प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती Jan Dhan Yojana Information in Marathi

jan dhan yojana information in marathi प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती आज आपण या लेखामध्ये जन धन योजना किंवा प्रधान मंत्री जन धन योजना या विषयावर माहिती घेणारा आहोत. आपल्या देशातील सरकार हे सतत लोकांच्या कल्याणासाठी आणि जनकल्याणासाठी काही ना काही योजनाची आखणी करत असते किंवा योजना राबवत असते आणि त्यामधील हि सध्याच्या काळामध्ये सुरु झालेली योजना म्हणजे जन धन योजना. जन धन योजना सुरु करण्याचा सरकारच मुख्य हेतू म्हणजे भारतामध्ये असे अनेक लोक होते ज्यांच्याकडे बँक खाते नव्हते आणि म्हणून अशा लोकांच्याकडे एकतरी बँक खाते असावे किंवा भारतातील लोकांचे सर्वांचे बँक खाते असावे आणि लोकांना बँक व्यवहार कसे चालतात हे माहित होण्यासाठी.

तसेच लोकांसाठी बँकिंग सेवा उपयोगी ठरावी, विमा संरक्षण, काही सरकारी योजना असतील त्याचा आर्थिक लाभ हा सरळ त्यांच्या खात्यावर जमा व्हावा तसेच देशातील आर्थिक व्यवहार हे सुलभ रीतीने चालावेत यासाठी सरकारने जन धन योजना सुरु केली. जन धन योजनेला आपण प्रधान मंत्री जन धन योजना या नावाने देखील ओळखू शकतो.

jan dhan yojana information in marathi
jan dhan yojana information in marathi

प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती – Jan Dhan Yojana Information in Marathi

Pantpradhan Jan Dhan Yojana Information in Marathi

प्रधान मंत्री जन धन योजना कोणी आणि केंव्हा सुरु केली ?

प्रधान मंत्री जन धन योजना हि एक बँकिंग सेवा पुरवण्यासाठी सुरु केलेली योजना आहे यामध्ये लोकांना बँकिंग विषयी सुविधा पुरवल्या जातात आणि तसेच लोकांना सरकारी योजनेतून मिळणारी आर्थिक मदत हि सरक जन धन खात्यामध्ये जमा होते. प्रधान मंत्री जन धन योजना हि आपल्या देशामध्ये २०१४ या वर्षामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी केली. हि योजना सुरु करण्याचा पाठीमागचा त्यांचा एकाच उद्देश होता कि देशातील प्रत्येक व्यक्तिला बँकिंग व्यवहाराविषयी माहिती असावी.

प्रधान मंत्री जन धन योजन काय आहे ?

 प्रधान मंत्री जन धन योजना हि एक बँकिंग सेवा पुरवण्यासाठी सुरु केलेली योजना आहे. या योजनेमध्ये ज्या लोकांचे बँक खाते नाही त्यांना बँकेमध्ये बँक खाते उघडण्यासाठी परावृत्त करणे त्याचबरोबर लोकांना बँक व्यवहारा विषयी माहिती देणे. हि योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ मध्ये सुरु केले आणि या योजनेच्या अंतर्गत भारतातील कोणतीही व्यक्ती शून्य शिल्लक खात्यावर आपले खाते उघडू शकते आणि हे जन धन खाते उघडण्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडून शुल्क आकाराला जात नाही.

प्रधान मंत्री जन धन योजनेमार्फत खाते उघडणारे भरपूर लोक होते म्हणजेच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि या योजनेमार्फत खाते उघडणाऱ्या लोकांची संख्या हि २०२१ पर्यंत ४४ कोटी इतकी होती आणि या संखेतील ५५ टक्के ह्या महिला आहेत ज्यांनी प्रधान मंत्री जन धन खाते ( PMJDY ) बँकेमध्ये उघडले आहे.

प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती – Jan Dhan Yojana Information in Marathi

योजनेचे नावप्रधान मंत्री जन धन योजना ( PMJDY )
सुरुवात१५ ऑगस्ट २०१४
कोणी सुरु केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी
किमान शिल्लकशून्य शिल्लक खाते
खाते उघडण्यासाठी आकाराला जाणारा शुल्कशून्य
व्याज दरकोणत्याही संबधित बँकेने ऑफर केलेल्या बचत खात्यावरील व्याजदरावर आधारित व्याजदर आकाराला जातो.

प्रधान मंत्री जन धन योजनेचे फायदे – benefits of pradhan mantri jan dhan yojna 

सरकार हे सतत आपल्या जनतेला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने फायदा व्हावा आणि त्यांचे जीवन सुधारित व्हावे यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते आणि अशीच हि प्रधान मंत्री जन धन योजना आहे ज्यामुळे लोकांना बँकिंग सेवा पुरवल्या जातात आणि बँकिंग व्यवहार समजून घेण्यासाठी मदत होते. चला तर आता आपण ( PMJDY ) या योजनेचे फायदे काय आहेत ते पाहूयात.

  • आपण एखाद्या बँकेमध्ये जर खाते उघडले तर आपल्याला त्या खात्यामध्ये काही रक्कम शिल्लक ठेवावी लागते पण प्रधान मंत्री जन धन योजनेमार्फत जर तुम्ही खाते उघडले तर खात्यामध्ये कोणतीही रक्कम शिल्लक ठेवली नाही तरी चालते म्हणजेच आपण या योजनेमार्फत शून्य शिल्लक खाते उघडू शकतो.
  • जन धन खाते हे २०१४ ते २०१५ यादरम्यान उघडले असेल आणि जर हे खाते उघडणारा लाभार्थी मरण पावला तर त्याला जीवन संरक्षण म्हणून ३०००० रुपये दिले जातात.
  • या योजनेमार्फत घरामध्ये एका खात्याला ५००० पर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा पुरवली जाते.
  • कोणत्याही संबधित बँकेने ऑफर केलेल्या बचत खात्यावरील व्याजदरावर आधारित व्याजदर आकाराला जातो.
  • काही सरकारी योजना असतील त्याचा आर्थिक लाभ हा सरळ त्यांच्या खात्यावर जमा होतो.
  • आपण या योजने अंतर्गत उघडलेल्या खात्यामार्फत मोबाईल बँकिंग वापरून शिल्लक तपासू शकतो त्याच बरोबर रुपे मार्फत संबधित व्यक्तीला १ लाखापर्यंत अपघाती विमा मिळू शकतो.
  • या योजने मार्फत सरकारला निधी भारतामध्ये कोठेही हस्तांतरित करणे सोपे झाले कारण हा निधी सरळ लाभार्थीच्या खात्यावर जमा होतो.

प्रधान मंत्री जन धन योजनेमार्फत खाते कसे उघडायचे आणि पात्रता – how to open pradhan mantri jan dhan yojna account 

प्रधान मंत्री जन धन योजनेमार्फत खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम PMJD योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागते आणि त्याचा अॅड्रेस https://www.pmjdy.gov.in/scheme या वेबसाईट वर जावून तेथून आपण अर्ज प्राप्त करू शकतो आणि हा अर्ज इंग्रजी किंवा हिंदीमध्ये असतो. तुम्हाला ज्या भाषेमध्ये हा अराज भरायचं आहे त्या भाषे तुम्ही हा र्ज भरू शकता. या वेबसाईट मार्फत तुम्ही अर्ज भरू शकत तसेच आवश्यक ती कागदपत्रे देखील सबमिट करू शकता.

प्रधान मंत्री जन धन योजना खाते उघण्यासाठीची पात्रता – eligibility 

  • प्रधान मंत्री जन धन योजने मार्फत जर एखाद्या व्यक्तीला खाते उघडायचे असेल तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे म्हणजेच भारतातील लोक या योजनेच लाभ घेवू शकतात.
  • आपण जरी या योजनेमार्फत खाते उघडून त्यामध्ये काहीच रक्कम शिल्लक ठेवली नसेल कारण आपण या योजने मार्फत शून्य शिल्लक खाते उघडू शकतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीला या खात्या अंतर्गत चेकबुक सुविधा पाहिजे असेल तर आपल्याला या खात्यामध्ये रक्कम ठेवणे गरजेचे असते.
  • PMJDY या योजनेमार्फत जर एखाद्या व्यक्तीला खाते उघडायचे असेल तर ती व्यक्ती १० वर्षापुढील असावी म्हणजेच १० वर्षाच्या आतील मुलांच्यासाठी जन धन हे खाते नाही तर १० वर्षावरील व्यक्ती या योजनेचा लाभाराठी बनू शकतो.
  • या योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी संबधित बँकेत खाते नसावे.

प्रधान मंत्री जन धन योजना खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे – documents needed to open PMJDY Account 

आपण कोणत्याही बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाते उघडण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे लागतात आणि हि कागदपत्रे आपण बँक खाते उघडण्यासाठी बँकेमध्ये सबमिट देखील करतो अश्याच प्रकारे आपल्याला प्रधान मंत्री जन धन योजना खाते उघडण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे लागतात ती आता आपण पाहूयात. जन धन खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे खाली दिली आहेत.

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कार्ड.
  • पासपोर्ट ( असल्यास ).
  • वाहन चालवण्याचा परवाना ( driving licence ).
  • फोटो असलेले ओळखपत्र.
  • मतदान ओळख पत्र ( votting card ).

अश्या प्रकारे प्रधान मंत्री जन धन योजना हि एक सरकारने सुरु केलेली योजना आहे जी ज्या लोकांना उपयुक्त ठरते ज्यांना बँकिंग व्यवहार कसे करायचे माहित नाही तसेच ज्यांना सरकार कडून आर्थिक लाभ मिळतात हे सरळ लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होतात आणि म्हणूनच योजना एक उपयुक्त योजना ठरली आहे.

आम्ही दिलेल्या jan dhan yojana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर प्रधानमंत्री जन धन योजना मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या pantpradhan jan dhan yojana information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि pradhan mantri jan dhan yojana information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!