किरण बेदी निबंध मराठी Kiran Bedi Essay in Marathi

Kiran Bedi Essay in Marathi किरण बेदी निबंध मराठी 

‘कठोर परिश्रम कधीही थकवा आणत नाही यामुळे समाधान मिळते – किरण बेदी

आज आपण या लेखामध्ये किरण बेदी यांच्याविषयी निबंध लिहिणार आहोत ज्यांची ओळख भारताच्या पहिल्या महिला ऑफिसर म्हणून केली जाते आणि त्यांनी पहिल्या महिला आय.पी.एस ऑफिसर बनून इतर मुलांना देखील प्रेरना दिली. किरण बेदी यांच्या जन्म हा ९ जून १९४९ मध्ये पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी एका गरीब घरामध्ये झाला आणि त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय हा कपडे विकण्याचा होता म्हणजेच त्यांचे कापड दुकान होते. किरण बेदी यांचे लग्ना अगोदरचे नाव किरण पेशावारीया असे होते आणि किरण बेदी यांच्या वडिलांचे नाव प्रकाश लाल पेशावारीया आणि आईचे नाव प्रेम पेशावारीया असे होते.

किरण बेदी यांनी शालेय शिक्षण हे अमृतसर मध्ये असणाऱ्या सेक्रेड हार्ट कॉनव्हेंट मध्ये केले आणि एनसीसी ( NCC ) चे शिक्षण घ्यायला सुरुवात केली तसेच त्यांनी त्यांची इंग्लिशमधून बॅचलर ऑफ आर्ट्स हि डिग्री अमृतसर मध्ये असणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वूमन या कॉलेज मधून झाली. मग त्यांनी इ. स १९७० मध्ये राज्य शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

मग इ. स १९७२ मध्ये किरण बेदी यांनी ब्रिज बेदी यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे आणि तिचे नाव सानिया बेदी असे होते. ज्यावेळी त्या पोलिक महासंचालक म्हणून काम करत होत्या त्यावेळी त्यांनी इ. स १९९८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतून कायद्याची पदवी मिळाली. तसेच त्यांनी १९९३ मध्ये सोशल सायन्स विभागातून डॉक्टरेट पदवी मिळवली.

kiran bedi essay in marathi
kiran bedi essay in marathi

किरण बेदी निबंध मराठी – Kiran Bedi Essay in Marathi

Essay on Kiran Bedi in Marathi

किरण बेदी ह्या फक्त भारताच्या पहिल्या महिला ऑफिसर तेवढेच ओळखल्या जात नाहीत तर त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय कार्य देखील केले. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात हि व्याख्याता म्हणून केली होती आणि त्यांनी अमृतसरच्या कॉलेज फॉर वूमन या कॉलेजमध्ये राज्यशास्त्रामध्ये व्याख्याता देत होत्या आणि त्याच दोन वर्षामध्ये त्यांनी नागरी सेवा परिक्षेच अभ्यास करून नागरी सेवा परीक्षा उतीर्ण झाल्या आणि त्या भारताच्या पहिल्या आय पी एस ऑफिसर बनल्या.

ज्यावेळी त्या पोलीस क्षेत्रामध्ये काम करू लागल्या त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पदासाठी आपली कामगिरी बजावली त्यांनी दिल्ली मध्ये असताना दिल्ली वाहतूक पोलीस म्हणून आपली कामगिरी बजावली तसेच चंडीगड मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर सल्लागार म्हणून कामगिरी बजावली त्याचबरोबर मिझोराम मध्ये पोलीस DIG म्हणून आपली कामगिरी बजावली तसेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो महासंचालक आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता अभियानासाठी नागरी पोलीस सल्लागार म्हणून काम केले.

त्यांनी त्यांच्या नागरी सेवा कारकीर्दीमध्ये अनेक विकास कामे केली तसेच सामाजिक सेवा देखील केली. किरण बेदी ज्यावेळी दिल्लीतील कारागृह महानिरीक्षक असताना त्यांनी तुरुंगामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या त्याचबरोबर त्यांनी तुरुंगामध्ये अनेक कार्यक्रम राबवले आणि त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसून आले.

इ. स १९८७ मध्ये किरण बेदी यांनी नवज्योती इंडिया फौंडेशन नावाचे एक NGO सुरु करून त्यांनी आपली सामाजिक कामगिरी देखील बजावली आणि या NGO चे मुख्य उदिष्ट हे व्यसन मुक्ती हे होते. तसेच त्यांनी महिला सशक्तीकरण आणि निरक्षरता यासारखी अनेक सामाजिक कार्ये देखील केली. ज्यावेळी त्यांनी नागरी सेवेसाठी काम सुरु केले त्यावेळी त्यांनी स्व इच्छेने सेवा निवृत्त झाल्या आणि मग त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भाग घेतले.

तसेच त्यांनी एकटी व्ही शो देखील केला होता त्यामध्ये त्यांनी होस्टची भूमिका बजावली होती आणि त्या कार्यक्रमाचे नाव आप कि कचेरी किरण के साथ असे होते आणि हा एक रियालिटी शो होता जो स्टार प्लस वर लागत होता. तसेच त्यांनी जीवनामध्ये लेखिका म्हणून देखील कामगिरी बजावली त्यांनी व्हॉट वेट रॉंग, वन वूमन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया प्रीजन सिस्टम तसेच इट्स ऑलवेज पॉसीबल यासारखी अनेक पुस्तके लिहिली. २०१४ मध्ये किरण बेदी यांनी अमित शहा आणि अरुण जेटली यांच्या उपस्थितीमध्ये भाजप मध्ये प्रवेश केला.

नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक दिवस चर्चा केल्यानंतर त्यांना लगेच पक्ष्यामध्ये प्रवेश मिळाला. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कृष्णा नगर मतदार संघातून उमेदार म्हणून उभा करण्यात आले आणि निवडणुका झाल्या परंतु २२७७ मतांनी किरण बेदी यांचा पराभव झाला.

किरण बेदी ह्या पोलीस अधिकारी असताना त्यांनी अनेक कामे केली परंतु त्यांना आयुष्यामध्ये अनेक विवादांना देखील सामोरे जावे लागले. इ. स १९८३ मध्ये यान ज्यावेळी अनैतिकपणे गोव्यातील लोकांच्यासाठी झोरा ब्रिजचे उद्घाटन केले तेव्हा अनेक वाद निर्माण झाले होते. त्याचबरोबर दिल्ली मध्ये असताना भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांच्यावर लाठी मार करण्यासाठी घोषणा दिली होती त्यावेळी त्यांच्यावर निषेध केला होता. तसेच ज्यावेळी तिहार तुरुंगामध्ये आयजी असताना एका कैद्याच्या सुरक्षतेकडे लक्ष न दिल्याचा आरोप देखील लावला होता अश्या प्रकारे अनेक वाद विवादामध्ये त्या अडकल्या होत्या.

किरण बेदी यांना त्यांच्या मोलाच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले त्यामधील काही खाली दिलेले आहेत. किरण बेदी यांना इ. स १९८९ मध्ये राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाला आणि तो भारताच्या राष्ट्रपती मार्फत मिळाला होता. तसेच इ. स १९८१ मध्ये भारताने वूमन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला तसेच इ. स १९९१ मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि ड्रग प्रिव्हेंशन अँड कंट्रोलसाठी आशिया क्षेत्र पुरस्कार मिळाला. इ. स १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला पुरस्कार देण्यात आला तसेच १९९४ मध्ये रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनतर्फे मॅगसेसे पुरस्कार.

अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम ऑफ इंडियन ओरिजिन मार्फत किरण बेदी यांना इ. स १९९९ प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. २००४ मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्र पदक मिळाले जे त्यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने मिळाले. हार्मनी फाऊंडेशनतर्फे सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार मिळाला जो २००५ मध्ये मिळाला आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्स तर्फे सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २००७ मिळाला. २०११ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट द्वारे भारतीय मानवता विकास पुरस्कार मिळाला आणि त्यांना असे अनेक पुरस्कार देवून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आला.

आम्ही दिलेल्या kiran bedi essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर किरण बेदी निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on kiran bedi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये  Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!