15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi – 15 August Essay in Marathi 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस या विषयावर निबंध लिहिणारा आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे कि १५ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि हा का साजरा केला जातो ते आपण पाहूयात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १५ तारखेला साजरा केला जातो आणि तो साजरा काण्याचे कारण देखील तसे आहे. १७ व्या आणि १८ व्या काळामध्ये आपल्या देशावर ब्रिटीशांचे राज्य होते आणि त्यांचे राज्य असताना ते आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू विनाश करत होते.

तसेच लोकांच्यावर अन्याय करत होते आणि त्यावेळी ब्रीटीश्यांच्या या जाचापासून लोकांची आणि देशाची सुटका करण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले तसेच काही लोक यामध्ये शहीद देखील झाले आणि आपल्या देशासाठी ज्यांनी स्वातंत्र्य लढा दिला ते म्हणजे भगत सिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आणि यारखे अनेक लोकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवले.

independence day essay in marathi
independence day essay in marathi

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Essay in Marathi

15 ऑगस्ट निबंध मराठी – 15 August Marathi Nibandh

आपल्या भारत देशाला ब्रिटीशांच्या पासून १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्यावेळी पंडित जवाहर लाल नेहरू हे राजकीय नेते होते. १९४७ मध्ये १५ ऑगस्ट या दिवशी भारताला मध्य रात्री स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरूंनी दिल्ली मध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवला आणि त्यावेळी ते भारतचे पहिले पंतप्रधान देखील बनले.

सलग २०० वर्ष आपल्या देशावर हुकुमत गाजवणाऱ्या ब्रीटीशांच्यापासून ज्यावेळी भारताला स्वातंत्र्यता मिळाली त्या दिवसापासून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि आज देखील हा दिवस त्याच आनंदामध्ये साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशासाठी किंवा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी दिलेले बलिदान तसेच दिलेला लढा.

Essay on Independence Day in Marathi

१५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयांच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आपल्या देशाला आम्पूर्ण जगामध्ये एक स्वातंत्र्य देश म्हणून ओळखू लागले तसेच भारत हा देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच विकासाच्या मार्गावर चालू लागला आणि भारताची प्रगती झाली आणि त्यामुळे भारतातील लोकांचे दिवसेंदिवस राहणीमान बदलू लागले आणि जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता तसेच देश विकासाच्या मार्गावर कधीच गेला नसता आणि लोकांचे राहणीमान कधीच सुधारले नसते.

पण तसे काही झाले नाही काही महापुरुषांच्या लढाई मुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि याचाच आनंद दर वर्षी भारतीय लोक साजरा करतात. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिवस हा भारतामध्ये दर वर्षी खूप आनंदाने साजरा करतात आणि भारतामध्ये हा सन एक राष्ट्रीय सन म्हणून साजरा केला जातो आणि सर्व दिवस म्हणजे सर्व भारतीयांच्या एक अभिमान आहे.

दरवर्षी दिल्लीमध्ये असणाऱ्या लाल किल्ल्यावर देखील आपण तिरंगा ( राष्ट्रध्वज ) फडकवला जातो आणि हा तिरंगा देशाच्या पंतप्रधानामार्फत फडकवला जातो आणि त्यावेळी तिरंगा फडकवल्या नंतर तोफांची सलामी दिली जाते तसेच राष्ट्रगीत गायिले जाते आणि त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान आपले मनोगत करतात तसेच ते देशाच्या प्रगतीसाठी ते पुढील धोरणे काय करणार आहेत ते सांगतात आणि या कार्यक्रमामध्ये तेथील लोक तसेच राजकीय नेते हजार असतात.

अश्या प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम करून दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवस ( १५ ऑगस्ट ) साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्य दिवस हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येक राज्यामध्ये देखील हा राष्ट्रीय सन अगदी उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो. ज्या प्रत्येक राज्याच्या राजधान्य आहेत त्या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ध्वजारोहन करतात तसेच राज्याचे मुख्यमंत्री देखील ध्वजारोहण झाल्यानंतर भाषण करतात आणि राज्याच्या विकासासाठी काय धोरणे आखली आहेत याचा लोकांना आढावा देतात.

अश्या प्रकारे सरकारी क्षेत्रामध्ये १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिवस ) साजरा केला जातो. तसेच भारतामध्ये अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी हॉस्पिटल, ग्राम पंचायत, सरकारी कार्यालय, कारखाने, शाळा आणि कॉलेज या ठिकाणी देखील ध्वजारोहन करून स्वातंत्र्यदिवस साजरा केला जातो.

शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये तर १५ ऑगस्ट हा दिवस खूप आनंदाने, उत्साहाने आणि दिमाखात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनादिवशी लहान मुले तसेच शाळेतील मोठी मुले सकाळी लवकर आवरून म्हणजेच इस्त्रीची शाळेचा ड्रेस घालून जातात आणि मग शाळेमध्ये गेल्यानंतर स्वातंत्र्य दिनासाठी कोणीतरी प्रमुख पाहुणे बनवलेले असतात आणि त्यावेळी मुले सर्व प्रथम ट्रॅक लेफ्ट राईट करतात.

तसेच एन. सी. सी ( NCC ) ची मुले काही तरी प्रमुख पाहुण्यांच्या समोर काही तरी कार्यक्रम करतात मग प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण किंवा तिरंगा फडकवला जातो मग प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होते तसेच त्यांचे आभार मानले जातात. १५ ऑगस्ट दिवशी काही मुले देखील भाषण करतात आणि ते भाषणामधून आपल्या देशाला कसे स्वातंत्र्य मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करतात तसेच काही मुले देशाच्या स्वातंत्र्याच्या काही घटनांच्यावर नाटक बसवून ते इतर विद्यार्थ्यांच्या समोर आणि शिक्षकांच्या समोर साजरे करतात आणि शेवटी शाळेमध्ये खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची समाप्ती होते.

अश्या प्रकारे शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो आणि कॉलेज मध्ये देखील आपला राष्ट्रध्वज फडकवला जातो तसेच प्रमुख पाहुण्यांचे आणि इतर पाहुण्यांचे तसेच काही शिक्षकांचे मनोगत होते. अश्या प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागापासून शहरी भागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाने १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट ( स्वातंत्र्य दिन ) हा आपल्या भारत देशाचा खूप महत्वाचा दिवस आहे कारण आपल्या देशाला या दिवशी परकीय आक्रमणापासून मुक्ती मिळाली म्हणजेच आपला देश परकरी सत्तेपासून स्वातंत्र्य झाला. आपला देश १५ ऑगस्ट १९४७ पासून स्वातंत्र्य झाला आणि या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

आम्ही दिलेल्या independence day essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या 15 august 1947 nibandh in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 15 august independence day essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये independence day of india essay in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!