जॅक मा मराठी माहिती Jack Ma Biography in Marathi

Jack Ma Biography in Marathi – Jack Ma Information in Marathi जॅक मा मराठी माहिती जॅक मा हे एक चीन व्यवसायिक, गुंतवणूकदार आणि राजकारणी आहेत. ज्यांनी बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान समूह अलीबाबा‌ स्थापन केली आहे. ते या संस्थेचे सहसंस्थापक आणि माजी कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते २०१४ मध्ये चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. २०१९ मध्ये त्यांनी अलिबाबा चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवृत्ती स्वीकारली. मा युन ही जगातील सर्वात शक्तिशाली लोकांपैकी एक आहेत. व ते चीनी व्यवसायाचे जागतिक ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. या लेखामध्ये आपण जॅक मा यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत.

 jack ma biography in marathi
jack ma biography in marathi

जॅक मा मराठी माहिती – Jack Ma Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)जॅक मा
जन्म (Birthday)१०  सप्टेंबर १९६४
जन्म गाव (Birth Place)चीन येथील हांगझोऊ, झेजियांग
राष्ट्रीयत्व (Citizenship)चायनीज
ओळख (Identity)चीन व्यवसायिक, गुंतवणूकदार आणि राजकारणी

जन्म व वैयक्तिक आयुष्य – Jack Ma Information in Marathi

प्रत्येक यशस्वी व्यक्तीला जसं संघर्षाच्या शिड्या चढाव्या लागतात त्याचप्रमाणे जॅक मा यांनी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये एक यशस्वी व्यक्तिमत्व होण्यासाठी अतिशय संघर्ष सहन केला आहे. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९६४ रोजी चीन येथील हांगझोऊ, झेजियांग येथे झाला. ते जॅक मा किंवा युन मा म्हणून ओळखले जातात.

लहान असताना त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली आणि इंग्रजीचा सराव व्हावा म्हणून त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी आपल्या सायकलवरून २७ किलोमीटर प्रवास करायचे. पर्यटकांना इंग्रजीतून मार्गदर्शन करायचे. ते तीन वेळा महाविद्यालयीन परीक्षेमध्ये नापास झाले. पुढे त्यांना अनेक कंपन्यांनी अपात्र ठरवून नोकरी दिली नाही. त्यांनी हॅंगझो नॉर्मल युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण पूर्ण केलं.

१९९८ मध्ये जॅक मा यांनी इंग्रजीमध्ये बॅचलर ऑफ आर्ट पदवी संपादन केली. आणि पुढे त्यांनी इंग्रजी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार शिकण्यास डांगझू डियान्झी विद्यापीठात प्रवेश घेतला. जॅक मा हे बौद्ध आणि ताओ या दोन धर्मांचे अनुयायी आहेत. विद्यापीठात असताना जॅक मा यांचा परिचय झांग यिंग यांच्याशी झाला. पुढे १९९८ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी त्वरित लग्न केलं. त्यांची पत्नी झांग यिंग या एका चिनी शिक्षक आहेत. सोबतच त्यांनी जॅक मा यांना त्यांच्या सुरुवातीच्या व्यवसायाच्या कामकाजात मदत केली. २००४ पर्यंत त्यात जॅक मा यांच्या कंपनीमध्ये जनरल मॅनेजर होत्या. या जोडप्याला तीन मुलं आहेत.

कारकीर्द

जॅक मा यांनी आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या अडचणींचा सामना केला आहे. अनेक वेळा अपयश स्वीकारून त्यांनी प्रत्येक संकटाला हसत तोंड दिलं त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता परंतु एकाही कंपनीने त्यांना नोकरी दिली नाही. त्यांनी पोलिसात भरती होण्यासाठी देखील अर्ज केला परंतु त्यांची शारीरिक क्षमता ठीक नसल्याचे सांगण्यात आले. ते एकदा २४ लोकांसह केएफसी मध्ये नोकरीसाठी गेले परंतु त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांची निवड करण्यात आली. एवढे अपयश सहन केल्यानंतर जॅक मा यांनी १९९४ मध्ये स्वतःची कंपनी सुरू केली. तिचे नाव होत हांगझोउ हैबो ट्रान्सलेशन एजन्सी.

१९९५ मध्ये जॅक मा आपल्या मित्रांसोबत अमेरिकेत गेले होते त्यावेळी त्यांना अमेरिकेमध्ये बियर विषयी माहिती मिळाली परंतु इतर देशांतील बियर संबंधित सर्व माहिती तिकडे होती परंतु चायना ची माहिती कुठेही इंटरनेटवरती उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांनी आपल्या मित्रांच्या साथीने चीनची संबंधित अगली वेबसाईट तयार केली. जी त्यांनी सकाळी साडेनऊच्या दरम्यान लाॅंच केली आणि पुढे दुपारी साडेबारा होईपर्यंत त्यांना वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून ईमेल येऊ लागले.

त्याच वर्षी जॅक मा यांनी आपल्या आयुष्यातील दुसरी कंपनी सुरू केली ही कंपनी त्यांनी हे येबिंग यांच्यासमवेत सुरू करून तिला चायना पेजेस असं नाव देण्यात आलं. त्यांनी चायना पेजेस डोमेन यूएस मध्ये chainapages.com म्हणून रजिस्टर केलं आणि पुढील तीन वर्षांच्या आत मध्ये या कंपनीची किंमत ८०००,००० युसडी झाली. या यशानंतर जॅक मा यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढू लागला आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या कंपन्यांसाठी वेबसाईट बनवायला सुरुवात केली.

१९९८ – १९९९ मध्ये जॅक मा हे चायना इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सेंटर या विदेश व्यापार आणि आर्थिक सहकार्य मतदाराने स्थापन केलेल्या आयटी कंपनीचे प्रमुख होते. १९९९ मध्ये जॅक मा यांनी राजीनामा दिला आणि इथूनच त्यांची अलीबाबा संस्था उदयास आली आपल्या १८ मित्रांच्या सोबतीने त्यांनी अली बाबाची स्थापना केली. १९९९ आणि २००० मध्ये अलीबाबा या त्यांच्या संस्थेने एक दोन वेळा $२५ दशलक्ष ही विदेशी गुंतवणूक जिंकली. जागतिक कॉमर्स प्रणाली मध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जॅक मा यांनी taobao, marketplace, alipay, lynx ची स्थापना केली.‌

बघता बघता ते एक यशस्वी उद्योजक म्हणून नावाजले जाऊ लागले. या व्यतिरिक्त याहू चे संस्थापक जेरी यांग यांनी taobao या कंपनीमध्ये तब्बल एक बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली. २०१४ मध्ये अलीबाबा ही कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये आयपीओ मध्ये २५ अब्ज डॉलर पेक्षा जास्त वाढला होता आणि ही जगातील सर्वात मौल्यवान तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक नावाजले जाऊ लागली. त्यांनी अलीबाबा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले.जॅक मा यांचे ऑनलाइन व्यवहार २०१२ मध्ये एक ट्रिलियन युआनपेक्षा जास्त झाला.

हुपन स्कूल या बिझनेस स्कूलची स्थापना २०१५ मध्ये जॅक मा यांनी केली. एकेकाळी त्यांना अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमधून अपात्र ठरवून नाकारण्यात आले होते आणि आज ते चायना मधील सर्वात दुसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून नावाजले जातात. जॅक मा यांनी २०१७ मध्ये कुंकू शॉट फिल्म मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आणि आपल्या अभिनयाची सुरुवात केली. ते एक यशस्वी उद्योजक असून एक समाज कार्यकर्ते देखील आहेत. २०१९ मध्ये त्यांनी आलीबाबा चे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवृत्ती दिल्ली कारण त्यांना समाज कार्य करायचे होत. पुढे 

जॅक मा यांनी शिक्षण पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य या घटकांच्या सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जॅक मा फाउंडेशन संस्था सुरू केली. २००८ मध्ये ‌सिचुआन भूकंपामुळे उध्वस्त झालं त्यावेळी अलीबाबा समूहाद्वारे $८०००,००० दान करण्यात आले. २००९ मध्ये जॅक मा यांना नेचर काॅन्झवहन्सीस् चायना प्रोग्राम चे ट्रस्टी म्हणून नेमण्यात आले.

२०१० मध्ये ते संस्थेचे संचालक बनले. होंग कोंग मध्ये होंग कोंग अशा उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीस मदत व्हावी म्हणून अलीबाबा समूहाने २०१५ मध्ये होंग कोंग यंग एंटरप्रेन्युअर्स फाउंडेशनची स्थापना केली. त्यावेळी नेपाळमध्ये भूकंप आला आणि भूकंपामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली अशा घरांच्या बांधकामासाठी अलीबाबा समूहाने नेपाळ ला निधी दान केला होता. जॅक मा यांनी २०१८ मध्ये जॅक मा फाउंडेशन ची सुरुवात केली आणि त्यांना समाज कार्य करायच आहे असे सांगून त्यांनी अलीबाबा समुहा मधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.

२०१९ मध्ये जॅक मा यांना फोर्ब्स तर्फे Malcolm s. फोर्ब्स लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला हा अवॉर्ड त्यांना चीन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्व मधील वंचित समुदाय यांना मदत केल्याबद्दल देण्यात आला. त्यांना अशियास २०१९ हिरोज ऑफ फिलांथरपी म्हणून सूचिबद्ध केलं गेलं. २०२० मध्ये covid-19 या महारोगाचा चीनमध्ये उद्रेक झाला त्या मध्ये रुग्णांना मदत पोचवण्याचं काम अलिबाबा फाउंडेशन आणि जॅक मा फाउंडेशन तर्फे करण्यात आलं.

रुग्णांना आजारामुळे त्रास कमी व्हावा म्हणून अनेक उपक्रम राबवण्यात आले शिवाय या दोन्ही फाउंडेशनने अनेक देशांना जसे की युनायटेड स्टेट्स, आशिया, आफ्रिका आणि युरोप मधील देशांमध्ये वैद्यकीय सोयीसुविधा पुरवल्या. जॅक मा यांचे सुरुवातीचे आयुष्य थोडे चढाओढी चे गेले प्रत्येक ठिकाणाहून त्यांना अपयश मिळत होतं परंतु त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवला. त्यांना स्वतःच्या बुद्धीवर विश्वास होता आणि आज ते जगातील यशस्वी उद्योजक आणि पैकी एक आहेत.

पुरस्कार

२००४ मध्ये चायना सेंटर टेलिव्हिजन तर्फे जॅक मा यांना वर्षातील १० आर्थिक व्यक्तीमत्वांपैकी एक या यादीत समाविष्ट करून घेतलं. २००५ मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जॅक मा यांची यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड केली. आशियातील पंचवीस सर्वात शक्तिशाली उद्योगपती मध्ये फॉर्च्यून २००५ मध्ये जॅक मा यांची निवड केली. बिझनेस पर्सन ऑफ द ईयर म्हणून बिझनेस विक तर्फे २००७ मध्ये जॅक मा यांची निवड करण्यात आली. बॅराॅनने २००७ साली जगातील तीस सर्वोत्कृष्ट सीईओ म्हणून जॅक मा यांचे नाव घोषित केले.

२००९ मध्ये टाईम मॅक्झिन तर्फे जगातील शंभर सर्वात शक्तिशाली व्यक्तीच्या यादीमध्ये जॅक मा यांचा समावेश केला. बिझनेस विक तर्फे चीन मधील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून जॅक मा यांची निवड केली. असे असंख्य महत्वपूर्ण पुरस्कार जॅक मा यांना प्रदान करण्यात आले आहेत त्यांना सामाजिक कार्यामध्ये योगदान दिल्याबद्दल देखील वेगवेगळे महत्वपूर्ण पुरस्कार लाभले आहेत.

आम्ही दिलेल्या jack ma biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जॅक मा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jack ma information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of jack ma in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!
%d bloggers like this: