केस काळे करण्याचे उपाय Kes Kale Karnyache Upay in Marathi

kes kale karnyache upay in marathi – natural black hair tips in marathi केस काळे करण्याचे उपाय, आज आपण या लेखामध्ये केस काळे कसे करायचे या बद्दल पाहणार आहोत. काही लोक हे आपल्या एकूणच सौंदर्याबद्दल खूप चिंतित असतात आणि त्यांना सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि चांगले दिसायचे असते आणि म्हणून ते आपले सौंदर्य खुलून दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि केस हा देखील सौंदर्याचा भाग आहे. विशेषता स्त्रीयांच्यामध्ये केस जितके लांब, दाट आणि काळेभोर असतील तितके तिचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे त्या आपल्या केसांच्या विषयी खूपच काळजी घेतात आणि पुरुषांचे देखील तसेच असते कि त्यांचे केस काळेभोर दिसत असतील तर ते त्यांच्या चेहऱ्याला चांगले दिसतात.

परंतु संध्या काही कारणांच्या मुळे मध्यम वयाच्या स्त्रियांचे आणि पुरुषांचे केस तर पांढरे होतच आहेत परंतु लहान वयाच्या मुला मुलींचे देखील केस पांढरे होत आहेत. सध्याच्या या प्रदूषणाच्या काळामध्ये लोकांना अनेक आरोग्य विषयक तसेच त्वचा आणि सौंदार्याविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामधील एक समस्या म्हणजे केस पांढरे होणे आणि हि समस्येला स्त्रियांना आणि पुरुषांना देखील सामोरे जावे लागत आहे.

आज चालू असलेल्या ह्या दगदगीच्या जीवनामुळे लोकांना आपल्या आरोग्याकडे तसेच सौंदर्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तसेच केसांची निगा देखील चांगल्या प्रकारे राखता येत नाही त्यामुळे केस पांढरे होणे, केस गळणे किंवा केसांची वाढ खुंटणे या सारख्या समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. पण असे काही पूर्वीचे घरगुती उपाय आहेत ज्यामुळे आपले केस काळे होऊ शकतात. चला तर आता आपण केस काळे करण्याचे उपाय पाहूया.

kes kale karnyache upay in marathi
kes kale karnyache upay in marathi

केस काळे करण्याचे उपाय – Kes Kale Karnyache Upay in Marathi

केस पांढरे होण्याची कारणे – causes of white hairs 

आज चालू असलेल्या ह्या दगदगीच्या जीवनामुळे लोकांना आपल्या आरोग्याकडे तसेच सौंदर्याकडे देखील लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तसेच केसांची निगा देखील चांगल्या प्रकारे राखता येत नाही त्यामुळे केस पांढरे होणे, केस गळणे किंवा केसांची वाढ खुंटणे या सारख्या समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. चला तर आपण आता केस पांढरे होण्याची कारणे काय आहेत ते पाहूया.

  • जर एखादा व्यक्ती कोणत्याही गोष्टीचे खूप टेन्शन घेत असेल किंवा त्या गोष्टी विषयी खूप विचार करत असेल तर त्या व्यक्तीचे केस लवकर पांढरे होतात.
  • जर एखाद्या व्यक्तीला सततचा कामाचा ताण तणाव असेल तर अश्या व्यक्तीचे देखील केस लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते.
  • वयानुसार देखील केस पांढरे होऊ लागतात.
  • जर केसांची निगा चांगल्या प्रकारे राखली नाही तरी देखील त्या संबधित व्यक्तीचे केस पांढरे होतात.
  • तसेच सध्याच्या प्रदूषण आणि धुळीमुळे देखील केस पांढरे होतात.
  • केसांच्यावर जास्त प्रमाणात केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरल्यामुळे तसेच केसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया केल्यामुळे देखील केस पांढऱ्या रंगाचे होता.
  • ज्या व्यक्तीला थायरॉईड चा त्रास आहे अश्या व्यक्तींची देखील केस लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते.
  • असे म्हणातले जाते कि एकाद्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमीन बी १२ ची कमतरता असते अश्या लोकांचे देखील केस लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते.
  • त्वचारोग, ट्युबरस स्कलेरोसीस, अलोपोसिया अरेटा या सारख्या आजारांच्यामुळे देखील केस पांढरे होण्याची शक्यता असते.

केस काळे करण्यासाठी उपाय – natural black hair tips in marathi

काही लोक हे आपल्या एकूणच सौंदर्याबद्दल खूप चिंतित असतात आणि त्यांना सर्वांच्यापेक्षा वेगळे आणि चांगले दिसायचे असते आणि म्हणून ते आपले सौंदर्य खुलून दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि केस हा देखील सौंदर्याचा भाग आहे. विशेषता स्त्रीयांच्यामध्ये केस जितके लांब, दाट आणि काळेभोर असतील तितके तिचे सौंदर्य खुलून दिसते. आणि म्हणूनच आता आपण खाली केस काळे कसे बनवायचे या बद्दल उपाय पाहणार आहोत.

  • पूर्वीच्या काळापासून शिकेकाई देखील केसांच्या सौंदर्यासाठी वापरली जाते आणि शिकेकाई मध्ये देखील असे आयुर्वेदिक गुणधर्म असतात जे केस पांढरे आणि गळती होण्यापासून थांबवते आणि म्हणून तुम्ही तुमच्या केसांच्यासाठी शिकेकाई चा वापर केला तर चांगले ठरू शकते. ज्या वेळी आपण केस धुणार असतो त्यावेळी जर शिकेकाई पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे उकळून ते पाणी गाळून ते थंड करून त्याने आपले केस धुतले तर केस पांढरे होण्याचे आणि केस गळतीची समस्या थांबू शकते.
  • केस काळे करण्यासाठी जास्वंदीचे तेल हे देखील एक रामबाण उपाय आहे आणि हे जास्वंदीचे तेल आपण घरच्या घरी अगदी सहजपणे बनवू शकतो. जास्वंदीचे तेल बनवताना ५ ते ६ जास्वंदीची फुले घ्या आता एका खोल भांड्यामध्ये १ मोठी वाटी तेल घाला आणि त्यामध्ये फुले कुस्करून घाला आणि ते मिश्रण चांगले १० मिनिटे उकळून घ्या आणि उकळ्यानंतर गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. तेल थंड झाले कि ते एका बाटलीमध्ये काढा आणि ते तेल आठवड्यातून एकदा केसांना लावा.
  • पांढरे झालेले केस तुम्हाला काळे करायचे असल्यास तुम्ही आले मिक्सरला फिरवून त्याचा रस काढून तो आल्याचा रस केसांच्या मुळांना लावा आणि ते तसेच तास भर ठेवा आणि मग ते एक तासाने धुऊन घ्या असे तुम्ही आठवड्यातून करा तुम्हाला फरक पडलेला दिसेल.
  • जर तुम्ही खोबऱ्याचे तेल जरी आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळांना लावले तरी तुमचे केस हे काळ्या रंगाचे होतात तसेच केसांची वाढ देखील चांगली होते.
  • जर तुम्ही केसांना तिळाचे तेल, भृंगराज तेल, ऑलीव्ह तेलाने केसांना मालिश केली तरी केस पांढरे होणे आणि गळती थांबते त्याबरोबर डोक्याला देखील आराम मिळतो.
  • आवळा व शिकेकाई हे दोन्ही एका भांड्यामध्ये पाण्यात भिजत घाला आणि हे मिश्रण दोन दिवसांनी त्यामधील बिया काढा आणि हे मिश्रण मिक्सरवर वाटून घ्या आणि मग त्यामध्ये दही आणि मेहंदी मिक्स करा आणि ते मिश्रण केसांना लावा आणि ते चार तास तसेच ठेवा आणि चार तासानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे केस पांढरे होणे थांबेल तसेच केसांना मऊ पणा येईल तसेच हा उपाय केस वाढीसाठी देखील चांगला आहे.
  • केस काळे होण्यासाठी योगासन आणि व्यायाम करणे देखील फायद्याचे ठरते आणि केस पांढरे होणे, केसांची वाढ खुंटणे आणि केस गळतीवर उपाय म्हणून शीर्षासन हा व्यायाम खूप उपयोगाचा आहे कारण हा व्यायामामुळे आपल्या केसांना रक्तपुरवठा होतो आणि केस पांढरे होणे, केसांची वाढ खुंटणे आणि केस गळती या समस्या दूर होतात.
  • ४ चमचे खोबरेल तेल घ्या आणि त्यामध्ये २ चमचे लिंबू रस घाला आणि आणि ते मिश्रण चांगले मिक्स करा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा तसेच तुमच्या संपूर्ण केसांना देखील टोकापर्यंत लावा आणि ते अर्धा तास ( ३० मिनिटे ) सुकू द्या आणि मग तुमचे केस तुम्हाला सूट होणारा शँपू वापरून स्वच्छ धुवा. यामुळे देखील तुमचे केस काळे होतील.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या kes kale karnyache upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर केस काळे करण्याचे उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या natural black hair tips in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि how to get black hair naturally at home in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!