कढी रेसिपी मराठी Kadhi Recipe in Marathi

Kadhi Recipe in Marathi – Maharashtrian Kadhi Recipe कढी रेसिपी मराठी महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपारिक डीशेस बनतात आणि त्यामधील एक लोकप्रिय आणि मनाला आनंद देणारा पदार्थ म्हणजे कढी. कढी हा पदार्थ एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो आपण तसाच जेवता जेवता गरमागरम पिण्यासाठी बनवतो किंवा मग भातासोबत खाण्यासाठी म्हणजेच कढी- भात खाण्यासाठी बनवतो. आपल्याला जर जेवण पटकन बनवायचे असल्यास आपण कढी – भात हा पर्याय निवडू शकतो कारण हा पदार्थ कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पध्दतीने बनवली जाते. आता आपण ताकापासून गरमागरम कढी कशी बनवायची ते या लेखामध्ये पाहणार आहोत.

kadhi recipe in marathi
kadhi recipe in marathi

कढी रेसिपी मराठी – Kadhi Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ५ ते ६ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

कढी म्हणजे काय ?

कढी रेसिपी हि दह्याचे ताक केले जाते आणि एका भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मिरची, कडीपत्ता, हळद आणि यांची फोडणी दिली जाते आणि पीठ लावलेले ताक त्या फोडणीमध्ये ओतून त्याची कढी बनवली जाते.

कढी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • ताक : ताक हा कढी बनवण्यासाठी लागणारा एक मुख्य घटक आहे कारण ताक शिवाय कढी बनूच शकत नाही. ताकाला डाळीचे किंवा नाचण्याचे पीठ लावले जाते आणि ते ताक फोडणीमध्ये ओतले जाते.
  • डाळीचे किंवा नाचण्याचे पीठ : ताकाला नाचण्याचे किंवा डाळीचे पीठ लावल्यामुळे कढीला चांगला घट्टपणा येतो.

कढी रेसिपी – maharashtrian kadhi recipe

कढी हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे आणि हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये बहुतेक लोकांच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी बनवतात कारण हि खमंग आणि गरमागरम कढी पिल्यानंतर पोटाला अगदी आनंद मिळतो. म्हणून आपण आता डाळीच्या पिठाची कधी आणि नाचण्याच्या पिठाची कढी कशी बनवतात ते पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ५ ते ६ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१० मिनिटे
एकूण लागणारा वेळ१५ मिनिटे
पाककलामहाराष्ट्रीयन

डाळीच्या पिठाची कढी रेसिपी – dalichya pithachi kadhi recipe 

डाळीच्या पिठाची कढी हि आपण केंव्हाहि बनवून खावू शकतो आणि हि कढी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.

बेसन / डाळीच्या पिठाची कढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kadhi recipe 

डाळीच्या पिठाची कढी बनवण्यासाठी आपल्याला विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असू शकते. चला तर मग पाहूयात कढी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.

  • ४ वाटी ताक.
  • २ चमचे पीठ.
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ चमचा जिरे.
  • १/४ चमचा हळद.
  • चिमुटभर हिंग.
  • २ हिरव्या मिरच्या ( मोडलेल्या ).
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • ७ ते ८ लसून पाकळ्या.
  • १ वाटी पाणी.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल
  • कोथिंबीर

कढी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kadhi recipe 

  • सर्वप्रथम दह्याचे ताक बनवून घ्या आणि मग त्या ताकाला २ चमचे डाळीचे पीठ लावा आणि ते रवीने चांगले गुसळून एकत्र करा आणि ते बाजूला ठेवा.
  • आता एक भांडे घ्या आणि ते भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला आता ते तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे घाला आणि मग जिरे फुलले कि त्यामध्ये कढीपत्ता आणि लसून घाला आणि लसून चांगला भाजू द्या.
  • आता त्यामध्ये लगेच हिरवी मिरची घाला आणि थोडावेळ त्या मिरचीचा तिखट पण थोडा त्या फोडणीमध्ये उतरू द्या मग त्यामध्ये हळद आणि हिंग आणि ते चांगले मिक्स करा.
  • आता या फोडणीमध्ये आपण पीठ लावून ठेवलेले ताक ओता आणि त्यामध्ये १ वाटी पाणी आणि मीठ घालून ते मिक्स करा आणि त्यालाचांगली उकळी येईपर्यंत चमच्याने ढवळत रहा.
  • कधी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती कढी गरमागरम सर्व्ह करा.

नाचण्याच्या पिठाची कढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kadhi recipe 

  • ४ वाटी ताक.
  • २ चमचे पीठ.
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ चमचा जिरे
  • २ चमचे आले लसून पेस्ट.
  • २ हिरव्या मिरच्या ( मोडलेल्या ).
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने.
  • १ वाटी पाणी.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल
  • कोथिंबीर

नाचण्याच्या पिठाची कढी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kadhi recipe 

  • सर्वप्रथम दह्याचे ताक बनवून घ्या आणि मग त्या ताकाला २ चमचे नाचण्याचे पीठ लावा आणि ते रवीने चांगले गुसळून एकत्र करा आणि ते बाजूला ठेवा.
  • आता एक भांडे घ्या आणि ते भांडे मध्यम आचेवर गॅसवर ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला आता ते तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे घाला आणि मग जिरे फुलले कि त्यामध्ये कढीपत्ता आणि आले लसून पेस्ट घाला आणि ते चांगले भाजा.
  • आता त्यामध्ये लगेच हिरवी मिरची घाला आणि थोडावेळ त्या मिरचीचा तिखट पण थोडा त्या फोडणीमध्ये उतरू द्या.
  • आता या फोडणीमध्ये आपण पीठ लावून ठेवलेले ताक ओता आणि त्यामध्ये १ वाटी पाणी आणि मीठ घालून ते मिक्स करा आणि त्यालाचांगली उकळी येईपर्यंत चमच्याने ढवळत रहा.
  • कधी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ती कढी गरमागरम सर्व्ह करा.

कढी कश्या सोबत सर्व्ह केली जाते – serving suggestion

कढी हा पदार्थ एक पारंपारिक पदार्थ आहे ज्याची आपण तसाच आनंद घेवू शकतो किंवा कधी – भात असे कॉम्बिनेशन देखील खावू शकतो.

आम्ही दिलेल्या kadhi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कढी रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dahi kadhi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि takachi kadhi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये how to make sol kadhi recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!