Lapsi Recipe in Marathi लापशी रेसिपी मराठी लापशी हा पदार्थ काय आहे हे बहुतेक लोकांना माहित नाही पण हा एक गोड पदार्थ आहे जो मोठ्या मोठ्या गव्हाच्या पिठापासून बनवला जातो म्हणजेच आपण याला सुजी म्हणू शकतो आणि हा पदार्थ महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये जरी मोठ्या प्रमाणात बनवला जात असला तरी हा पदार्थ भारतामध्ये काही इतर ठिकाणी देखील बनवला जातो. या पदार्थाबद्दल असे म्हंटले जाते कि हा एक पारंपारिक पदार्थ आहे म्हणजेच हा खूप पूर्वीच्या काळापासून बनवला जातो आणि हा पदार्थ बनवण्यास खूप सोपा आहेच परंतु हा पदार्थ तितकाच पौष्टिक देखील आहे.
आपण हि लापशी रेसिपी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम बनवून खावू शकतो. ज्या लोकांना गोड आणि महाराष्ट्रीयन डिश खाण्यासाठी आवडतात ते लोक हि रेसिपी बनवू शकतात आणि हि रेसिपी लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्यापर्यंत सर्वांच्यासाठी एक उत्तम रेसिपी आणि आणि हि रेसिपी खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच २५ ते ३० मिनिटामध्ये बनते आणि हि बनवण्यासाठी देखील खूप कमी साहित्य लागते.
हि रेसिपी आपण कोणतेही उत्सव साजरे करताना किंवा काही सणांना केली जाते. चला तर आता आपण लापशी हि पौष्टिक रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.
लापशी रेसिपी मराठी – Lapsi Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती |
बनवण्याची पध्दत | सोपी |
- दलिया : लापशी बनवण्यासाठी दलिया हे महत्वाचा घटक आहे जे गव्हापासून मोठे मोठे रव्यासारखे पाडले जाते ज्याला महाराष्ट्रामध्ये सुजी म्हणून देखील ओळखले जाते आणि ते गुळ आणि इतर साहित्य वापरून बनवले जाते.
- गुळ : लापशी मध्ये वापरला जाणारा गुळ देखील या पदार्थातील मुख्य घटक आहे आणि या पदार्थामध्ये खिसून गुळ घातल्यामुळे तो लगेच विरघळतो आणि त्यामुळे पदार्थाला गोडपणा देखील येतो.
- ड्राय फ्रुट्स : या पदार्थामध्ये काजू, बदाम आणि आणि बेदाणे हे ड्राय फ्रुट्स वापरले जातात.
लापशी कशी करायची – how to make lapsi in marathi
लापशी रेसिपी हि एक महाराष्ट्रीयन पारंपारिक गोड आणि आणि पौष्टिक डिश आहे जी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. लापशी रेसिपी हि काही भागामध्ये सणांना आणि उत्सवांना बनवली जाते तसेच हि रेसिपी उत्तर भारतामध्ये होळीच्या सणाला देखील बनवली जाते. चला तर आता आपण हि खूप सोपी आणि झटपट बनणारी लापशी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती |
बनवण्याची पध्दत | सोपी |
लापशी रेसिपी बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते आणि जे साहित्य लागते ते काही वेळा लापशी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते तर काही वेळा ते साहित्य उपलब्ध नसते त्यावेळी ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. चला तर आता आपण लापशी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी दलिया ( गव्हाचा पडलेला मोठा मोठा रवा ).
- ३ वाटी पाणी.
- १ वाटी गुळ ( खिसलेला ).
- २ ते ३ चमचे तुप.
- २ चमचे बदाम तुकडे.
- १ चमचे काजू तुकडे.
- १ चमचा बेदाणे.
- १/२ चमचा वेलची पावडर.
आता आपण वर दिलेले साहित्य वापरून लापशी कशी बनवायची ते पाहूयात.
- लापशी बनवताना सर्वप्रथम दलिया स्वच्छ निवडून घ्या आणि मग तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे करून ते देखील बाजूला ठेवा.
- मग गॅसवर मध्यम आचेवर एक भांडे ठेवा आणि ते गरम झाले कि त्यामध्ये २ चमचे तूप घाला आणि ते गरम झाले कि त्यामध्ये प्रथम काजूचे तुकडे टाका आणि ते चांगले लालसर होईपर्यंत भाजा आणि ते भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवा.
- आता त्यामध्ये काजू घाला आणि ते देखील भाजून घ्या आणि बेदाणे देखील तुपामध्ये परतवून घ्या आणि मग ते बाजूला काढून ठेवा.
- आता या भांड्यामध्ये आणखी थोडे तूप घाला आणि मग त्यामध्ये दलिया घालून ते ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर चांगले परतून किंवा भाजून घ्या ( दलिया भाजताना तो करपणार नाही याची काळजी घ्या ). ( भाजल्यानंतर गॅस बंद करा )
- आता ते दुसरीकडे एका भांड्यामध्ये ३ वाटी पाणी गया आणि ते मध्यम आचेवर उकळण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये गुळ घाला आणि तो थोडा विरघळू द्या मग गुळ विरघळला कि त्यामध्ये भाजलेला दलिया घाला आणि मिक्स करा.
- त्यानंतर लगेचच यामध्ये वेलची पावडर आणि तळलेले ड्राय फ्रुट्स घाला आणि मिक्स करा.
- आणि ते झाकण लावून चांगले शिजवून घ्या.
- ते मऊ शिजले कि आपली लापशी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
लापशी कश्यासोबत खावी – serving suggestions
लापशी सर्व्ह करतेवेळी ती गरमागरम तुपासोबत सर्व्ह करावी. लापशी हि रेसिपी आपण आठवड्यातून एकदा खाल्ली तर ते आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे.
आम्ही दिलेल्या lapsi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर लापशी रेसिपी मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या lapsi rava kheer recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gavachi lapsi recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये lapsi recipe in marathi by madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट