घरची सुरक्षा निबंध मराठी Home Safety Essay in Marathi

Home Safety Essay in Marathi घरची सुरक्षा निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये घराची सुरक्षा ( home safety ) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. कोणालाही आपले घर जरी जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण वाटत असले तरी देखील आपल्या घराला देखील अनेक सुरक्षित गोष्टींनी वेठीस धरलेले असते आणि त्या असुरक्षित गोष्टींच्या पासून सावधगिरी कशी घ्यायची आणि घराला वेठीस धरणाऱ्या असुरक्षित गोष्टी कोणकोणत्या असतात ते आपण आता घराची सुरक्षा ( home safety ) या निबंधामध्ये पाहूयात. चला तर मग घराची सुरक्षा ( home safety ) या विषयावर निबंध लिहूया आणि घरातील सुरक्षतेविषयी लोकांच्या मध्ये जरुती निर्माण करूया.

घर हे सर्वांच्यासाठीच एक सुरक्षित ठिकाण असते परंतु घरामध्ये अश्या अनेक असुरक्षित गोष्टी असतात ज्या घराला वेठीस धरतात म्हणजे त्या गोष्टींच्यापासून घराला धोका असू शकतो. घरामध्ये अश्या अनेक गोष्टी असतात ज्या घराच्या असुरक्षतेसाठी कारणीभूत ठरतात आणि त्या म्हणजे इलेक्ट्रिक कुकर, साधा कुकर आणि गॅस यासारख्या अनेक वस्तू असतात ज्या घराच्या असुरक्षतेचा धोका वाढवतात. परंतु आपण या गोष्टींच्याकडे लक्ष देवून येणारा ठोका टाळू शकतो किंवा काही इतर संभाव्य धोक्यापासून बचाव करू शकतो पण घरामध्ये सुरक्षितता राखणे हे घरातील एकाच व्यक्तीचे काम नाही तर घरामध्ये सुरक्षितता ठेवण्यासाठी घरातील सर्वांनी तितकेच कष्ट घेतले पाहिजे.

home safety essay in marathi
home safety essay in marathi

घरची सुरक्षा निबंध मराठी – Home Safety Essay in Marathi

Essay on Home Safety in Marathi

प्रत्येक घरामध्ये घराची सुरक्षितता राखण्यासाठी काही नियम असतात; उदाहरणार्थ काही घरामध्ये जेवणानंतर किंवा गॅसचा वापर झाला कि गॅस तर आठवणीने बंद केलाच जातो परंतु सिंलेंडर देखील बंद करून ठठेवले जाते आणि त्यामुळे घरामध्ये होणारा धोका कमी होतो. तसेच प्रत्येक घरामध्ये घराची सुरक्षितता ठेवण्यासाठी वेगवेगळे नियम असतात आणि सर्वांचे नियम हे सारखेच असतात परंतु त्या नियमामध्ये थोडाफार फरक असतो आणि प्रत्येक घरातील कुटुंबाने आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने घरातील नियम पाळून घर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

घरातील सर्वात भयंकर धोका म्हणजे आग लागणे आपण असे कित्येक उदाहरणे पहिली आहेत कि घरामध्ये आग लागून घरामध्ये खूप वेगाने आग पसरून संपूर्ण घर पेटून जाते आणि त्यामध्ये जीवित हानी देखील होते त्यामुळे घरामध्ये ज्या कारणांच्या मुले आग लागते अशी उपकरणे सुरक्षित पणे हाताळली पाहिजेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजेत. घरामध्ये आपण इलेक्ट्रिक कुकर, साधा कुकर, हिटर आणि गॅस यासारख्या वस्तू दैनंदिन वापरासाठी वापरल्या जातात आणि यापासून अनेक संभाव्य धोके असतात त्यामळे या प्रकारच्या वस्तू वापरताना खूप काळजीपूर्वक वापरल्या पाहिजेत.

जर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत घरामध्ये कोणतीही असामान्य गोष्ट घडली कि लगेच त्यावर सावधगिरीने उपाय करा किंवा त्यावर लगेच काहीतरी तोडका काढा त्यामुळे पुढे होणारे धोके टळतील आणि जर असे नाही केले तर घरामधी धोका वाढण्याची शक्यता असू शकते आणि त्यामुळे विपरीत परिणाम होती म्हणून कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घरातील सुरक्षतेबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. घरातील लोकांना घरातील धोक्यांच्याविषयी उपाय माहित असणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे घरातील लोकांचे प्राण वाचू शकतात. खाली काही घराच्या सुरक्षतेसाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत जर तुम्ही कोठेही बाहेर जात असाल तर घराचे सर्व खिडक्या आणि दरवाजे चांगले बंद करा आणि मग घराच्या मुख्य दरवाज्याला चांगले लॉक करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणीही जाऊ शकणार नाही किंवा तुमच्या घरामध्ये चोर किंवा लुटेरे खुसू शकणार नाहीत.

आम्ही कित्येक वेळा पहिले आहे कि काही स्त्रिया स्वयंपाक झाला कि काहीवेळेला गॅस बंद करण्यास विसरतात आणि त्यामुळे गॅस घरातल्या वातावरणामध्ये पसरते आणि जर आपण गॅस जवळ आगीची काडी लावली तर तेथे मोठ्या प्रमाणात आग लागण्याची शक्यता असते त्यामुळे स्त्रियांनी आपला स्वयंपाक झाला कि चांगले लक्ष देऊन गॅस बंद केले पाहिजे. त्याचबरोबर गॅसचे सिलेंडर देखील खूप धोकादायक असते कारण गॅस सिलेंडरचा स्पोट होऊ शकतो आणि त्यामुळे घरामध्ये आग लागू शकते आणि अशे कित्येक उदाहरणे आपण बगितली आहेत.

ज्यामध्ये गॅस सिलेंडरचा स्पोट होवून घरामध्ये आग लागून अनेक जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडरचा वापर झाला कि आठवणीने गॅस सिलेंडर देखील बंद करा त्यामुळे गॅस सिलेंडरच स्पोटचा धोका कमी होईल. ज्यावेळी घरी स्त्रिया जेवण बनवत असतात त्यावेळी जर कुकरमध्ये काही घालत असतील त्यामध्ये प्रमाणात पाणी घालून त्याचे टोपण नीट बसवून कुकर गॅसवर ठेवावा.

घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची औषधे असतात आणि ती औषधे लहान मुलांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच घरातील धारधार वस्तू देखील लहन मुलांच्या पासून लांब ठेवाव्यात. घरामध्ये असुरक्षित धोक्यापासून काही नुकसान होऊ नयेत म्हणून खाली उपाय दिले आहेत. घरामध्ये ज्वलनशील वस्तू म्हणजेच पडदे, प्लॅस्टिक हे अग्नि स्तोत्र म्हणजेच पोर्टेबल हीटर, फ्रीज, ओव्हन या वस्तूंच्यापासून लांब असू द्या आणि विद्युत उपकरणे पाण्यापासून लांब ठेवा.

जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर स्वयंपाक घरातील चाकू किंवा धारधार वस्तूंच्याकडे दुर्लक्ष करू नका. विषारी पदार्थ जसे कि पेंट थिनर, उंदीर मारण्याचे औषध, अँटीफ्रीज यासारखी औषधे शक्यातो एकाद्या लॉकच्या कपाटामध्ये ठेवा किंवा मग लॉक असणाऱ्या रूम मध्ये ठेवा. तसेच आपल्या घरामध्ये खूप प्लेन फरश्या असतील तर त्यावर पाणी पडू देवू नका कारण फरशीवर पाणी पडले आणि जर त्यावर कोणी पाय ठेवला तर पाय घसरून पडण्याची शक्यता असते त्यामुळे फरशीवर पाणी पडू देवू नका किंवा मग नॉन स्लीप स्ट्रिप्स किंवा फ्लोवर मॅट्स वापरा अश्या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे घराची सुरक्षा करू शकता.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलीस, विष नियंत्रण, अग्निशमन विभाग किंवा दल, विश्वासू मित्र आणि शेजारी यांचे फोन नंबर जवळ असले पाहिजेत ज्यामुळे आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीसाठी बोलावू शकतो.

घर म्हणजे आपल्या जुन्या आठवणी ज्यामध्ये अजूनही जिवंत असतात असे ठिकाण तसेच घर म्हणजे उन, वारा आणि पाऊस यापासून आपले संरक्षण करते ते म्हणजे घर आणि आपल्या घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असते कि आपले घर हे वेगवेगळ्या वाईट गोष्टींच्यापासून सुरक्षित ठेवणे आणि त्यासाठी आपण घरामध्ये घरसुरक्षेसाठी नियम बनवले पाहिजेत आणि ते पाळले पाहिजेत तसेच असुरक्षित धोक्यापासून सावधगिरी पाळली पाहिजे.

आम्ही दिलेल्या home safety essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर घरची सुरक्षा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on home safety in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!