लिंबू लोणचे रेसिपी मराठी Limbu Lonche Recipe in Marathi

Limbu Lonche Recipe in Marathi – Limbache Lonche Recipe in Marathi लिंबूचे लोणचे रेसिपी भारतातील ग्रामीण भागामधील स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणारे वेगवेगळे पदार्थ बनवतात जसे कि आवळा कॅन्डी, आंब्याचे लोणचे, आवळा मुरांबा, कच्च्या कैरीचा गुळांबा, पापड, यासारखे अनेक पदार्थ बनवून ठेवतात जेणेकरून ते वर्षभर आपल्याला जेंव्हा खावू वाटतात त्यावेळी खाता येईल. तसेच ग्रामीण भागातील स्त्रिया वेगवेगळे लोणच्याचे प्रकार देखील बनवतात जसे कि आंबा लोणचे, लिंबू लोणचे, माईन मुळा लोणचे, गाजर लोणचे, हिरव्या मिरचीचे लोणचे यासारखे लोणची बनवली जातात आणि आज आपण या लेखामध्ये लिंबूचे लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

लिंबूचे लोणचे हे घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि हे बनवण्यासाठी लिंबू, मीठ, साखर आणि तिखट हे महत्वाचे साहित्य लागते आणि लिंबूचे लोणचे बनवताना सर्वप्रथम लिंबू चांगले धुवून ते कापडाने पुसून कोरडे करून घेतले जातात आणि मग त्याच्या फोडी करून त्यामधील बिया काढल्या जातात आणि त्याला मीठ आणि तिखट लावून ते चांगले मिक्स करून ते एक बरणीमध्ये भरून ठेवले जाते

आणि मग काही दिवसांनी ते काढून त्यामध्ये पाक घालून मिक्स केले जाते आणि परत बरणीमध्ये भरून ठेवले जाते. लिंबूचे लोणचे घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण लिंबूचे लोणचे कसे बनवायचे ते पाहूयात.

limbu lonche recipe in marathi
limbu lonche recipe in marathi

लिंबू लोणचे रेसिपी मराठी – Limbu Lonche Recipe in Marathi

तयारीसाठी लागणार वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे ( परंतु हे लोणचे पाक घालण्याच्या अगोदर ७ ते ८ दिवस आणि साखरेचा पाक घातल्यानंतर ३ महिने मुरवले जाते ).
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

लिंबूचे लोणचे कसे बनवतात – limbache lonche recipe in marathi

बनवण्यासाठी लिंबू, मीठ, साखर आणि तिखट हे महत्वाचे साहित्य लागते आणि लिंबूचे लोणचे बनवताना सर्वप्रथम लिंबू चांगले धुवून ते कापडाने पुसून कोरडे करून घेतले जातात आणि मग त्याच्या फोडी करून त्यामधील बिया काढल्या जातात आणि त्याला मीठ आणि तिखट लावून ते चांगले मिक्स करून ते एक बरणीमध्ये भरून ठेवले जाते आणि मग काही दिवसांनी ते काढून त्यामध्ये पाक घालून मिक्स केले जाते आणि ते परत थोडे दिवस मुरवले जाते.

लिंबू लोणचे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients

  • लिंबू : लिंबूचे लोणचे बनवण्यासाठी लिंबू हा घटक महत्वाचा आहे. लिंबूचे लोणचे बनवताना लिंबूच्या फोडी बनवल्या जातात आणि त्यामधील बिया काढून त्याला मीठ आणि तिखट लावून मुरवले जाते आणि मग त्या फोडी पाकमध्ये घातल्या जातात आणि मुरवल्या जातात.
  • साखर : लिंबूचे लोणचे गोड बनवण्यासाठी त्यामध्ये साखर तशीच किंवा साखरेचा पाक घातला जातो.

लिंबूचे लोणचे रेसिपी – lemon pickle recipe 

idlimbu lonche recipe in marathi लिंबूचे लोणचे हि एक पारंपारिक डिश आहे जी भारतामध्ये खूप पूर्वीपासून बनवली जाते आणि हि रेसिपी आपण एकदा बनवली कि वर्षभर टिकवून ठेवू शकतो आणि आपल्याला जेंव्हा हवी आहे त्यावेळी खावू शकतो. लिंबूचे लोणचे रेसिपी घरी बनवण्यास खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण लिंबूचे लोणचे कसे बनवायचे आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणार वेळ१० मिनिटे
बनण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे ( परंतु हे लोणचे पाक घालण्याच्या अगोदर ७ ते ८ दिवस आणि साखरेचा पाक घातल्यानंतर ३ महिने मुरवले जाते ).
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाभारतीय
बनवण्याची पध्दतखूप सोपी

लिंबूचे लोणचे रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make lemon pickle recipe 

लिंबू लोणचे बनवण्यासाठी लिंबू आणि साखर हे मुख्य साहित्य लागते आणि लोणचे बनवण्यासाठी लागणारी साखर आणि इतर साहित्य आपल्या घरामध्ये आधीपासून उपलब्ध असते आणि जर नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. लिंबू लोणचे बनवण्यासाठी बाजारातून आणलेले ताजे लिंबू वापरा.

  • ६ ते ७ लिंबू.
  • २ वाटी साखर.
  • अर्ध्या वाटीला कमी लाल मिरची पावडर.
  • १ ते दीड मोठा चमचा मीठ.

लिंबूचे लोणचे रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make lemon pickle recipe 

लिंबू लोणचे हि रेसिपी एक पारंपारिक रेसिपी आहे जी खूप पूर्वीपासून बनवली जाते आणि आजही हि रेसिपी त्याच आवडीने बनवली जाते आणि खाल्ली देखील जाते. चला तर मग आता आपण वर दिलेले साहित्य वापरून लिंबू लोणचे कसे बनवायचे ते पाहूयात.

  • लिंबूचे लोणचे बनवताना सर्वप्रथम लिंबू चांगले धुवून ते कापडाने पुसून कोरडे करून घेतले जातात.
  • मग त्याच्या तुम्हाला हव्या तश्या आणि एका लिंबूच्या जितक्या मध्यम आकाराच्या फोडी बनतात तितक्या फोडी करून घ्या आणि त्यामधील बिया काढून घ्या.
  • मग ह्या फोडी एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ घाला आणि हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण चांगले मिक्स झाले कि हे एका बरणीमध्ये काढून त्याला गच्च झाकण लावून ते ७ ते ८ दिवस मुरवत ठेवा.
  • ७ ते ८ दिवसांनी हे लोणचे एका भांड्यामध्ये काढा आणि मग दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा किलो साखर आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला आणि ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवून चमच्याने सतत ढवळत राहून त्यामधील साखर विरघळून घ्या आणि त्याचा थोडा घट्ट पाक बनवून घ्या आणि गॅसबंद करा.
  • पाक थोडा गार झाला कि त्यामध्ये लिंबूचे लोणचे घाला आणि ते मिक्स करा आणि ते परत बरणीमध्ये घालून ठेवा.
  • लिंबू लोणचे तयार झाले. हे लोणचे चांगले मुरण्यासाठी कमीत कमी तीन महिने तरी लागतात.

लिंबू लोणचे कश्यासोबत खातात – serving suggestions

  • लिंबू लोणचे आपण बनवून ठेवून ते आपण केंव्हाही तसेच तोंडी लावून किंवा चपाती सोबत किंवा भातासोबत खावू शकतो.

टिप्स (Tips) 

  • जर तुम्हाला पाक जास्त आवडत नसेल तर ज्यावेळी आपण लाल तिखट आणि मीठ मिक्स करतो त्यावेळीच साखर मिक्स करून लोणचे मुरु द्यावे.
  • लिंबूच्या लोणचच्या मध्ये फोडी घालण्याऐवजी आपण लीम्बुचा खीस देखील घालून लोणचे बनवू शकतो.

आम्ही दिलेल्या limbu lonche recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर लिंबू लोणचे रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या limbache lonche recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि limbache mirchi lonche recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये limbache god lonche recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!