जैवविविधता निबंध मराठी Jaiv Vividhata Chi Garaj Essay in Marathi

Jaiv Vividhata Chi Garaj Essay in Marathi – Biodiversity Essay in Marathi जैवविविधता निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये जैव विविधता ( biodiversity ) या विषयावर निबंध लिहिणार आहोत आणि या लेखामध्ये आपण जैव विविधता म्हणजे काय, जैव विविधतेचे स्थर, जैव विविधता कसे काम करते आणि जैव विविधतेची गरज का आहे या सर्व घटकांची माहिती आपण आज या लेखामध्ये निबंध मार्फत घेणार आहोत. चला तर मग आता आपण जैव विविधता गरज या विषयावर माहिती लिहुयात.

सर्व प्रथम आपण जैव विविधता म्हणजे काय हे जणू घेवूयात – जैव विविधता म्हणजे सर्व सजीवांची विविधता म्हणजेच विविध वनस्पती, प्राणी, सूक्ष्म जीव आणि त्यामध्ये असलेली अनुवांशिक माहिती आणि त्यांच्या मार्फत तयार झालेली परिसंस्था म्हणजे जैव विविधता.

किंवा

जगामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि जीवजंतूंना मिळून जैव विविधता बनते.

jaiv vividhata chi garaj essay in marathi
jaiv vividhata chi garaj essay in marathi

जैवविविधता निबंध मराठी – Jaiv Vividhata Chi Garaj Essay in Marathi

Biodiversity Essay in Marathi

जैव विविधता हि अनेक वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्म जीव यांनी बनलेली आहे आणि जितकी जैव विविधता चांगली तितकेच पर्यावरन देखील चांगले राहते म्हणजेच पर्यावरण समृध्द, सुव्यवस्थित आणि संतुलित राहण्यास मदत होते. जैव विविधता हि मानवासाठी खूप महत्वाची आहे कारण विविध वनस्पती आणि प्राणी एकत्रीत पाने मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतात. आपण जैव विविधतेची गरज समजावून घेण्यागोदर जैव विविधता काय आहे त्याचे प्रकार काय आहेत ते जाणून घेवूयात.

जैव विविधता हा परीसंस्थेच्या सेवांचा पाया आहे ज्याला मानवाच्या अबेक मुलभूत गरजा जोडलेल्या आहेत. जैव विविधतेचे काही प्रकार आहेत ते म्हणजे परिसंस्था जैव विविधता, प्रजाती विविधता आणि अनुवंशिक विविधता. अनुवंशिक विविधतेमध्ये वनस्पती, बुरशी, प्राणी आणि सूक्ष्म जीव यांच्यामध्ये असलेल्या जनुकांच्या विविधतेशी संबधित असतात तसेच प्रजाती विविधता हि वेगवेगळ्या प्रजातींचा संदर्भ देते आणि परिसंस्था विविधता म्हणजे समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधीय जंगले, उष्ण आणि थंड वाळवंट, आर्द्र प्रदेश, पर्वत, जंगल, नद्या, प्रवाळ खडक या सारख्या घटकांचा समावेश येतो.

जैव विविधता हि गरजेची का आहे आणि हि आपल्या जीवनासाठी का महत्वाची आहे, ते आपण पाहूयात. जैव विविधता हि आपल्या जीवनामधील अनेक पैलूंच्यासाठी महत्वाची आहे आणि आपण वेगवेगळ्या कारणासाठी जैव विविधतेला महत्व देतो. जैव विविधता हि मानवाला ते ते प्रधान करते जे जे मानवाच्या मुलभूत गरजांच्यामध्ये समाविष्ट आहे.

जैव विविधतेतून मानवाला अन्न, निवारा, औषधे आणि इंधन यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी मिळतात आणि ह्या मानवाला लागणाऱ्या अत्यंत महत्वाच्या गरजा आहेत ज्या शिवाय मनुष्य जगू शकत नाहीत. तसेच बियाणे विखुरणे, परिसंस्था परागकण, पाणी शुद्धीकरण, हवामान नियमन आणि कृषी कीटकांचे नियंत्रण यासारख्या गोष्टींच्यावर देखील जैव विविधतेचा चांगला परिणाम होतो. त्याचबरोबर जैव विविधतेचे सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि धार्मिक मूल्य देखील आहे.

पण आता जैव विविधतेचे नुकसान होत आहे आणि जैव विविधतेचे नुकसान याची व्याख्या आपण अशी करू शकतो कि वेगवेगळ्या प्रजाती नष्ट होणे किंवा प्रजाती नामशेष होणे. २० व्या शतकामध्ये म्हणजेच सध्या जैव विविधतेचे ( biodiversity ) नुकसान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जैव विविधतेच्या नुकसानाची करणे म्हणजे विखंडन, पाणी उत्खनन, जमिनीचे रूपांतरण आणि शोषण, हवामान बदल यामुळे जैव विविधतेचे नुकसान होते.

जरी हवामानातील बदल हा जरी हळू हळू बदलणारा घटक असला तरी हवामांच्या बदलाचा परिणाम हा जैव विविधतेतील वनस्पतींच्यावर आणि जीवांच्यावर होतो. गेल्या काही शतकामध्ये अनेक वनस्पती आणि प्राण्याचे प्रकारे काही कारणांच्या मुळे नामशेष झालेले आहेत आणि पुढे देखील अनेक वनस्पती आणि प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळे जैव विविधता धोक्यामध्ये आहे आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये देखील अनेक फरक दिसून येत आहेत.

जगामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अधुनीकरण वाढले आहे तसेच मानवाचा तंत्रज्ञानाचा कल देखील खूप वाढला आहे आणि त्यामुळे मानवाला खूप फायदे होत आहेत त्यामुळे मानव या अधुनीकरनाच आणि तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर काय वाईट परिणाम होतील ह्याचा विचार करतच नाही पण अधुनिकरणाचे अनेक वाईट परिणाम झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे हवामानामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे जैव विविधतेतील काही जीव नामशेष झाले आहेत.

मानवाने स्वच्छ पर्यावर ठेवून जैवविविधतेला प्रोत्साहन देणे खूप गरजेचे आहे कारण जैव विविधतेतील जीव जगले तर आपले पर्यावरण समृद्ध बनेल आणि मानवाच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतील. इ शिखर परिषदेमध्ये जगातील नेत्यांनी शाश्वत विकास यासाठी सर्वसमावेश धोरणावर सहमती दर्शवली होती आणि रिओ येथे स्वीकारण्यात आलेल्या महत्वाव्ह्या करारापैकी एक महत्वाचा

जैव विविधता सुरक्षित करण्यासाठी अधिवेशन देखील झाली होती १९९२ मध्ये रिओ दि जानेरा येथे पृथ्वी शिखर परिषदेमध्ये जगातील नेत्यांनी शास्वत विकार या सर्वसमावेशक धोरणासाठी सहमती दिली होती आणि रिओ येथे स्वीकारण्यात आलेल्या महत्वाच्या करारापैकी एक म्हणजे जैविक विविधतेवरील अधिवेशन. जगातील अनेक सर्कारांच्यामधील हा करार तीन मुख्य उदिष्ठ्ये प्रस्तापित करणारा होता.

ती तीन मुख्य उदिष्ठ्ये म्हणजे जैविक विविधतेचे संवर्धन, जैविक विविधतेमध्ये असणाऱ्या घटकांचा शास्वत वापर आणि अनुवंशिक संसाधनांच्या वापरातून मिळणाऱ्या फायद्याचा न्याय आणि न्याय वाटणी. २०१० मध्ये झालेल्या युरोप परिषदेमध्ये जैव विविधतेचे नुकसान थांबवण्यासाठी सहमती दर्शवली अश्या प्रकारे वेगवेगळ्या जैव विविधता टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले.

जैव विविधता विषयी काही तथ्ये (facts) 

  • सोळाव्या शतकापासून पृथ्वीवरील सुमारे ६८० पृष्ट वंशीय प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
  • जैव विविधतेतील जमिनीच्या आदिवासामध्ये राहणाऱ्या बहुसंख्या मूळ प्रजाती ह्या १९०० ते आज पर्यंत २० टक्के कमी झाल्या आहेत.
  • सध्याच्या आधुनिकीकरणा मुळे सुमारे एक दशलक्ष प्राणी आणि वनस्पती प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर येवून पोहचल्या आहेत.
  • समुद्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सागरी प्राणी असतात पण सध्या सर्व समुद्री सस्तन प्राण्यांच्यापैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त समुद्री प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत

जैव विविधता हि मानवाच्या मुलभूत गरजा भागवते तसेच चांगल्या जैव विविधतेमुळे पर्यावरण देखील खूप समृध्द राहते त्यामुळे जैव विविधता जतन करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकाच प्रजाती वाचवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अधिवास आणि परिसंस्था वाचवली पाहिजे.

आम्ही दिलेल्या jaiv vividhata chi garaj essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जैवविविधता निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay on Jaivavividhata in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि jaivvividhata essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!