खाजा रेसिपी मराठी Khaja Recipe in Marathi

Khaja Recipe in Marathi खाजा रेसिपी मराठी खाजा रेसिपी हि एक भारतीय पारंपारिक रेसिपी आहे जी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जाते आणि हा एक गोड पदार्थ आहे जो आपण सणांमध्ये किंवा विशेष क्षणांच्या वेळी बनवली जाते किंवा बेकरीतून विकत आणली जाते. खाजा हि रेसिपी मैद्या पासून बनवली जाते आणि मैद्यामध्ये इतर साहित्य घालून त्याची कणिक मळली जाते आणि मग त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते लाटून घ्यायचे आणि मग त्याला थोडे तूप आणि पीठ लावून त्याची उरळी करायची आणि मग रोल झाला कि चाकूने छोटे छोटे भाग कट करायचे आणि त्याला खाज्यासारखा आकार द्यायचा आणि मग ते गरम तेलामध्ये तळून घेतले जातात आणि मग ते गोड साखरेच्या पाकमध्ये ५ ते ६ मिनिटे बुडवून काढले जातात.

खाजे घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये बहुतेक लोकांना हा पदार्थ खूप आवडतो आणि हा पदार्थ लहानांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी उत्तम आहे. खाजा हि रेसिपी आपण घरी खूप सोप्या पध्दतीने बनवू शकतो आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण खाजा रेसिपी बनवू शकतो. चला तर आज आपण या लेखामध्ये खाजा रेसिपी कशी बनवायची ते पाहणारा आहोत.

khaja recipe in marathi
khaja recipe in marathi

खाजा रेसिपी मराठी – Khaja Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे.
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

खाजा कसा बनवतात ?

खाजा हि रेसिपी मैद्या पासून बनवली जाते आणि मैद्यामध्ये इतर साहित्य घालून त्याची कणिक मळली जाते आणि मग त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते लाटून घ्यायचे आणि मग त्याला थोडे तूप आणि पीठ लावून त्याची उरळी करायची आणि मग रोल झाला कि चाकूने छोटे छोटे भाग कट करायचे आणि त्याला खाज्यासारखा आकार द्यायचा आणि मग ते गरम तेलामध्ये तळून घेतले जातात आणि मग ते गोड साखरेच्या पाकमध्ये ५ ते ६ मिनिटे बुडवून काढले जातात.

खाजे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य ( key ingredients ) ( khaja recipe in marathi )

  • मैदा : मैदा हा खाज बनवण्यासाठी लागणारा एक महत्वाच घटक आहे ज्यामध्ये एकता साहित्य घालून कणिक मळली जाते आणि त्याचे गोळे बनवून पोळ्या लाटल्या जातात.
  • साखर : खाजा हा गोड असतो आणि हा गोडपणा साखरेमुळे येतो. या ररेसिपीमध्ये साखरेचा पाक बनवला जातो आणि मग त्यामध्ये तळलेले खाजे टाकले जातात.
  • तेल : खाजे तळण्यासाठी तेल देखील महत्वाचे साहित्य आहे. कारण खाजे तेलामध्ये तळले जातात.
  • तूप : खाज्या बनवताना आपण जर तूप वापरले तर खाजे कुसकुशीत होतात.

खाजा रेसिपी – khaja recipe 

खाजा हि एक सोपी रेसिपी आहे जी भारतामध्ये बहुतेक भागामध्ये बनवली जाते आणि हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच ३५ ते ४० मिनिटामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. आता आपण खाजा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
बनवण्यसाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ३५ ते ४० मिनिटे.
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतसोपी

खाजा रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make khaja recipe 

खाजा रेसिपी बनवण्यासाठी मैदा, साखर, तूप, तेल हे महत्वाचे साहित्य लागते तसेच इतर साहित्य देखील लागते आणि यामधील बहुतेक साहित्य हे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर आपल्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो.

  • १ वाटी मैदा.
  • अर्धी वाटी कॉर्न फ्लावर.
  • २ ते ३ चमचे तूप ( कणिक मध्ये मिक्स करण्यासाठी ).
  • अर्धी वाटी तूप ( लावण्यासाठी ).
  • १ वाटी साखर.
  • अर्ध्या वाटीला थोडेसे कमी पाणी.
  • दुध ( कणिक मळण्यासाठी ) ( आवश्यकतेनुसार ).
  • १/२ चमचा वेलची पावडर.
  • तेल ( तळण्यासाठी ).
  • मीठ ( चवीनुसार ).

खाजा रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make khaja recipe 

खाजा रेसिपी बनवणे खूप सोपे आहे आणि हि रेसिपी आपण विशेषता दिवाळीच्या सणामध्ये किंवा काही खास सणांच्यासाठी बनवतो. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून खाज कसा बनवायचा ते पाहूयात.

  • खाजा बनवताना सर्वाप्रथम एका बाऊलमध्ये पीठ चाळून घ्या आणि मग त्यामध्ये गरम केलेले तूप आणि थोडेसे चवीनुसार मीठ घाला.
  • मग त्यामध्ये लागेल तेवढे किंवा गरजेनुसार दुध घाला आणि घट्ट आणि मऊ कणिक मळून घ्या आणि हि कणिक १० मिनिटे भिजू द्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि त्यामध्ये एक वाटी साखर आणि त्यामध्ये पाणी मिक्स करा आणि साखर पूर्णपणे विरघळूपर्यंत हलवत रहा आणि मग त्याचा एकतारी पाक बनवून घ्या आणि त्यामध्ये वेलची पावडर घाला आणि मिक्स करून आणि गॅस बंद करा.
  • आणि तो पाक गार होईपर्यंत बाजूला ठेवा.
  • आता आपण मळून ठेवलेली कणिक घ्या आणि त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवा.
  • आता सर्वप्रथम ३ गोळे घ्या आणि त्याला थोडा मैदा लावून एक पातळ पोळी लाटून घ्या अश्या प्रकारे तिन्ही गोळ्यांच्या पातळ पोळ्या लाटून घ्या.
  • आता पोळपाटावर एक पोळी ठेवा आणि त्यावर तुपाचे आणि कॉर्नफ्लॉवरचे मिश्रण चांगले चपचपीत लावून घ्या मग त्यावर दुसरी पोळी ठेवा आणि परत त्याला तुपाचे मिश्रण लावा आणि त्यावर तिसरी पोळी ठेवा आणि त्याला परत तुपाचे मिश्र लावा.
  • मग याचा रोल बनवा आणि रोलच्या दिनही कडा पाण्याने चिकटवून घ्या.
  • आणि मग रोल झाला कि चाकूने छोटे छोटे भाग कट करायचे आणि त्याला खाज्यासारखा आकार द्यायचा.
  • आता एका कढई मध्ये गॅसवर मध्यम आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये बनवून ठेवलेले खाजे घाला ( तेलामध्ये जितके खाजे मावतील तितकेच घाला ) .
  • आणि हे खाजे मंद आचेवर चांगले कुरकुरीत आणि थोडे तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या आणि ते चांगले तळले कि तेलातून बाहेर काढा आणि थोडे गार झाले कि पाकमध्ये टाका आणि ५ मिनिटे पाकामध्ये राहू द्या.
  • मग ते ५ मिनिटानंतर पाकामधून बाहेर काढा.
  • अश्या प्रकारे राहिलेले खाजे तळून पाकामधून काढून घ्या.

आम्ही दिलेल्या khaja recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर खाजा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या recipe of khaja in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bengali khaja recipe in marathi video माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये malvani khaja recipe in marathi करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!