जीवधन किल्ला इतिहास मराठी Jivdhan Fort History in Marathi

jivdhan fort history in marathi – jivdhan fort information in marathi जीवधन किल्ला इतिहास मराठी, जीवधन किल्ला माहिती, भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत आणि त्या किल्ल्यांना रोमांचक असा इतिहास आहे आणि महाराष्ट्रातील जीवधन हा देखील एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि आज आपण या लेखामध्ये जीवधन या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जीवधन हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घाटघरच्या परिसरामध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला ३७५४ फुट उंचीवर वसलेला आहे आणि हा गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे आणि हा किल्ला ६५ एकर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे.

जरी या किल्ल्याच्या स्थापनेबद्दल आणि निर्मितीविषयी काही माहिती नसली तरी या किल्ल्याची निर्मिती सातवाहनांच्या काळामध्ये झाली असावी असे म्हटले जाते आणि हा किल्ला नाणे घाटाच्या परिसरामध्ये म्हणजेच नाणे घाट पासून खूप जवळ आहे.

आणि असे देखील म्हटले जाते कि या किल्ल्याचे बांधकाम हे नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केले होते आणि या किल्ल्यावरून या व्यापारी मार्गाचे संरक्षण केले जाते होते. चला तर खाली आपण जीवधन किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेवूया.

jivdhan fort history in marathi
jivdhan fort history in marathi

जीवधन किल्ला इतिहास मराठी – Jivdhan Fort History in Marathi

किल्ल्याचे नावजीवधन किल्ला
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घाटघर परिसरामध्ये वसलेला आहे
प्रकारगिरिदुर्ग
उंचीसमुद्रसपाटीपासून ३७५४ फुट
क्षेत्रफळ६५ एकर
पाहण्यासारखी ठिकाणेजिवाईदेवीचे मंदिर, ऐतिहासिक पाण्याचे टाके आणि समाधी
चढाईची श्रेणीकठीण
ट्रेकर्सअनुभवी ट्रेकर्ससाठी उत्तम

जीवधन किल्ला मराठी माहिती – information about jivdhan fort in marathi

जीवधन हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घाटघर परिसरामध्ये वसलेला आहे आणि या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव हे घाटघर आहे आणि या गावातून किल्ल्याची चढाई ट्रेकर्स सुरु करू शकतात. जीवधन हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३७५४ फुट उंच आहे आणि या किल्ल्याचा परिसर ६५ एकर इतका आहे.

या किल्ल्याची निर्मिती सातवाहनांच्या काळामध्ये झाला होता आणि हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची निर्मिती नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. किल्ल्यावर चढाई करत असताना आपल्याला जुन्या काळातील चौकोनी पाण्याचे टाके दिसतात आणि काही ठिकाणी ५ टाक्यांचा समूह आहे तर काही ठिकाणी दोन टाक्यांचा समूह आहे.

त्याचबरोबर आपल्याला किल्ल्यावर जिवाईदेवीचे मंदिर पाहायला मिळते आणि मंदिराच्या मागे दोन समाधी देखील आहेत. या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य दरवाजे आहेत आणि त्यामधील एक म्हणजे कल्याण दरवाजा जो नाणेघाटावर जातो आणि दुसरा म्हणजे जुन्नर दरवाजा जो घाटघर गावातून जातो.

किल्ला हा वरून पहिल्या आयताकृती आकाराचा आहे आणि किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला नाणेघाट, हरिश्चंद्र गड, निमगिरी किल्ला, कुकडेश्वर किल्ला, माळशेज घाटातील रस्ता, रतनगड आणि हडसर किल्ला या सारख्या सुंदर परिसराची दृश्ये आपल्याला पाहायला मिळतात.

जीवधन किल्ल्यावर जाणारे मार्ग

जीवधन या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मुख्य दरवाजे आहेत आणि ते म्हणजे कळल्यान दरवाजा आणि जुन्नर दरवाजा.

  • कल्याण दरवाजा : कल्याण दरवाजा हा नाणे घाटाच्या बाजूला आहे आणि येथून नानेघाटावर जाण्यासाठी वाट आहे.
  • जुन्नर दरवाजा : बहुतेक किल्ला प्रेमी हे या मार्गाचा उपयोग करतात आणि जुन्नर दरवाजा हा घाटघर गावातून किल्ला चढल्यानंतर लागतो म्हणजेच हा मार्ग घाटघर या गावातून जातो.

जीवधन किल्ल्याचा इतिहास – history

जीवधन हा किल्ला केंव्हा निर्माण झाला या बद्दल काही ठोस पुरावे नाहीत परंतु असे म्हटले जाते कि जीवधन हा किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला असावा आणि या किल्ल्याच्या निर्मितीचा हेतू हा नाणेघाटावरील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तयार केला होता.

ज्यावेळी भारतामध्ये इंग्रज आले आणि त्यावेळी त्यांनी भारतातील तसेच महाराष्ट्र राज्यातील देखील अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले आणि त्यावेळी त्यांनी जीवधन हा किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला आणि ज्यावेळी १८१८ मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यावेळी या किल्ल्यावर चढण्यासाठी बनवलेल्या पायऱ्या ठिकठिकाणी सुरुंग लाऊन तोडला आणि आज देखील आपण जर या किल्ल्यावर गेलो तर आपल्याला या सुरुंग खुणा दिसतात.

जीवधन किल्ल्याविषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts

  • जीवधन हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील घाटघरच्या परिसरामध्ये वसलेला आहे.
  • १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्यावेळी या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.
  • या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ हे ६५ एकर इतके आहे आणि हा किल्ला ३७५४ फुट उंचीवर आहे.
  • जीवधन या किल्ल्यावरून आपल्याला नाणेघाट, हरिश्चंद्र गड, निमगिरी किल्ला, कुकडेश्वर किल्ला, माळशेज घाटातील रस्ता, रतनगड आणि हडसर किल्ला या सारखा परिसर दिसतो.
  • जरी या किल्ल्याच्या निर्मितीविषयी इतिहासामध्ये काही ठोस पुरावा नसला तरी हा किल्ला सातवाहनांच्या काळामध्ये बांधला असावा असे म्हटले जाते.
  • जीवधन या किल्ल्याला भेट देण्याचे उत्तम वेळी हि पावसाळा आणि हिंवाळा आहे.

जीवधन किल्ल्याची ट्रेक आणि अडचणीची वाट

जीवधन हा किल्ला ट्रेक करण्यासाठी एक रोमांचक किल्ला जरी असला तरी या किल्ल्याचा ट्रेक करणे खूप कठीण आहे आणि ह्या किल्ल्याचा ट्रेक हा अनुभवी ट्रेकर्सनेच करावा कारण या किल्ल्यावर चढताना अनेक अवघड आणि तांत्रिक असे दगडांचे पॅच आहेत. या किल्ल्याच्या पायथ्याचा मार्गापासून ते वरच्या ठिकाणापर्यंतचे अंतर हे १० किलो मीटर इतके आहे आणि आणि संपूर्ण ट्रेक पूर्ण करण्यासाठी ७ ते ८ तास लागू शकतात.

कसे पोहचायचे – how to reach

जर तुम्हाला जीवधन या किल्ल्याला भेट द्यायची असल्यास तुम्ही प्रथम बसने, रेल्वेने किंवा ट्रेनने पुणे या शहरामध्ये या आणि पुणे या शहरापासून जीवधन हा किल्ला १२३ किलो मीटर अंतरावर आहे किंवा तुम्ही पुणे या शहरातून जुन्नर या शहरामध्ये देखील जावू शकता आणि तेथून घाटघर हे गाव २५ किलो मीटर अंतरावर आहे.

आणि घाटघर या गावामध्ये गेल्यानंतर तेथून ५ ते ६ किलो मीटर आहे. जर तुम्ही जुन्नर – घाटघर या मार्गाने स्वातीची कार घेऊन गेल्यास तुम्ही थेट गडाच्या पायथ्याशी जावू शकता आणि मग तेथून तुम्ही किल्ल्याची चढाई करू शकता.

आम्ही दिलेल्या jivdhan fort history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर जीवधन किल्ला इतिहास मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jivdhan fort information in marathi या jivdhan fort naming history in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about jivdhan fort in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!