Jinji Fort Information in Marathi (Gingee Fort) जिंजी किल्ला हा तामिळनाडू राज्यातील विलुपुरम जिल्ह्यात चेन्नई पासून १६० किलो मीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. जिंजी या किल्ला दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचा आणि सामर्थ्यवान किल्ला आहे जो मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. हा किल्ला रायगड आणि राजगड नंतर मराठ्यांची राजधानी असलेला मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला होता. या किल्ल्याला मध्ययुगीन युरोपियन प्रवाश्यांनी या किल्ल्याला पूर्वेकडील ट्रॉय असे नाव दिले होते तसेच या किल्ल्यला तेथील स्थानिक लोक सेनजी असे देखील म्हणत होते.
या किल्ल्याला जिंजी किवा सेनजी असे नाव तेथे असणाऱ्या सेनजीअम्मन देवीच्या मादिरावरून पडले आहे. असे म्हणतात कि हा किल्ला १३ व्या शतकामध्ये चोळ राजकर्त्यांनी बांधला आणि त्यानंतर हा किल्ला विजयनगरच्या राजकर्त्यांच्या हाती गेला त्यावेळी त्यांनी हा एक अभेद्य किल्ला बनवला.

जिंजीचा किल्ला माहिती मराठी – Jinji Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | जिंजी किल्ला (Gingee Fort) |
प्रकार | टेकडी किल्ला |
ठिकाण | तामिळनाडू राज्यातील विलुपुरम जिल्ह्यामध्ये हा किल्ला कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रयानदुर्ग या तीन टेकड्यांवर वसलेला आहे. |
स्थापना | १३ व्या शतकामध्ये |
संस्थापक | चोळ वंशाच्या काळामध्ये |
उंची | ८०० फुट उंचीवर बांधलेला आहे |
जिंजी किल्ला हा तामिळनाडू राज्यातील विलुपुरम जिल्ह्यात चेन्नई पासून १६० किलो मीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. जिंजी हा किल्ला पूर्वी १३ व्या शतकामध्ये चोळ राजकर्त्यांनी बांधला होता त्यानंत या किल्ल्यावर विजयानगरच्या राजकर्त्यांनी ताबा मिळवला आणि या किल्ल्याचे रुपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये केले. हा किल्ला कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रयानदुर्ग या तीन टेकड्यांवर हा अभेद्य किल्ला विस्तारलेला आहे. या किल्ल्याला तिहेरी त्रीकोनाकृती तटबंदी आहे त्यामुळे या किल्ल्यावर आक्रमण करणे त्या काळी सोपे नव्हते. जिंजी हा किल्ला १३ किलो मीटर क्षेत्रामध्ये पसलेला असून जिंजी किल्ला ८०० फुट उंचीवर आहे.
- नक्की वाचा: माहुर गडाची माहिती
हा किल्ला पांडिचेरी पासून ५५ ते ६० किलो मीटर अनातारावर आहे. या किल्ल्यामध्ये आपल्याला मंदिरे, तोफा, कैद्यांच्या विहिरी, कोठारे आणि कल्यान महल यासारखे अनेक प्राचीन अवशेष पाहायला मिळतात.
जिंजी किल्ल्याचा इतिहास – Jinji Fort History in Marathi
जिंजी हा किल्ला सुमारे १२०० वर्ष जुना आहे असे काही इतिहासकार सांगतात. एकेकाळी मेंढपाळ समुदयातील आनंद कोन यांनी ज्यावेळी आपले मेंढरे चरण्यासाठी सोडली होती त्यावेळी ती मेंढरे चुकून चरत चरत पश्चिम डोंगरावरील एका गुहेमध्ये गेली होती आणि त्यावेळी आनंद कोन हे त्या मेढरांना बाहेर उसकलवून लावण्यासाठी त्या गुहेमध्ये गेले होते त्यावेळी त्यांना त्या गुहेमध्ये एक खजिना सापडला होता. त्यांनी त्यावेळी एक छोटी सैन्याची फौज उभा करून तेथील शेजारी असणाऱ्या एका छोट्या राजकर्त्याचा पराभव करून तो परिसर आपल्या ताब्यात घेतला कमलगिरी वर एक छोटासा किल्ला बांधला आणि त्याने या किल्ल्याचे नाव आनंदगिरी असे ठेवले.
इ. स. ११९० ते इ. स. १३३० मध्ये कोनार राजवंशाने जिंजी या किल्ल्यावर राज्य केले. त्यानंतर ह्या किल्ल्यावर चोळ वंशाने ताबा मिळवला आणि तेथील कोनार वंशाने बांधलेला किल्ला पडून तेथे किल्ल्याचे नवीन बांधकाम केले. त्यानंतर हा किल्ला विजयनगरच्या राजांच्या कडे गेला आणि त्यांनी या किल्ल्याचे भव्य आणि अभेद्य अश्या किल्ल्यामध्ये रुपांतर केले. जिंजी हा किल्ला इ. स. १६७७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यांनी देखील या किल्ल्यावर अनेक बांधकामे केली.
- नक्की वाचा: नळदुर्ग किल्ल्याची माहिती
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम ज्यावेळी जिंजी किल्ल्यावर होते त्यावेळी औरंगजेबाने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न केले होते पण त्याला सलग ७ वर्ष हा किल्ला आपल्या ताब्यात घेता आला नाही. १६९८ मध्ये हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला आणि नंतर हा किल्ला कर्नाटकातील नवाबांना देण्यात आला पण इ. स. १७५० फ्रेंच लोकांनी नवाबांचा पराभव करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि शेवटी हा किल्ला इ. स. १७६१ मध्ये इंग्रजांच्या कडे गेला.
जिंजी किल्ला मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी कशी बनली ?
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी हा किल्ला इ. स. १६७७ मध्ये दक्षिण दिग्विजय मोहीमेमध्ये आपल्याला ताब्यात घेतला. जिंजी हा किल्ला राजगड आणि रायगड यानंतर स्वराज्याची तिसरी राजधानी होते आणि हे खूप जणांना माहित नाही. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा मूत्यू झाला त्यानंतर औरंजेबाच्या सैनिकांनी म्हणजेच मोगलांनी रायगड किल्ल्याला वेढा घातला.
त्यावेळी राजाराम महाराजांनी तेथून ५ एप्रिल १६८९ मध्ये रायगडावरून सुटून मोगलांच्या सैनिकांना कशी बशी हुलकवनी देत ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जिंजी या किल्ल्यावर पोहचले आणि त्यावेळी राजाराम महाराजांनी या किल्ल्याला आपली राजधानी बनवून तेथून पुढील ९ वर्ष मराठा साम्राज्याचा राजकारभार हाताळला.
जिंजी किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
कृष्णगिरी किल्ला :
आपण ज्यावेळी मुख्य किल्ल्यावर चढताना उत्तरेला आपल्यला कृष्णगिरी किल्ला पाहायला मिळतो जेथे राणी राहत होती हा किल्ला कृष्णगिरी टेकडीवर आहे म्हणून याला कृष्णगिरी असे नाव पडले आहे. जिंजीच्या किल्ल्यावर ज्यावेळी इंग्रजांचे राज्य होते त्यावेळी कृष्णगिरी किल्ल्यावर इंग्रज लोक राहत होते म्हणून त्याला इंग्रज किल्ला देखील म्हंटले जाते.
- आपल्याला या किल्ल्यावर सुदर घुमट असलेली एक सुंदर दरबाराची इमारत पाहायला मिळेल.
- या किल्ल्यावर एक कृष्ण मंदिर देखील आहे.
सभागृह :
क्रीश्नामंदिराहून थोडे खाली आल्यानंतर एक सभागृह लागते ज्याच्या स्टेजला खाली हत्ती, वानर या सारखे नक्षीकाम केलेले पाहायला मिळेल.
- त्याचबरोबर आपल्याला राजगिरीच्या किल्ल्यामध्ये रंगनाथाचे मंदिर, घुमटाकार छत असलेली कोठारे आणि दारूखाना पाहायला मिळतो.
सेन्जी देवीचे मंदिर :
सेन्जी देवीचे मंदिर हे राजगिरीच्या किल्ल्यामध्ये आहे आणि या किल्ल्याचे जिंजी किवा सेनजी असे नाव या देवी वरूनच पडले आहे. तिचे मंदिर देखील आपल्याला जिंजी किल्ल्यावर पाहायला मिळते.
जिंजीचा किल्ला फोटो:

जिंजी किल्ल्यावर कसे जायचे ?
- जिंजी या किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे किल्ल्यापासून १६० किलो मीटर चेन्नई या शहरामध्ये आहे. आपण कोणत्याही मुख्य शहरातून विमान पकडून चेन्नई ला येवू शकतो आणि तेथून विलुपुरम ला जाण्यासाठी बस किवा कॅब घेवू शकता किल्ल्यापर्यंत देखील तुम्हाला कॅब मिळू शकेल.
- हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला रेल्वेंने यायचे असल्यास विलुपुरम येथे किल्ल्याजवळील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. तुम्ही रेल्वेने विलुपुरम ला येवून तेथून बस किवा टक्सीने किल्ल्यापर्यंत जावू शकता.
प्रवेश शुल्क : या किल्ल्यामध्ये भारतीय पर्यटकांच्याकडून १५ रुपये प्रवेश शुल्क आकाराला जातो आणि विदेशी पर्यटकांच्या कडून १०० रुपये प्रवेश शुल्क आकाराला जातो.
वेळ : जिंजी हा किल्ला सकाळी ९ ते संध्याकाळी ४.३० पर्यंत पर्यटकांच्यासाठी खुला असतो.
किल्ला पाहण्यासाठी लागणारा वेळ : जिंजी हा किल्ला पाहण्यासाठी १ ते २ तास लागतात.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, जिंजीचा किल्ला jinji fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. jinji fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about jinji fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जिंजीचा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या jinji killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
किल्ल्याची खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !!!
अशाच नवीन माहितीसाठी पुन्हा भेट देत रहा