कडकनाथ कोंबडी माहिती Kadaknath Kombadi Information in Marathi

kadaknath kombadi information in marathi कडकनाथ कोंबडी माहिती, सध्या कोंबड्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार हे कुक्कुटपालन पध्दती मध्ये पाळले जातात आणि कोंबड्यांचे अनेक असे लोकप्रिय प्रकार आहेत. ज्यांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्यामधील एक कोंबडीचा प्रकार म्हणजे कडकनाथ कोंबडी आणि आज आपण या लेखामध्ये कडकनाथ कोंबडीविषयी माहिती पाहणार आहोत. कडकनाथ हि एक कोंबडीची प्रजाती आहे.

ज्याचा शोध मध्यप्रदेश या राज्यामध्ये झाला आणि या कोंबडीची खासियत म्हणजे हि कोंबडी वरून दिसायला काळ्या रंगाची असतेच त्याचबरोबर या कोंबडीचे मांस आणि रक्त देखील काळ्या रंगाचे असते आणि या कोंबडीचे मांस देखील काळ्या रंगाचे असल्यामुळे या कोंबडीला ‘काळी मासी” या नावाने देखील ओळखले जाते.

तसेच या कोंबडीच्या प्रकाराला काळी कोंबडी या नावाने देखील ओळखले जाते. चला तर खाली आपण कडकनाथ कोंबडी विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती घेवूया.

kadaknath kombadi information in marathi
kadaknath kombadi information in marathi

कडकनाथ कोंबडी माहिती – Kadaknath Kombadi Information in Marathi

कोंबडीचा प्रकारकडकनाथ कोंबडी
इतर नावेकाळी कोंबडी आणि काळी मासी
रंगकाळा
वजननर : १.५ ते २ किलो मादी : १ ते १.५ किलो

कडकनाथ कोंबडीचे मूळ ?

कडकनाथ कोंबडीचा प्रकार हा दुर्मिळ प्रकारातील असून ह्या कोंबडीचे मूळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यातील आहे.

कडकनाथ कोंबडीविषयी महत्वाची माहिती – information about kadaknath kombadi in marathi

कडकनाथ कोंबडी हा एक कोंबडीचा प्रकार आहे आणि हि कोंबडी त्याच्या मांसासाठी ओळखली जाते आणि या कोंबडीला काळी कोंबडी म्हणून देखील ओळखले जाते. कडकनाथ कोंबडीमध्ये नर आणि मादी ह्या थोड्या फरकाने दिसायला वेगळ्या असतात आणि नर आणि मातीचे वजन देखील वेगळे असते.

या प्रकारामध्ये नर कोंबडीचे वजन ही दीड ते दोन किलो पर्यंत असते तर मादी कोंबडीचे वजन हे १ च्या पुढे आणि दीड किलो पर्यंत असू शकते. कडकनाथ कोंबडीचा प्रकार हा १०० ते १२५ दिवसामध्ये म्हणजे ३ ते ३.५ महिन्यामध्ये १.२० किलो पर्यंत वाढू शकतो.

या कोंबडीची जात हि खूपच दुर्मिळ आहे परंतु या कोंबडीचे मांस चव असल्यामुळे आणि त्यामध्ये औषधी गुण असल्यामुळे या कोंबडीला बाजारामध्ये खूप मागणी आहे.

कडकनाथ कोंबडीची बाजारातील किंमत ?

कडकनाथ कोंबडीचे मांस हे काळ्या रंगाचे असले तरी ह्या कोंबडीचे मास हे चवदार असते आणि अरोग्यासाठी औषधी देखील असते त्यामुळे या कोंबडीची बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि हा प्रकार बाजारामध्ये चांगल्या किंमतीमध्ये देखील जातो.

हा कोंबडीचा प्रकार बाजारामध्ये ९०० ते १५०० पर्यंत विकला जातो त्याचबरोबर या कोंबडीची अंडी देखील चवदार आणि पौष्टिक असल्यामुळे या अंड्याला देखील खूप मागणी आहे त्यामुळे या प्रकारच्या कोंबड्यांचे कुक्कुट पालन करणाऱ्या मालकास चांगला फायदा होऊ शकतो.

कडकनाथ कोंबडीचे फायदे – kadaknath kombadi advantages in marathi

  • कडकनाथ कोंबडीचे मास हे चवदार असल्यामुळे या कोंबडीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे याचा भाव देखील जास्त आहे त्याचबरोबर या कोंबडीची अंडी देखील चांगल्या किंमतीमध्ये जातात.
  • या कोंबडीच्या मांसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि या कोंबडीच्या मांस खाल्ल्यामुळे रक्त पेशी आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
  • या कोंबडी प्रकारची एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ह्या कोंबड्या खाल्लेला आहार लगेच मांसामध्ये रुपांतर करतात.
  • कडकनाथ कोंबडीच्या अंड्यामध्ये अनेक पौष्टिक मुल्ये असतात आणि यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक मुल्ये असल्यामुळे ह्या कोंबडीची अंडी वृद्धांच्या आरोग्यासाठी चांगली ठरू शकतात.
  • कडकनाथ कोंबडीच्या मांसाचा सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढण्यास मदत होते असे म्हटले जाते.
  • इतर कोंबड्यांच्या मांसामध्ये जास्त प्रमाणत चरबी असते परंतु कादाक्नाथ हा असा कोंबडीचा प्रकार आहे ज्यामध्ये अधिक प्रमाणात प्रथिने असतात आणि कमी चरबी असते त्यामुळे हे मांस आरोग्यास चांगले आहे.
  • कडकनाथ कोंबडीचे मांस ही महिलांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे.
  • त्याचबरोबर कडकनाथ कोंबडीचे मांस हे फुफ्फुसाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील मदत करते.  

कडकनाथ कोंबडी विषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • कडकनाथ कोंबडीचा प्रकार हा दरवर्षी ८५ ते १०० अंडी देते आणि हि अंडी तपकिरी रंगाची आणि मध्यम आकाराची असतात.
  • कडकनाथ या प्रकारच्या कोंबडीच्या रक्तामध्ये असणारे मेलेनिन हे त्वचारोगाने ग्रस्त असलेल्या लोकांच्यासाठी चांगले किंवा फायदेशीर ठरू शकते.
  • कडकनाथ कोंबड्या ह्या चांगल्या काळजी मध्ये १० ते १२ वर्ष जगू शकतात परंतु या कोंबड्या चांगल्या वाढीनंतर मांसासाठी वापरल्या जातात.
  • या कोंबडीच्या अंड्याचे वजन हे ४० ग्रॅम इतके असते.
  • कडकनाथ या कोंबडीच्या प्रकाराचा वापर हा अंडी, मांस आणि काही औषधी गुणधर्मांच्यासाठी केला जातो.
  • या प्रकारच्या कोंबडीच्या पायापासून, डोळे आणि डोक्यापर्यंत सर्वकाही काळ्या रंगाचे असते.
  • कडकनाथ कोंबडीच्या प्रकाराला पवित्र प्रकार म्हणून मनाला जातो कारण ह्या प्रकारचा बळी देवीला दिला जातो असे म्हटले जाते.
  • या प्रकारच्या कोंबडीच्या पिल्लांचा रंग हा निळसर रंगाचा असतो आणि या पिल्लांच्या अंगावर निळसर रंगाचे पट्टे असतात.
  • या प्रकारच्या कोंबडीचे पालन हे जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये गरीब लोक किंवा आदिवासी लोक करतात परंतु सध्या या प्रकारच्या कोंबडीची मागणी बाजारामध्ये वाढल्यामुळे अनेक लोक या कुक्कुट पालनामध्ये पडले आहेत.

आम्ही दिलेल्या kadaknath kombadi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कडकनाथ कोंबडी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kadaknath kombadi advantages in marathi या kadaknath kombadi palan in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about kadaknath kombadi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Kadaknath kombadi information in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!