kashibai bajirao ballal information in marathi काशीबाई बाजीराव बल्लाळ माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये काशीबाई बाजीराव बल्लाळ यांच्या विषयी माहिती घेणार आहोत म्हणजेच त्यांचा परिचय, त्या कोण होत्या आणि त्यांच्या इतिहासामध्ये काय ओळख आहे या विषयी आता आपण पाहणार आहोत. छत्रपती शाहू महाराज हे ज्यावेळी मराठ्यांचा राजकारभार पाहत होते त्यावेळी त्यांचे पहिले पेशवे (पंतप्रधान) हे बबाळाजी विश्वनाथ पेशवे हे होते आणि त्यांचा थोरला मुलगा बाजीराव पेशवे ज्यांना कोण ओळखत नाही कारण त्यांचे इतिहासामध्ये नाव चांगले लोकप्रिय झालेले आहे आणि अशा या लोकप्रिय पेशव्याची म्हणजेच पहिले बाजीराव पेशवे यांची पत्नी म्हणून काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची ओळख आहे आणि काशीबाई यांचे लग्न हे खूपच लहान वयामध्ये झाले होते.
काशीबाई यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील चासकमान या गावामध्ये १९ ऑक्टोबर १७०३ मध्ये एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. काशीबाई यांच्या वडिलांचे नाव महादजी कृष्ण जोशी असे होते आणि त्यांच्या आईचे नाव शुबाई असे होते. काशीबाई ह्या एक चांगल्या आणि श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांचे लहानपणीपासूनच खूप लाड झाले तसेच त्यांच्या सर्वजन प्रेमाने वागत होते आणि त्यांना लहानपणी लाडूबाई या नावाने बोलावले देखील जायचे.
महादजी हे छत्रपती यांच्या कल्याण प्रांताचे सुभेदार होते त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत देखील केली होती आणि तसेच हे त्या भागातील मोठे सावकार देखील होते. महादजी यांचे पूर्वी पासूनच मराठ्यांशी चांगले संबध होते नंतर पेशव्यांशी देखील विवाह संबध प्रस्थापित झाले म्हणजे पहिले बाजीराव पेशवा आणि काशीबाई यांचा विवाह झाला.
काशीबाई बाजीराव बल्लाळ माहिती मराठी – Kashibai Bajirao Ballal Information in Marathi
पूर्ण नाव | काशीबाई बाजीराव बल्लाळ |
जन्म | १९ ऑक्टोबर १७०३ |
जन्म ठिकाण | पुणे जिल्ह्यातील चासकमान या गावामध्ये झाला |
पालक | महादजी कृष्ण जोशी आणि शुबाई |
पतीचे नाव | पहिला बाजीराव पेशवा |
मुलांची नावे | बाजीराव ( नानासाहेब पेशवे ), रघुनाथ राव, रामचंद्र राव आणि जनार्दन राव. |
मृत्यू | २७ नोव्हेंबर १७५८ |
काशीबाई बाजीराव बल्लाळ यांच्या विषयी माहिती – Kashibai Bajirao Ballal History in Marathi
काशीबाई ह्या पहिले बाजीराव पेशवे यांची पत्नी म्हणून इतिहासामध्ये ओळख आहे आणि त्या महादजी कृष्ण जोशी आणि शुबाई यांची मुलगी होतो. काशीबाई यांचा जन्म १९ ऑक्टोबर १७०३ मध्ये पुणे जिल्ह्यातील चासकमान या गावामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला आणि त्यांना एक भाऊ देखील होता त्याचे नाव कृष्णराव असे होते. काशीबाई यांच्या घरची परिस्थिती चांगली आणि श्रीमंत असल्यामुळे त्यांचे बालपण हे खूप लाडामध्ये गेले आणि म्हणून त्यांना लहानपणी लाडूबाई या नावाने देखील ओळखले जायचे.
महादजी यांचे मराठ्यांशी आणि पेशव्यांशी संबध चांगले असल्यामुळे त्यांनी पेशवे आणि त्यांच्यामध्ये विवाह संबध प्रस्थापित केले म्हणजेच आपल्या मुलीचे ( काशीबाई ) लग्न हे पहिला बाजीराव पेशवा यांच्याही झाला. काशीबाई आणि पेशवा बाजीराव यांचा विवाह ११ मार्च १७२० मध्ये सासवड या ठिकाणी पूर्ण विधिवत झाला आणि काशीबाई ह्या वयाच्या १७ व्या वर्षी विवाह बंधनामध्ये अडकल्या.
पहिले बाजीराव पेशवे हे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याशी प्रेमाने वागत होते तसेच त्यांना घरातील तसेच प्रशासकीय जबाबदाऱ्या देखील पार पाडत होत्या म्हणजेच पहिले बाजीराव पेशवे यांच्या अनुपस्थितीमध्ये त्या कुटुंब आणि प्रशसकीय जबाबदारी देखील पूर्ण करत होत्या. काशीबाई आणि पेशवा बाजीराव यांना चार मुले होती ती म्हणजे बाळाजी बाजीराव ( नानासाहेब पेशवे ), रघुनाथ राव, रामचंद्र राव आणि जनार्दन राव.
काशीबाई आणि मस्तानी यांच्यामधील संबध – relations between kashibai and mastani
बाजीराव पेशवा हे सुरुवातीच्या काळामध्ये काशीबाई सोबत खूप पेमाने वागत होते तसेच त्या बाजीराव यांच्या अनुपस्थितीमध्ये कुटुंब आणि प्रजेची जबाबदारी देखील पार पाडत होती. ज्यावेळी बाजीराव युध्दासाठी जात होते त्यावेळी त्याच राज्याचा कारभार सांभाळत होत्या. काशीबाई यांना आपले पती म्हणजेच बाजीराव पेशवा यांच्या विषयी खूप आदर, विश्वास आणि प्रेम होते आणि त्यांना त्या गुरु देखील मनात होत्या.
बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमकथे विषयी देखील आपल्या सर्वांना माहित आहेच. ज्यावेळी पेशवा बाजीराव यांनी बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांची मुलगी मस्तानी हिच्याशी विवाह केला त्यावेळी मात्र काशीबाई यांचा अभिमान दुखावला. तरी देखील काशीबाई यांनी मस्तानी हिच्याशी चांगल्या वागल्या म्हणजेच त्यांनी तिला चांगली वागणूक दिली तसेच मस्तानीच्या मृत्यूनंतर तिने तिच्या मुलाचे म्हणजेच शमशेर बहादूर यांचे देखील चांगल्या प्रकारे पालन पोषण केले तसेच त्याला राज्यामध्ये चांगल्या पदावर देखील ठेवले.
काशीबाई यांची कामगिरी
बाजीराव पेशवा हे त्यांच्या शेवटच्या काळामध्ये खूप आजारी होते आणि या आजारामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला त्यानंतर काही दिवसांनी मस्तानीचा देखील मृत्यू झाला. यानंतर काशीबाई यांनी मस्तानीचा मुलगा शमशेर बहादूर याचे पालन पोषण केले तसेच राज्यामध्ये चांगले स्थान देखील दिले. बाजीराव पेशवा आणि मस्तानी यांच्या मृत्यूनंतर काशीबाई यांच्या आयुष्यामध्ये अनेक बदल झाले आणि त्या आपला जास्तीत जास्त वेळ हा धार्मिक कार्यामध्ये घालवला.
तसेच त्यांनी १७४९ मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सोमेश्वर शिव मंदिर बांधले जे आज देखील खूप लोकप्रिय आहे. बाजीराव पेशवे यांच्या मृत्युनंतर त्यांनी काही दिवस कुटुंबाची आणि प्रशासकीय जबाबदारी सांभाळली. त्यांनी त्यांच्या काळामध्ये १०००० यात्रेकरूंचा प्रवास घडवून आणला होता आणि त्यासाठी त्यांनी १ लाख रुपये खर्च केले होते. अश्या प्रकारे त्यांनी पेशवा बाजीरावच्या मृत्यू नंतर आपली कामगिरी बजावली आणि काही दिवसांनी त्यांचा प्रशासकीय राजकारभार हा बाळाजी बाजीराव ( नानासाहेब पेशवे ) हे पाहू लागले.
काशीबाई यांच्याविषयी तथ्ये – facts
- काशीबाई यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील चासकमान या गावामध्ये १९ ऑक्टोबर १७०३ मध्ये झाला.
- त्यांनी त्यांच्या काळामध्ये १०००० यात्रेकरूंचा प्रवास घडवून आणला होता आणि त्यासाठी त्यांनी १ लाख रुपये खर्च केले होते.
- १७४० मध्ये पहिला बाजीराव पेशवा यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यू नंतर काशीबाई यांनी कुटुंब आणि राज्याची जबाबदारी पार पडली होती.
- त्यांनी बांधलेले सोमेश्वर शिव मंदिर खूप लोकप्रिय आहे.
- मस्तानी हि काशीबाईंची सौतन असून देखील त्यांनी मस्तानीला चांगली वागणूक दिली आणि तिच्या मृत्यू नंतर तिच्या मुलाला म्हणजेच शमशेर बहादुरला चांगले सांभाळले.
- काशीबाई यांना चार मुले होती, बाजीराव (नानासाहेब पेशवे), रघुनाथ राव, रामचंद्र राव आणि जनार्दन राव.
- ज्यावेळी पेशवा बाजीराव यांनी बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांची मुलगी मस्तानी हिच्याशी विवाह केला त्यावेळी मात्र काशीबाई यांचा अभिमान दुखावला होता तरी देखील त्या त्यामधून सावरल्या आणि आपली जबाबदारी पुढे चांगल्या प्रकारे पार पाडत गेल्या.
काशीबाई यांचा मृत्यू – death
काशीबाई यांचा मृत्य २७ नोव्हेंबर १७५८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील सातारा या जिल्ह्यामध्ये झाला. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंब, राज्य, धर्म आणि पत्नी धर्माचे कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावले.
आम्ही दिलेल्या kashibai bajirao ballal information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर काशीबाई बाजीराव बल्लाळ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Kashibai Bajirao Ballal History in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट