लालबागचा राजा इतिहास Lalbaugcha Raja Information in Marathi

lalbaugcha raja information in marathi – history of lalbaugcha  raja in marathi लालबागचा राजा इतिहास आज आपण या लेखामध्ये लालबागचा राजा म्हणजेच लालबागचा गणपती या विषयी माहिती तसेच लालबागच्या गणपतीचा काय इतिहास आहे ते पाहणार आहोत. मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील शहरांच्यामध्ये अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत त्यामधील एक प्रसिध्द आणि लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ जे मुंबई मध्ये आहे ते म्हणजे लालबागचा राजा. लालबागचा राजा हे त्या मंडळाच्या गणपतीचे नाव आहे आणि हा गणपती खूप प्रसिध्द आहे आणि असे म्हणतात कि लालबागचा राजा हा गणपती नवसाला पावणारा गणपती आहे म्हणजेच आपण या गणपतीकडे काही मागितले तर आपली इच्छा लगेच पूर्ण होते.

लालबगचा राजा हा गणपती दरवर्षी गणेश चतुर्थीला बसवला जातो आणि दरवर्षी या गणपतीचे दर्शन घेण्यास मुंबई मधील लोक देखील जातात आणि बाहेरील लोक भाविक देखील जातात त्यामुळे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते. हा गणपती २० फुटी उंचीचा आहे आणि हा गणपती गणेश चतुर्थीला मध्ये अनंत चर्तुर्थी पर्यंत बसवला जातो.

लालबागच्या राज्याची स्थापना १९३४ पासून करण्यात आली म्हणजेच लालबागचा गणपती हा १९३४ पासून बसवण्यात आला आणि तो आजपर्यंत अगदी भक्ती भावाने बसवला जातो. या गणपती बद्दल हे म्हटले जाते कि लालबागचा गणपती हा कोळी समाज्याला नवसाला पावलेला गणपती म्हणून ओळखले जाते. चला तर आता आपण खाली लालबागच्या राज्याविषयी खाली आणखीन माहिती घेवुया.

lalbaugcha raja information in marathi
lalbaugcha raja information in marathi

लालबागचा राजा इतिहास – Lalbaugcha Raja Information in Marathi

मंडळाचे  नावलालबागचा राजा
स्थापनाइ.स १९३४
कोणी स्थापन केलकोळी आणि व्यापारी बंधू
ओळखनवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राज्याची ओळख आहे.
गणपतीच्या मूर्तीची उंची२० फुट

लाल बागच्या राज्याची कथा – history of lalbaugcha raja in marathi

लाल बागाच्या राजाची स्थापना हि १९३४ मध्ये झाली आणि या मागे अशी कथा आहे कि सध्या ज्या ठिकाणी मार्केट आहे त्या ठिकाणी मार्केट निर्माण होण्यासाठी मुंबईच्या कोळी आणि व्यापारी लोकांनी नवस केला होता आणि असे घडले कि त्याचा हा नवस पूर्ण झाला आणि पेरूचाळ येथे उघड्यावर भरणारा बाजार हा बंद झाला आणि आता आहे.

त्या ठिकाणी बाजार भरवण्यासाठी शेड बांधण्यात आले आणि ते १९३२ मध्ये बांधण्यात आले आणि हे बांधण्यासाठू भाऊसाहेब शिंदे, डॉ. व्ही.बी कोरगांवकर, जेठाभाई शहा नाकवा कोकम मामा या सारख्या अनेक लोकांच्या प्रयत्नाने आणि त्या ठिकाणी बाजार इमारत बांधण्यासाठी रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा दिली.

इ.स १९३४ मध्ये होडी वल्हवनाऱ्या दर्यासागारांच्या रुपात श्रींची स्थापना झाली आणि मग या गोष्टीविषयी जसे जसे लोकांना समजू लागले कि हा गणपती नवसाला पावतो त्यामुळे या गणपतीचे दर्शन घेण्यास लोकांची गर्दी होऊ लागली. तसेच हा गणपती दिवसेंदिवस लालबागचा गणपती म्हणून प्रसिध्द होऊ लागला.

लालबागच्या राजाच्या मंडळातर्फे लोकांना कशी मदत केली जाते ?

लालबागच्या राज्याचा दरवर्षी गणेशोत्सव खूप धुमधडाक्यात तसेच भक्तीभावाने देखील केला जातो आणि या मंडळातर्फे नेत्र तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच अनेक आरोग्य शिबिरे देखील आयोजित केली जातात. तसेच मंडळातर्फे अनेक वेगवेगळी व्याख्याने देखील आयोजित केली जातात. तसेच सध्याच्या काळात लोकांना पुराला खूप तोंड ध्यावे लागले आणि हेच लक्षात घेऊन लालबागच्या मंडळाने पूरग्रस्त लोकांना मदत म्हणून २५ लाख रुपये निधी हि पूरग्रस्तांना देण्यात आली आणि हि मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत देण्यात आली.

लालबागच्या राज्याविषयी महत्वाची माहिती – important information about lalbaugcha raja 

  • सार्वजनिक गणेशोत्सव सुरु होण्याअगोदर लालबागच्या राज्याची स्थापना झाली होती.
  • त्या काळी श्रींची वेगवेगळ्या स्वरूपातील मुर्ती बसवण्यात आली होती म्हणजेच त्या काळी नेत्यांच्या रूपातील श्रीची मूर्ती बसवण्यात अलीहोती जसे कि सुभाष चंद्र बोस यांच्या वेषातील मूर्ती तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेषातील मूर्ती तसेच गांधीजी यांच्या वेषातील मूर्ती बसवण्यात येत होती पण सध्या सिंहासनावर बसलेली मूर्ती दरवर्षी बसवण्यात येते आणि या प्रकारची मूर्ती लालबागची मूर्ती म्हणून लोकप्रिय झाली आहे.
  • लालबागच्या राजाची मिरवणूक कि भव्य मिरवणूक असते आणि बँड, लेझीम आणि ढोलताश्यांच्या जाल्लोश्यामध्ये हि मिरवणूक काढली जाते आणि हि मिरवणूक लालबाग, सानेगुरुजी, क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, भायखळा रेल्वे स्थानक, सुतार गल्ली, माधाबग, व्ही.पी रोड आणि मग शेवटी गिरगाव चौपाटीला जातो.
  • लालबागचा राजा हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो आणि आज देखील हा गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या गणपतीला खूप गर्दी असते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भाविकांच्या गणपती उत्सवामध्ये रांगा लागलेल्या असतात.
  • लालबागच्या राज्याची स्थापना हि १९३४ मध्ये झाली म्हणजेच लालबागचा राजा हा गणपती १९३४ पासुन बसवण्यात आला आणि हा गणपती कोळी आणि व्यापारी बंधूनी आपला नवस पूर्ण झाल्यानंतर बसवला.
  • लालबागच्या राज्याची मूर्ती हि दरवर्षी सिंहासनावर बसलेली मूर्ती असते आणि या मूर्तीच्या चेहऱ्यामध्ये कोणताही फरक नसतो आणि हि मूर्ती दरवर्षी २० फुट उंचीची असते.
  • लालबगचा राजा हा सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करतो आणि नवसाला पावतो असे म्हटले जाते आणि म्हणून अनेक भाविक लोक गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात आणि भाविक मुंबई मधील देखील असतात आणि मुंबईच्या बाहेरील असतात. काहीजन खूप दूर दूर हून लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात.

आम्ही दिलेल्या history of lalbaugcha raja in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लालबागचा राजा इतिहास व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lalbaugcha raja information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि lalbaugcha raja story in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lalbaugcha raja history in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!