जागतिक साक्षरता दिन 2023 International Literacy Day Information in Marathi

International Literacy Day Information in Marathi – World Literacy Day Meaning in Marathi जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती आपल्याला आयुष्यात जर कोणतीही गोष्ट करायची असेल , आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील, किंवा आपले ठराविक ध्येय गाठयचे असेल तर सर्वात प्रथम आपल्याला आपले ध्येय आणि तिथं पर्यंत पोहचण्याचे ज्ञान असावे लागते. हे ज्ञान कधी कधी आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडून मिळते, पण बहुतेक वेळा आपल्याला स्वतःला वेगवेगळ्या मार्गाने मिळवावे लागते. त्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्वाचे साधन आहे. शिक्षणाने माणूस हा स्वावलंबी तसेच खंबीर बनतो.

शिक्षित व्यक्ती कधीच कुठे थांबू शकत नाही जर त्याची इच्छा नसेल तरच ती थांबते. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी जागतिक साक्षरता दिवस हा ८ सप्टेंबर रोजी साजरा करतात जातो.

International literacy day information in marathi
International literacy day information in marathi

जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती – International Literacy Day Information in Marathi

साक्षरता दिवस मराठी माहिती

आत्ताच आपण पाहिले आहे की कोणत्याही व्यक्तीची प्रगती ही त्याच्या शिक्षणावर अवलंबून असते. त्यामुळे एक व्यक्ती शिक्षणाच्या जोरावर आपली वैयक्तिक प्रगती करू शकत असेल तर तो आपल्या गावाची प्रगती करू शकतो शिक्षणामुळे अशी गावे प्रगत होत असतील तर एक  प्रगत होऊ शकतो आणि अशा बहुसंख्य जिल्हे प्रगत झाल्यामुळे एक राज्य प्रगतीपथावर येऊ शकते.

जागतिक साक्षरता दिवस का साजरा केला जातो?

भारतातील सर्व राज्ये प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत असतील तर संपूर्ण देश प्रगती पथावर येऊ शकतो. त्यामुळे शिक्षण हा कुठल्याही देशाच्या प्रगतीचा एक भक्कम पाया असतो. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी जागतिक स्तरावर जागतिक साक्षरता दिवस हा सण साजरा केला जातो.

आता आपण जर पाहिले सध्या संपूर्ण जगात चार अब्ज लोक साक्षर आहेत तर एक अब्ज लोक हे निरक्षर आहेत. भारतामध्ये पाहिले गेले तर भारताची साक्षरता ही इको 69.3 टक्के आहे. आणि त्यापैकी पुरुषांची साक्षरता ही 78.5 टक्के आणि महिलांची 59.3 टक्के आहे. त्याबरोबरच शहरी भाग आणि ग्रामीण भागातील साक्षरते चे अंतर ही खूप आहे.

शहरी भागात मिळणाऱ्या सुविधांच्या तुलनेत ग्रामीण भागात मिळणाऱ्या सुविधा ह्या कमी प्रमाणात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षणाची म्हणावी तितकी जागृकता परविन होती पण सध्या माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षण हे एक गरजेची वस्तू झालेली आहे. शिक्षणाचे महत्त्व सर्वदूर पसरत आहे.

भारतामध्ये केरळ हे सर्वात शिक्षित राज्य म्हणून ओळखले जाते. केरळची साक्षरता ही 99 टक्के आहे. आणि सर्वात कमी साक्षर असलेले राज्य म्हणजे बिहार हे आहे.

संपूर्ण जगाकडे पाहिले असता जागतिक साक्षरता ही 86.3 टक्के आहे. त्यांपैकी पुरुषांची जागतिक स्तरावरील साक्षरता 90 टक्के आहे. आणि महिलांची जागतिक स्तरावर ची साक्षरता ही 82.7% आहे. ‘अंडोरा’ नावाचा एक देश आहे ज्या ठिकाणी साक्षरता ही शंभर टक्के आहे. त्याबरोबर फिनलंड हा जगातील सर्वात जास्त साक्षरता असलेला देश म्हणून ओळखला जातो.

साक्षरते बरोबरच देशांमध्ये निगर साउथ सुदान जीनिया बर्किना फासो ही निरक्षर ते मध्ये सर्वात वर येतात. निरक्षरता मुळे नायजेरिया, सुदान या सारख्या देशाची अवस्था फारच बिकट झालेली आहे. भारतामध्येही काही ठिकाणी किंवा काही गाव असे आहेत जिथे प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत सोयी अजूनही उपलब्ध नाहीत.

आजही बिहारसारख्या राज्यात शिक्षणाचे महत्त्व म्हणावी तितकी समजले नाही. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशात शिक्षण आणि आरोग्य ही सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. शिक्षणामुळे लोकांमध्ये कोणत्याही गोष्टीबद्दल योग्य तर्क करण्याची क्षमता येते. जोगी तयार करण्याची क्षमता आल्यामुळेच त्यांची होणारी फसवणूक ही कमीत कमी होते.

अशामुळे लोकशाही सारख्या देशांमध्ये लोक आपल्या डोक्याने अगदी चांगले निर्णय घेऊन योग्य व्यक्तींना राज्यकारभार सोपवू शकतात. साक्षर असणे म्हणजे नुसते लिहिता-वाचता येणे असे नाही. ज्यांना लिहिता वाचता येते त्यांना फक्त शिक्षित असे म्हणतात.

जो व्यक्ती शिक्षण घेऊन आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतःबरोबर आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करतो, आपल्या बरोबर इतरांच्या आयुष्यात प्रगती साठी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास सक्षम बनतो त्याला त्याला खऱ्या अर्थाने साक्षर असे म्हणतात. आणि अशा साक्षर व्यक्तीला शिक्षित नाही तर सुशिक्षित असे म्हटले जाते.  आपल्याला शिक्षित नाही तर सुशिक्षित पिढी घडवायची आहे.

यावर्षी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक साक्षरता दिवस हा मात्र “मानवी केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी” या तत्वावर आधारित अशी आहे. तसेच हा जागतिक साक्षरता दिवस साजरा करताना पुढीलप्रमाने कर्तव्य आपण करू शकतो.

  1. जवळपासच्या वाचनालयात जाऊन पुस्तके दान करणे. किंवा प्राथमिक शाळेत जिथे नवीन पुस्तकांची आणि माहितीची बरीच गरज असते अशा ठिकाणी पुस्तके दान आपण करू शकतो.
  2. लहान मुलं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना बद्दल कायम उत्सुक असतात. त्यांना सर्व गोष्टी जाणून घेण्याच भलतच कुतूहल असतं. त्यामुळे अशा लहान मुलांना आपण पुस्तक भेट वस्तू म्हणून देऊ शकतो यादिवशी.
  3. आपण एक मंडळ ही स्थापन करू शकतो ज्याच्या मार्फत आपण इच्छुक आणि हौशी वाचकांसाठी पुस्तके उपलब्ध करून देऊ शकतो.

अशाप्रकारे जागतिक साक्षरता दिवस साजरा करताना आपण लक्षात घेतले पाहिजे की याचा मूळ उद्देश हा साक्षरता आणि त्याचे महत्त्व हे एखाद्या समाजाच्या, वर्गाच्या आणि व्यक्तीच्या प्रगतीसाठी किती गरजेची आहे. ज्यामुळे एकंदरीतच सर्वांगीण विकास होणे अगदी शक्य होऊन जाते. 

आम्ही दिलेल्या International literacy day information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “जागतिक साक्षरता दिन मराठी माहिती 2021” बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about national nutrition week in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि world nutrition week information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये national nutrition week in marathi Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर nutrition week in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “जागतिक साक्षरता दिन 2023 International Literacy Day Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!