Kabaddi Information in Marathi कबड्डी चार हजार वर्षापसून भारतामध्ये खेळला जाणारा एकदम जुना खेळ म्हणजे कबड्डी होय. काही लोक असे म्हणतात कि या खेळाची सुरुवात महाभारतातील अभिमन्युने केली. पूर्वीच्या काळामध्ये हा खेळ खेडेगावांमध्ये मनोरंजनासाठी हा खेळ खेळला जायचा पण आता हा खेळ पूर्ण भारतभर खेळला जातो आणि या खेळाच्या राज्यस्तरीय आणि प्रो कबड्डी नावाच्या स्पर्धा हि आयोजित केल्या जातात. हा खेळ खेळण्यासाठी सपाट मैदान लागते आणि या खेळाचे मैदान बनवताना शक्यतो लाल मातीचा उपयोग केला जातो. पूर्वीच्या काळात हा खेळ रिकाम्या वेळी एक मनोरंजन म्हणून खेळला जायचा त्यामुळे हा खेळ खेळण्यासाठी नियम न्हवते पण आत्ताच्या जगामध्ये ह्या खेळला स्पर्धेचे स्वरूप आल्यामुळे या खेळासाठी वेगवेगळे नियम लागू केले आहेत. हा खेळ स्त्रिया आणि पुरुष दोघेही खेळू शकतात.

कबड्डी खेळाची माहिती – Kabaddi Information in Marathi
कबड्डी खेळाविषयी माहिती – Kabaddi in Marathi
भारतीय नाव | कबड्डी |
एकूण खेळाडू? | १२ खेळाडू |
पुरुषांकरिता असणारा वेळ? | ४० मिनिटांचा असतो |
महिलांसाठी असणारा वेळ? | ३० मिनिटांचा असतो |
रेड टाकणे म्हणजे काय? | एक खेळाडू विरुध्द संघाच्या भागात ( कोर्ट ) जावून विरुध्द खेळाडूला स्पर्श करून आपल्या भागात येतो त्याला रेड टाकणे म्हणतात |
रेड टाकणाऱ्या खेळाडूला काय म्हणतात? | रेडर |
डिफेंड करणे म्हणजे काय? | डीफेंडरचे काम असते रेडर ला आपल्या भागात पकडून ठेवणे किवा मध्य रेषेला स्पर्श न करू देणे आणि रेडरला राखीव जागेत ढकलणे त्यामुळे तो खेळाडू बाद होईल |
डिफेंड टाकणाऱ्या खेळाडूला काय म्हणतात? | डिफेंडर |
मैदानाचा आकार | पुरुषांसाठी – १२.५० मीटर बाय १० मीटर महिलांसाठी – ११ मीटर बाय ८ मीटर |
कबड्डी खेळाचा इतिहास – History
कबड्डी हा खेळ खूप प्राचीन काळापासून म्हणजेच ४००० वर्षापासून खेळला जातो. या खेळाची सुरुवात भारतामध्ये झाली. हा खेळ भारतामध्ये महाभारतातील श्री कृष्णाने तसेच अभिमन्यूने खेळला होता असे म्हंटले जाते त्याचबरोबर असेही म्हंटले जाते कि पूर्वीच्या काळी राजकुमारींसमोर आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी राजकुमार हा खेळ खेळत होते. महाभारत काळापासून कबड्डी या खेळाला भारतामध्ये महत्वाचे स्थान आहे. कब्बडी हा खेळ १९३६ मध्ये बर्लिन ऑल्म्पिकमध्ये समावेश झाला मग त्यानंतर या खेळाचा समावेश भारतामध्ये राष्ट्रीय खेळात झाला ( कलकत्ता येथे झालेला राष्ट्रीय खेळ ). भारतामध्ये ऑल इंडिया कबड्डी फेडरेशन स्थापना १९५० मध्ये झाली. अश्या प्रकारे या खेळाची सुरुवात झाली आणि पहिला राष्ट्रीय खेळ चेन्नई मध्ये झाला.
- नक्की वाचा: क्रिकेट खेळाची माहिती
कबड्डी ग्राउंड – Kabaddi Ground information in Marathi
कबड्डी खेळाचे मैदान आयताकृती आकाराचे असते आणि हे सपाट जमिनीवर लाल माती वापरून बनवलेले असते. हा खेळ स्त्रिया आणि पुरुष दोघेही खेळू शकत असल्यामुळे. पुरुषांकरिता १२.५० मीटर बाय १० मीटर असते आणि स्त्रियांकरिता ११ मीटर बाय ८ मीटर. या मैदानाच्या बरोबर मध्य भागी एक रेष आखलेली असते ज्यामुळे मैदान दोन भागामध्ये विभागले जाते आणि त्या रेषेला मध्य रेषा म्हणतात. त्यानंतर थोडे अंतर सोडून निदान रेषा मग त्यानंतर असते बोनस रेषा आणि मग शेवट अंतिम रेषा असतात. मैदानाच्या दोन्ही बाजूला जी थोडीसी जागा शिल्लक असते त्याला राखीव क्षेत्र म्हणतात आणि अंतिम रेषेच्या बाहेर बाद खेळाडूंसाठीची जागा असते.
- नक्की वाचा: लंगडी खेळाची माहिती
तमिळ ‘काई पीडी’ या शब्दापासून कबड्डी हा शब्द आला आहे. कबड्डी या खेळला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
राज्य | नाव |
महाराष्ट्र | कबड्डी, हुतूतू |
कर्नाटका | हुतूतू |
आंध्रप्रदेश | चेडूगुडू |
चेन्नई | चेडूयुडू |
बंगाल | हुडूडू, हद्दू |
केरळ | वंडीवडी |
तामिळनाडू | चादुकट्टु |
पंजाब | सौची पक्की, कुड्डी, झाबर गंगा, |
उत्तर भारतात | साबरगन्ना, कोनवरा |
मालद्विप | भवातिक |
कबड्डी नियम ( rules )
- या खेळामध्ये १२ खेळाडू असतात आणि त्यामधील ७ खेळाडू मैदानामध्ये खेळतात आणि राहिलेले राखीव असतात.
- हा खेळ पुरुषांसाठी ४० मिनिटासाठी खेळला जातो त्यामध्ये २०-२० मिनिटाचे २ सत्र असतात आणि महिलांसाठी हा खेळ ३० मिनिटाचा असतो आणि त्यामध्ये १५-१५ मिनिटाचे २ सत्र असतात.
- खेळताना कबड्डी कबड्डी म्हणणे आवश्यक असते.
- ज्यामध्ये एक खेळाडू विरुध्द संघाच्या भागात ( कोर्ट ) जावून स्पर्श करून आपल्या भागात येणे.
- एक खेळाडू विरुध्द संघाच्या भागात ( कोर्ट ) जावून विरुध्द खेळाडूला स्पर्श करून आपल्या भागात येतो त्याला रेड टाकणे म्हणतात आणि त्या खेळाडूला रेडर म्हणतात.
- रेडर खेळाडूला जे हाताळतात त्यांना डीफेंडर म्हणतात.
- जेव्हा एखाद्या संघातील सगळे खेळाडू आऊट झाले तर विरोधी संघाला २ गुण मिळतात.
- डीफेंडर संघाने रेडरला पकडले तर त्या संघाला २ गुण मिळतात.
- रेडरची रेड व्यर्थ गेली तर डीफेंडर संघाला १ गुण मिळतो.
- डीफेंडरचे काम असते रेडर ला आपल्या भागात पकडून ठेवणे किवा मध्य रेषेला स्पर्श न करू देणे आणि रेडरला राखीव जागेत ढकलणे त्यामुळे तो खेळाडू बाद होईल आणि डीफेंडर संघाला गुण मिळतील.
- जर रेडरणे डीफेंडर संघातील २ किवा त्यापेक्षा जास्त खेळाडूंना स्पर्श केले तर डीफेंडर संघातील खेळाडू बाद होतात व रेडर च्या संघाला गुण मिळतात.
- रेडर ची एक रेड टाकायची वेळ ३० सेकंद असते.
कबड्डी खेळाच्या अंतरराष्ट्रीय स्पर्धा ( international competition )
प्रो कबड्डी लीग किवा स्पर्धा
प्रो कबड्डी लीग या स्पर्धेची सुरुवात २६ जुलै २०१४ मध्ये सुरु झाली आणि हा लीग दरवर्षी आयोजित केला जातो. या खेळामध्ये भारतातील तसेच वेगवेगळ्या देशातील खेळाडू सहभागी होतात.
कबड्डी विश्वचषक
दोन वेगवेगळ्या आयोजकांनी दोन वेगवेगळ्या प्रकारचे कबड्डी विश्वचषक आयोजित केले होते त्यामध्ये भारताचा संघ विजयी झाला होता.
विश्व कबड्डी लीग
विश्व कबड्डी लीग हा ऑगस्ट ते डिसेंबर या काळामध्ये खेळला जातो. यामध्ये बॉलीवूड कलाकार संघ खरेदी करतात.
- नक्की वाचा: बुद्धिबळ खेळाची माहिती
कबड्डी खेळाचे प्रकार ( types of kabaddi game )
कबड्डी खेळाचे प्रामुख्याने ४ प्रकार आहेत ते म्हणजे अमर कबड्डी, पंजाबी कबड्डी, जेमिनी कबड्डी आणि संजीवनी कबड्डी.
अमर कबड्डी
अमर कबड्डी हि संजीवनी स्वरूपाच्या नियामासारखी साम्य आहे. घोषित केलेला खेळाडू कोर्ट सोडत नाही त्याऐवजी तो कोर्टामधेच खेळत राहतो आणि विरोधी संघातील एक एक खेळाडूला आऊट करतो आणि गुण मिळवतो . या खेळामध्ये कोणतीही मर्यादा नाही आणि या प्रकारामध्ये खेळाडू बाद झाल्यानंतरहि खेळतो.
संजीवनी कबड्डी
संजीवनी कबड्डीमध्ये बाद झालेल्या खेळाडूला परत खेळण्याची संधी मिळू शकते. संजीवनी कबड्डी हा खेळ भारतामध्ये खेळला जाणारा सामान्य खेळ आहे आणि हा खेळ ४० मिनिटाचा असतो आणि त्यामध्ये पाच मिनिटाचा ब्रेक असतो त्याच बरोबर या खेळामध्ये १२ खेळाडू असतात त्यामधील ७ खेळाडू मैदानमध्ये खेळत असतात आणि राहिलेले राखीव खेळाडू असतात.
जेमिनी कबड्डी
या प्रकारच्या कबड्डी खेळामध्ये एकदा खेळाडू मैदानातून बाहेर पडले तर ते खेळामध्ये परत येवू शकत नाहीत म्हणजेच त्याच्या संघातील सर्व खेळाडू बाहेर येवूतोपर्यंत हे या खेळामध्ये परत खेळू शकत नाहीत.
पंजाबी कबड्डी
पंजाबी कबड्डी गोलाकार स्वरुपात खेळली जाते. हा खेळ २२ मीटर व्यासाच्या गोलाकार खेळपट्टीवर खेळला जातो.
परदीप नरवाल
परदीप नरवाल याला भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा दुबकी किंग म्हणून ओळखले जाते. हा प्रो कबड्डी मधील उच्च प्रतीचा रेडर म्हणून ओळखले जे आणि हा प्रो कबड्डी मध्ये ९०० गुण मिळवणार पहिला खेळाडू आहे. या खेळाडूने चार सुर्वर्ण पदक जिंकले आहेत.
राहुल चौधरी
राहुल चौधरी याला रेड मशीन किवा शोमन या नावांनी ओळखले जाते. हा कबड्डी लीगमधील सर्वात यशस्वी रेडर मधील एक आहे. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा सदस्य आहे त्याचबरोबर या खेळाडूने विश्वचषक देखील खेळला आहे.
दीपक हुडा
या खेळाडूचे नाव दीपक राम हुडा असे आहे आणि हा भारतीय व्यावसायिक कबड्डीपट्टू आणि भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार आहे. हा खेळाडू प्रो कबड्डी मध्ये पुणेरी पलटणकडून खेळतो.
संदीप नरवाल
संदीप नरवाल हा हरियाणाच्या सोनीपत मधील भारतीय कबड्डीपट्टू आहे. हा २०१६ च्या विश्वचषकात भारतीय राष्ट्रीय कबड्डी संघाकडून खेळला त्याचबरोबर हा प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण कडून खेळतो.
रीशांक देवडीगा
रीशांक देवडीगा हा एक भारतीय कबड्डीपपट्टू आहे जो व्हीआयव्हीओ प्रो कबड्डी मध्ये खेळतो. हा सर्वोत्तम रेडर्स च्या लिस्ट मध्ये आहे. रीशांक देवडीगा हा दुबई मध्ये कबड्डी जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता.
कब्बडी खेळाविषयी तथ्ये ( facts about kabaddi game )
- कबड्डी हा हा खेळ बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे.
- प्रो कबड्डी लीग ची स्थापना २६ जुलै २०१४ मध्ये झाली.
- पहिला महिला विश्वचषक खेळ २०१२ मध्ये खेळला गेला.
- कबड्डी या खेळामध्ये पाच मिनिटाचा ब्रेक टाईम असतो.
- कबड्डी खेळामध्ये २ गट असतात.
- या खेळामध्ये महिलांसाठी वेगळे मैदान असते आणि पुरुषांसाठी वेगळे मैदान असते.
- पुरुषांसाठी ४० मिनिटाचा एक सामना असतो आणि महिलांसाठी ३० मिनिटाचा एक सामना असतो.
आम्ही दिलेल्या kabaddi information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर कबड्डी या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about kabaddi game in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि kabaddi information marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू kabaddi chi mahiti नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट