Kat Vada Recipe in Marathi कट वडा रेसिपी मराठी कट वडा हि एक महाराष्ट्रीयन म्हणजेच हि एक कोल्हापुरी झणझणीत आणि चमचमीत रेसिपी आहे आणि हि जरी कोल्हापुरी डिश असली तरी हि महाराष्ट्राच्या यासेच भारताच्या इतर भागामध्ये देखील खूप आवडीने बनवली जाते आणि खाल्ली देखील जाते. कट वडा म्हणजेच बटाट्याच्या पातळ रस्स्यामध्ये बटाटे वडा घातला जातो आणि त्याचा आनंद ब्रेड सोबत घेतलं जातो. कट वडा हि रेसिपी खूप लोकांना आवडते म्हणून अनेक लोक हि रेसिपी घरी बनवण्याचा प्रयत्न करतात अश्या लोकांच्यासाठी आज आपण कट वडा कसा बनवायचा ते पाहणार अहोत.
कट वडा घरी बनवणे खूप सोपे आहे आणि हा कमीत कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ ते ४० मिनिटामध्ये बनू शकतो परंतु हा बनवण्यासाठी साहित्य जास्त लागते. चाल तर मग पाहूयात कट वडा कसा बनवायचा.
कट वडा रेसिपी मराठी – Kat Vada Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ ते ४० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | सोपी |
कट वडा रेसिपी – kolhapuri kat vada recipe in marathi
कट वडा हि एक महाराष्ट्रीयन झणझणीत डिश आहे जी बटाटा वडा आणि बटाटा रस्सा याचे कॉम्बिनेशन आहे. कट वडा आपण घरामध्ये अगदी सोप्या पध्दतीने बनवू शकतो आणि हि रेसिपी आपण ३५ ते ४० मिनिटामध्ये बनवून ठेवू शकते. आपल्याला वडा बनवण्यासाठी जे उकडलेले बटाटे लागणार आहे ते आपण जर आदल्या दिवशी रात्री उकडून ठेवले तर आपली कट वडा रेसिपी पटकन बनू शकेल. चला तर मग आता आपण कट वडा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
कट वडा बनवताना वडा बनवताना वेगळे साहित्य लागते आणि पातळ रस्सा बनवताना वेगळे साहित्य लागते. त्यामुळे कट वडा बनवण्यासाठी लागणारे काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही साहित्य उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग कट वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २५ ते ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ ते ४० मिनिटे |
बनवण्याची पध्दत | सोपी |
- १ वाटी हरभरा डाळीचे पीठ.
- १ चमचा रवा.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा खायचा सोडा.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- ३ ते ४ बटाटे
- ६ हिरव्या मिरच्या ( चिरलेल्या किंवा बारीक पेस्ट केलेल्या ).
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- ७ ते ८ कडीपत्ता पाने.
- १/४ चमच्या हिंग.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( चिरलेली ).
- १ मोठा चमचा तेल.
- तेल ( तळण्यासाठी ).
- २ बटाटे ( उकडून कुसकरलेले ).
- १ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- २ चमचे आलं लसून पेस्ट.
- १/४ चमच्या हिंग.
- हळद ( आवश्यकतेनुसार ).
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा गरम मसाला.
- अर्धी छोटी वाटी वाटलेले खोबरे आणि कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- १ मोठा चमचा तेल.
- ४ वाटी पाणी.
- उकडलेल बटाटे साल काढून ते चिरून घ्या.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, हिरवी मिरची, आलं लसून पेस्ट आणि कडीपत्ता घाला आणि ते चांगले एकत्र करा.
- त्यानंतर त्यामध्ये हिंग, हळद घाला ते काही वेळासाठी चांगले चांगले एकत्र करा आणि मग त्यामध्ये शिजवलेला बटाटा, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर ( चवीनुसार ) घाला ते चांगले मिक्स करा.
- आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाका आणि बटाट्याचे सारण एकत्र करून घ्या. आता हे सारण काही वेळासाठी बाजूला ठेवा.
- मग बाऊलमध्ये डाळीचे पीठ घ्या आणि त्यामध्ये रवा, हळद, सोडा आणि मीठ घालून ते कोरडे मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आता त्या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून वड्यासाठी लागणारे बॅटर बनवून घ्या.
- बटाट्याच्या भाजीचे लाडू एवडे किंवा तुम्हाला ज्या आकाराचे वडे हवे आहेत त्या आकाराचे गोळे बनवून घ्या.
- आता कढई गॅसवर ठेवून तापवून घ्या आणि त्यामध्ये वडे तळण्यासाठी तेल घाला आणि ते तेल मोठ्या आचेवर गरम करा.
- तेल गरम झाले कि गॅसची आच कमी ( मध्यम ) करा.
- आता भाजीचे गोळे डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये बुडवून तो गोळा त्या पीठाने चांगला झाकून घ्या आणि तो हळुवार तेलामध्ये सोडा आणि ते वडे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्या
- वडे तयार झाले हे थोड्या वेळेसाठी बाजूला ठेवा.
- उकडलेल बटाटे साल काढून ते कुसकरून घ्या आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई किंवा भांडे गरम करायला ठेवा आणि कढई गरम झाली की त्यामध्ये १ मोठा चमचा तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला.
- मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे, आलं लसून पेस्ट, हिंग, हळद, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घालून ते चांगले एकत्र करा.
- आता यामध्ये कुसकरलेला बटाटा आणि वाटलेली खोबरे आणि कोथिंबीर घाला आणि मिक्स करा आणि त्यामध्ये लगेच चार वाटी गरम पाणी घाला आणि ते मिक्स करा.
- शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि मिक्स करून आमटीला एक चांगली उकळी येवू द्या. आमटीला उकळी आली कि गॅस बंद करा.
तिसरी कृती : कट वडा कसा सर्व्ह केला जातो
- कट वडा सर्व्ह करताना एका वाटीमध्ये गरमा गरम रस्सा घाला आणि मग त्यामध्ये वडा घाला आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि शेव घाला आणि त्यामध्ये चमच्या घालुन ती वाटी प्लेटमध्ये ठेवा आणि त्या प्लेटमध्ये बाजूला ब्रेडच्या फोडी ठेवा आणि सर्व्ह करा.
आम्ही दिलेल्या kat vada recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कट वडा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cut vada recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि batata vada rassa recipe in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये vada usal recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट