kojagiri purnima information in marathi कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी, आज आपण या लेखामध्ये संप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये येणारी कोजागिरी पौर्णिमा या विषयी पाहणार आहोत. हा एक हिंदू संस्कृतीच्या दिवसातील एक महत्वाचा दिवस आहे आणि हा दिवस किंवा पौर्णिमा हि अश्विन पौर्णिमेदिवशी येते. कोजागरी पौर्णिमेविषयी असे मानले जाते कि या दिवसादिवाशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्र मंडळातून बाहेर पडून पृथ्वीवर येते. कोजागिरी पौर्णिमा हि काही ठिकाणी वैज्ञानीक कारणामुळे साजरी केली जाते तर काही ठिकाणी धार्मिक कारणांच्यामुळे साजरी केली आणि हि पौर्णिमा भारतामध्ये सर्व राज्यामध्ये साजरी केली जाते आणि खासकरून महाराष्ट्र राज्यामध्ये कोजागिरी पौर्णिमेला महत्वाचे स्थान आहे आणि हि पूर्णिमा महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
हा दिवस शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा दिवस आहे कारण शेतकरी लोक जनावरे, म्हशी आणि गायी पाळतात आणि म्हशी आणि गायी ह्या दुध देणाऱ्या प्राणी आहेत आणि या दिवशी दुध घोटण्याचा कार्यक्रम हा शेतकरी वर्ग सामुहिकपणे करतात. या दिवशी खेड्यामध्ये आणि शहरामध्ये दुधामध्ये साखर आणि इतर मसाले घालून मसाले दुध बनवतात आणि ते दुध रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते आणि दुधामध्ये चंद्र दिसल्यानंतर ते दुध सर्वजन पितात.
कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा या नावांनी देखील ओळखले जाते. हा दिवस झारखंड आणि बिहार मध्ये देखील मोठ्या उत्साहात केला साजरा केला जातो आणि या दिवशी कोजागरहा पूजा म्हणून ओळखली जाते.
कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी – Kojagiri Purnima Information in Marathi
सणाचे नाव | कोजागिरी पौर्णिमा |
कालावधी | संप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये |
इतर नावे | शरद पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा आणि अश्विन पौर्णिमा |
कोजागिरी पौर्णिमेचे महत्व
- या दिवसाबद्दल असे म्हटले जाते कि या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि पृथ्वीवर चंद्राचा प्रखर प्रकाश पडलेला असतो आणि हा प्रकाश शुध्द आणि सात्विक मनाला जातो आणि म्हणून या दिवशी लोक गोड दुध बनवून ते चंद्राच्या प्रकाश्यामध्ये ठेऊन ते पितात. असे म्हटले जाते कि हे दुध पिल्यानंतर आपल्याला अनेक रोगांच्यापासून दूर ठेवले जाते.
- कोजागरी पौर्णिमेविषयी असे मानले जाते कि या दिवसादिवाशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्र मंडळातून बाहेर पडून पृथ्वीवर येते आणि म्हणून काही ठिकाणी या दिवशी हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते.
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते – how to do kojagiri purnima puja in marathi
कोजागिरी पौर्णिमा हि वर्षातून एकदा साजरी केली जाते आणि हि पौर्णिमा संप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये येणारी पौर्णिमा असते आणि याला आश्विन पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. कोजागिरी पौर्णिमा हि संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जाते आणि भारतामधील काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवींचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी गोड दुध बनवून ते चंद्राच्या प्रकाशात थोडावेळ ठेवून मग ते पिले जाते.
या दिवशी कलशाची आणि लक्ष्मी देवीच्या फोटोचे पूजन करतात तसेच काही लोक या दिवशी दिवसभर उपवास देखील करतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे गरम दुधामध्ये साखर, सुका मेवा ( बदाम, पिस्ता, काजू, चारोळ्या, खिसमिस ), वेलदोडा पावडर या सारखे इतर साहित्य घालून दुध बनवतात आणि मग ते चंद्राच्या प्रकाश्यामध्ये ठेवले जाते आणि मग ते थोड्या वेळाने पिले जाते.
कोजागिरी पौर्णिमेविषयी महत्वाची माहिती – kojagiri purnima chi marathi mahiti
- काही ठिकाणी कोजागिरी पूर्णिमेला लोक स्नान करतात त्याचबरोबर नवीन वस्त्र परिधान करतात आणि मग लक्ष्मी देवीचे पूजन करतात आणि दिवसभर व्रत देखील करतात.
- या दिवशी काही लोक चंद्राची देखील पूजा करतात कारण काही लोक असे म्हणतात कि या दिवशी चंद्राची पूजा केली तर घरामध्ये धन आणि अन्नाची कमतरता कधीच भासत नाही.
- भारताच्या काही भागामध्ये कोजागिरी पौर्णिमेदिवशी नवविवाहित मुली आणि अविवाहित स्त्रिया देखील उपवास करतात.
- या पौर्णिमेला कौमुदी पर्णिमा, लोकखी पूजा, शरद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा या नावांनी देखील ओळखले जाते.
- या दिवशी गरम दुधामध्ये साखर, सुका मेवा ( बदाम, पिस्ता, काजू, चारोळ्या, खिसमिस ), वेलदोडा पावडर या सारखे इतर साहित्य घालून दुध बनवतात आणि मग ते चंद्राच्या प्रकाश्यामध्ये थोडावेळ ठेवले जाते त्या दुधामध्ये चंद्र दिसल्यानंतर ते पिले जाते. असे म्हटले जाते कि चंद्राचा प्रकाश हा शुध्द आणि सात्विक असतो आणि चंद्राचा प्रकाश पडलेले दुध पिल्यानंतर लोक आजारी पडत नाहीत असे म्हटले जाते.
- हि पौर्णिमा संप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये असते आणि या काळामध्ये पावसाचे वातावरण जास्त असते त्यामुळे आपल्याला आकाश स्वच्छ आणि सुंदर दिसत नाही परंतु कोजागिरी पौर्णिमेच्या दिवश काश स्वच्छ आणि सुंदर दिसते.
- काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मीची तसेच म्हशीवर बसलेल्या बळी राजाला देखील पूजले जाते आणि घरे, मंदिरे या ठिकाणी दिवे लावले जातात.
- या दिवसाबद्दल असे म्हटले जाते कि या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि पृथ्वीवर चंद्राचा प्रखर प्रकाश पडलेला असतो.
- कोजागिरी पौर्णिमा हि वर्षातून एकदा साजरी केली जाते आणि हि पौर्णिमा संप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीमध्ये येणारी पौर्णिमा असते आणि याला आश्विन पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
- झारखंड आणि बिहार मध्ये या दिवशी कोजागहरा पूजा करतात.
आम्ही दिलेल्या kojagiri purnima information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kojagiri purnima chi marathi mahiti या article मध्ये update करू, मित्रांनो हि what is kojagiri purnima in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये why we celebrate kojagiri purnima in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट