कोरडा खोकला साठी घरगुती उपाय Korda Khokla Upay in Marathi

korda khokla upay in marathi – sukha khokla upay in marathi कोरडा खोकला साठी घरगुती उपाय आज आपण या लेखामध्ये कोरडा खोकला या बद्दल माहिती लिहिणार आहोत. खोकला हा दोन प्रकारचा होतो एक म्हणजे कफ खोकला आणि कोरडा खोकला आणि आता आपण कोरडा खोकला (dry cough) कसा कमी करायचा या बद्दल उपाय पाहणार आहोत. कोरड्या खोकल्याला अनुत्पादक खोकला म्हणून ओळखले जाते आणि या प्रकारचा खोकला स्लेश्मा तयार करत नाहीत त घश्यामध्ये गुदगुल्या झाल्यासारखे होते आणि आपल्याला कोरडा खोकला येऊ शकतो.

सर्दी किंवा फ्लू झाल्यानंतर हा खोकला होतो आणि कोरडा खोकला हा काही वेळा गंभीर असतो तर काही वेळा गंभीर नसतो. कोरोणोच्या काळामध्ये कोरडा खोकला होणे म्हणजे खूप धोक्याचे असते असे मानले जात होते कारण कोरडा खोकला हे एक कोरोनाच्या लक्षणापैकी एक आहे.

जर तुम्हाला कोरडा खोकला आला असेल आणि तो २ ते ३ दिवसामध्ये बरा झाला तर काही काळजी करण्याच्या कारण नसते परंतु कोरडा खोकला दीर्घकाळा टिकला तर आणि खोकल्यासोबत छातीमध्ये घट्टपणा जाणऊ लागला तर हि धोक्याची घंटा मानली जाते आणि अश्या वेळी त्या संबधित व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांना भेट देऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

कोरडा खोकला स्लेश्मा तयार करत नाही आणि स्लेश्मा निर्माण होत नसल्यामुळे फुफ्फुस किंवा वायूमार्गामध्ये कोणताही अडथळा नसल्यामुळे खोकल्यावाटे काहीही बाहेर येत नाही आणि त्या जास्त प्रमाणात संसर्ग होत नाही.

korda khokla upay in marathi
korda khokla upay in marathi

कोरडा खोकला साठी घरगुती उपाय – Korda Khokla Upay in Marathi

खोकला म्हणजे काय ? 

  • खोकला हा आपल्या शरीराची फुफ्फुसे आणि श्वासनलिका स्वच्छ करण्याचा मार्ग आहे ज्यामुळे चांगला श्वास घेण्यास मदत होऊ शकते.
  • खोकला ही एक स्वयंचलित (रिफ्लेक्स) स्नायू क्रिया आहे जी तुमच्या खालच्या श्वासनलिका (फुफ्फुस) आणि वरच्या श्वासनलिका मधून हवा बाहेर काढण्यास भाग पाडते.

कोरडा खोकला म्हणजे काय ? 

कोरडा खोकला स्लेश्मा तयार करत नाही आणि स्लेश्मा निर्माण होत नसल्यामुळे फुफ्फुस किंवा वायूमार्गामध्ये कोणताही अडथळा नसल्यामुळे खोकल्यावाटे काहीही बाहेर येत नाही आणि त्या जास्त प्रमाणात संसर्ग होत नाही.

कोरोनाचे लक्षण म्हणून तुम्हाला कोरडा खोकला झाला असेल तर कोरड्या खोकल्याची लक्षणे – symptoms 

जर तुम्हाला कोरानाचे लक्षण म्हणून कोरडा खोकला झाला असेल तर तुम्हाला आरोग्याविषयी खालील लक्षणे दिसून येतात. चला तर मग कोरड्या खोकल्याची लक्षणे पाहूयात.

  • त्या केसमध्ये तुम्हाला कोरड्या खोकल्यासोबत थंडी वाजून आणि ताप येवू शकतो.
  • चव किंवा वास येत नाही.
  • त्या संबधित व्यक्तीला डोकेदुखी आणि थकवा जाणऊ शकतो.
  • तसेच स्नायू आणि शरीर दुखण्यास सुरुवात होते.
  • घसा खवखवणे आणि कोरडा खोकला होतो.
  • तसेच त्या संबधीत व्यक्तीला मळमळ आणि उलट्या होतात.
  • तसेच त्या संबधित व्यक्तीला धाप लागते किंवा श्वास घेण्यास त्रास होतो.

कोरडा खोकला कमी करण्यासाठी उपाय – remedies for dry cough – sukha khokla upay in marathi

कोरड्या खोकल्याला अनुत्पादक खोकला म्हणून ओळखले जाते आणि या प्रकारचा खोकला स्लेश्मा तयार करत नाही व घश्यामध्ये गुदगुल्या झाल्यासारखे होते आणि आपल्याला कोरडा खोकला येऊ शकतो. कोरडा खोकला हा काही वेळा गंभीर असतो तर काही वेळा गंभीर नसतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी काय काय उपाय आहेत ते आता आपण पाहणार आहोत.

  • कोरडा खोकला असणाऱ्या व्यक्तींनी तुळशी पासून बनवलेला काढा घेतला तर सर्दी कमी होते आणि हा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, तुळशीच्या मंजुळा, तुळशीच्या फांद्या, थोडेसे आले, हळद, २ लवंग, २ ते ३ काळी मिरी, थोडीसी साखर हे सर्व पाण्यामध्ये घाला आणि ते चांगले उकळून घ्या आणि ते चांगले उकळले कि ते गरम असताना गाळा आणि ते गरम गरम पिले कि आपल्याला कोरडा खोकला पासून किंवा घसा खवखवण्यापासून आराम मिळतो.
  • आपल्याला जर कोरडा खोकला झाला असेल तर आपण एक कप गरम पाणी दिवसातून ४ वेळा पिले तर आपला कोरडा खोकला कमी होतो किंवा खोकल्यापासून आराम मिळतो.
  • कोरडा खोकला असल्यामुळे तुम्हाला हायड्रेट राहणे आवश्यक आहे आणि हायड्रेट राहण्यासाठी तुम्हाला सतत लिंबू पाणी किंवा सतत पाणी पिण्याची आवश्यकता आहे.
  • खोकला असणाऱ्या व्यक्तीने धुम्रपान, मध्यपान किंवा सिगारेट ओढणे टाळले पाहिजे कारण यामुळे आणखीन खोकला वाढू शकतो.
  • कोरडा खोकला असणाऱ्या व्यक्तीने लोणचे, स्मोक्ड मीठ, सुकामेवा, चॉकलेट, स्ट्रोबेरी, चरबीयुक्त पदार्थ, परिपक्व चीज आणि आम्लयुक्त पदार्थ खाणे टाळले पाहिजे कारण या प्रकारचे पदार्थ खाल्ल्यामुळे खोकला वाढू शकतो.
  • खोकला कमी हिण्यासाठी तुम्ही रात्रभर तुमच्या तोंडामध्ये लवंग धरा त्यामुळे तुम्हाला रात्री झोपल्यानंतर खोकला येणार नाही आणि हा खोकला कोरडा असो वा कफ खोकला हा उपाय दोन्ही साठी उत्तम उपाय आहे.
  • गाजराचा रस हा सामान्य सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी हा असामान्य घरगुती उपाय उत्तम आहे. हे विचित्र वाटेल परंतु हे मनोरंजक पेय सामान्य सर्दी आणि खोकल्यापासून मुक्त होण्यास मदत करते.
  • खोकला झालेल्या व्यक्तीने जर कच्चे आले चाऊन खाल्ले तर खोकला कमी होऊ शकतो तसेच सुंठ पावडर दुधातून घेतल्यानंतर देखील खोकला कमी होऊ शकतो.
  • कोरडा खोकला असणाऱ्या व्यक्तीने जर रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये एक चमचा हळद आणि मध घालून पिले तर खोकला कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर एक चमचा मधामध्ये हळद मिक्स करून दिवसातून ३ वेळा खाल्ली तर खोकला कमी हिण्यास मदत होत.
  • त्याच बरोबर आले देखील खोकला कमी करण्यासाठी चांगले काम करते आणि आल्याची पेस्ट एका चमचा मधामध्ये मिक्स करून दिवसातून २ वेळा खाल्ली तर आपला खोकला कमी होतो आणि आपल्या घश्याला देखील आराम मिळतो.
  • खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही चहामध्ये किंवा पाण्यामध्ये दालचिन पावडर टाकून ते पाणी किंवा चहा सेवन करा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
  • जर तुम्ही सकाळी कच्ची तुळशीची पाने चावून खाल्ली तरी तुमचा खोकला कमी होऊ शकतो आणि खोकला जलद बारा होण्यासाठी तुम्ही दिवसातून ४ ते ५ वेळा तुळशीचे पाने चावून खा त्यामुळे तुम्हाला फरक जाणवेल.
  • मार्शमॅलो रूट ही एक प्राचीन प्रकारची औषधी वनस्पती आहे जी कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे.

कोरडा खोकला झाल्यानंतर डॉक्टरांना कधी भेटायचे

  • जर एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला झाला असेल आणि हा खोकला ५ ते ६ दिवसानंतर देखील कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  • कोरड्या खोकल्यामुळे तुम्हाला छातीमध्ये दुखत असेल तर लगेच डॉक्टरांना भेट दिली पाहिजे.
  • खोकताना रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांना भेट द्या.
  • जर तुम्हाला खोकताना दम लागत असेल तर तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या korda khokla upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कोरडा खोकला साठी घरगुती उपाय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sukha khokla upay in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि korda khokla gharguti upay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!