श्रमाचे महत्व मराठी निबंध Importance of Hard Work Essay in Marathi

Importance of Hard Work Essay in MarathiThe fruit of hard work श्रमाचे महत्व मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये कठीण परिश्रमाचे महत्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत. या पृथ्वी तलावर जे जे जीव राहतात त्यांना जगण्यासाठी कठोर परिश्रम हे घ्यावेच लागतात कारण मानवाला जसे आपले अन्न गोळा करण्यासाठी किंवा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात तसेच प्राण्यांना देखील अनेक कठोर परिश्रम करावे लागतात. उदाहरणार्थ मुंग्या आपल्या पावसाळ्यातील अन्नाची तयारी ह्या उन्हाळ्यामधेच करून ठेवतात तसेच अनेक मोठ मोठ्या प्राण्यांना देखील आपले पोट भरण्यासाठी शिकार हा करावा लागतो.

म्हणजेच या जगामध्ये कष्ट किंवा कठीण परिश्रम केल्या शिवाय कोणालाच काही मिळता नाही. कठीण परिश्रम करणे हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे आणि आपण जर कठीण परिश्रम करून जर काही सध्या केले तर त्याला खूप महत्व असते आणि आपल्याला त्या गोष्टीचे समाधान देखील मिळते. प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला जीवनामध्ये कधी ना कधी किंवा मग जन्माच्या सुरुवाती पासूनच कठीण परिश्रम करावे लागतात कारण कठीण परिश्रम केल्याशिवाय या जगामध्ये आपण आपला वेगळा छाप उठवू शकत नाही.

importance of hard work essay in marathi
importance of hard work essay in marathi

श्रमाचे महत्व मराठी निबंध – Importance of Hard Work Essay in Marathi

Essay on hard work in Marathi

तसेच कष्टाच्या बळावरच आपल्याला जे हवे आहे ते आपण मिळवू शकतो. मला तर वाटते कि आयुष्य म्हणजे एक कठोर परिश्रमाच आहे कारण आपण आपल्या सामोरे येणाऱ्या अनेक समस्या कष्टाच्या बळावर सोडवू शकतो आणि आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो. आपण आपल्या लहान वयामध्ये किंवा तरुण वयामध्ये जितके कष्ट करू किंवा परिश्रम करू तितके आपल्याला म्हतारपणी जीवन चांगले जाईल म्हणजेच आपल्या तरुण वयामध्ये आपण आपले आयुष्य चांगल्या प्रकारे सेटल केले.

तर आपण आपले राहिलेले आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो आणि हे सर्व फक्त कठीण परिश्रमाने साध्य होते. अनेक लोकांचा असा समाज आहे कि परिश्रम केल्याने काही साध्य होत नाही किंवा कष्टाचा काहीच उपयोग नसतो कारण आपली आयुष्यामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टी ह्या नशिबावर अवलंबून असतात आणि आपले नशिबच आपले आयुष्य घडवते आणि परिश्रमाचा काहीच उपयोग नसतो कारण आपल्या जीवनामध्ये जे घडते.

ते आपल्या नशिबात होणार असते परंतु असे विचार करणाऱ्या लोकांना माहित नाही कि परीश्रामापुढे नशीब देखील झुकते आणि आपल्या कष्टाने आपण आपल्या नशिबामध्ये होणाऱ्या गोष्टी देखील बदलता येतात. कोणत्याही मानवाच्या आयुष्यामध्ये जर फक्त अंधार असेल किंवा त्याचे आयुष्य फक्त दुखाने भरलेले असेल तर त्याला या सर्वातून बाहेर येण्यासाठी एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे कठोर परिश्रम. कठोर परिश्रम घेतले तर आपण अंधारामधून प्रकाशामध्ये येवू शकतो तसेच दुखाचे डोंगर पार करून आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख अनु शकतो.

देवाने हा जन्म आपल्याला काही तरी चांगले कार्य करण्यासाठी दिला आहे आणि आपल्याला आपल्या जीवनाचा चांगला वापर करून आपले नाव उंच शिखरावर गाठायचे असेल तर आपल्याला कठोर परिश्रम हे एकमेव मार्ग आहे कारण त्यामुळे आपण आपल्या सर्व इच्छा, स्वप्न पूर्ण करू शकतो.

जगातील प्रत्येक व्यक्तीला परिश्रम किंवा कष्ट हे करावे लागते कारण जर जगामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे शोध लावण्यासाठी कठोर परिश्रम घेतले नसते  तर आपण आधुनिक जगामध्ये कसे जगलो असतो तसेच आपली कामे खूप सोप्या पध्दतीने आणि कमी वेळेमध्ये कशी झाली असती. आपण शेतामधील पिकलेले अन्न जे बाजारामधून आणतो जसे कि ज्वारी, गहू, तांदूळ, डाळी आणि इतर जे धान्य मिळते ते शेतामाधुल आलेले असते आणि हे अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याला वर्षभर कष्ट घ्यावे लागतात आणि शेतकरी शेतामध्ये पिक घेण्यसाठी सर्वप्रथम शेताची मशागतकरतात तसेच त्यामध्ये सेंद्रिय खत टाकतात.

तसेच मह त्याच्या सऱ्या पडतात आणि मग पावसाची सर येवून गेली कि आणि जमीन थोडी मावू झाली कि त्यामध्ये धान्याच्या बियाची पेरणी करतात आणि त्याला ४ ते ५ दिवसांनी त्याला पाणी देतात तसेच ते १५ ते २० दिवसाने चांगले उगवायला सुरुवात होते तसेच पिक वर आले कि त्याला अनेक प्रकारची औषधे तसेच टॉनिक मारतात त्यामुळे पिक चांगले बहरते तसेच पिकावर कीड येत नाहीत.

त्याचबरोबर त्याची चांगली वाढ होण्यासाठी त्याला पाणी देतात अश्या प्रकारे ते पिक येण्यासाठी कष्ट करतात आणि मग ते काढण्यासाठी योग्य झाल्यानतर ते काढतात आणि मग ते चांगले वळवून बाजारामध्ये चांगल्या दामामध्ये विकतात आणि हे करण्यासाठी त्यांना खूप कठोर परिश्रम घ्यावे लागतात आणि म्हणून आपण जे अन्न खातो ते शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ असते.

तसेच एकाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये जर चांगले गुण मिळवायचे असतील तर त्याला देखील कठीण परिश्रम घ्यावे लागतात जसे कि त्याला शाळेमध्ये होणारे सर्व तास करावे लागतात, शिक्षण शिकवताना लक्ष देऊन कोणतीही व्याख्या समजावून घ्यावी लागते. तसेच त्याला घरामध्ये रोज सर्व करावा लागतो तसेच त्याला सर्व संज्ञा तसेच व्याख्या समजावून घ्याव्या लागतात आणि लक्षपूर्वक अभ्यास करावा लागतो आणि अश्या प्रकारे त्याला चांगले मार्क पाडण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात.

अश्या प्रकारे आपली हि दुनिया परिश्रमावर चालते आणि जर कोणीच परशराम केले नाहीत तर हि दुनिया चालणार नाही म्हणून आपण जिकडे तिकडे बघू तिकडे प्रत्येक माणूस कष्ट करत असतो आणि आपले आयुष्य सुरळीत जगण्याचा प्रयत्न करत असतो.

आम्ही दिलेल्या importance of hard work essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर श्रमाचे महत्व मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या importance of hard work essay in marathi  या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay on hard work in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये The fruit of hard work essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!