इंटरनेट निबंध मराठी Internet Essay in Marathi

Internet Essay in Marathi – Essay on Advantages and Disadvantages of Internet in Marathi Language इंटरनेटचे फायदे व तोटे निबंध मराठी अगदी शेकडो वर्षांपासून मनुष्याने टप्प्याटप्प्याने प्रगती केली आहे. आणि मनुष्याने केलेली सर्वात मोठी प्रगती म्हणजे इंटरनेट होय. इंटरनेट ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याशिवाय आज जग चालूच शकत नाही. इंटरनेटमुळे जग खूपच जवळ आलं आहे. इंटरनेट मुळे आज अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेट मुळे अशक्य गोष्ट देखील शक्य झाली आहे. पूर्वी आपल्याला जर आपल्या एखाद्या नातेवाईकाला बातमी कळवायची असेल तर पत्रव्यवहार करावा लागायचा पत्र व्यवहारांमध्ये बराच वेळ जायचा परंतु इंटरनेट मुळे आपण आपल्या नातेवाईकांना एखादी बातमी घरात बसल्या‌ कळवू शकतो.

इंटरनेट मुळे आपण आपल्या दैनिक आयुष्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या परिवारासह, आपल्या नातेवाईकांशी सगळ्यांशी गप्पा मारू शकतो. इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झाली इंटरनेटमुळे प्रत्येक काम त्वरित होऊ लागलं. इंटरनेटमुळे जगाच्या प्रगतीस चालना मिळाली. इंटरनेट हे एक संप्रेषण माध्यम आहे ज्यामध्ये आपण माहितीची देवाणघेवाण करू शकतो.

internet essay in marathi
internet essay in marathi

इंटरनेट निबंध मराठी – Internet Essay in Marathi

इंटरनेटचे फायदे व तोटे निबंध मराठी – Essay on Advantages and Disadvantages of Internet in Marathi Language

इंटरनेट हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे त्याच महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी सकाळी उठल्यावर आपल्याला हातामध्ये न्यूजपेपर लागतं परंतु आता इंटरनेट मुळे आपण समाचार, बातम्या टीव्हीवर देखील बघू शकतो तसेच आपल्या मोबाईल मध्ये देखील इंटरनेटच्या माध्यमातून बघू शकतो.

ऑफिस मध्ये संगणकावर काम करताना देखील इंटरनेटचा वापर होतो. वेगवेगळे व्यवहार, मोठे मोठे व्यवहार आपण इंटरनेटच्या माध्यमातून सुरक्षित रित्या करू शकतो. आज आपला देश डिजिटल इंडिया बनत आहे. पूर्वी जर आपल्याला पैशांची देवाणघेवाण करायची असेल तर प्रत्यक्षात त्याठिकाणी पोचून पैशाची देवाणघेवाण कराव लागायचं परंतु आता इंटरनेटमुळे आपण क्षणभरात कोणालाही पटकन पैसे पाठवू शकतो व कोणाकडूनही पैसे मागवून घेऊ शकतो.

प्रत्येक क्षेत्रामध्ये इंटरनेट खूप महत्त्वाचा भाग बनला आहे. क्षेत्रांमध्ये देखील मोठे मोठे व्यवहार सहज इंटरनेटमुळे पार पडत आहेत. इंटरनेट फक्त फोन आणि संगणकापर्यंत मर्यादित राहिला नाही आहे ‌तर आता इंटरनेट वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये, खाजगी कंपन्यांमध्ये, बँक‌ मध्ये अशा प्रकारे सर्व क्षेत्र इंटरनेटने व्यापून घेतले आहेत.

आज काल लोक घरातील सामान, उत्पादने, एखादी गोष्ट खरी देण्यासाठी नेट बँकिंगचा उपयोग करतात. तर इंटरनेट म्हणजे एक जागतिक प्रणाली आहे जी माहिती सामायिक करण्यासाठी व जगभरातील लोकांशी संबंध साधण्यासाठी इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर करते. आपल्याला हवी असलेली माहिती आपल्यापर्यंत इंटर लिंग हायपर टेक्स्ट प्रोटोकॉल आणि वर्ल्ड वाईड वेब च्या माध्यमातून मिळते.

इंटरनेट ही आता सामान्य गोष्ट झाली आहे परंतु इंटरनेटचे फायदे व उपयोग असामान्य आहेत. इंटरनेट आता जगभरात सर्वत्र पसरला आहे आपल्या भारतात देखील प्रत्येक गावात शहरात जिल्ह्यात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. इंटरनेट मुळे माणसं एकत्र आली इंटरनेटने संपूर्ण जगाला एकत्र आणलं. आपल्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला आपण इंटरनेटचा वापर करतो.

इंटरनेट मुळे आपल्याला जगभरातील समाचार जाणून घेता येतो. इंटरनेट मुळे आपल्याला एखाद्या विशेष विषयावरील माहिती मिळवता येते. इंटरनेट मुळे आपल्याला आपल्या घरच्यांशी नातेवाईकांशी सहज बोलता येतं इंटरनेटमुळे व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून, सोशल नेटवर्किंग ॲप्स च्या माध्यमातून आपण सर्वजण आपल्या परिवाराची मित्र-मैत्रिणींशी जोडले गेलो आहोत. इंटरनेटचा सर्वात जास्त वापर विद्यार्थ्यांमध्ये होत आहे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे सहज उपलब्ध झाले.

आता covid-19 काळामध्ये शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले परंतु इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचं फारसे नुकसान झाले नाही. इंटरनेटचा आणखी एक फायदा म्हणजे व्यापार. बाजारपेठेत इंटरनेटमुळे अधिक स्पष्टता व पारदर्शकता आली. इंटरनेटच्या माध्यमातून व्यापारी स्वतः आपल्या उत्पादनाची जाहिरात करू शकतात.

पूर्वी पत्रव्यवहार केला जायचा परंतु आता इंटरनेट मुळे अतिशय महत्त्वाची बातमी देखील अगदी क्षणभरात माहित पडते. पूर्वी आपल्याला सामान घेण्यासाठी किंवा उत्पादने खरेदी करण्यासाठी बाजारात जावं लागायचं परंतु आता इंटरनेटच्या माध्यमामुळे आपण बाजारच घरी आणलं आहे अगदी घरी बसून आपण आपल्याला हवी ती गोष्ट खरेदी करू शकतो.

इंटरनेट मुळे जगाला ऑनलाईन मार्केटिंग या नवीन कल्पनेचा परिचय मिळाला. इंटरनेट मुळे आपण लाईट बिल, पाणी बिल टीव्हीच बिल, मोबाईल्स रिचार्ज यासारखी अनेक गोष्टी अगदी घरबसल्या करू शकतो. इंटरनेटमुळे कुठल्याही विषयावरील माहिती चुटकीसरशी शोधून काढता येते इंटरनेट मुळे आपण घरबसल्या आपल्याला हव्या त्या रेस्टॉरंट मधून जेवण मागवू शकतो.

इंटरनेट मुळे आपण कपड्यांची खरेदी देखील करू शकतो.‌ इंटरनेटच्या माध्यमातून आपण ट्रेनची तिकीट, बस तिकीट बुक करू शकतो. इंटरनेट मुळे आपल्याला हवी असणारी औषध देखील आपण घरबसल्या मागवू शकतो. इंटरनेट मुळे करमणूक देखील होते इंटरनेटवर वेगळे चित्रपट मालिका उपलब्ध असतात.

इंटरनेट मुळे मानवी जीवन अतिशय सोपं झालं आहे. इंटरनेट मुळे घडून आलेली सगळ्यात मोठी क्रांती म्हणजे नेट बँकिंग. आता बँकिंग क्षेत्रामध्ये देखील इंटरनेटचा वापर प्रामुख्याने वाढत चालला आहे अनेक बँक आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करून देतात. एखाद्या ग्राहकाला दुसर्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर आता बँक मध्ये जाण्याची गरज नाही मोबाइल मध्ये बरेच नेट बँकिंग ॲप उपलब्ध असतात इंटरनेटचा वापर करून आपण मोबाईल मधून आपल्या खात्यातून दुस-याच्या खात्या मध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो.

तसेच इंटरनेट मुळे बेरोजगारीची समस्या देखील दूर करता येऊ शकते. इंटरनेटमुळे वेगवेगळ्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नोकरी शोधणं अतिशय सोपं झालं आहे. इंटरनेटमुळे आपण आपल्याला हवी ती नोकरी हव्या त्या ठिकाणी मिळवू शकतो. इंटरनेट मुळे आपण घर बसल्या देखील आपलं काम करू शकतो घरबसल्या डेटा ट्रान्सफर करू शकतो‌. घरबसल्या फाईल ट्रान्सफर करू शकतो, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून आपण मीटिंग देखील अटेंड करू शकतो.

कॉर्पोरेट क्षेत्रात तर‌ इंटरनेटला मोठी मागणी आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंटरनेटचा उपयोग करण्यासाठी आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. इंटरनेटचे खूप चांगले व उपयुक्त फायदे आहेत परंतु इंटरनेटचे बरेच तोटे देखील आहेत.

जर आपण इंटरनेटचा वापर आपल्या कामा व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींसाठी करत असू तर त्याने आपल्यालाच त्रास व नुकसान होणार आहे. आपलं काम सोडून इंटरनेटवर खेळ खेळणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे किंवा मनोरंजनासाठी दिवसभर इंटरनेटचा वापर करणे जे आपल्या यशाच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकत. इंटरनेटवर प्रत्येक गोष्टीची माहिती उपलब्ध असते परंतु इंटरनेटचा वापर आपण फक्त चांगली माहिती मिळवण्यासाठी केला पाहिजे.

बरेच लोक इंटरनेटचा वापर चुकीची माहिती मिळवण्यासाठी देखील करतात. इंटरनेट हे एक असे माध्यम आहे ज्याचा आपण योग्य तो वापर केला तर आपल्याला योग्य ती माहिती मिळते आणि आपला वेळ देखील वाचतो. परंतु बरेच लोक इंटरनेटच्या आहारी जात आहेत इंटरनेटचा गैरवापर करून वेगवेगळे फ्रॉड करत आहेत.

लोकांना फसवत आहेत. आता सध्या ई क्राईम्स देखील वाढत चालले आहेत. इंटरनेट मुळे आपला भरपूर विकास झाला आहे. इंटरनेटमुळे जग माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करत आहे. इंटरनेटमुळे वेगवेगळे शोध लागत आहेत. इंटरनेट मुळे आपला सोशल मीडियाशी संपर्क आला. इंटरनेट च्या माध्यमातून आपण सोशल मीडियावर आपले विचार मांडू शकतो आपल्या विचारांची देवाण-घेवाण करू शकतो.

सध्या इंटरनेट मुळे सोशल मीडिया हे एक प्रसिद्ध माध्यम बनलं आहे जिथे वेगवेगळ्या भाषेची वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळ्या देशातील लोक एकमेकांशी संपर्क साधतात आपल्या विचारांची देवाण-घेवाण करतात आपल्याला योग्य-अयोग्य गोष्टींची माहिती सोशल मीडियाद्वारे सांगतात हे फक्त आणि फक्त इंटरनेट मुळे  शक्य झाल आहे.

इंटरनेट मुळे ऑनलाईन पैसे कमवणे देखील सोपे झाल आहे. इंटरनेटवर घरी बसल्या ऑनलाइन काम करण्याचे अनेक माध्यमं खुली झाली आहेत. असं एकही क्षेत्र नाही जिथे इंटरनेटचा वापर होत नाही आहे. अगदी छोट्यात छोट्या गोष्टींमध्ये इंटरनेटचा वापर आवश्यक झाला आहे. इंटरनेट आता आपल्या सगळ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे आणि आता इंटरनेट शिवाय जग चालणं कठीण आहे. इंटरनेटच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या भविष्यात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक प्रगती पहायला मिळणार आहे.

आम्ही दिलेल्या internet essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इंटरनेट निबंध मराठी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on internet in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि internet che fayde tote essay in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!