Importance of Festivals Essay in Marathi राष्ट्रीय सणांचे महत्त्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये सणांचे महत्व या विषयावर पाहणार आहोत म्हणजेच आपण सण का साजरे केले जातात आणि संणांचा मानवी जीवनामध्ये काय फायदा होतो ते पाहणार आहोत. जगामध्ये मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात तसेच भारत हा देश संस्कृती प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये आपली संस्कृती जपण्यासाठी किंवा देशातील लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी किंवा लोकांना त्यांच्या रोजच्या कामातून काही वेगळेपणा म्हणून भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात.
भारतामध्ये दिवाळी, गणेश चतुर्थी, दसरा, मकर संक्रांति, लोहरी, नाग पंचमी, पोंगल, बैल पोळा, होळी, रंगपंचमी, गुढी पाडवा यासारखे अनेक छोटे मोठे सण साजरे केले जातात आणि भारतामध्ये अनेक राष्ट्रीय सण देखील साजरे केले जातात जसे कि स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), शिक्षक दिन, महिला दिन आणि बालदिन यासारखे अनेक राष्ट्रीय सण देखील साजरे केले जातात.
राष्ट्रीय सणांचे महत्त्व मराठी निबंध – Importance of Festivals Essay in Marathi
Essay on Importance of Festivals in Marathi
आपण खरेतर तर आपल्या आयुष्याकडे बघायला गेलो तर माणूस हा पूर्णपणे व्यस्त झाला आहे आणि त्याला कामाशिवाय काही सुचत नाही तसेच लोकांचे जीवन हे संसारिक चक्रामध्ये अडकले आहे आणि तसेच माणसाच्या जीवनामध्ये काही वेळेला दुख आणि काही वेळेला सुख अशी परिस्थिती निर्माण होते तसेच मानवाच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार देखील घडून येतात त्यामुळे माणसाचे जीवन हे खूप दगदगीचे आणि काळजीचे झाले आहे पण पूर्वीच्या काळापासून आपल्या पूर्वजांनी सुरु करून ठेवलेले काही उत्सव आपल्या जीवनामध्ये अनेक बदल तसेच आनंद घेवून येतात.
आपल्या घरामध्ये कोणताही सण असला कि आनंदाचे वातवरण असते तसेच घरातील लोक आपल्या सर्व चिंता, काळजी आणि दुख बाजूला ठेवून सणाची तयारी करतात. सण किंवा उत्सव हे आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण यावे किंवा माणसाला त्याच्या रोजच्या जीवनातून किंवा दगदगीत विरंगुळा मिळावा म्हणून साजरे केले जातात. पूर्वीच्या काळी वेगवेगळे सण हे थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जात होते आणि सध्या आधुनिक काळामध्ये सण साजरे करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे.
भारतामध्ये प्रत्येक सण साजरा करण्यापाठीमागे काही ना काही महत्व किंवा कथा लपलेली आहे. भारतामध्ये अनेक धार्मिक सण साजरे केले जातात जसे कि दसरा, दिवाळी, गणेश जयंती, मकर संक्रांति आणि हे सण साजरे करण्याच्या पाठीमागे अनेक करणे किंवा कथा आहेत. दिवाळी आहे भारतामध्ये साजरा केला जाणारा एक मोठा सण आहे आणि हा सण भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो.
दिवाळी या सणाला दिव्यांचा सन म्हंटले जाते त्यामुळे दिवाळी या सणाला आपल्याला सगळीकडे दिव्यांची रोशनाई दिसते तसेच दिवाळी या सणामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या मोठ मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात तसेच वेगवेगळ्या प्रकारचा फराळ बनवला जातो तसेच दिवाळी मध्ये गायीचे पूजन केले जाते, लक्ष्मी कुबेर पूजन केले जाते आणि फटके देखील उडवले जातात आणि दिवाळी दोन ते तीन दिवस खूप उत्साहाने साजरी केली जाते आणि यामध्ये लोक आपल्या सर्व चिंता, काळजी आणि दुख विसरून जातात आणि उत्सवाचा आनंद घेतात.
तसेच दसरा हा देखील भारतामध्ये साजरा केला जाणारा मोठा सण आहे आणि या सणामध्ये देवीचे पूजन केले जाते तसेच दसऱ्याच्या अगोदर नऊ दिवस कडक उपवास केला जातो. दसरा हा सण साजरा करण्यापाठीमागे दोन कथा आहेत त्या म्हणजे अश्विन शुध्द दशमीच्या दिवशी दसरा साजरा केला जातो कारण प्रभू श्री रामांनी याचा दिवशी रावणाचा वध केला होता आणि म्हणून सत्याचा वाईटावर विजय म्हणून दसऱ्या दिवशी रावणाच्या पुतळ्याला जाळून दसरा हा सन साजरा केला जातो.
तसेच दसऱ्या विषयी असे देखील म्हटले जाते कि दसऱ्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला होता आणि म्हणूनच भारतामध्ये काही लोक दुर्गा देवीची पूजा करून दसरा हा सण साजरा करतात तर काही लोक रावणाच्या पुतळ्याचे दहन करून हा दिवस साजरा करतात. भारतामध्ये साजर्या केल्या जाणार्या मोठ्या सणांपैकी आणखीन एक सन म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थी हा सन संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आणि आपल्या देशामध्ये या सणाची आतुरतेने वाट पाहणारे अनेक लोक आहेत.
गणेश चतुर्थी हा सन भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो हा सन ६ ते ११ दिवसांचा असतो म्हणजेच हा सन घरामध्ये ५ ते ६ दिवस साजरा करतात आणि बाहेरील मंडळाचे गणपती हे ११ दिवस असतात. गणपती या सणामध्ये पहिल्या दिवशी गणपतीची मूर्ती घरामध्ये आणून ती सजवलेल्या मखरामध्ये बसवली जाते आणि त्या मूर्तीला फुले, दुर्वा आणि हार घालून मूर्तीची पूजा आणि आरती करून गणपतीला गोड खिरीचा किंवा मोदकाचा नैवैद्य दाखवला जातो.
आणि अश्या प्रकारे ५ ते ६ दिवस गणपतीची पूजा केली जाते आणि नैवैद्य देखील दाखवले जाते आणि गणपती आलेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गौरी देखील आणल्या जातात आणि त्यांना साडी आणि दागिने घालून नटवले जाते आणि अश्या प्रकारे ५ ते ६ दिवस सन उत्साहात साजरा केला जातो आणि मग ५ व्या किंवा ६ व्या दिवशी मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते अश्या प्रकारे गणपती सन साजरा केला जातो आणि त्यामुळे आजूबाजूला उत्साहपूर्ण निर्माण होते.
बैल पोळा हा सन शेतकऱ्यांना सन म्हणून साजरा केला जातो तसेच कृषिप्रधान संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणजे बैल पोळा आणि बैल पोळा हा सण आपल्यासाठी सैदैव कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक सण आहे. हा सण श्रावण महिन्यामध्ये पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो आणि या दिवशी बैलांचा थाट असतो. तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी नाग पंचमी हा सन देखील केला जातो आणि हा सन श्रावण महिन्यात ५ व्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते.
आणि हा सन साजरा करण्यापाठीमागाचे कारण म्हणजे नागपंचमीचे महत्त्व म्हणजे सक्रिय सापांना शांत करणे आणि पावसाळ्यात जेव्हा साप त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडतात तेव्हा पाऊस आणि पूर यामुळे त्यांना मानवांसाठी धोका होण्यापासून परावृत्त करणे. रंगपंचमीच्या सणाला रंगाचा सन म्हटले जाते आणि या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून सन साजरा करतात.
तसेच भारतामध्ये अनेक राष्ट्रीय सन देखील साजरे केले जातात जसे कि स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन हा दिवस १५ ऑगस्ट दिवशी साजाराला केला जातो कारण आपल्याल देशाला ब्रिटीशांच्या पासून १५ ऑगस्ट १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तसेच देशाची घटना हि २६ जानेवारीला लिहिली म्हणून त्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळे सन साजरे केले जातात आणि प्रत्येक सन साजरा करण्यापाठीमागे काही ना काही कारण आहे आणि आपण भारतामध्ये पूर्वीपासून साजरे केले जाणारे सर्व सन साजरे करून आपली भारतीय संस्कृती जपली पाहिजे.
आम्ही दिलेल्या importance of festivals essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रीय सणांचे महत्त्व मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on importance of festivals in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Our Festivals Marathi Essay माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ESSAY ON FESTIVALS IN MARATHI Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट