उभारण्यासाठी टाकलेले पाऊल.

महाराष्ट्रात देखील होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीची तयारी आदल्या दिवसापासूनच केली जाते. होळी होण्यासाठी लाकडे झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाची फांदी कपड्याच्या तुकड्याने पूर्णपणे झाकतात. नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते.

त्याच्यावर वाळलेले गवत, लाकडे, केळी व इतर फळे रचली जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणाबाजी केली जाते.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदनाचा असतो. या दिवशी लोक एकमेकांवर रंग उडवतात. आनंदाने नाचत असतात. होळीचा सण आता एवढा प्रसिद्ध आहे की तो भारतातच नाही तर विदेशामध्येही साजरा केला जातो. होळीच्या सणाला शत्रुही मित्र बनून जातो. होळीच्या सणाला श्रीमंत-गरीब जाति धर्म असा कोणताच भेदभाव केला जात नाही. या सणाला सर्व लोक एकमेकांच्या घरी जातात आणि रंगासोबत खेळतात. या सणाला लोक राग, द्वेष विसरतात आणि एक नवीन नात्याची सुरुवात करतात.

आम्ही दिलेल्या holi essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता सण होळी निबंध” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या holi nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि holi nibandh marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण holi festival essay in marathi या लेखाचा वापर 10 points on holi in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!