जिलेबी रेसिपी मराठी Jalebi Recipe in Marathi

Jalebi Recipe in Marathi जिलेबी रेसिपी मराठी जलेबी रेसिपी जलेबी हा एक गोड पदार्थ आहे जो अनेक लोकांना आवडतो. या पदार्थाला जिलबी या नावाने देखील ओळखले जाते आणि हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिध्द आहे आणि हा पदार्थ आपण केंव्हाही बनवून खावू शकतो तसेच हा पदार्थ आमच्या घरी तसेच बहुतेक लोक स्वातंत्र्य दिनादिवशी किंवा प्रजासत्ताक दिनादिवशी आणला जातो कारण या पदार्थाला त्या दिवशी खास महत्व असते कारण हा पदार्थ गोड असल्यामुळे त्या दिवशी हा पदार्थ खावून ह्या दिवसांचा आनंद घेतला जातो. जिलेबी हा पदार्थ आपण उत्सवामध्ये, घरगुती तसेच सार्वजनिक समारंभामध्ये किंवा आपण स्वातंत्र्य दिनादिवशी किंवा प्रजासत्ताक दिनादिवशी लोक जलेबी घरी बनवतात किंवा विकत आणतात.

अनेक लोकांना असे वाटते कि जलेबी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप अवघड आहे परंतु हा पदार्थ आपण समजतो तितका अवघड नाही खरं तर हा पदार्थ घरी बनवून पाहण्यासाठी खूप सोपा. जलेबी हि रेसिपी मैदा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यामध्ये इतर साहित्य घालून ते भिजवले जाते आणि ते २ ते ३ तासांसाठी बाजूला ठेवले जाते आणि मग त्याच्या गोल जलेब्या तेलामध्ये सोडल्या जातात

आणि त्या चांगल्या तळून घेतल्या जातात आणि मग त्या साखरेच्या पाकमध्ये टाकल्या जातात. जलेबी हा पदार्थ खाताना कुरकुरीत लागतो कारण हा खूप हलका बनलेला असतो थोडा गोड देखील असतो कारण हा पदार्थ काही वेळासाठी गोड पाकामध्ये ठेवला जातो. आज आपण या लेखामध्ये जलेबी रेसिपी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

jalebi recipe in marathi
jalebi recipe in marathi

जिलेबी रेसिपी मराठी – Jalebi Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ२ ते ३ तास 
बनण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३ तास २० मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

जलेबी म्हणजे काय ?

जलेबी हि रेसिपी मैदा आणि तांदळाचे पीठ एकत्र करून त्यामध्ये इतर साहित्य घालून ते भिजवले जाते आणि ते २ ते ३ तासांसाठी बाजूला ठेवले जाते आणि मग त्याच्या गोल जलेब्या तेलामध्ये सोडल्या जातात आणि त्या चांगल्या तळून घेतल्या जातात आणि मग त्या साखरेच्या पाकमध्ये टाकल्या जातात.

जलेबी किंवा जिलबी रेसिपी – how to make jalebi in marathi

जलेबी हा एक गोड पदार्थ असून हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये लोक खूप आवडीने खातात आणि हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये तसेच देशाच्या इतर भागामध्ये खूप प्रसिध्द आहे. सगळे जरी हा पदार्थ बनवण्यासाठी खूप अवघड आहे असे म्हणत असले तरी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे म्हणूनच आज आपण जलेबी कशी बनवायची आणि ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ२ ते ३ तास 
बनण्यासाठी लागणारा वेळ २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ३ तास २० मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

जलेबी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make jalebi recipe 

जलेबी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते आणि जर घरामध्ये जलेबी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये कोणतेतरी साहित्य नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे अनु शकतो. चला तर मग पाहूयात जेल्बी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

 • २ वाटी मैदा.
 • २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ.
 • २ चमचे दही.
 • दीड चमचा बेकिंग पावडर.
 • १/२ चमचा खायचा सोडा.
 • ३ वाटी साखर.
 • १/२ चमचा वेलची पावडर.
 • पिवळा खाद्य रंग ( गरजेनुसार ).
 • तेल किंवा तूप ( तळण्यासाठी ).
 • १/२ केसर चमचा.
 • १ चमचा काजू, बदाम आणि पिस्ता तुकडे.
 • पाणी ( आवश्यकतेनुसार )

जलेबी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make jalebi recipe 

आता आपण वर दिलेले साहित्य वापरून जलेबी रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात. चला तर मग जलेबी बनवण्यासाठी केली जाणारी कृती पाहूयात.

 • सर्वप्रथम एका मिक्सिंग बाऊलमध्ये २ चमचे दही घ्या आणि मग ते चांगले फेटून घ्या आता त्यामध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. मग त्यामध्ये थोडे पाणी, अगदी थोडासा पिवळा रंग आणि तांदळाचे पीठ घाला आणि ते मिश्रण चांगले फेटून ते बॅटर सारखे बनवा आणि ते मिश्रण झाकून २ ते ३ तास बाजूला ठेवा.
 • एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये ३ वाटी साखर घालून त्यामध्ये २ वाटी पाणी घ्या.
 • आणि हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि साखर विरघळेपर्यंत ते ढवळत रहा. मग त्यामध्ये थोडी वेलची पावडर घालून ते मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
 • मग ते थोडे शिजवा म्हणजेच याचा कच्चा पाक बनवून गॅस बंद करा.
 • आता एक कढई घ्या आणि त्या कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा.
 • आता एक पांढरे कापड किंवा प्लास्टिक पिशवी घ्या आणि मग त्या पिशवीमध्ये किंवा कापडामध्ये आपण बनवून ठेवलेले पीठ घाला आणि त्याचा पोटली बांधल्यासारखा आकार बनवा.
 • आता तेल गरम झाले कि गॅस ची आच मंद करा आणि ती बॅटरची पोटली घ्या आणि आणि त्याला सुईने एक छीद्र पाडा आणि मग तेलामध्ये गोल जलेबी सोडा. अश्या प्रकारे तेलामध्ये जितक्या जलेब्या मावतील तितक्या जलेब्या सोडा आणि त्या हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
 • आता जलेब्या चांगल्या तळल्या असतील तर त्या तेलातून काढून घ्या आणि लगेच पाकामध्ये टाका. अश्या प्रकारे राहिलेल्या पिठाच्या देखील जिलेब्या बनवून त्या तळून घ्या आणि त्या पाकमध्ये घाला.
 • जिलेब्या थोड्या वेळासाठी पाकामध्ये ठेवल्या तरी चालतील त्यामुळे पाकाचा गोडपणा जीलेबीमध्ये शोषला जातो.
 • आता जिलेब्या सर्विंग प्लेटमध्ये काढून त्यावर थोडे केसर आणि काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाकून ते सर्व्ह करा.

जलेबी कशी सर्व्ह करावी – serving suggestion 

 • जलेबी आपण गरम किंवा थंड तुमच्या आवडीनुसार सर्व्ह करू शकतो
 • जिलेब्या सर्विंग प्लेटमध्ये काढून त्यावर थोडे केसर आणि काजू, बदाम आणि पिस्ताचे तुकडे टाकून ते सर्व्ह करा.
 • तसेच जलेबी आपण रबडी मध्ये घालून आपण जलेबी रबडी म्हणून सर्व्ह करू शकतो.
 • नक्की वाचा: रसमलाई रेसिपी मराठी 

जलेबी बनवण्यासाठी सांगितलेल्या काही टिप्स – tips to make jalebi recipe 

 • जलेबीचे बॅटर जास्त पातळ हि होऊ देवू नका आणि जास्त घट्ट देखील होऊ देवू नका.
 • आपण जर पाकामध्ये थोडासा लिंबू रस घातला तर पाकामध्ये परत साखर होत नाही त्याचबरोबर तुम्ही साखर न होण्यासाठी दुध देखील घातले तरी चालेल.
 • जलेब्या तळताना मंद आचेवर तळल्या तर त्याचा रंग जास्ती काळपट होत नाही.

आम्ही दिलेल्या jalebi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जिलेबी रेसिपी मराठी jilebi resepi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या recipe of jalebi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि how to make jalebi at home in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to make jalebi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!