हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती Hyderabad Mukti Sangram Information in Marathi

Hyderabad Mukti Sangram Information in Marathi हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम हि एक प्रकारची चळवळ होती जसे महात्मा गांधीजीनी ब्रिटीश भारत सोडून जावे म्हणून ‘चले जावो’ या सारख्या अनेक चालवली केल्या होत्या त्याच प्रमाणे हैदराबाद मुक्ती संग्राम हि एक चळवळ होती जी हैदराबाद शहराला निजामशाहीच्या वर्चस्वापासून दूर करण्यासाठी सुरु केली होती. हैदराबाद मुक्ती संग्राम हे रामनंद तीर्थ यांनी निजामशाहीचे मूळ हैदराबाद शहरातून उपडून काढण्यासाठी सुरु केले होते.

ज्यावेळी हा हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम सुरु झाला त्यावेळी कासीम रझवी जो निजामांचा सेनापती होता त्याने हैदराबाद शहरातील लोकांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली, परंतु मुक्ती संग्राम काही थांबवला नाही त्याला पुढे मोठे स्वरूप प्राप्त झाले.

तसेच या संग्रामाचे नेतृत्व रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चौहान या लोकांनी केले.

काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, सूर्यभान पवार, गोविंदराव पानसरे, विठ्ठलराव काटकर, जानकीलालजी राठी, हरिश्चंद्गजी जाधव, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील, जनार्दन होर्टीकर, शंकरराव जाधव आणि श्रीधर वर्तक या सारख्या अनेक लोकांनी या मुक्ती संग्रामामध्ये मोलाची आणि महत्वाची कामगिरी बजावली होती. हैदराबाद मुक्ती संग्राम हा गावा गावा मध्ये लढला गेला आणि त्याला चांगले यश देखील मिळाले.

hyderabad mukti sangram information in marathi
hyderabad mukti sangram information in marathi

हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती मराठी – Hyderabad Mukti Sangram Information in Marathi

अधिकृत नावहैदराबाद मुक्ती संग्राम आणि या मराठवाडा मुक्ती संग्राम असे देखील म्हंटले जाते.
हैदराबाद मुक्ती संग्राम महत्वहैदराबाद आणि मराठवाडा हे प्रदेश भारताचे भाग बनले.
हैदराबाद मुक्ती संग्राम कोणी सुरु केलारामानंद तीर्थ
हैदराबाद मुक्ती संग्राम कोणाविरुद्ध केला होतानिजामांच्या विरुध्द
हैदराबाद मुक्ती संग्राम केंव्हा यशस्वी झाला१७ सप्टेंबर १९४८

हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे काय ? 

पूर्वीच्या काळी हैदराबाद हे शहर मीर उस्मान आली खान बहादूर नियमुदौला निजाम उल मुल्क असाफजाह ह्या एका निजामशाहीतील व्यक्तीकडे म्हणजेच निजामांचे राज्य होते. पण हैदराबाद शहराला निजामांच्या वर्चस्वापासून दूर करण्यासाठी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम चालू केले गेले.

हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामचा इतिहास – marathwada mukti sangram din history

जरी आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य झाला असला तरी हैदराबाद शहरावर निजामांचे राज्य हे कायम होते म्हणजेच हैदराबाद / मराठवाड्यातील लोकांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले नव्हते. इ. स १९४७ मध्ये हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीर सारखी काही राज्ये वगळता बहुतेक रियासत भारतीय संघराज्यात विलीन झाली आणि हैदराबाद हे शहर मीर उस्मान आली खान बहादूर नियमुदौला निजाम उल मुल्क असाफजाह ह्या एका निजामशाहीतील व्यक्तीकडे म्हणजेच निजामांचे राज्य होते.

हैदराबाद हे शहर देखील भारतामध्ये विलीन करण्यासाठी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम सुरु केला. यामध्ये हैदराबाद सह मराठवाडा, तेलंगाना आणि कर्नाटक मधील ४ जिल्ह्यांचा समावेश होता. १३ सप्टेंबर १९४८ मध्ये निजामाच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.

त्यावेळी मुक्ती संग्रामातील सैनिकांनी तुळजापूर, नळदुर्ग, दौलताबाद, वरंगल, कन्नड, बिदर आणि जालना यासारखी मुख्य आणि महत्वाची शहरे आपल्या हातात घेतली त्यामुळे निजामांचा सेनापती जन अल इद्गीस याने शरणागती पत्करली आणि त्यावेळी निजाम शरण आले. १७ सप्टेंबर १९४८ मध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाले.

हैदराबाद मुक्ती संग्राम का सुरु करण्यात आले ?

जरी आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटीश सत्तेतून स्वातंत्र्य झाला असला तरी हैदराबाद शहरावर निजामांचे राज्य हे कायम होते म्हणजेच हैदराबाद / मराठवाड्यातील लोकांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळाले नव्हते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद हे शहर जवळ जवळ ११ महिने निजामाच्या गुलामगिरीत होते आणि या शहराला निजामशाहीतून मुक्त करण्यासाठी अनेक लोकांनी मोलाची कामगिरी केली आहे. या शहरामध्ये ज्यावेळी निजामांचे राज्य होते त्यावेळी या शहराची लोकसंख्या १ कोटी पेक्षा जास्त होती आणि त्यामध्ये कर्नाटक, मराठवाडा आणि तेलंगाना यामधील काही भाग समाविष्ट होता.

हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम हे ‘रामनंद तीर्थ’ यांनी निजामशाहीचे मूळ हैदराबाद शहरातून उपडून काढण्यासाठी सुरु केले होते. ज्यावेळी हा हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम सुरु झाला त्यावेळी कासीम रझवी जो निजामांचा सेनापती होता त्याने हैदराबाद मधील लोकांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली परंतु मुक्ती संग्राम पुढे तासाचा सुरु ठेवला आणि त्याला पुढे मोठे स्वरूप प्राप्त झाले.

या मुक्ती संग्रमामामध्ये रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चौहान या सारख्या नेत्यांनी नेतृत्व केले होते त्याचबरोबर काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, सूर्यभान पवार, गोविंदराव पानसरे, विठ्ठलराव काटकर, जानकीलालजी राठी, हरिश्चंद्गजी जाधव, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील, जनार्दन होर्टीकर, शंकरराव जाधव आणि श्रीधर वर्तक या सारख्या अनेक लोकांनी या मुक्ती संग्रामामध्ये मोलाची आणि महत्वाची कामगिरी बजावली होती.

परंतु निजामांचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले होते म्हणून १३ सप्टेंबर १९४८ मध्ये निजामाच्या विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली त्यावेळी मुक्ती संग्रामातील सैनिकांनी तुळजापूर, नळदुर्ग, दौलताबाद, वरंगल, कन्नड, बिदर आणि जालना यासारखी मुख्य आणि महत्वाची शहरे आपल्या हातात घेतली.

त्यामुळे निजामांचा सेनापती जन अल इद्गीस याने शरणागती पत्करली आणि त्यावेळी निजाम शरण आले. १७ सप्टेंबर १९४८ मध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाले म्हणजेच या शहराला निजामांच्या वर्चस्वापासून मुक्ती मिळाली आणि खऱ्या अर्थाने हैदराबाद मधील लोक स्वातंत्र्य झाले.

हैदराबाद मुक्ती दिवस – marathwada mukti sangram din marathi images

हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम हा दिवस साजरा केला जातो आणि दिवशी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुट्टी जाहीर केलेली असते. मुक्ती संग्राम या लढ्यामध्ये मरण पावलेल्या शूरवीरांच्या स्मारका जवळ लोक जमतात आणि त्यांना त्यांची आठवण म्हणून श्रद्धांजली वाहतात. शाळांमध्ये रॅली आयोजित केल्या जातात, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही उपस्थित असतात.

प्रदेशाशी संबंधित समस्या मांडण्यासाठी चर्चासत्रेही आयोजित केली जातात. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार १७ सप्टेंबर हा दिवस मुक्ती दिवस म्हणून साजरा करते. औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, आणि हिंगोली हे आता मराठवाड्याचा भाग आहेत आणि या भागांमध्ये देखील मुक्ती दिवस साजरा केला जातो.

हैदराबाद मुक्ती संग्राम विषयी तथ्ये – facts about hyderabad mukti sangram 

  • १७ सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम हा दिवस साजरा केला जातो आणि दिवशी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुट्टी जाहीर केलेली असते.
  • १९४७ ते १९४८ या काळामध्ये हैदराबाद या शहरामध्ये निजामांचे राज्य होते.
  • हैदेराबादला निजामांच्या वर्चस्वापासून मुक्त करण्यासाठी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम सुरु केला होता.
  • हैदराबाद मुक्ती संग्राम दिन दिवशी शाळांमध्ये रॅली आयोजित केल्या जातात, ज्यात विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही उपस्थित असतात.

आम्ही दिलेल्या hyderabad mukti sangram information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathwada mukti sangram din history या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि maratha mukti sangram din माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये 17 september marathwada mukti din Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती Hyderabad Mukti Sangram Information in Marathi”

  1. मराठवाडा मुक्ती संग्राम च्या दिवशी फक्त मराठवाड्यात सुट्टी असते, पूर्ण महाराष्ट्रात सुट्टी नसते.
    ह्या संग्रामात पुरुषोत्तम राव चपळगावकर यांचं हि मोठं योगदान आहे.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!